वैनगंगा नदीबद्दल माहिती मराठीत – Wainganga River Information in Marathi
हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला वैनगंगा नदीबद्दल माहिती मराठीत – Wainganga River Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – कोयना नदी
वैनगंगा नदी – Wainganga River Information in Marathi
वैनगंगा (Vainganga) महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांमध्ये वैनगंगा नदीचा समावेश आहे. उगमस्थान – वैनगंगा नदी मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगातील छिंदवाडा येथे उगम पावते. नंतर ही नदी महाराष्ट्राच्या विदर्भ भागात येते.
वैनगंगा नदीच्या उपनद्या – बावनथरी, कन्हान, चुलबन या वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. या नद्या वैनगंगा नदीला ठिकठिकाणी येऊन मिळतात.
वैनगंगा नदीचे खोरे – वैनगंगा नदी महाराष्ट्राच्या विदर्भ विभागातून वाहते. वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये भंडारा, गडचिरोलीवचंद्रपूर हे जिल्हे येतात.
वैनगंगा नदीच्या खोऱ्यातील तलाव – नवेगाव, शिवनी, घोडाझरी, , असोलमेंढा, चोरखमारा तसेच बांदलकसा हे मोठे तलाव वैनगंगा नदीच्या खोऱ्यात आहेत. राष्ट्रीय उद्याने – वैनगंगा नदीच्या खोऱ्यात नवेगाव व ताडोबा ही राष्ट्रीय उद्याने आहेत.
ताडोबा अभयारण्यात वाघांचे खास संवर्धन केले जाते. इतर माहिती – मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वतरांगांत छिंदवाडा येथे उगम पावलेली वैनगंगा नदी दक्षिणवाहिनी बनते.
भंडारा जिल्ह्यात तिला बावनथरी ही नदी येऊन मिळते. पुढे नागपूर जिल्ह्यातून येणारी कन्हान ही उपनदी मिळते. अंभोरा येथे वैनगंगा, कन्हान व आंब या नद्यांचा त्रिवेणी संगम होतो.
त्रिवेणी संगमानंतर वैनगंगेला वर्धा नदी येऊन मिळते. त्यामुळे वैनगंगेला प्राणहिता असे नाव पडले आहे. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर हे जिल्हे वैनगंगेच्या खोऱ्यात येतात. या भागात भिल्ल व गौंड आदिवासींची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे.
या आदिवासींचे जीवन वैनगंगा नदीमुळे संपन्न झाले आहे. वैनगंगा नदीच्या पाण्याचा उपयोग खोऱ्यातील गावांना होतो. वैनगंगा नदीचे खोरे फार सुपीक व समृद्ध आहे.
या नदीच्या पाण्याचा विदर्भाला जास्तीत जास्त फायदा होतो. वैनगंगा नदीवर यवतमाळ जिल्ह्यात उमरखेडजवळ सहस्रकुंड’ नावाचा विशाल धबधबा आहे.
काय शिकलात?
आज आपण वैनगंगा नदीबद्दल माहिती मराठीत – Wainganga River Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.