Site icon My Marathi Status

तरवड फुलाबद्दल माहिती मराठीत – Senna Auriculata Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला तरवड फुलाबद्दल माहिती मराठीत – Senna Auriculata Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – कण्हेर फुलाबद्दल माहिती

तरवड – Senna Auriculata Information in Marathi

माळावरचे फूल म्हणजे तरवड होय. हे फूल दिसायला सुंदर असते. रंग : ही फुले गडद पिवळ्या रंगाची असतात. वर्णन : या फुलाचे झाड झुडूपवर्गीय असून, सरळ वाढते.

माळरानातील तरवडाची झुडपे बहुधा ४ ते ५ फुटांपर्यंतच वाढतात. उंच वाढणाऱ्या चिवट तरवडाला फांद्या फार नसतात. पाने जाड, साधारणपणे रुपयाच्या नाण्याएवढी असतात.

गोंडस टपोरी फुले गडद पिवळ्या रंगाची असतात. या झाडास लहान लहान लांबट शेंगा येतात. तरवडाचे बी तांबूस रंगाचे असते. प्रकार : या वनस्पतीमध्ये दोन: तीन प्रकार असे :

१) भुई तरवड २) ठेंगणा तरवड ३) उंच तरवड तरवडाचे प्रकार व त्यांचे उपयोग: उंच तरवड : तरवडाचे झाड ३० फुटांपर्यंत उंच वाढते व अतिशय चिवट असते. याचे लाकूड तांबूस रंगाचे असते.

साल करड्या काळसर रंगाची असते. याचा उपयोग पानमळ्याच्या कुंपणासाठी करतात. तसेच याचे मोठे वासे कुडाला आधार म्हणून वापरतात. या झाडाची लाकडे, साली वाळवून जळणासाठी वापरतात.

खेडेगावात या झाडाच्या सालींची धुरी डास हटवण्यासाठी उपयोगात आणतात. ठेंगणे तरवड : ठेंगण्या तरवडाची पाने आकाराने लांबट व गोलाकार असतात.

ठेंगणा तरवड हा उघड्या मोकाट रानमाळावर उगवतो, तो सरणपणासाठी उपयुक्त असतो. तसेच अती चालण्याने पाय सुजले, मुरगळले किंवा काही कारणाने लचक भरली तर तरवडाची पाने पाण्यात गरम करून त्याचा शेक घ्यावा.

या झाडांची पाने जनावरे खात नाहीत. पानगळ झालेली पाने खड्ड्यात कुजविली तर त्याचे सेंद्रिय खत तयार होते. वैशिष्ट्य : तरवड झाड माळावर, शेतावर कुठेही उगवते. तरवडीची लागवड केली जात नाही.

तरवडीच्या फुलांना वास नसतो. पण या फुलांभोवती भुंगे मात्र भिरभिरतात. इतर माहिती : तरवडाची गडद पिवळी टपोरी फुले दसऱ्याच्या वेळी घटाच्या माळेकरिता वापरतात.

तसेच रानावनात गुराखी मंडळी तरवडाच्या कोवळ्या काटक्यांतील टणक भाग बाहेर काढून त्या मोकळ्या सालीचा वापर पुंगी (बासरी) म्हणून करतात, तर बियांचा उपयोग वैदू लोक जनावरांना औषध म्हणून करतात. तरवड झाडांच्या फुलांना माळावरचं पिवळं सोनं’ म्हणून ओळखतात.

काय शिकलात?

आज आपण तरवड फुलाबद्दल माहिती मराठीत – Senna Auriculata Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version