Site icon My Marathi Status

शिक्रा पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Shikra Bird Information in Marathi

हॅलो वाचकांनो.. आज मी तुम्हाला शिक्रा पक्ष्याबद्दल माहिती मराठीत – Shikra Bird Information in Marathi देणार आहे. तर चला बघुयात.

१. मराठी नाव : शिक्रा
२. इंग्रजी नाव : Shikra (शिक्रा)
३. आकार : ३० ते ३४ सें. मी.
४. वजन : १३० ग्राम.

माहिती – Shikra Bird Information in Marathi

या पक्ष्याचं इंग्रजी नाव इतकं रूळलंय की याला सगळेजण शिक्रा म्हणूनच ओळखतात. हा एका जातीचा शिकारी पक्षी आहे. शिकारी पक्षी म्हणजे जिवंत भक्ष्याची शिकार करणारा.

विरळ जंगलं, खेड्यापाड्यांच्या आसपास असणाऱ्या राया आणि शेतीच्या प्रदेशात हा पारव्याएवढा ससाणा दिसतो. पुष्कळदा हा पक्षी आपल्याला प्रत्यक्ष दिसण्याआधी इतर पक्ष्यांनी त्याला हेरलेलं असतं.

बुलबुल, सातभाई, वेडे राघू, साळुक्या, पारवे हे पक्षी शिक्रयाची चाहूल लागताच घाबरून उडायला लागतात किंवा बसल्या जागेवरूनच दुसऱ्यांना सावध करणारे आवाज काढतात. अशा सलामी नंतर जर आपण आसपास नीट लक्ष देऊन पाहिलं, तर गोलाकार पंखांची उघडझाप करत आणि अधून मधून संथपणे तरंगत येणारा हा ससाणा दिसतो.

तीक्ष्ण नजर, बाकदार चोच आणि धारदार नख्या यांची नैसर्गिक देणगी मिळालेला शिक्रा सरडे, सापसुरळ्या, खारी, पक्षी यांची शिकार करतो. आकार आणि रंग यावरून या पक्ष्याच्या तीन उपजाती किंवा भौगोलिक वंशांची नोंद झाली आहे.

पाठीकडून निळसर राखी आणि पोटाकडून पांढऱ्या रंगाच्या या पक्ष्याच्या छातीवर आणि पोटावर तांबूस तपकिरी रेषा असतात. या रेषा पाण्यावर सूक्ष्म लहरी उठाव्यात तशा दिसतात. मादी नरापेक्षा मोठी असते शिवाय मादीचा रंग पाठीकडून तपकिरी असतो.

साधारण मार्च ते जून या काळात शिक्रा घरटं करतो. त्याचं घरटं कावळ्याच्या घरट्यासारखंच असतं. शिक्रा बऱ्याचदा आंब्याच्या झाडात घरटं करतो. अशी झाडं अगदी शहराच्या मध्यभागी, गजबजलेल्या भागात असतील तरी चालतात.

तुमच्या घराच्या आसपास एखादा शिक्रा दिसतो का यावर लक्ष ठेवा. शिक्रयासारख्या शिकारी पक्ष्यांना (Birds of prey) बाज असं एक सर्वसाधारण नाव आहे. शिक्रा हा एका जातीचा शिकारी पक्षी आहे. एखाद्या परिसरात शिक्रा आला, की पक्ष्यांची धांदल उडते.

जो तो लपण्यासाठी जागा बघतो. त्याला पाहून या झाडावरून त्या झाडावर तुरूतुरू धावणारी आणि उड्या ठोकणारी पिटुकली चानी (म्हणजे खार) सुद्धा क्षणभर थबकते. शेपटी नाचवत घशातून किचकिचल्यासारखा आवाज काढून जणू सगळ्यांना सांगत असते.

काय शिकलात?

आज मी तुम्हाला शिक्रा – Shikra Bird Information in Marathi दिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद

Exit mobile version