वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे निबंध मराठी | Vrukshavalli Aamha Soyare Vanachare Nibandh Marathi

Vrukshavalli Aamha Soyare Vanachare Nibandh Marathi – मित्रांनो आज “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

“वृक्षवल्ली आम्हा सोयरी, वनचरे

पक्षीही सुस्वरे, आळविती ॥”
आज मी जागी झाले ते या कर्णमधुर ओळींच्या हळुवार स्पर्शानेच ! तुकाराम महाराजांचे भावमधुर काव्य आणि स्वरसामाज्ञी लता मंगेशकर यांनी चढविलेला स्वरांचा सुरेल साज!

त्या मधुर मिलाफाने चित्तवृत्ती प्रफुल्लित झाल्या. वृक्ष आणि वेली! निसर्गाचे सर्वोत्तम वरदान! धरणीमातेने मुक्त हस्ताने बहाल केलेला मौल्यवान खजिनाच जणू!

Vrukshavalli Aamha Soyare Vanachare Nibandh Marathi

‘वृक्षाः हि जीवनाधाराः,
वृक्षाः सत्पुरुषाः खलु’,

‘परोपकाराय फलन्ति वृक्षाः’
या शब्दात वृक्षांचा गौरव केला जातो.सोय जाणतो तो सोयरा! मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा वृक्ष, वेली भागवितात. मग ती आमची सोयरीच नव्हेत का?

“किंबहुना ते ‘आप्तांचेही आप्त’ आहेत असे म्हटल्यास अतिशयोक्तीचे ठरणार नाही. सुभाषितकारांच्या मते रवी, चंद्र, घन, वृक्ष, नद्या, गायी आणि सज्जन यांची निर्मिती निर्मिकाने परोपकारासाठीच केली आहे. “Vrukshavalli Aamha Soyare Vanachare Nibandh Marathi”

“मूलं भुजंगैः शिखरं प्लवंगैः
शाखा विहंगैः कुसुमंच भंगें।
श्रितं सदा चन्दनपादपस्य

परोपकाराय सतां विभूतयः ।।” Vrukshavalli Aamha Soyare Vanachare Nibandh Marathi

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे निबंध मराठी

सर्प चंदनाच्या मुळाशी आश्रय घेतात. माकडे शैड्यांवर असतात. पक्षी फांद्यांच्या तर भुंग फुलांच्या आश्रयाने राहतात. तात्पर्य, सज्जनांचे ऐश्वर्य परोपकारासाठी असते.

‘नास्ति मूलं अनौषधम्’ म्हणजे असे एकही मूळ (झाड) नाही की ज्यामध्ये औषधी गुण नाही. इतकंच नाही तर वृक्षाच्या मुळापासून फळापर्यंत प्रत्येक अवयवाचा मानव आणि मानवेतर प्राण्यांना उपर्योग आहे.

आमच्या पूर्वजांनी वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व ओळखले होते. वृक्षांच्या घनदाट, शीतल छायेत बसूनच वेदातील अनेक ऋचा रचल्या गेल्या. गौतम बुद्धांना आत्मज्ञान झाले बोधिवृक्षाच्या साक्षीने! Vrukshavalli Aamha Soyare Vanachare Nibandh Marathi

ऋषींनी जप, तप, अनुष्ठाने केली तेव्हा त्यांच्या शिरावर वृक्षांचेच छत्र होते. पूर्वी प्रत्येकाच्या अंगणात प्राजक्त, बेल, तुळस, आंबा अशी झाडं असायची.

Vrukshavalli Aamha Soyare Vanachare Nibandh Marathi

तुळस, औदुंबरासारख्या वृक्षांची नित्यनेमाने पूजा , व्हायची. परत मध्यंतरीच्या काळात माणसाला या उपकारकर्त्यांचा विसर पडला. ‘कुन्हाडीचा दांडा, गोतास काळ’ ठरावा तद्वत् आम्ही वृक्षांचा ‘काळ’ ठरलो. प्रमाणाबाहेर जंगलतोड केली.

प्रदूषण, अवर्षण, जमिनीची धूप या आम्हीच आमंत्रण दिले. निसर्गाचे संतुलन बिघडले. आज मात्र आम्हाला खडबडून जाग आली आहे.वनमोहत्सव हा आमचा राष्ट्रीय उत्सव झाला आहे. कोणत्याही कार्यक्रमाचे उद्घाटन आज वृक्षारोपणाने होते.

‘झाडे लावा, देश वाचवा’,

‘एक मूल, एक झाड’
हा आजचा मंत्र आहे.वनसंवर्धन व्हावे म्हणून सरकार कटिबद्ध झाले आहे. वृक्षांपासून आम्हाला काय मिळत नाही? शीतल छाया, मधुर फळे, पाने, फुले, औषणे, जळणं, घरासाठी लाकूड! वृक्षांमुळे प्राणवायू मिळतो. ‘Vrukshavalli Aamha Soyare Vanachare Nibandh Marathi’

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे निबंध मराठी

मेघ आकर्षित होऊन पाऊस पडण्यास मदत होते. घरांची, बागांची, शहरांची शोभा वाढते. जमिनीची धूप थांबते. निसर्गाचे संतुलन टिकून राहते.औदुंबरासारख्या काही वृक्षांचा अँटेनासारखा उपयोग होऊ शकतो असे शास्त्रज्ञांचे मत आहे.

वृक्षवेलींच्या सहवासात कवींच्या प्रतिभेला बहर येतो.कवयित्री इंदिरा संत यांना तर वृक्ष जिवाभावाचे सोबती वाटतात. त्यांच्याशी त्या हितगुज करतात.

त्या म्हणतात “जरी वेढले चार भिंतीनी, या वृक्षांची मजला सोबत सळसळणारा स्नेह बरसतो, खिडक्यांमधूनि मजवर अविरत” वृक्षांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

Vrukshavalli Aamha Soyare Vanachare Nibandh Marathi

राजस्थानमधील बिश्नोई स्त्रियांनी सुमारे 3000 वर्षांपूर्वी ‘चिपको आंदोलन छेडले. त्यात २५० स्त्रियांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन वृक्षांना जीवनदान दिले. आज आम्ही एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे आहोत.

विज्ञान युगात वावरत आहोत. वृक्षांची महती आम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही. तरीपण सांगितल्याशिवाय राहावत नाही म्हणून सांगण्याचा हा प्रपंच!

“वृक्षवल्लरी आम्हा सोयरी कथिते तुम्हाला
वृक्ष वाढवा, घाला आळा जंगलतोडीला ।
जागृत होऊनि करा नेटका राष्ट्राचा संसार
पुत्रांनो मी धरतीमाता मागतसे आधार ||”

तर मित्रांना  “Vrukshavalli Aamha Soyare Vanachare Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे निबंध मराठी ” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: