What is digital wellbeing in marathi – मित्रांनो आज स्मार्टफोन चा वापर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. स्मार्टफोन आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे असे म्हणले तरी वावघे ठरणार नाही. कारण आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभरात आगण्य वेळा या स्मार्टफोन चा वापर करत असतो.
यात वेळ बघण्यापासून ते ऑनलाईन अभ्यास करण्यापर्यंत सर्व कामे आपण याच स्मार्टफोन मध्ये करत असतो. पूर्वी जे कार्यक्रम आपण दूरदर्शन वर पाहायचे आता ते एका क्लिक मध्ये आपल्या मोबाईल मध्ये उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आज प्रत्येक जण या मोबाईलमध्ये गुंतलेला असतो. मित्र आणि नातेवाईक यांच्याशी गप्पा देखील आज सोशल मीडियाच्याच माध्यमातून होताना दिसत आहेत.
त्यामुळे आपण या मोबाईलचे गुलाम झाले आहोत की काय असे वाटत आहे. आपण आपले मुक्तपणे आयुष्य जगणे विसरलो आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन android च्या नवीन update मध्ये एक विलक्षण feature समाविष्ट करण्यात आलेले आहे जे की तुम्हाला मोबाईल वापरण्यावर कंट्रोल ठेवण्यात मदत करेल. त्या feature च नाव आहे digital wellbeing.
आजच्या पोस्टमध्ये आपण याच टॉपिक विषयी माहिती घेणार आहोत. Digital wellbeing म्हणजे ( what is digital wellbeing in marathi) याचा वापर कसा करावा, यामध्ये apps आणि games चा watch time कसा पहावा, इत्यादी
Contents
- 1 Digital wellbeing म्हणजे काय? (What is digital wellbeing)
- 2 What is digital wellbeing in marathi?
- 3 Digital wellbeing कसे वापरावे ? (How to use digital wellbeing in marathi)
- 4 Parental control काय आहे ? ( What is parentral control in marathi)
- 5 Digital wellbeing आणि parenting control चे फायदे ( benefits of digital wellbeing and parenting control in marathi)
Digital wellbeing म्हणजे काय? (What is digital wellbeing)
मित्रांनो तुम्ही जर तुमचा android मोबाईल जर update केला असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या सेटिंग्ज मध्ये digital wellbeing नावाने एक नवीन पर्याय पाहायला मिळत असेल. हा पर्याय android ने त्याच्या नुकत्याच एका android 9 update मध्ये समाविष्ट केला आहे. अनेक लोकांना याबद्दल प्रश्न आहे की हा digital wellbeing नावाचा पर्याय काय आहे आणि त्याचा काय उपयोग आहे ?
Digital wellbeing हा एक अँड्रॉइड मोबाईल मधील असा पर्याय आहे जो की तुम्हाला तुमच्या दररोज मोबाईल वापराची माहिती देतो. म्हणजे दररोज तुम्ही किती वेळ मोबाईल वापरता, दिवसभरात तुम्ही कोण कोणते apps वापरले ते किती वेळ वापरले, तसेच तुम्ही कोणते games खेळले, कोणता गेम किती वेळ खेळला,इत्यादी पूर्ण माहिती तुम्हाला या पर्याय मध्ये पाहायला मिळणार आहे.
तसेच यामध्ये तुम्ही दिवसभरात गूगल क्रोम व यूट्यूब किती वेळ वापरले, कोणकोणती वेबसाइट्स व यूट्यूब चॅनल तुम्ही पाहिले याबाबत सर्व माहिती या digital wellbeing पर्याय मध्ये record होत असते.
या माहिती वरून तुमच्या लक्षात येऊ शकते की तुम्ही तुमचा मोबाईल सर्वात जास्त कोणत्या कामासाठी वापरता किंवा मोबाईल मध्ये तुमचा सर्वात जास्त वेळ कुठे वाया जातो. यावरून तुम्हाला तुमच्या जास्त मोबाईल वापरण्यावर कंट्रोल देखील ठेवता येईल.
What is digital wellbeing in marathi?
या feature मध्ये watch limit ठेवण्याचा देखील पर्याय उपलब्ध आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेऊ शकता. या feature च्या मदतीने तुम्ही निर्धारित करू शकता की तुम्ही कोणता app/game किती वेळ वापरू शकता. जर तुम्ही एखाद्या app वर watch limit ठेवली तर तुम्ही तो ऍप त्या लिमिट पेक्षा जास्त नाही वापरू शकत.
उदाहरणात तुमचा युट्यूबवर व्हिडिओ पाहण्यासाठी खूप वेळ वाया जात आहे आणि तुम्हाला यूट्यूब वापरण्यावर नियंत्रण ठेऊ शकतात. समजा तुम्हाला एका दिवसात जास्तीत जास्त फक्त २ तासच यूट्यूब पाहायचे आहे. तर तुम्ही digital wellbeing या feature च्या मदतीने यूट्यूब वर २ तासाची watch limit लावू शकता. जेणेकरून तुमचा यूट्यूब २ तासापेक्षा जास्त वेळ चालणार नाही.
Digital wellbeing कसे वापरावे ? (How to use digital wellbeing in marathi)
- Digital wellbeing वापरण्यासाठी अगोदर तुम्हाला android 9 चे latest version update करावे लागेल जर तुम्ही update केलेले नसेल तर.
- जर तुम्ही android 9 अगोदरच update केलेले असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईल सेटिंग्ज मध्ये जायचे आहे. यात सर्वात खाली तुम्हाला digital wellbeing & parental control चा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.
- हा पर्याय ओपन केल्यानंतर तुम्हाला digital wellbeing चा interface दिसेल. ज्यामध्ये तुम्हाला तुम्ही दिवसभर मोबाईल कोण कोणत्या कामासाठी वापरला याबद्दल माहिती मिळेल. तसेच येथे तुम्हाला हे देखील दिसून येईल की तुम्ही दिवसभरात किती वेळा मोबाईल unlock केला.
- तसेच यात तुम्हाला दिवसभरात किती notifications मिळाल्या हे देखील दिसेल.
- तुम्ही जर येथे दिसणाऱ्या मोठ्या सर्कल वर क्लिक केले तर तुम्हाला पूर्ण आठवड्याचा data पाहायला मिळेल. तसेच येथे तुम्हाला प्रत्येक app आणि game चा watch time देखील पाहायला मिळेल.
- येथून तुमच्या लक्षात येऊ शकते की तुम्ही दिवसभरात कोणत्या कामासाठी मोबाईलवर सर्वाधिक वेळ व्यथित करता.
- यात तुम्हाला parental control चा देखील पर्याय उपलब्ध आहे.
Parental control काय आहे ? ( What is parentral control in marathi)
Digital wellbeing मध्येच तुम्हाला आणखी एक पर्याय उपलब्ध आहे तो म्हणजे parenting control. हा पर्याय मुख्यतः parents म्हणजेच पालकांसाठी बनवलेला आहे. या feature चा वापर करून आई वढील त्यांच्या लहान मुलांवर मोबाईल वापरण्यावर नियंत्रण ठेऊ शकतात तसेच त्यांच्यावर बंधन देखील ठेऊ शकतात.
Parenting control द्वारे तुम्ही तुमचा मोबाईल तुमच्या मुलगा किंवा मुलीच्या मोबाईल शी connect करू शकता. नंतर तुम्हाला तुमच्या parenting control पर्यायमध्ये तुमच्या पाल्याच्या मोबाईलचा पूर्ण data मिळेल. यावरून तुम्हाला समजू शकते की तुमचा मुलगा मोबाईल मध्ये किती वेळ व्यथित करतो तसेच तो कोणता app/game किती वेळासाठी वापरतो.
यावरून तुम्हाला तुमच्या पाल्याच्या मोबाईल वापरावर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल.
How to set up parenting control feature:
- सर्वात पहले तुम्हाला तुमच्या पाल्याच्या मोबाईल मध्ये सेटिंग्ज मध्ये जायचे आहे.
- सेटिंग्ज मध्ये तुम्हाला खाली एक digital wellbeing & parenting control असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा.
- यात तुम्हाला खालच्या बाजूला set up parenting control चा पर्याय दिसेल तो सिलेक्ट करा.
- त्यानंतर तुम्हाला हा मोबाईल parent व child कोण वापरणार आहे असे विचारले जाईल. तिथे तुम्ही child सिलेक्ट करा.
- आता तुम्हाला email id समाविष्ट करा म्हणून पर्याय दिसेल. त्यात तुमच्या मोबाईलचा email id समविष्ट करा.
- आता तुमचा मोबाईल तुमच्या पाल्याच्या मोबाईल शी कनेक्ट होईल आणि तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पाल्याच्या मोबाईलचा वापर कसा होत आहे याबद्दल पूर्ण माहिती मिळेल.
Digital wellbeing आणि parenting control चे फायदे ( benefits of digital wellbeing and parenting control in marathi)
Digital wellbeing आणि parenting control feature चे खूप सारे फायदे आहेत. पण या feature द्वारे तुमचा मोबाईल तुमच्या parents द्वारे control केला जाऊ शकतो. यामुळे तुम्हाला हे फीचर बेकार वाटू शकते पण खरच हे तुमच्या digital wellbeing आणि time management साठी अतिशय गरजेचं आहे.
Benefits of digital wellbeing & parenting control:
- या feature मध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईल use चा पूर्ण data मिळेल.
- यापासून तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही मोबाईलवर कोणत्या कामात सर्वात जास्त वेळ वाया घालवता.
- तसेच येथे तुम्हाला येथे प्रत्येक app/game चा watch time पाहायला मिळेल. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की तुम्ही कोणता app/game दिवसभरात किती वेळ वापरता.
- तसेच येथे तुम्हाला watch limit चा देखील पर्याय मिळतो. येथून तुम्ही कोणता app/game किती वेळ वापरायचा हे निर्धारित करू शकता. यापासून तुम्हाला time management साठी मदत होईल.
- Parenting control द्वारे तुम्हाला तुमच्या पाल्याच्या मोबाईलवर नजर व नियंत्रण ठेवता येईल.
- हे आप तुमच्या digital wellbeing आणि time management साठी नक्कीच फायद्याचे ठरेल.
तुम्ही काय शिकलात ?
मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला digital wellbeing आणि parenting control बद्दल संपूर्ण माहिती दिली. जसे की digital wellbeing म्हणजे काय (what is digital wellbeing in marathi) तसेच parenting control म्हणजे काय व ते कसे set up करायचे याबद्दल माहिती दिली.
मित्रांनो what is digital wellbeing in marathi हा लेख तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. तसेच तुम्हाला digital wellbeing mhanje kay याबद्दल काही शंका असेल तर ते ही विचारा, धन्यवाद…!!!