छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भाषण | 19 फेब्रुवरी भाषण मराठी
करून तांडव जिंकू आम्ही दिल्लीचे तक्त कोण आम्हास अडवणार आम्ही जन्मताच शिवभक्त..छाती ठोकून सांगतोय शिवबांचा मावळा
नाव शिवशंकर तो कैलास पती. नाव लंबोदर तो गणपती नतमस्तक तया चरणी ज्याने केली स्वराज्य निर्मिती.
देव माझा तो एकच शिवछत्रपती
माझ्या राजाचं एकही मंदिर नाही परंतु त्यांचं नाव घेतल्यावर प्रत्येक जण त्यांच्यासमोर नथमस्तक झाल्याशिवाय राहत नाही कारण माझा राजा कोण्या मंदिरात राहत नाही तर प्रत्येकाच्या मनात आणि हृदयात राहतो आहे.
अरे नुसता गर्वच नाही तर माज आहे माज मला मी शिवभक्त असल्याचा जगात भारी (19) फेब्रुवारी.
19 फेब्रुवारी 1630 म्हणजे स्वराज्य संस्थापक शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस.
आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आणि एकनिष्ठ स्वराज्यासाठी जीवाला जीव देणाऱ्या गोरगरीब मावळ्यांच्या साथीने अन सह्याद्रीच्या प्रत्यक्ष साक्षीने शिवछत्रपती शिवरायांनी हे अलौकिक, अपराजित, राकट आणि काटक स्वराज्य उभं केलं स्वराज्य स्थापन करणं ही श्रींची इच्छा होती. प्रथम तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. प्रजेतील रयतेवर अन्याय व अत्याचार करणाऱ्यांचा चौरंग केला जायचा जसा रांझी गावच्या पाटलाचा केला तसा. मित्रांनो वेळ आली आहे अन्यायविरोधात एकत्र होण्याची आज माझे राजे असते तर कोणाची हिम्मत झाली नसती परिस्थितीकडे वाकड्या नजरेने बघण्याची.
तलवार तर सगळ्यांच्याच हातात होती ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती
छत्रपती शिवरायांनी जगण्याची उमेद आणि स्वातंत्र्यासाठी झगडण्याचा आत्मविश्वास आपल्यात निर्माण करून दिला प्रत्येक संकटाच्या वेळी शिवराय सर्वांच्या सोबत असत. अफजलखानाची भेट, शाहिस्तेखानाची फजिती, पन्हाळ्यावरून सुटका असे अनेक प्रसंग आहेत लाख मेल तर चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे ही भावना त्या कालच्या लोकांची होती पण आज लाख मेल तर चालतील पण माझी सत्ता राहिली पाहिजे ही भावना आजकालच्या लोकांची आहे. आजची स्वार्थी मतलबी राजकारण पाहून शिवराय नक्की म्हणाले असते नका करू जात-पात प्रांताची भेद पाडू तसे होत असेल तर मी तेही मोडीत काढू होऊन एक नातेगोते सुखी करावी प्रजा शिवकाळासारखा जीवाला जीव देऊन विकास करावा तोच खरा जाणता राजा तोच खरा जाणता राजा .
तीनशे किलोमीटर भिंत बांधायला 150 वर्षे लागतात पण शिवरायांनी पन्नास वर्षाच्या कालावधीत जे काही किल्ले बांधले त्याची लांबी रुंदी चार-पाच हजार किलोमीटर तर नक्कीच भरेल चीनच्या भिंतीला आपण जगातले सर्वात मोठे आश्चर्य मानतो तर मित्रांनो हे काय आहे .
ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात किंवा बोलल्याने अंगात ऊर्जा का निर्माण होते अरे मित्र म्हणेन की खरे संशोधन श्री छत्रपती शिवाजी महाराजा नावाच्या उच्चारावरच करायला हवे कारण हे नाव उच्चारताच अंगावर काटा येतो छाती अभिमानाने फुलून येते हृदयाचे ठोके वाढतात . हे सर्व काही घडतं ते छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा उच्चारण. थरथरणारे हात ही स्थिर होऊन समशेर धरून पाहतात विजेत चाललेल्या नेत्रात ही स्वातंत्र्याची जीबी उमटते हे सर्व काही घडतं ते छत्रपती शिवाजी महाराज या नावाचा उच्चारण
मित्रांनो जगात सर्व काही आहे 12 महिने 11 खेळाडू दहा बोटे नवग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा शास्त्र पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त आणि फक्त एकच म्हणजे शिवबा मराठी म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर कॉलर ताट करून अभिमानाने सांगा मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेले म्हणजे मराठे सूर्यनारायण उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता पण शिवरायांचा जन्मच झाला नसता तर हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट ऑफ गुरु हा शंभर मार्काचा पेपर घेतला जातो अनेक राष्ट्रातही आदर्श शिवछत्रपतींचा इतिहास शिकवला जातो पण आमचं दुर्दैव एवढंच की आमच्याकडे शिवछत्रपतींचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला. जातो.मित्रांनो गर्व असेल छत्रपती शिवरायांच्या भूमीत जन्म घेतल्याचा तर आदर्श ठेवा शिवछत्रपतींचा कारण माझा राजा कोण्या धर्माविरुद्ध नव्हता तर तो फक्त अन्यायाविरुद्ध होता. म्हणून जगाच्या इतिहासात जास्त ओढ नाही अशी सहसा ची कृती त्यांच्या हातून घडली पुष्कळ प्रसंगी शिवराय शौर्य पेक्षा युक्तीमतेच्या जोरावर यशस्वी ठरले ही युक्ती मत्ता जर त्यांच्या अंगी नसती तर आज मराठ्यांचा इतिहास लिहिण्याचा योगच आज आला नसता महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतल्याबरोबर बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी ,येसाजी कंक, तानाजी मालुसरे, हंबीरराव मोहिते असे अनेक महाप्रतापी शूरवीर शिवरायांच्या कार्यात सहभागी झाले आज प्रत्येकाला वाटतं शिवबा जन्माला आला पाहिजे पण तो दुसऱ्याच्या घरात जर शिवबा घडवायचा असेल तर त्यासाठी जिजाऊ घडली पाहिजे आणि शहाजीच्या मनामध्ये ही आज ठसली पाहिजे तुमचं चरित्र वाचायला फार छान वाटतं पण काहींना पत्नी पडताना दिसत नाही शिवरायांच्या ठाई कल्पकता तेजस्विता याप्रतिम गुण असल्यामुळे आज जगाच्या कानाकोपऱ्यात शिवरायांचे नाव अजरामर झाले आहे विद्वानांचा ते आदर करत होते थट्टा मस्करी विनोद यांचा त्यांना तितकारा होता स्त्री जाती विषयी मनात आदराची वागणूक होते ते स्पष्ट वक्ते धर्मा अभिमानी न्यायप्रिय अन्य धर्मीयांचा आदर करणारे कठोर शासक श्रीमंतयोगी , नितिवंत, बुद्धिमंत, कलावंत, सामर्थ्यवंत, व परस्त्रीला माते समान मानणारे इतिहासातील एकमेव व्यक्तिमत्व श्री जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज
400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेले निरागस बाळ म्हणजे शिवबा राजनीति युद्धनीती गनिमी कावा यांसारख्या कुठे शस्त्रांचा कळस म्हणजे शिवबा एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप