Site icon My Marathi Status

वटपौर्णिमा सणाबद्दल माहिती मराठी | Vat Purnima Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला वटपौर्णिमा सणाबद्दल माहिती मराठी | Vat Purnima Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – १५ Festivals Information in Marathi

दिनांक : २४ जून २०२१
महिना : ज्येष्ठ
तिथी : पौर्णिमा
पक्ष : शुक्ल

धार्मिक महत्त्व

पंचांगानुसार हिंदू धर्मातील तिसरा मराठी महिना म्हणजे ज्येष्ठ. या महिन्यातील पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा होय. या दिवशी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पतीला दीर्घायुष्य मिळावे म्हणून प्रार्थना करतात.

दिवसाचे महत्त्व

वटपौर्णिमेच्याला ‘वटसावित्री पौर्णिमा’ असेही म्हणतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून ते ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेपर्यंत सुवासिनींनी उपवास करावा व वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करून उपवास सोडावा.

या दिवशी वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाकडून परत मिळविले. या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी ब्रह्मा-सावित्रीचे पूजन करावे. सत्यवान-सावित्रीची कथा वाचावी किंवा ऐकावी.

आपल्या भारतीय संस्कृतीत पतिव्रता स्त्रियांना फार महत्त्व आहे. पतिव्रता स्त्रियांमध्ये सावित्रीचे स्थान फार वरचे आहे. म्हणून या दिवशी पाच-सात सुवासिनींना घरी बोलावून त्यांची आंबा व गव्हाने ओटी भरली जाते. आंबा फळाचे महत्त्व या दिवशी विशेष असते.

इतर फल

वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी वडाच्या झाडाची साग्रसंगीत पूजा करतात, वडाला सात प्रदक्षिणा घालून सात वेळा झाडाला सूत बांधतात.

पुढील सात जन्म आपल्याला हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात. सावित्रीने याच दिवशी पतीचे प्राण परत मिळवून असाध्य अशी गोष्ट साध्य केली तीच श्रद्धा आणि निष्ठा या स्त्रियांच्या मनात असते.

हा सण खास सुवासिनी स्त्रियांचाच आहे आणि अशा सणातून आणि व्रतवैकल्यांतून स्त्रियांवर नैतिकतेचे संस्कार होतात. वडाचे झाड आपल्याला छान, दाट थंडगार सावली देते. वाटसरूचे विश्रांतिस्थान असते. या दिवशी कर्नाटक प्रांतात बेंदूर म्हणजेच बैलांची पूजा केली जाते. त्याला कारदुणवी’ असे म्हणतात.

काय शिकलात?

आज आपण वटपौर्णिमा सणाबद्दल माहिती मराठी | Vat Purnima Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version