सोन्याचे सुवर्णमंदिर
शिखांचे पवित्र स्थान म्हणून अमृतसरकडे पाहिले जाते. बियास नदीच्या काठी हे शहर वसले आहे. शिखांची चार तख्ते आहेत. त्यापैकी अमृतसरचे तख्त हे ‘श्री अकाल तख्त साहिब’ या नावाने ओळखले जाते. शिखांचे चौथे गुरु रामदास यांनी शिखांसाठी सुंदर मंदिर बांधावे म्हणून प्रथम एक तलाव खोदायला घेतले. त्या तलावाला नांव ठेवले ‘अमृतसरोवर.’ या नावामागे एक आख्यायिका आहे.
प्रभू रामचंद्राने अश्वमेघ करावयाचे ठरवून दिग्विजय घोडा सोडला आणि तो घोडा लव-कुश यांनी पकडला. त्याच्या मुक्ततेसाठी राम-लक्ष्मण व भरत-शत्रुघ्न यांनी लव-कुशांशी युद्ध केले. पण लव-कुशांनी चौघांना मूर्च्छित पाडले. त्यांना शुद्धीवर आणण्यासाठी लव-कुशांनी स्वर्गातून अमृत आणले व त्यांच्यावर शिंपडले. उरलेले अमृत जमिनीत पुरले. त्याच ठिकाणी गुरु रामदास याने तलाव खोदला आणि वसाहत सुरु केली.
या स्थानाला रामदासपूर’ नांव पडले. या तलावाचे पाणी अमृतासारखे असल्यामुळे रामदासपरचे पढेअमतसर’ झाले. संगमरवराचे घाट असलेले हे सरोवर ४७५ फूट लांब-रुंद आहे. शिखांचा पाचवा गुरु अर्जुनदेव याने हे मंदिर निर्माण केले. सुवर्णमंदिर हे सोन्याच मंदिर आहे. मंदिराची छते व भिंती सोन्याचा मुलामा दिलेल्या पत्र्यांच्या आहेत. महाराजा रणजितसिंहाने या मंदिराची खरी शोभा वाढवली.
रोज सकाळी अकालबुंग येथून पवित्र ग्रंथ ‘ग्रंथसाहिब’ आणून तो सुवर्णमंदिरातील एका छत्रीखाली ठेवतात. तो दिवसभर तिथेच असतो. देवस्थानाचे गायक त्याच्यापुढे बसून रागदारीत गीते गातात. ग्रंथी नावाचा अधिकारी ग्रंथ साहिबावर चवरी वारीत असतो. समोर वस्त्र पसरलेले असते. त्यावर भाविक लोक पैसे ठेवतात. रात्र पडल्यानंतर ग्रंथसाहिब परत मूळजागी नेतात.
येथे एकूण तेरा गुरुद्वारे असून सुवर्ण-मंदिर मुख्य आहे. शिखांच्या गुरुद्वारात उघड्या डोक्याने कोणालाही जाता येत नाही. या मंदिराचे प्रवेशद्वार उत्तरेकडे असून प्रवेशद्वारावर शिख योद्धे व क्रांतिकारकांची चित्रे लावलेली आहेत. अमृत सरोवराच्या पूर्वेला ६८ पवित्र स्थळे असून मंदिराला चार प्रवेशद्वार आहेत. प्रदक्षिणा मार्गात एक जुबीवृक्ष’ असून मंदिराचा पहिला पुजारी बाबा गुजहाजी याने ४५० वर्षांपूर्वी या वृक्षाखाली बसून मंदिराच्या बांधकामाची देखरेख केली असं मानतात.
या झाडावर भाविकांची श्रद्धा असून बायका पुत्रप्राप्तीसाठी या झाडाला वस्त्र बांधतात. सुवर्ण मंदिराच्या तळमजल्यावर ‘ग्रंथसाहिब’ वस्त्राने आच्छादित असून तो खास केलेल्या सिंहासनावर ठेवतात. पहिल्या मजल्यावर अखंड पाठ चालू असतो. वरच्या मजल्यावर शिख महाल असून गुरु येथे बसत असत. येथील गुरु का लंगर’ येथील मोठ्या भोजनगृहात सर्वांना भोजन मिळते. येथे तीन रात्री रहाण्याची सोय आहे.
शिख संप्रदायात चार अकाल, तख्ते प्रसिद्ध आहेत. १) अमृतसर २) आनंदपूर ३) पटना ४) नांदेड हे मंदिर सर्वांसाठी खुले आहे. येथील शिस्त, स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. भक्त निरनिराळ्या मार्गाने यात्रेकरुंची सेवा करीत असतात. इ. स. १७६२ मध्ये अहमदशाह अब्दाली याने उद्ध्वस्त केलेले हे सुवर्णमंदिर दल खालसाच्या भाई देसराजने पुन्हा उभारले. अमृतसर हे चंदिगडपासून २३५ कि.मी. तर वाघा सीमेपासून २९ कि.मी. वर आहे.