Site icon My Marathi Status

तापी नदी बद्दल माहिती मराठीत – Tapi River Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला तापी नदी बद्दल माहिती मराठीत – Tapi River Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – वैनगंगा नदी

तापी नदी – Tapi River Information in Marathi

महाराष्ट्रातील काही प्रमुख नद्यांमध्ये तापी नदीचा समावेश आहे. उगमस्थान – तापी नदी मध्य प्रदेशातील बैतुल विभागात महादेवाच्या डोंगरात उगम पावते. तापी नदीच्या उगमाजवळ तिला मूळतापी’ असे म्हणतात.

तापी नदीचे खोरे – तापी नदीच्या खोऱ्यामध्ये जळगाव जिल्ह्याचा मोठा प्रदेश येतो. अजिंठा डोंगररांगा, उत्तरेकडील सातपुडा पर्वत तसेच दक्षिणेकडील सातमाळा डोंगराच्या दरम्यानचा प्रदेश तापी नदीच्या खोऱ्यात येतो.

तापी नदीच्या उपनद्या – पूर्णा, पांझरा तसेच गिरणा या तापी नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. शिवाय इतर लहान उपनद्याही आहेत. इतर माहिती – तापी नदी महाराष्ट्र, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांतून वाहत जाते.

मध्य प्रदेशातील बुन्हाणपूर जवळून ती महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात प्रवेश करते. तेथे ती पूर्व-पश्चिम वाहते. पुढे शहादा गावाजवळून तिचा गुजरात राज्यात प्रवेश होतो.

तापी नदीची लांबी सुमारे ७०० किमी. असून त्यातील २०० किमी.चा प्रवाह महाराष्ट्रात आहे. पूर्णा ही नदी जळगाव जिल्ह्यातील तापी नदीला येऊन मिळते. तसेच पुढे पांझरा व गिरणा याही नद्या तापी नदीला येऊन मिळतात.

महाराष्ट्रात तापी नदीचे पात्र बरेच विशाल असून तिच्या काठावर काही तीर्थक्षेत्रे आहेत. तापी व पूर्णा यांच्या संगमाजवळ संत चांगदेवांची समाधी आहे.

तापी नदीकाठी एदलाबाद येथे संत मुक्ताबाईंचे प्रसिद्ध मंदिर आहे. तापी नदीचे खोरे फार सुपीक व समृद्ध आहे. तापीचे पाणी शेती, बागायती, उद्योग व कारखान्यांसाठी तसेच पिण्यासाठी वापरण्यात येते.

अमरावती, अकोला व जळगाव भागातील आदिवासी व भिल्ल जमातींची ती जीवनदायिनी नदी आहे. तसेच तापीमुळे खोऱ्यातील गावांची चांगली भरभराट झाली आहे.

काय शिकलात?

आज आपण तापी नदी बद्दल माहिती मराठीत – Tapi River Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version