हॅलो मित्रांनो आज आपण स्वस्तिक (तगर) फुलाबद्दल माहिती मराठीत – Swastik Flower Information in Marathi पाहणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – जास्वंद
स्वस्तिक (तगर) – Swastik Flower Information in Marathi
१] | मराठी नाव : | स्वस्तिक (तगर) |
२] | इंग्रजी नाव : | Tabernaemontana divaricata |
स्वस्तिक (तगर) हे फूल दिसायला खूपच सुंदर दिसते. रंग : या फुलाचा रंग स्वच्छ पांढरा असतो. त्याचा दांडा फिकट हिरव्या रंगाचा व लहान असतो.
वर्णन : तगरीची पाने लांबट व हिरवीगार असतात. पाने मऊ असतात व पान तोडल्यावर पांढरा चीक बाहेर येतो. झाडाचे खोड फिक्कट राखाडी असते. या फुलाला पाच पाकळ्या असतात.
ही फुले झाडावरच छान दिसतात. ही फुले तोडली की, थोड्या वेळातच सुकू लागतात. या फुलांना वास येत नाही. या फुलांना तगर असेही म्हणतात.
प्रकार : सिंगल व डबल स्वस्तिक असे दोन प्रकार आहेत. उपयोग : हे फूल पांढरे असल्यामुळे महादेवाला वाहतात. देवाला वाहण्यासाठी, हार करण्यासाठी या फुलांचा उपयोग होतो.
वैशिष्ट्य : या फुलांच्या पाकळ्या स्वस्तिकासारख्या दिसतात. म्हणून याला स्वस्तिकही म्हणतात. लागवड : याही झाडाचे बी नसते. एखादी फांदी जमिनीत लावल्यावर कालांतराने पाने फुटतात व रोप तयार होते.
याच्या कळ्या झुबक्यांनी येतात. या फुलांनी बहरलेले झाड लांबूनच पाहिले की हिरव्या गालीच्यावर पांढरी शुभ्र नक्षी काढली आहे, असे वाटते.खुप जणांच्या दारात स्वस्तिक (तगर) या फुलांची झाडे असतात.
काय शिकलात?
आज आपण स्वस्तिक (तगर) फुलाबद्दल माहिती मराठीत – Swastik Flower Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.