What is programming in marathi – प्रोग्रामिंग ही एक अशी पद्धत आहे ज्याद्वारे आपण कंप्युटर किंवा मग एखाद्या इलेक्ट्रॉनिक यंत्राला सूचना देऊ शकतो. त्यांच्याकडून हवं ते काम करून घेण्यासाठी त्यांना आज्ञा, आदेश देऊ शकतो. प्रोग्रामिंग मध्ये कंप्युटर किंवा मग इलेक्ट्रॉनिक यंत्र जसे की टेलिव्हिजन, फ्रीज, वॉशिंग मशीन, इत्यादींना दिल्या जाणाऱ्या सूचना , आदेश हे programming languages मध्ये लिहिलेले असतात.
Contents
- 1 What is programming in marathi – प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय?
- 2 Programming म्हणजे काय – what is programming in marathi
- 3 प्रोग्रामिंग भाषा म्हणजे काय – what is programming language in marathi
- 4 Programming languages चे प्रकार – types of programming languages
- 5 Programming languages चे काही अन्य प्रकार ( Types of programming languages based on purpose)
- 6 Programming कशी शिकावी ?
- 7 Programming शिकण्याचे फायदे आणि उपयोग:
What is programming in marathi – प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय?
कंप्युटर आणि इतर सर्व इलेक्ट्रॉनिक यंत्र हे या प्रोग्रामिंग च्याच मदतीने त्यांचे कार्य करतात. तुमच्याही मनात शंका असेल की कंप्युटर काम कसे करतो? तर त्यासाठी सर्वात महवात्वाचा घटक कारणीभूत आहे तो म्हणजे प्रोग्राम.
त्यामुळे तुम्हाला जर कंप्युटर व इतर इलेक्ट्रॉनिक यंत्रांचे कार्य समजून घ्यायचे असेल तर तुम्हाला अगोदर प्रोग्रामिंग काय असते? माहिती असणे गरजेचे आहे. तुम्ही जर programming म्हणजे काय याच प्रश्नाच्या शोधात जर इतपर्यंत आला असाल तर तुम्ही एकदम बरोबर ठिकाणी आहात.
कारण या पोस्ट मध्ये तुम्हाला programming म्हणजे काय (what is programming in marathi), प्रोग्रामिंग कशी शिकावी, प्रोग्रामिंग चे फायदे – उपयोग,इत्यादी. या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.
Programming म्हणजे काय – what is programming in marathi
प्रोग्रामिंग ही एक अशी प्रक्रिया आहे की जी आपल्याला कंप्युटर कडून कोणतेही कार्य करून घेण्यास मदत करते. प्रोग्रामिंग च्याच साह्याने आपण कंप्युटर ला सूचना, आज्ञा व आदेश देऊ शकतो आणि ही प्रोग्रामिंग करणाऱ्या व्यक्तीला programmer असे म्हटले जाते.
Programming मध्ये सर्व कोड हे programming languages च्या मदतीने लिहिलेले असतात. त्यामुळे तुम्हाला जर प्रोग्रामिंग बद्दल सर्व मूलभूत माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला programming languages बद्दल देखील माहिती असणे गरजेचे आहे. कारण programming languages च तर programming चे मुळ आहेत.
प्रोग्रामिंग भाषा म्हणजे काय – what is programming language in marathi
जसे आपण मनुष्य एकमेकांशी संवाद साधण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी भाषेचा वापर करत असतो. स्वतःला व्यक्त करण्याचं आणि संवाद साधण्याचं भाषा हे एक प्रभावी माध्यम आहे. आज प्रत्येक देशात, राज्यात वेगवेगळ्या असंख्य भाषा बोलल्या जातात.
कंप्युटर तर निर्जीव असतात. मग त्यांच्याशी संवाद कसा करायचा? त्यांना आपले प्रश्न कसे विचारायचे, त्यांना आज्ञा, आदेश कसे द्यायचे ? कारण कंप्युटर आपण ज्या बोली भाषा बोलतो जसे की मराठी, हिंदी, इंग्रजी यांना समजत नाही. त्यामुळे कॉम्पुटर सोबत संवाद साधण्यासाठी विशेष कंप्युटर भाषा तयार केलेल्या आहेत त्यांना programming languages असे म्हटले जाते.
आज २५०० पेक्षा भी जास्त programming languages अस्तित्वात आहेत. यामध्ये कंप्युटर ला सूचना, आज्ञा देण्यासाठी विवध कोड असतात. त्यांच्या मदतीने आपण प्रोग्राम तयार करून कंप्युटर कडून हवी ती कामे करून घेऊ शकतो.
Programming languages चे प्रकार – types of programming languages
Programming lamguages ज्या कार्यासाठी वापरल्या जातात आणि त्यांच्या वैशिष्ट्य यावरून प्रोग्रामिंग भाषांचे विवध प्रकार आहेत. म्हणजे प्रत्येक कार्यासाठी विशेष संगणकीय भाषा आहेत. जसे की मायक्रोप्रोसेसर तयार करण्यासाठी वेगळ्या संगणकीय भाषा आहेत, ऑपरेटिंग सिस्टिम साठी वेगवेगळ्या आहेत.
पण संगणकीय भाषांचे खालीलप्रमाणे मुख्य दोनच प्रकार आहेत:
- Low level languages
- High level languages
Low level languages
तुम्हाला तर माहितीच असेल की कंप्युटर केवळ binary language समजतो. म्हणजे अशी भाषा जी केवळ ० आणि १ या दोन अंकापासून च तयार झालेली असते. याच भाषेला low level language असे म्हटले जाते जी की ० आणि १ पासून बनलेली असते.
ही भाषा कंप्युटर अगदी सहजपणे समजू शकतो पण मनुष्याला ही भाषा समजण्यास फार कठीण आहे. Binary language जर समजून घ्यायची असेल तर अगोदर सर्व बायनरी कोड समजून घ्यावे लागतात व ते पाठही करावे लागतात. सर्व बायनरी कोड समजणं आणि ते लक्षात ठेवणं हे काम सामान्य माणसाला अशक्य आहे.
त्यामुळे या low level languages चा वापर प्रोग्राम लिहिण्यासाठी केला जात नाही.
Low level languages चे प्रकार (types of low level languages)
Low level languages चे पण खालीलप्रमाणे दोन प्रकार आहेत:
- Machine language
- Assembly language
Machine language ही भाषा खास कंप्युटर साठी तयार करण्यात आलेली आहे. या भाषेमध्ये केवळ ० आणि १ या दोनच अंकाचा समावेश असतो. त्यामुळे कंप्युटर व इतर मशीन या भाषेला अगदी सहजपणे समजू शकतात. पण ही भाषा मनुष्याला समजण्यास फार कठीण आहे.
Machine language ला आणखी सोपं बनवण्यासाठी या assembly language तयार करण्यात आली. या भाषेमध्ये पहिल्यांदाच काही pnenomic abbrevations जसे की sub, add, div यासारख्या शब्दांचा वापर करण्यात आला. ही भाषा मनुष्य समजू शकतो पण कंप्युटर ला समजत नाही. कारण यामध्ये binary language चा वापर केला जात नाही.
ही भाषा कंप्युटर ला समजावी यासाठी binary language मध्ये convert केली जाते. Assembly language ला binary language मध्ये convert करण्यासाठी ज्या सॉफ्टवेअर चा वापर केला जातो त्याला assembler असे म्हणतात. म्हणूनच तर या संगणकीय भाषेला assembly language असे म्हटले जाते.
High level language
High level languages (HLL) या human readable computer languages असतात. म्हणजे या भाषा मनुष्य सहजपणे समजू शकतो. यामध्ये कोड लिहिण्यासाठी इंग्लिश शब्दांचा जास्त वापर केला जातो आणि या भाषांचा syntax इंग्रजी भाषेच्या जवळपास समान असतो.
या भाषा तयार करण्याचा उददेश च होता की त्या मनुष्याला सहज समजाव्यात जेणेकरून मनुष्य प्रोग्रममध्ये instructions सहज मांडू शकेल.
असे असले तरीही या high level languages कॉम्पुटर समजू शकत नाही. त्यासाठी या भाषा binary languages मध्ये convert कराव्या लागतात. High level languages ला binary language (machine language) मध्ये रुपांतरीत करण्यासाठी compiler आणि interpreter या दोन सोफ्टवेअर चा वापर केला जातो.
C++, Java, python या काही आज जगभरात सर्वात जास्त प्रशिद्ध कंप्युटर भाषा आहेत. या भाषेचा वापर वेब डिझायनिंग पासून ते जवळपास सर्वत्र केला जात आहे.
Programming languages चे काही अन्य प्रकार ( Types of programming languages based on purpose)
Purpose म्हणजे उद्देश्य यावरून देखील संगणकीय भाषांचे काही प्रकार पडतात. कारण काही भाषा या एखाद्या विशिष्ट कामासाठीच वापरल्या जाणाऱ्या आहेत, त्यांचं एक विशिष्ट उद्दिष्ट असतं.
त्यामुळे purpose वरून देखील programming languages चे खालीलप्रमाणे काही उपप्रकार पडतात:
- Machine language : या भाषेतील कोड हा कंप्युटर ला समजण्यास सोपा असल्यामुळे कंप्युटर या कोड ला लगेच execute करतो
- Assembly language : ही भाषा machine language चीच पुढची पिढी आहे. या भाषेमध्ये पहिल्यांदाच pnuenomic abbreviations चा वापर करण्यात आला.
- System languages : या प्रोग्रामिंग भाषांचा वापर खास करून कंप्युटर सिस्टम तयार करण्यासाठी केला जात. या भाषा बहुदा low level task करण्यासाठी वापरल्या जातात.
- Scripting languages: या भाषा खास करून high level task साठी वापरल्या जातात आणि या भाषा खूप powerful असतात.
- Domain specific languages : या भाषा विशेष अती महत्वाच्या कार्यासाठी वापरल्या जातात.
- Visual languages : या भाषांना non text based languages असे देखील म्हटले जाते. कारण या भाषांचा वापर हा केवळ visual कार्यासाठी केला जातो.
- Esoteric languages : या भाषा खूपच मजेशीर असतात. पण या केवळ education purpose साठी वापरल्या जातात.पण यांचा वापर कोणत्याही कार्यासाठी केला जात नाही.
Programming कशी शिकावी ?
तुम्हाला जर प्रोग्रामिंग शिकून त्यात करिअर करायचं असेल तर त्यासाठी तुम्ही बारावी नंतर कंप्युटर इंजिनीरिंग जॉईन करू शकता. कंप्युटर इंजिनिअरिंग च्या चार वर्षांच्य काळात तुम्हाला सर्व महत्वाच्या programming languages शिकवल्या जातात. यामध्ये C, C++, python, java, html, css, SQL, इत्यादी संगणकीय भाषांचा समावेश असतो. तसेच तुम्हाला प्रोग्रामिंग भाषा बरोबरच कंप्युटर च्या संबंधित सर्व विषय देखील शिकवले जातात.
तसेच तुम्ही जर अशिक्षित असाल किंवा आता कंप्युटर इंजिनीअरिंग जॉईन करण्यास अक्षम असाल तरीही काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. आज अशा अनेक coding institute आहेत जेथे तुम्ही कोर्स फी भरून प्रोग्रामिंग शिकू शकता.
जर तुमच्याकडे पैश्यांची देखील अडचण असेल तर आज इंटरनेटवर अशा अनेक वेबसाइट्स, यूट्यूब चॅनल आहेत जेथून तुम्ही फ्री मध्ये प्रोग्रामिंग शिकू शकता.
यासाठी मी खाली काही websites आणि youtube channel ची लिस्ट देत आहे जेथून तुम्ही फ्रीमध्ये programming ( coding ) शिकू श
Programming शिकण्याचे फायदे आणि उपयोग:
- तुम्ही यातून आयटी क्षेत्रात नौकरी मिळवू शकता
- स्वतःचे अॅप तयार करू शकता
- Web developement मध्ये देखील करिअर करून भरपूर पैसे कमावू शकता
- ब्लॉगींग करून देखील पैसे करू शकता
- तसेच तुम्ही freelancing मध्ये देखील अनेक कामे करून पैसे मिळवू शकता
- Freelancing मध्ये सर्वात जास्त पैसे मिळवून देणारे कामे करू शकता जसे की app developement, web designing, animator, इत्यादी
- विविध कार्यासाठी आयटी क्षेत्रातील कंपन्यांना code script तयार करून देऊ शकता व त्यातून पैसे देखील कमावू शकता
- तसेच youtube वर देखील वाचा tutorial चॅनल ओपन करून तेथून देखील लाखों पैसे कमावू शकता
- अशा प्रकारे प्रोग्रामिंग (coding ) शिकण्याचे अगणित फायदे व उपयोग आहेत. त्यातील केवळ काहीच मी वरती नमूद केले आहेत.
निष्कर्ष :
मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण programming (coding ) म्हणजे काय – what is programming in marathi, programming कशी व कुठून शिकावी, programming languages म्हणजे काय, त्यांचे प्रकार, programming चे फायदे आणि उपयोग, इत्यादी बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली.
मला अशा आहे की तुम्हाला प्रोग्रामिंग म्हणजे काय ( what is programming in marathi ) बद्दल सर्व माहिती समजली असेल. तुम्हाला जर कोडिंग बद्दल काही शंका असतील तर त्या मला कमेंट मध्ये सांगा. मी तुम्हाला नक्कीच reply देईल.
तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रासोबत नक्की शेअर करा, धन्यवाद…!!!