वाडा हा पालघर जिल्यातील औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असलेला तालुका आहे. wada maharashtra मधे Steel / metals उत्पादनामध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे वाडा हे नवीन औद्योगिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. महाराष्ट्रातील फटाक्यांसाठी सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ वाडा येथे आहे.
येथे फटाक्याची मोठमोठी गोदामे व घाऊक बाजाराची दुकाने आहेत येथे सणासुदीला फटाक्यांची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात लांब लांबून लोक येत असतात. वाड्याचे एकूण क्षेत्र 749.76 किमी वर्ग आहे 2011 च्या जनगणनेनुसार वाडा तालुक्यामधील ही लोकसंख्या 178,370 होती. wada maharashtra taluka मध्ये तसेच 39,303 घरे होती
Contents
2011 जनगणना नुसार वाडा तालुका लोकसंख्या
वर्ग | लोकसंख्या |
पुरुष | 91,990 |
महिला | 86,380 |
एकूण | 1,78,370 |
Wada taluka Village List | वाडा तालुकातील गावांची नावे
Wada Taluka village list
कादिवली | वारनोळ | वीजयगड |
भावेघर | किरवली | विलकोस तर्फे वाडा |
मुंगुस्ते | दाढरे | गारगाव |
सुपोंडे | पोशेरी | सरसओहळ |
कळंभई | वरसाळे | आब्जे |
भोपिवली | कोळीम सरोवर | कुर्ले |
मुसरणे | धापड | गातेस बु. |
ठुणावे | रायसळ | सारशी |
कळंभे | वसुरी बु. | ऐनशेत |
बिलावली | कोंढळे | कुयाळु |
नांदणी गायगोठा | डोंगस्ते | गातेस खु. |
तिळसे | सांगे | सासणे |
कळंभोळी | वसुरी खु. | आखाडा |
बीलघर | कोने | लखमापूर |
नाणे | गाळे | गौरापूर |
तिळगाव | सापणे बु. | झाडखैरे |
कळमखांड | वावेघर | आलमान |
बिळोशी | कोणसई | लोहपे |
नारे | गाळतरे | घोणसई |
तिळमाळ | सापणे खु. | सावरखांड |
कांभारे | वीजापूर | अंबारभुई |
बोरांडे | कुडुस | मालोंडे |
नेहरोळी | गांधरे | गोळेघर |
तोरणाई | सापरोंडे | शेळे |
कंचाड | आबिटघर | आंभई |
ब्राह्मणगाव | कुमदळ | मांडवा |
वाघोटे | निचोळे | गोराड |
खानिवली | तुसे | शेळटे |
डाकिवली | कापरी | आंबिस्ते बु. |
पेठरंजनी | बुधावली | मांडे |
वैतरणा नगर | निंबवळी | गोऱ्हे |
खरीवली तर्फे कोहज | उचाट | शीळ |
देसई | करांजे | आंबिस्ते खु. |
फणसगाव | चांबळे | मांगाठाणे |
वरई बु. | निशेत | गुहीर |
खरीवली तर्फे पौळबार | उज्जैनी | शिलोत्तर |
देवळी | करंजपाडा | आमगाव |
पिक | चेंदवळी | मांगरोल |
वऱ्हई खु. | ओगदा | गुंज |
खोडदे | उमरोठे | शिरसाड |
देवळी तर्फे कोहज | कासघर | आपटी |
पिंपळास | चिखळे | मानिवली |
वरले | पाचघर | हमरापूर |
खुपरी | उसर | सोनाळे बु. |
देवगाव | काटी | असनस |
पिंपरोळी | चिंचघर | मेट |
वारधा | पाली | हरोसाळे |
खुटळ | वडवळी तर्फे गाव | सोनाळे खु. |
देवघर | केळठण | आवंढे |
पिंजाळ | दाभोण | म्हासवळ |
डाहे | पालसई | जाळे |
परळी | वडवळी तर्फे पौळबार | सोनशिव |
वडवळी तर्फे सोनाळे | खैरे आंबिवली | बालीवली |
खैरे तर्फे वाडा | बावळी | मोज |
दहिवळी कुंभिस्ते | विलकोस तर्फे कोणपटी | जामघर |
पास्ता | विर्हे | बेरशेती |
Schools / college’s in wada | वाडा मधील शाळा व महाविद्यालये
Wada maharashtra taluka मधे खालील शाळा व महाविद्यालये आहेत
- Swami Vivekanand Vidyamandir & Jr college,Wada maharashtra
- Wada College of Management & science
- Pandurang Javji high school
- Anand Laxman College of Science, Art & Commerce
- True Light English Medium School
- Little Angel’s English medium school
- Sharda Vidyalaya, nehroli
- Ideal CBSE School, posheri
नद्या
वाड्यातून वाहणाऱ्या म्हणजे वैतरणा आणि पिंजाळ ह्या दोन मुख्य नद्या आहेत.
शेती
वाड्यातील शेतकरी हा मुख्यतः भात शेती वरच अवलंबून आहे ही भातशेती मुख्यतः हंगामी असते म्हणजेच वाडा मधील शेतकरी हा भाताचे पीक हे पावसाळ्यातच घेतो. मात्र काही ठिकाणी या विधानात तफावत आढळते जसेकी नदी जवळ असलेली ठिकाणे. या ठिकाणांजवळ पाणी असल्याने उन्हाळी हंगामातही भात शेती होते.
तसेच वाडा येथील शेतकरी उडीद, तूर, मूग, वाल, राई, करडई, हरभरा इत्यादी कडधान्ये तसेच भाजीपाला उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात घेतात.
वाडा कोलम | Wada Kolam rice
तालुक्यात पिकणारा वाडा कोलम फक्त wada maharashtra मधेच नाही तर भारतभर आपला दर्जा टिकवून आहे. सुगंधी बासमती तांदुळ म्हणून वाडा कोलमची मागणी ही आजकाल फक्त भारतातच नसून आजकाल त्याला विदेशातही मागणी वाढत आहे वाडा कोलम झिनी तांदूळ म्हणूनही ओळखले जाते.
हा आपल्या पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुकामध्ये पिकणारा पारंपारिक भाताचा प्रकार आहे. वाड्यात मोठ्या प्रमाणावर पिकवल्या जाणाऱ्या तांदळाच्या या जातीला नुकताच ‘भौगोलिक संकेत’ (जीआय) टॅग मिळाला आहे.
या टॅगमुळे पालघरच्या वाडा तालुक्यातील या तांदळाला एक वेगळी ओळख मिळेल तसेच विस्तीर्ण आणि आणखी आंतरराष्ट्रीय बाजारपेठा खुळतील आणि wada kolam rice हा भात प्रकार प्रसिद्धीस येण्यास मदत होईल
वाडा मधील पर्यटन व धार्मिक स्थळे | Tourist places in wada maharashtra
तीळसेश्वर मंदिर (तीळसे)
वाडा तालुक्यामधील तीळसेश्वर शिव मंदिर हे एक अत्यंत महत्वाचे धार्मिक स्थळ आहे. असे म्हणतात की येथील शिवलिंगाची स्थापना खूप पुरातन काळात झाली होती व येथे पांडवांनी एक मंदिर बांधले होते दर वर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी येथे खूप मोठी जत्रा भरते त्यामधे हजारो भाविक सहभागी होतात.
तसेच येथे आपल्याला दैवी मासे बघायला मिळतात हे मासे खूप मोठे आहेत. आणि त्यांची संख्या खूप आहे तसेच या माश्यांबद्दल भरपूर गोष्टी आपल्याला ग्रामस्थांकडून ऐकायला मिळतात
विठ्ठल रखुमाई मंदिर | Vitthal mandir Wada
वाड्यातील विठ्ठल रखुमाई मंदिर हे मुख्य बाजापेठेत आहे हे मंदिर आकाराने खूप मोठे आहे.
हनुमान मंदिर | hanuman mandir wada
वाडा तालुका मधील हनुमान मंदिर हे सुध्दा वाड्यातील एक मोठे श्रद्धेचे ठिकाण असून मंदिर खूप जुन्या काळातील आहे.
खंडेश्वरी मंदिर | khandeshwari mandir wada
वाडा तालुक्यातील खंडेश्वरी मंदिर हे एक पांडवकालीन मंदिर आहे. तेथे हिंगलाई माता व शिव मंदिर आहे. हे मंदिर वाडा शहरात प्रवेश करताना लागणारा खंडेश्वरी नाका येथे आहे.
वाड्याचा तलाव | wada lake
संध्याकाळी अस्त होणाऱ्या सूर्याला वाड्याच्या तलावाच्या बाजूला बसून बघण्याची मजा ही काही औरच आहे. समोर तलावत पाण्यावर डूलणारी कमळ फूलं , मावळत असलेला सूर्य, तळ्याच्या बाजूला व आकाशात उडणारे निरनिराळे पक्षी बघताना मन हलके होऊन जाते. मन शांत ठेवण्यासाठी ही नक्कीच वाड्यातील एक चांगली जागा आहे.
कोहोज किल्ला | kohoj fort wada
kohoj Fort वाडा तालुक्यामधील वाघोटे गावाजवळ असणारा हा कोहोज किल्ला निसर्गाच्या सानिध्यात नटलेला आहे. तसेच ह्या किल्ल्याला अनेक वर्षांचा इतिहास लाभलेला आहे. कोहोज किल्ल्याबद्दल आम्ही लीहलेली अधिक माहिती वाचण्यासाठी कृपया कोहोज किल्ला येथे क्लिक करा .