Site icon My Marathi Status

शाइस्तेखानास शास्त केली

कोकण जिंकण्यासाठी मोहिमेवर निघालेल्या करतलबखान या मोंगल सरदाराला उंबर खिंडीतून पिटाळून लावून शिवाजी महाराज स्वत: कोकणात गेले व दाभोळपासून राजापूरपर्यंतचा प्रदेश घेतला व ते राजगडावर आले. आता पुण्यातील आपल्या लालमहालात गेली तीन वर्षे ठाण मांडून बसलेल्या व स्वराज्यात लुटालूट करणाऱ्या, गाव न् गाव उद्ध्वस्त करणाऱ्या शाइस्तेखानास स्वराज्यातून कसा घालवून द्यायचा आणि जमल्यास या जगातूनच त्याला कसा घालवायचा याचा विचार महाराज करीत होते.

महाराजांचे सगळे लक्ष पुण्यातील लालमहालाकडे व त्यात असलेल्या शाइस्तेखानाकडे लागले होते. या शाइस्तेखानाला हाणल्याखेरीज त्यांच्या मनाला स्वस्थता वाटेना. ग्राम विचार करता करता महाराजांनी एक विलक्षण डाव रचला. डाव तसा जोखमीचाच, प्रसंगी जिवावर बेतणारा होता; पण आता ठरले म्हणजे ठरले! एकदम मध्यरात्री लालमहालात शिरायचे व शाइस्तेखानाला उडवायचे. महाराजांनी आपली ही योजना मांसाहेब, नेताजी, तानाजी, आबाजी देशपांडे व चिमणाजी देशपांडे यांना सांगितली. ही कल्पना ऐकताच सर्व जण अगदी अवाक झाले. फारच धाडसी बेत.

लालमहालाच्या परिसरात शाइस्तेखानाची एक लाख फौज होती. पुण्याच्या हद्दीवर खानाने कडक पहारा बसविला होता. एकाही मराठी माणसाला त्याची नीट चौकशी केल्याशिवाय आत सोडत नसत, पण एकदा ठरले, म्हणजे ठरले. सगळा बेत अगदी गुप्त. या कानाचे त्या कानाला कळणार नाही. काय काय करायचे, कसे कसे करायचे, कुणी काय करायचे हे अगदी पक्के ठरले आणि खानाला खलास करून त्याच्या जाचातून स्वराज्याला सोडविण्याचा मुहर्त महाराजांनी निश्चित केला. गला चैत्र शद्ध अष्टमीची मध्यरात्र, ६ एप्रिल १६६३. दिवस मावळला.

महाराजांनी मांसाहेबांचा आशीर्वाद घेतला. जगदंबेचे दर्शन घेतले. दोन हजार निवडक मावळ्यांसह निघाले. नेताजी. मोरोपंत. बाबाजी देशपांडे, चिमणाजी देशपांडे, सर्जेराव व चांदजी जेधे असे खासे खासे सरदार बरोबर घेतले. महाराज गड उतरून खाली आले. त्यांनी चारशे मावळे आपल्या दिमतीला घेतले. उरलेल्या फौजेचे दोन भाग केले. एक गट मोरोपंतांच्या व दुसरा नेताजीच्या हाताखाली दिला. बिनीवर बाबाजी व चिमणाजी हे भाऊभाऊ निघाले. महाराज पुण्याच्या अलीकडे अर्ध्या कोसावर काळ्या वावरात येऊन पोहोचले. मध्यम झाला होती.

फक्त रातकिड्यांचा आवाज येत होता. खानाच्या छावणीतली सगळी माहिती गण हेरांनी अगोदरच आणली होती. तो रमझानचा महिना होता. आज सहावी रात्र होती. मोंगली फौज धर्मनियमाप्रमाणे दिवसा कडक उपवास करीत होती. दिवसा काहीही खायचे नाही आणि त्याचा वचपा रात्री सपाटन जेवून काढतात. मग साहजिकच सुस्ती येऊन रात्री ते गाढ झोपतात. शाइस्तेखानाच्या सैन्यात मराठा व रजपूत सैनिक होते, तरी बहसंख्य मुसलमान सैनिकच होते; त्यामुळे रोजा सोडून सैनिक गाढ झोपी जात.

एकदा का सैनिक झोपले की, पुण्यात, लालमहालात प्रवेश करणे अगदी सहज शक्य होते. ते शक्य व्हावे म्हणून तर महाराजांनी त्या महिन्यातील मध्यरात्र हा मुहर्त निश्चित केला होता. शिवाय शहरात मराठा, रजपूत, मुसलमान सैनिकांच्या छावण्यांचे तळ कुठे कुठे पडले आहेत, त्याच प्रमाणे त्या सैनिकांना चकविण्यासाठी कुठली बाजू सोयीची आहे, लालमहालाच्या आवतीभोवती काय स्थिती आहे, एकूण राबता कसा कसा चालला आहे, इत्यादींची अगदी इत्थंभूत माहिती महाराजांनी हेरांकडून अगोदरच मिळविली होती व त्यानुसार लालमहालावरील छाप्याची योजना तयार केली होती.

एकूण कामगिरी मोठी अवघड होती. जिवावर बेतणारी होती. लाख फौजेच्या गराड्यात शिरून, चिरेबंदी वाड्यात शिरून, खानाला ठार मारून, सहीसलामत परत यायचे म्हणजे सोपी गोष्ट नव्हती. शिवाजी महाराजांना व बाबाजी आणि चिमणाजी यांना पुणे शहराची व लालमहालाची खडानखडा माहिती होती, कारण तेथे त्यांचे बालपण गेले होते. चिमणाजी व महाराज यांनी आपल्याबरोबर दोनशे मावळ्यांची तुकडी घेतली. दुसरी दोनशे मावळ्यांची तुकडी बाबाजीच्या हाताखाली दिली आणि ते निघाले. देवडीवर व आतही जागोजागी पहारे होते. खान झोपला होता.

जनान्यातील दासी व नोकर-चाकर झोपलेले होते. महाराजांची व चिमणाजीची तुकडी शहराकडे निघाली. त्यांच्या मागोमाग बाबाजीची तुकडी येत होती. खानाच्या छावणी भोवती कडक पहारा होता. छावणी आली. हे सरळ आत निघाले. पहारेकऱ्यांनी त्यांना अडविले तुम्ही कोण? कोठून आलात? कठे निघालात चौकशी सरू झाली. एका घोडेस्वाराने सर्जेराव जेधे यांने चौकशीदारांना खडसावून सांगितले. “आम्हाला तुम्ही ओळखत नाही? आम्ही खानसाहेबांचीच माणसे आहोत. काल संध्याकाळी तम्ही पहाऱ्यावर आला नसताना पुढच्या चौक्यावर रात्रीच्या पहाऱ्यासाठी गेलो होतो.

आता माघारी जात आहोत.” महाराजांच्या माणसांची ही बतावणी अगदी सहज पचून गेली. चौकीदारांनी त्या दन्हिाहा तुकड्यातील मावळ्यांना अगदी खुशाल आत जाऊ दिले. पुढच्या चौकीदारांनीही ही आपलीच माणसे आहेत असे समजून आणखी आत जाऊ दिले. सगळे मावळे महाराजांसह शहरात गेले व लगेच ते इतस्तत: विखरून गेले. थोड्या वेळाने गवताने भरलेल्या दोन बैलगाड्या चौकीपाशी आल्या. त्यांच्याबरोबर इब्राहिमखान नावाचा एक पठाण होता. तो चौकीदारांना म्हणाला, “आमच्या छावणीतल्या घोड्यांना पुरेसे गवत मिळत नाही आणि हे गाडीवान गवताने भरलेल्या गाड्या घेऊन आपल्या गावाकडे जात होते.

त्यांना मी पकडून आणले आहे. आता त्यांना करतलबखानांच्या छावणीत नेतो व गवत काढून घेऊन यांना हकलून देतो. चौकीदारांनी त्या दोन गाड्या आत जाऊ दिल्या. मग एका ठरलेल्या ठिकाणी त्या गाड्या गेल्यावर महाराजांच्या त्या इब्राहिमखान पठाणाने त्या गाड्यांवरील गवतात लपवून ठेवलेल्या तलवारी काढून घेतल्या. गवत छावणीबाहेर असलेल्या घोड्यांपुढे टाकले.

अशा रीतीने महाराजांचे ठरलेले मावळे हत्यारांसह पुण्यात आले. त्याच रात्री एका लग्नाच्या मिरवणुकीत शिरून महाराज, बाबाजी व चिमणाजी पुण्यात शिरले. त्यांच्यामागोमाग हत्यारबंद मावळे निघाले. महराज, चिमणाजी व बाबाजी दबकत दबकत लालमहालापाशी आले. लालमहालात मुदपाकखान्याची म्हणजे स्वयंपाक करण्याची जागा होती. मुदपाकखान्यात आचारी व नोकरचाकर झोपलेले होते. सगळ्यात महत्त्वाची हीच जागा होती. मुदपाकखान्यात एकदा शिरले की, पुढचे काम सोपे होते.

महाराज आपल्या साथीदारांसह आले आणि त्यांनी मुदपाकखान्यात प्रवेश केला… त्यांच्या मागोमाग मावळे आत शिरले… अंधार दाट होता… त्या अंधारातच मावळ्यांनी भटारखान्यात काम करणाऱ्या व झोपलेल्या आचाऱ्यांना ठार मारले… लगेच महालाच्या मागच्या बाजूस असलेल्या एका कच्च्या भितीत गुपचूप भगदाड पाडून महाराज महालात घुसले… मुदपाकखान्यातील एका नोकराला चाहूल लागली… “गनीम आया। गनीम आया। तो नाकर आरडू लागला. महाम त्या ओरडण्याने वाड्यातल्या सर्वांना जाग आली आणि सगळीकडे धावाधाव सुरू झाली.

एक नोकर घाबरत घाबरत झोपलेल्या खानाकडे गेला व त्याला जागे करून म्हणाला, “भटारखान्यात काहीतरी गडबड आहे. तेथे आवाज येत आहे. कोणीतरी गनीम आत शिरले आहेत.” त्याच वेळी आरोळ्या, किंकाळ्या उठू लागल्या… हे ऐकताच खान एकदम उठला व भाला घेऊन धावू लागला… खानाच्या बायकांनी समया कुंकून विझविल्या… मराठे अंधारातच तलवारी फिरवू लागले… एकच कापाकापी सुरू झाली… महाराज शाइस्तेखानास शोधत होते. त्यांना खानच हवा होता. बाबाजीने धुमाकूळ सुरू केला. सगळीकडे गोंधळ सुरू होताच दालनात झोपलेला शाइस्तखानाचा मुलगा अब्दुल फत्तेखान जागा झाला व शाइस्तेखानाचे रक्षण करण्यासाठी तलवार घेऊन धावत निघाला, पण एका मराठी वीराने एकाच फटक्यात त्याला ठार मारले.

खान जीव मुठीत धरून बसला होता. अंधारात काहीही दिसत नव्हते. तरीही महाराजांनी व त्यांच्या साथीदारांनी अंदाजाने वार करून खानाच्या अनेक लोकांना ठार मारले. महाराज खानाला शोधत होते. तोच त्यांना हवा होता. इतक्यात खान खिडकीतून बाहेर पळून जात असलेला महाराजांना दिसला… महाराजांनी पटकन झेप घेऊन खानावर अंदाजाने खाडकन घाव घातला… त्या वेळी भयंकर आरडाओरडा झाला… महाराजांना वाटले खान मेला, पण खानाचे सुदैव! ..खान मेला नाही. त्याच्या उजव्या हाताची तीन बोटे तुटली व तो तिथून निसटला. या दणदणाटात खानाचा साठ माणस मारली गली.

महाराजाची सहा माणसे दगावली. इतके होई तो वाड्याबाहेर मोठे लष्कर गोळा झाले. गनीम आला. या बातमीने छावणीत मोठी गडबड सुरू झाली. लोक ओरडत होते, “गनीम आयाऽऽ । गनीम आयाऽऽ । दगाऽऽ दगाऽऽ” …मग मराठ्यानीही ओरडायला सरुवात केली. “गनीम? गनीम? कहाँ है गनाम! गनिमाला शोधायला लष्कराचे लोक महालात शिरले. अंधारात, अर्धवट उजडात त्याच गर्दीत ‘गनीम गनीम’ असे ओरडत महाराज व मराठे सामील झाले. सबंध छावणीभर शत्रूची शोधाशोध सुरू झाली. त्याच गर्दीत सामील होऊन महाराज व मराठे पसार झाले व ठरवून ठेवलेल्या ठिकाणी सर्जेराव जेधे व इब्राहिमखान पठाण उभे होते तिथे आले. तेथे घोडे तयारच होते.

सर्व जण घोड्यांवर स्वार झाले. “खानसाहबको मारकर शिवाजी भाग जा रहा है। पकडो उस मरगढे को।” असे आपणच ओरडत सर्व मावळे, तुकड्या तुकड्यांनी वेगवेगळ्या दिशांना, त्या वेढ्यातून वेगवेगळ्या ठिकाणांहून पुण्याबाहेर पडले व ठरलेल्या ठिकाणी उभ्या असलेल्या मोरोपंतांना व नेताजीला भेटले. लालमहालात आपण शाइस्तेखानास ठार मारले असेच महाराज समजत होते. त्यांनी मोरोपंत व नेताजी यांना तसे सांगितले असता सर्वांना अतिशय आनंद झाला. लाजजागत क सगळीकडे धावत सुटलेल्या खानाच्या सैन्याला चकविण्यासाठी नेताजीने एका मावळ्याला शिंग फुकण्यास सांगितले. तिकडे कात्रजच्या घाटात शे-दीडशे बैलांच्या शिंगांना पलिते बांधून ठेवले होते. शिंगाचा आवाज ऐकताच मावळ्यांनी पलिते पेटविले.

घाबरलेले बैल कात्रजच्या घाटातून पळू लागले. खानाच्या सैनिकांना ते अंधारातून पळून जाणारे मावळेच वाटले. मग सर्व जण त्या दिशेला धावत सुटले, पण जवळ जाताच त्यांना खरा प्रकार कळला. मावळ्यांनी आपल्याला चांगलेच बनविले हे त्यांच्या लक्षात आले. खानाचे सैन्य कात्रजकडे गेल्याचे पाहून महाराज सिंहगडाकडे निघून गेले. खानाची अब्र पार धुळीला मिळाली. शिवाय तीन बोटे गेली. त्याला जगाला तोंड दाखवावयास जागा उरली नाही. खानाची आता खातरीच झाली की, हा शिवाजी सैतानच आहे. त्याला चेटक येत असले पाहिजे. त्याला हवे तेथे गुप्त आणि प्रकट होता येत असले पाहिजे.

खानाला आता पुण्यात राहणे धोक्याचे वाटू लागले. भयंकर घाबरलेला खान पक्क्या बंदोबस्तात औरंगाबादला गेला. औरंगजेबास हे सगळे समजताच तो भयंकर संतापला. त्याने खानाला बंगालमध्ये जाण्याचे फर्मान काढले.लालमा महाराज व सर्व मावळे राजगडावर गेले. सर्वांना अतिशय आनंद झाला. खान मेला नाही. त्याची फक्त बोटे तुटली हे महाराजांना समजताच त्यांना जरा वाईट वाटले, पण झाला प्रकार काही कमी नाही म्हणून महाराज अतिशय खुश झाले.

Exit mobile version