‘सुजाण पालकत्व’ मराठी निबंध | Sujan Palakatva Nibandh in Marathi
Sujan Palakatva Nibandh in Marathi :- मित्रांनो आज सुजाण पालकत्व मराठी निबंध या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
आपल्याला थोडे कळू लागते ना लागते तोच जग आपल्याबद्दल अनेक चौकशा करायला लागून आपल्या जीवनात डोकवायला लागते. ‘शाळेत जायला लागला का?’ हा बहुधा पहिला प्रश्न असतो. अन् म तिथून पुढे, ‘कितवीत आहेस? नंबर कितवा? कुठल्या साइडचे शिक्षण घेणार?
नोकरी लागली का? मग आता लाडू केव्हा? पेढे केव्हा?’ यासारखे वयानुरूप प्रश्न बदलत जातात. पण आयुष्याच्या अंती मात्र या चौकशा ज्या दोन प्रश्नांवर येऊन थांबतात, ते प्रश्न म्हणजे ‘प्रकृती कशीआहे? आणि मुलंबाळं काय करतात?’ जीवनाचा सारा प्रवास कसा झाला ते या दोन प्रश्नांच्या उत्तरावर अवलंबून असते.
जीवनात अंतिम सुख या शेवटच्या उत्तरांमधेच शोधतायेते. ‘आपण आयुष्यभर धडपडलो, स्वत:साठी, कुटुंबासाठी कष्ट उपसले, घर थाटले, सुखासमाधानाच्या चार गोष्टी जमविल्या, मुलांच्या शिक्षणाची उत्तम व्यवस्था केली, त्यांना काही कमी पडू दिले नाही.’Sujan Palakatva Nibandh in Marathi
Contents
Sujan Palakatva Nibandh in Marathi
अशी सगळ्यांचीच खात्री असते. पण मग या अंतिम प्रश्नाचे उत्तर ‘अगदी उत्तम चालले आहे. मुले उत्तम त-हेने जीवनात स्थिर आहेत. त्यांच्या जीवनाचा समाजाला फायदा आहे. त्यांच्या उद्योगांमुळे कमीतकमी समाजाला धोका नक्कीच नाही. आम्हाला कशाची कमतरता नाही.
बस्स ! आता बोलावणे येईल तेव्हा तृप्ततेने आणि समाधानाने डोळे मिटायचे!’अशा प्रकारचे उत्तर किती जणांना देता येईल? बहुतेक ठिकाणी कुठे ना कुठे काही टोचतच असते. म्हातारपणी कसले ना कसले दुःख हृदयात खुपत असते.
त्या दुःखाचीही अनंत कारणे असू शकतात. सगळ्यांचेच जीवनमार्ग हिरवळीतून चालल्याप्रमाणे सुखद कधीच नसतात. अनेक दुःख, संघर्ष आणि परिस्थितीचे फटके जीवनमार्ग खडतर बनवतात. दैव आणि नशीब काही प्रमाणात टाळता येत नाहीत.
तरी म्हातारपणी होऊन गेलेल्या अनेक गोष्टींचा विचार करू लागलो तर आपल्या अनेक चुका लक्षात येतात. विशेषत: मुलांच्या बाबतीतल्या आपल्या वर्तनाबद्दल नंतर विचार करताना – ‘अरे, इथं आपलं चुकलंच’, ‘या गोष्टी तेव्हा आपल्या लक्षातच आल्या नाहीत,’Sujan Palakatva Nibandh in Marathi
‘मुलांचं मन तेव्हा आपण जाणलंच नाही’ ‘आपण आपल्याच काळजीकाट्यात व्यस्त राहिलो, मुले वाढविणे हे खरोखर एवड्या जबाबदारीचं काम आहे हे तेव्हा लक्षात आलं असतं तर’ असे अनेक विचार मनाला अस्वस्थ करतात. पण आता उपयोग नसतो.
गोष्टी घडून गेलेल्या असतात. सारे जीवनच आपोआप घडत राहते तशा. प्रवाहपतिताप्रमाणे बरेवाईट शिक्षण, मिळाली ती नोकरी, जमेल तसे लग्न होतेच. मुलेबाळेही होतात आणि मग वाट मिळेल तसा जीवनप्रवाह वाहात राहतो, या गोष्टी होतील तशा ‘होऊ देणे’ योग्य नाही तर यातली प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक ‘करणे’ हे महत्त्वाचे आहे हे ज्याला कळते त्याचा जीवनमार्ग प्रशस्त होतो.
सुजाण पालकत्व मराठी निबंध
शिक्षण मिळणे पेक्षा हवे ते शिक्षण ‘ मिळवणे’, ‘नोकरीत चिकटणे’ पेक्षा हवी ती नोकरी निवडणे आणि ‘लग्न होणे’ पेक्षा योग्य वेळी योग्य विचारांती आणि योग्य निवड करून ‘लग्न करणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे मुलं होणे यापेक्षा ‘सुजाण आईबाप बनणे’ या क्रियांना विशेष अर्थ आहे.
या सर्व क्रिया यशस्वीपणे पार पाडण्यावरच ‘उत्तम पालकत्वाची, जबाबदार पालकत्वाची पदवी पदरात पडणार आहे आणि तीही आयुष्याच्या शेवटी. आणि या अभ्यासाची सुरुवात अगदी लहानपणापासून स्वत:च्या जोपासनेपासून व्हायला हवी. Sujan Palakatva Nibandh in Marathi
त्याची बीजं प्रत्येकाच्या जबाबदार पालकांकडून पेरली जायला हवीत हेही उघड आहे.उत्तम शिक्षण आणि आर्थिक स्वावलंबन ही जबाबदार पालकत्वाची सुरुवातच आहे. लग्न केव्हा करायचे आणि आईबाप केव्हा व्हायचे याचा भरपूर पूर्वविचार आणि आखणी व्हायला हवी.
मुलाच्या जन्मापूर्वीच आपली आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि बौध्दिक तयारी परिपूर्ण झालेली असेल तर जीवनाची वाटचाल योग्य त-हेने सुरू होईल. मुलाला जन्म देणे सोपे आहे. पण त्या बालकामधून एक संपन्न, बुद्धिमान, सदाचारी व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्नांची अतिशय गरज आहे.
आणि ही जाणीव पालक म्हणून जेवढ्या लौकर निर्माण होईल तेवढे चांगले. कारण बालकाच्या सर्वांगीण विकासाचा पाया त्याच्या एक ते सहा वर्षांच्या आयुष्यातच घातला जातो. आणि हा काळ मूल जास्तीतजास्त त्याच्या पालकांच्या सहवासातच असते.आजकाल अडीच वर्षापासून मूल ‘शाळेत जायला लागते.
आणि ती शाळा एकदाची चांगल्यातली चांगली मिळाली की आपले मुलाच्या ‘बौध्दिक’ वगैरे विकासाबद्दलचे कर्तव्य संपले असे खूप जणांना वाटते. आता ती सर्व जबाबदारी शाळांवर टाकून आईबाप फक्त मुलाच्या परोपरीच्या लाडांपुरते उरतात. अन् मग यथावकाश त्याचे परिणाम दिसू लागतात.Sujan Palakatva Nibandh in Marathi
म्हणूनच बाळाच्या जन्माच्या आधीपासूनच आपण यशस्वी आणि जबाबदार पालक बनण्याच्या अभ्यासक्रमाला सामोरे जायला हवे. पूर्ण विचारांती मुलाच्या सर्वांगीण विकासामधली आपली नेमकी भूमिका काय, आपण त्यासाठी काय काय करू शकतो याचे ज्ञान मिळवून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली तर त्यातून मुलाचा जास्तीतजास्त आणि सर्वांगीण विकास साधता येतो.
बाळाची शारीरिक वाढ सोळाव्या-सतराव्या वर्षांपर्यंत होताना दिसत असते. खूप ठिकाणी त्याची काळजी घेतलीही जाते. पण बौध्दिक आणि मानसिक वाढ ही काही अशी लक्षात येत नाही. म्हणून त्याबद्दल सर्व माहिती करून घ्यायला हवी. Sujan Palakatva Nibandh in Marathi
बाळाच्या मेंदूची वाढ ही तिसऱ्या वर्षीच पूर्ण झालेली असते. ही वाढ म्हणजे मेंदूचे आकारमान-ते तीन वर्षांनंतर वाढत नाही. आणि मेंदूची जडणघडण बाळ आईच्या पोटात असल्यापासूनच सुरू होते. म्हणून मेंदूच्या निकोप वाढीचा विचार ते बाळ आईच्या पोटात असल्यापासूनच पालकांनी करायला हवा.
Sujan Palakatva Nibandh in Marathi
मुलाच्या बुद्धिमत्तेचा विकासही आईच्या पोटातूनच सुरू होतो. तिथपासून ते वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत बुद्धिमत्तेचा पत्रास टक्के विकास झालेला असतो आणि उरलेला पन्नास टक्के विकास सहा ते बारा या वयात होतो.
म्हणजेच वयाच्या बारा वर्षांपर्यंत होणाऱ्या त्याच्या बौद्धिक विकासावर त्याच्या भविष्यकाळात दिसून येणाऱ्या बुद्धिमत्तेची इमारत उभी असते एवढ्या एका गोष्टीवरून सुद्धा बाळाच्या एकूण विकासामधील आईबाबांचे स्थान आणि त्यांचे कर्तव्य लक्षात यावे.
म्हणूनच अर्थार्जन सुरु होण्यापूर्वी लग्न करणे हा जसा मूर्खपणा ठरतो त्याचप्रमाणे जबाबदार पालकत्वाची पुरेपूर जाण न येताच आईबाप होणे हाही मूर्खपणा आहे. बाळ जन्माला येण्यापूर्वीच मातेने स्वत:ला शारीरिक-मानसिकदृष्ट्या समर्थ आणि बाळाच्या स्वागतासाठी सर्वतोपरी सिद्ध बनवायला पाहिजे.
आज खरे तर या विषयावर कित्येक पुस्तके प्रतिवर्षी निघत असतात. पण किती मातापित्यांनी त्यांचे वाचन केले असेल हा प्रश्नच आहे. बाळाच्या मानसिक स्वास्थ्याचा विचारही बाळ पोटात असल्यापासूनच करायला हवा. आईच्या मन:स्थितीचे पडसाद गर्भावर उमटत असतात. Sujan Palakatva Nibandh in Marathi
जन्मानंतर सहा वर्षांपर्यंतचे मूल हे पूर्णतः आईवर अवलंबून असते. स्त्रीमुक्तीवाल्या काहीही म्हणोत, बालसंगोपन आईनेच का, बापाने सुद्धा करायला हवे यावर कितीही वाद होवोत. असल्या वादांशी बाळाला तरी काही कर्तव्य नसते.
त्याला आईच्या पोटात असताना मिळणारे सारे सुख, स्वास्थ्य, सुरक्षितता आणि आनंद त्याला पुढेही आईकडूनच तिच्या स्पर्शातून, तिच्या स्पंदनातून, तिच्या आनंदातून लाभत असतो. म्हणून त्याच्या निरोगी मानसिक जडणघडणीसाठी सुद्धा पहिली काही वर्षे आईचा सतत सहवास बाळाला आवश्यक आहे.
त्यासाठी आईने सावधान आणि सतर्क राहायला पाहिजे. म्हणूनच त्यासाठी या सावधानतेसाठ आवश्यक ते ज्ञान आई आणि बाबा दोघांनी आधीच मिळवले पाहिजे. आज शहरातून, खेड्यातून स्त्रियांची साक्षरता वाढलेली आहे.Sujan Palakatva Nibandh in Marathi
शालांत परीक्षेच्या आसपास शिक्षण झालेल्या भावी मातांची संख्या आता वाढते आहे. विविध पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे यांच्या वाचनाने, आकाशवाणी, टी.व्ही. यांचा योग्य उपयोग करून उत्तम मातृत्वासाठी, पितृत्वासाठी स्वत:ला तयार करणे आज अजिबात अवघड नाही.
‘पोरं होणं’ आणि ‘पालकत्व निभावणं’ या वेगळ्या गोष्टी आहेत हे लक्षात येणे महत्त्वाचे. हे निभावणे म्हणजे काय? तर आपल्या बाळामधून बौद्धिक, मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या संपन्न आणि ज्याचा समाजाच्या विकासाला थोडाफार तरी हातभार लागेल असे एक व्यक्तिमत्त्व आकाराला आणणे म्हणजे पालकत्व निभावणे, नुसती मुले जन्माला घालणे म्हणजे सुजाण पालकत्व नव्हे. तसे तर नवा जीव जन्माला घालण्याचे काम सारी सजीव सृष्टी करतच असते.
सुजाण पालकत्व मराठी निबंध
ते तर साऱ्या सजीवांचे प्रमुख कार्यच आहे. पण मानवेतर सृष्टी निसर्गाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून आपले हे काम यशस्वीपणे करत असते. पण त्याच निसर्गाने माणसाला बुद्धीची देणगी दिली आणि माणसावरचा आपला विश्वासच व्यक्त केला.
आणि निसर्गनियम पाळणे अगर मोडणे हे माणसाच्या हातीच सोपवले. पण परिणाम काय? आजच्या वेगवान आणि बेलगाम, मोहमयी आणि सुखलोलुप दुनियेत माणसाची ही बुद्धी भ्रष्ट होऊ पाहते आहे.
आपल्या बुद्धीचे लगाम कुठे आखडावेत, कुठे सैल सोडावेत, कोणत्या दिशेला वळवावेत याचे भानच त्याला राहिले नाही असे दिसते. भरमसाठ प्रजा निर्माण होत आहे. पण तिची योग्य निगराणी नाही म्हणून समाजजीवन किडत चालले आहे. ‘Sujan Palakatva Nibandh in Marathi’
दारिद्र्य अडाणीपणा आणि मार्गदर्शनाचा अभाव यामुळे खूप काही चांगले करावे असे वाटणारे आईबापही गोंधळल्यासारखे झाले आहेत. मूल केव्हा व्हावे, त्याच्या शरीराची काळजी कशी घ्यावी हे जागोजागच्या आरोग्यकेंद्रात आणि प्रचारमाध्यमातून अगदी जाहिरातींमधूनसुद्धा बिंबवले जाते पण तेवढेच पुरेसे नाही.
त्याशिवाय आणखीही खूप काही करावे लागते आणि तेही फार महत्त्वाचे असते याचा विचार क्वचितच होतो. जीवनाच्या अखेरच्या टप्यावर खरीखुरी कृतार्थता अनुभवण्यासाठी आपण काय करायला पाहिजे याचा विचार गृहस्थाश्रमाच्या उंबऱ्यावर उभे राहण्यापूर्वीच केला असेल आणि त्या विचाराप्रमाणे कृती घडली असेल तर आपण आपल्या कर्तव्यात चुकलो नाही हे समाधान तरी निश्चित मिळेल.
Sujan Palakatva Nibandh in Marathi
तर मित्रांना तुम्हाला सुजाण पालकत्व मराठी निबंध आवडलाअसेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “Sujan Palakatva Nibandh in Marathi” मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.