Site icon My Marathi Status

What is program in marathi – प्रोग्राम म्हणजे काय ?

What is program in marathi प्रोग्राम म्हणजे काय – संगणकाकडून कोणतेही कार्य जर आपल्याला करून घ्यायचे असेल तर आपण काय करतो ? उदाहरणात समजा आपल्याला संगणकावरील एखादी फाईल ओपन करायची असेल तर आपण त्या फाईल वर arrow नेतो आणि डबल क्लिक करतो आणि ती फाईल लगेच ओपन होते.

फाईल ओपन करण्याचं कार्य संगणकाने कसे केले बरे ? आपण त्याला फाईल ओपन करण्यासाठी सूचना कशी दिली? तुम्हाला याबद्दल नक्कीच कुतूहल असेल.  हे सर्व कार्य घडलं ते म्हणजे कंप्युटर सिस्टीम मध्ये कार्यरत असलेल्या प्रोग्राम मुळे.

प्रोग्राम एक अशी फाईल असते ज्यामध्ये युजर ने संगणकाला दिलेल्या सूचनांचा एक संच असतो. त्यानुसार संगणक कोणतेही कार्य पार पाडते. त्याला जशी सूचना मिळेल त्यानुसार तो प्रतिक्रिया देत असतो. या प्रोग्रामच्या मदतीनेच आपण संगणकाला सूचना किंवा आज्ञा देत असतो.

आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला या program बद्दलच माहिती सांगणार आहे जसे की प्रोग्राम म्हणजे काय (what is program in marathi), प्रोग्राम चे प्रकार, प्रोग्राम कसे कार्य करतो, प्रोग्राम कसा तयार करायचा, इत्यादी.

प्रोग्राम म्हणजे काय (what is program in marathi)

संगणकावर एखादी क्रिया करण्यासाठी किंवा एखादी समस्या सोडवण्यासाठी युजर ने संगणकाला दिलेल्या सूचनांचा संच म्हणजे प्रोग्राम असतो.

प्रोग्राम ही एक अशी फाईल असते ज्यामध्ये क्रमानुसार सूचना लिहिलेल्या असतात. या सर्व सूचनांचा क्रम हा कटिबध्द असतो. या सर्व सूचना त्याच क्रमाने सफल होणे गरजेचे असते, तरच त्यातून अपेक्षित प्रतिसाद मिळू शकतो.

उदाहरणात तुम्हाला जर चहा बनवायचा असेल तर तुम्ही काय करता बरं? अगोदर एका पातेल्यात पाणी घेता, नंतर ते पाणी गरम करता, नंतर त्यात पत्ती , साखर , सुंट टाकता आणि त्याला व्यवस्थित उकळून घेता. अशा प्रकारे तुमचा चहा तयार होतो. या सर्व क्रिया तुम्ही याच क्रमाने करता. तुम्ही जर हा क्रम बदलला तर तुमचा चहा व्यवस्थित होणार नाही.

त्याच प्रमाणे प्रोग्राम मध्ये देखील एखादे कार्य करण्यासाठी अश्याच क्रमवार सूचना दिलेल्या असतात. याच सूचनांचे पालन करून संगणक विविध कार्य संपन्न करत असतो. वेगवेगळी कामे करण्यासाठी संगणाकामध्ये अनेक प्रोग्राम अस्तित्वात असतात.

हे प्रोग्राम लिहिण्यासाठी संगणकीय भाषांचा वापर केला जातो ज्यांना की programming languages असे म्हटले जाते आणि प्रोग्राम लिहिणाऱ्या व्यक्तीला प्रोग्रामर असे म्हटले जाते.

प्रोग्राम कसा तयार करावा ?

प्रोग्राम तयार करणे म्हणजे फार कठीण कार्य नाही. प्रोग्राम कुणीही तयार करू शकतो पण त्यासाठी programming languages यायला हव्यात आणि प्रोग्रामिंग चे मूलभूत ज्ञान असणे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.

तुम्हाला जर python, java, c++, यापैकी किंवा इतर कोणतीही संगणकीय भाषा अवगत असेल तुम्ही प्रोग्राम तयार करू शकता.

एकच कार्य करण्यासाठी सर्वांचा प्रोग्राम हा सारखाच असणे गरजेचे नाही, कुणाचा प्रोग्राम त्याच कार्यासाठी वेगळा देखील असू शकतो. कारण प्रोग्रामिंग मध्ये एकाच कार्यासाठी वेगवेगळे logic असू शकतात. पण logic जरी वेगवेगळे असले तरी त्यातून निर्माण होणारे परिणाम (output) सर्वांचे सारखेच असायला हवेत.

खाली एक c++ संगणकीय भाषेत लिहिलेला hello world program दिला आहे. त्यातून तुम्हाला कल्पना येऊ शकते की प्रोग्राम कसा असतो?

#include <iostream>

using namespace std;

int main ( ) {

Cout << ” hello world ” ;

}

वरील प्रोग्राम run झाल्यावर तुम्हाला संगणकाच्या पडद्यावर hello world हा शब्द प्रिंट झालेला दिसेल.

प्रोग्राम कसे कार्य करतो ?

प्रोग्राम मध्ये एखादे कार्य करण्यासाठी क्रमवार काही सूचना दिलेल्या असतात. हा प्रोग्राम run झाल्यानंतर संगणक क्रमवार त्या सूचनांचे पालन करतो आणि तुम्हाला अपेक्षित परिणाम पडद्यावर दाखवतो. जसे वरी दिलेल्या प्रोग्राम मध्ये संगणकाने hello world हा शब्द प्रिंट केला आहे.

याच बरोबर प्रोग्राम मध्ये आणखी दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. त्या म्हणजे –

  1. इनपुट (input)
  2. परिणाम (output)

काही कार्य करण्यासाठी संगणकाला युजर कडून काही मूलभूत माहिती आवश्यक असते , ती आपण देतो त्याला input असे म्हटले जाते. जसे तुम्ही कधी ATM मशीन मधून पैसे काढले असतील तर तेंव्हा तुम्हाला तिथे pin टाकावा लागतो. तुमचा पिन म्हणजेच तुम्ही संगणकाला दिलेला input असतो. तुमच्या इनपुट च्याच मदतीने संगणक पुढील क्रिया पार पाडतो आणि तुम्हाला अपेक्षित परिणाम देत असतो.

तुम्हाला लक्षात आले असेल की input च्या मदतीने आपण संगणकाला एखादे कार्य करण्यासाठी आवश्यक माहिती देत असतो. नंतर संगणक या माहितीवर प्रक्रिया करून तुम्हाला अंतिम परिणाम output दाखवतो.

अशाप्रकारे संगानाकमध्ये इनपुट आणि आऊटपुट या प्रक्रियांचा मदतीने कोणतेही कार्य घडत असते.

प्रोग्राम चे प्रकार (types of program in marathi)

चला तर मग आता आपण प्रोग्राम च्या मुख्य प्रकरांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया…

प्रोग्राम चे खालीलप्रमाणे मुख्य दोन प्रकार आहेत:

System programs

System programs हे मुख्यतः कंप्युटर सिस्टम चे व्यवस्थापन करण्यासाठी तयार केलेले असतात. यामध्ये operating system, network server यासारखे प्रोग्राम असतात जे की सिस्टम कार्यान्वित करण्यासाठी आवश्यक असतात. हे सर्व programs कॉम्प्युटरची इंटर्नल सिस्टम manage करण्याचे कार्य करत असतात.

System programs हे user interface आणि system calls च्या मधोमध स्थापित असतात.

System programs ची काही उदाहरणं :

  • Operating systems
  • Linux
  • Windows
  • Website server
  • Networking system

तुम्ही जी कोणती ऑपरेटिंग सिस्टीम कॉम्प्युटरमध्ये किंवा मोबाईलमध्ये use करतात ते सर्व system programs आहेत जसे की windows, macos, linux, android, ios, इत्यादी

Application programs :

तुमचे जीवन सरळ व सोपे बनवण्यासाठी तुम्ही दिवसभरात जे कोणते apps, games वापरता ते सर्व application program आहेत. जसे की google chrome, microsoft office, photoshop, pubg, gta vice city, इत्यादी हे सर्व application programs आहेत.

तुम्ही दिवसभरात तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत किंवा नातेवाईकांशी गप्पा मारण्यासाठी जे सोशल मीडिया नेटवर्क वापरता जसे की facebook, instagram, twitter हे सर्व देखील application program च आहेत.

Application programs हे खास करून आपली कामे सोपी करण्यासाठी आणि आरामदायी जीवन प्रधान करण्यासाठी बनवली जातात.

Application programs ची काही उदाहरणं :

  • Google chrome
  • Photoshop
  • Microsoft office
  • Facebook
  • Instagram
  • Pubg

निष्कर्ष :

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला computer program बद्दल माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला जसे की प्रोग्राम म्हणजे काय (what is program in marathi), प्रोग्राम चे प्रकार (types of program) , प्रोग्राम कसा तयार करायचा, प्रोग्राम कसा कार्य करतो, इत्यादी.

मित्रानो मला अशा आहे की तुम्हाला ही माहिती प्रोग्राम म्हणजे काय ( what is program in marathi ) नक्कीच समजली असेल. अशीच नव नवीन उपयुक्त माहिती वाचण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट देत रहा.

तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर ही माहिती तुमच्या मित्र मैत्रिणीसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना देखील माहिती होईल की program म्हणजे काय असतो ?

धन्यवाद…!!!

Exit mobile version