Pseudo code म्हणजे काय ( what is pseudo code in marathi ) हा कोणत्याही समस्येवर समाधान मिळवण्यासाठी तयार केलेला पूर्वनियोजित कोड असतो. यामध्ये आपल्याला ज्या समस्येवर तोडगा काढायचा आहे त्याच्या solution बद्दल रूपरेखा (plan) तयार केली जाते. याला प्रोग्रामिंग भाषेत pseudo code असे म्हटले जाते.
हा बहुतेक कंप्युटर प्रोग्राम लिहिण्यापूर्वी त्याची रूपरेखा (planning) तयार करण्यासाठी तयार केलेला स्टेप बाय स्टेप कोड असतो. यामध्ये त्या समस्येचा स्टेप बाय स्टेप तोडगा सोप्या भाषेत मांडलेला असतो. नंतर याच pseudo कोड पासून वास्तविक कंप्युटर प्रोग्राम तयार केला जातो.
या पोस्टमध्ये आपण याच प्सूडो कोड बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. Pseudo कोड म्हणजे काय ( what is pseudo code in marathi) तसेच pseudo code examples, features, advantages, disadvantages, in marathi.
Contents
Problem solving strategies : pseudo code information in marathi
तुम्हाला तर माहीतच असेल की संगणक मनुष्य ज्या भाषा बोलतो त्या समजत नाही. म्हणून संगणक सोबत जर संवाद साधायचा असेल तर त्याच्यच भाषेत म्हणजे programming language मध्ये संवाद साधावा लागतो.
तसेच संगणाकाकडून जर एखादे कार्य करून घ्यायचे असेल किंवा त्याला सूचना द्यायची असेल तर त्याच्याच भाषेत म्हणजे प्रोग्रामिंग भाषेत कोड लिहावा लागतो आणि त्याला program असे म्हटले जाते.
तुम्हाला जर program म्हणजे काय माहिती नसेल तर तुम्ही या लिंक वर क्लिक करून अगोदर ती पोस्ट वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला pseudo code mhanje kay लगेच समजेल.
काही प्रोग्राम हे फार मोठे आणि कठीण लॉजिक असणारे असतात. त्यामुळे असे मोठे आणि कठीण लॉजिक (complex logic ) असणारे प्रोग्राम तयार करण्यासाठी सुरूवातीला त्यांची रूपरेखा तयार करणे गरजेचे असते. त्या प्रोग्राम चा लॉजिक अगोदर कच्च्या भाषेत लिहिणे गरजेचे असते. कारण वास्तविक प्रोग्राम लिहिताना कुठलीही चूक होऊ नये आणि लवकर प्रोग्राम तयार व्हावा. त्यांना problem solving strategies असे म्हटले जाते.
Types of problem solving strategies :
- Algorithm
- Flowchart
- Pseudo code
What is pseudo code in marathi – pseudo code म्हणजे काय ?
Psuedo कोड ही एक problem solving stratigy आहे जी की कंप्युटर प्रॉब्लेम solve करण्यासाठी उपयोगात आणली जाते.
Pseudo code चा मुख्य हेतू असतो की वास्तविक प्रोग्राम तयार करण्यापूर्वी त्याचा प्रोग्राम लॉजिक अगोदर कच्च्या भाषेत लिहिला जातो. जेणेकरून प्रोग्राम तयार करताना कुठलीही चूक होऊ नये.
यामध्ये print, add, sum, input, output सारखे प्रोग्रामिंग मधील शब्द देखील वापरले जातात जेणे करून प्रोग्रामर ला लिहिलेले program logic लवकर समजले जावे. तसेच यामध्ये flowchart सारखे वर्तुळ, आयात, सर्कल यासारख्या चिन्हांचा वापर देखील केला जात नाही.
Pseudo कोड हा अगदी सोप्या भाषेत लिहिला जातो व तो लिहिण्यासाठी कुठल्याही प्रोग्रामिंग भाषेची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या कोणत्याही मराठी, हिंदी, इंग्रजी बोली भाषेत हा pseudo code लिहू शकता. तसेच यासाठी विशेष प्रोग्राम ची देखील आवश्यकता नाही तुम्ही अगदी कागदावर देखील हा pseudo कोड लिहू शकता.
Features of pseudo code in marathi
Pseudo कोड चे खालीलप्रमाणे काही वैशिष्ट्ये आहेत :
- Pseudo कोड हे अगदी सोप्या भाषेत म्हणजे साधारण इंग्रजी भाषेत लिहिलेले असतात. त्यामुळे हे कोड प्रोग्रामर द्वारा अगदी सहजपणे कोणत्याही प्रोग्रामिंग भाषेत रुपांतरीत केले जाऊ शकतात.
- Pseudo कोड हे बहुदा कंप्युटर प्रोग्राम च्या लॉजिक संबंधित माहिती देणारे असतात त्यामुळे ते कठीण व जटिल प्रोग्राम तयार करण्यासाठी अतीआवश्यक असतात.
- Pseudo कोड ला इंग्रजी भाषेत अशा प्रकारे लिहिले जाते की जेणेकरून त्यापासून अतिशय जलद गतीने व सोयीस्करपणे प्रोग्राम सोर्स कोड तयार करता येईल.
- Pseudo code हा प्रोग्राम तयार करण्याच्या लगेच अगोदर बनवला जातो त्यामुळे pseudo कोड ला प्रोग्राम चा आरसा देखील म्हटले जाते.
pseudo कोड चे फायदे (advantages of pseudo code)
- Pseudo कोड हा इंग्रजी भाषेत तयार केलेला असल्यामुळे तो प्रोग्रामर ला खूप लवकर समजतो.
- Pseudo कोड मध्ये प्रोग्राम चे लॉजिक अशा प्रकारे लिहिलेले असते की ते प्रोग्रामर ला अगदी सहजपणे कोणत्याही प्रोग्रामिंग भाषेत रुपांतरीत करता येते.
- Pseudo कोड लिहिण्यासाठी कंप्युटर किंवा मोबाईल ची आवश्यकता नसते. तुम्ही अगदी कागदावर देखील हा कोड लिहू शकता फक्त तुम्ही जो लॉजिक त्या pseudo कोड मध्ये लिहिताय ते योग्य असायला हवा व त्यापासून अपेक्षित परिणाम मिळायला हवेत.
- Pseudo कोड मुळे प्रोग्राम अतिशय जलद गतीने लिहिला जातो व त्यामुळें चुका पण फार कमी होतात.
pseudo कोड लिहिण्याचे नुकसान :
- प्रत्येक प्रोग्राम साठी pseudo कोड तयार करणे फायद्याचे नसते. यामुळे प्रोग्राम लिहिण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो.
- Pseudo कोड लिहिणे हे केवळ कठीण व जटिल प्रोग्राम ( hard and complex program ) साठीच फायदेशीर असते.
- तसेच pseudo कोड लिहिताना चुका झाल्या तर प्रोग्राम देखील चुकतो. प्रोग्राम पासून देखील अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.
निष्कर्ष :
मित्रांनो pseudo code हे संगणकीय विज्ञान क्षेत्रात शिक्षण घेणाऱ्या आणि प्रोग्रामिंग शिकण्यात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांनी जाणून घेणे हे फार महत्त्वाचे असते. कारण त्यांना प्रोग्राम तयार करण्यासाठी नक्कीच या pseudo कोड ची गरज भासत असते.
म्हणूनच मी या पोस्टमध्ये तुम्हाला pseudo कोड म्हणजे काय ( what is pseudo code in marathi) याबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला. मला अशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल आणि तुमच्या साठी फायदेशीर देखील ठरेल.
माझा या पोस्टमध्ये उद्देश एवढाच होता की तुम्हाला pseudo कोड म्हणजे काय ( what is pseudo code in marathi) याबद्दल सविस्तर माहिती द्यावी, धन्यवाद…!