मित्रांनो आज मी तुम्हाला शालेय प्रार्थना आणि परिपाठ – School Prathna and Paripath in Marathi म्हणजेच प्रार्थना, पसायदान आणि त्याचा अर्थ, समूह गीत इत्यादी मी आज तुम्हाला देणार आहे तर चला बघुयात.
Contents
- 1 राष्ट्रगीत । शालेय प्रार्थना आणि परिपाठ | School Prathna and Paripath in Marathi
- 2 प्रार्थना । शालेय प्रार्थना आणि परिपाठ | School Prathna and Paripath in Marathi
- 2.1 १. उपकार
- 2.2 २. नमो भास्करा
- 2.3 ३. तुम ही हो माता
- 2.4 ४. सर्व धर्म प्रार्थना
- 2.5 ५. या लाडक्या मुलांनो
- 2.6 ६. तन-मन-धन से
- 2.7 ७. या भारतात बंधुभाव नित्य बसू दे।
- 2.8 ८. सागर वसना पावन देवी
- 2.9 ९. प्रार्थना
- 2.10 १०. सरस्वती स्तवन
- 2.11 ११. इतनी शक्ती हमे देना दाता
- 2.12 १२. लावियेला दीप
- 2.13 १३. सत्यं शिवं सुंदरा
- 2.14 १४. गुरुविण जगी थोर काय?
- 2.15 १५. एक प्रतिज्ञा असे आमुची
- 2.16 १६. हे हंसवाहिनी
- 2.17 १७. देह मंदिर चित्त मंदिर
- 3 प्रतिज्ञा । शालेय प्रार्थना आणि परिपाठ | School Prathna and Paripath in Marathi
- 4 पसायदान । शालेय प्रार्थना आणि परिपाठ | School Prathna and Paripath in Marathi
- 5 समूहगीत । शालेय प्रार्थना आणि परिपाठ | School Prathna and Paripath in Marathi
राष्ट्रगीत । शालेय प्रार्थना आणि परिपाठ | School Prathna and Paripath in Marathi
जन-गण-मन अधिनायक जयऽहे,
भारत भाग्य विधाता।
पंजाब, सिंध, गुजराथ, मराठा,
द्राविड, उत्कल, बंग,
विंध्य, हिमाचल, यमुना, गंगा,
उच्छल जलधितरंग,
तव शुभ नामे जागे,
तव शुभ आशिष मागे,
गाए तव जय गाथा।
जनगणमंगल दायक जय हे। भारत भाग्यविधाता।
जय हे, जय हे, जय हे, जय जय जय जय हे। – रवींद्रनाथ टागोर
वंदे मातरम्
वंदे मातरम्, वंदे मातरम्
सुजलाम्, सुफलाम्, मलयज शीतलाम्
सस्यश्यामलाम् मातरम्। वंदे मातरम्।।
शुभ्रजोत्स्ना पुलकित यामिनीम्।
फुल्लकुसुमित द्रुमदल शोभिनीम्
सुहासिनीम् सुमधुरभाषिणीम्
सुखदाम् वरदाम् मातरम्। वंदे मातरम्। वंदे मातरम् ।। – बंकिमचंद्र चॅटर्जी
प्रार्थना । शालेय प्रार्थना आणि परिपाठ | School Prathna and Paripath in Marathi
१. उपकार
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो॥
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर।
चांदणे सुंदर पडे त्यांचे॥
सुंदर ही झाडे सुंदर पाखरे।
किती गोड बरे गाणे गाती।।
सुंदर वेलींची सुंदर ही फुले।
तशी आम्ही मुले देवा तुझी॥
२. नमो भास्करा
नमो भास्करा दे अनोखा प्रकाश
तनाचा मनाचा कराया विकास
गतीच्या विकासास द्यावा प्रकाश
झणी होऊ दे दुर्गुणांचा विनाश
नमो शारदा मी तुझा नम्र दास
अशी बुद्धी देई मला तुचि खास
घडो मायभूमी अहर्निश सेवा
मनाला अहंकार कधी ना शिवावा।
३. तुम ही हो माता
तुम ही हो माता, पिता तुम्ही हो।
तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही हो॥धृ॥
तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे
कोई न अपना, सिवा तुम्हारे
तुम्ही हो नैया, तुम्ही खिवय्या॥१॥
जो खिल सके ना, वो फूल हम है
तुम्हारे चरणों की धूल हम है।
दया की दृष्टी सदा ही रखना॥२॥
४. सर्व धर्म प्रार्थना
ॐ तत् सत् श्री नारायण तू, पुरुषोत्तम गुरु तू।
सिद्ध बुद्ध तू, स्कंद विनायक, सविता पावक तू।।
ब्रह्म मज्द तू, यह शक्ती तू, ईशु पिता प्रभू तू।
रुद्र, विष्णू तू, राम- कृष्ण तू, रहीम ताओ तू।।
वासुदेव गो-विश्वरूप तू, चिदानंद हरि तू।
अद्वितीय तू, अकाल निर्भय, आत्मलिंग शिव तू॥ – विनोबा भावे
५. या लाडक्या मुलांनो
या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार ।
नव हिंदवी युगाचे, तुम्हीच शिल्पकार ॥धृ।।
आईस देव माना, वंदा गुरुजनांना।
जगी भावनेहुनी या, कर्तव्य थोर जाणा ।
गंगेपरी पवित्र, ठेवा मनी विचार ॥१॥
शिवबापरी जगांत, दिलदार थोर व्हावे।
टिळकापरी सदैव, ध्येयास त्या स्मरावें।
जे चांगलें जगी या, त्याचा करा स्वीकार।।२।।
शाळेत रोज जाता, ते ज्ञान-बिंदु मिळवा।
हृदयांत आपुल्या त्या देशाभिमान ठेवा।
कुलशील थोर माना, ठेवू नका विकार ॥३॥
६. तन-मन-धन से
तन-मन-धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा
सभी धर्म, अरू, पंथ को दिल से रहे पियारा॥
विजयी हो, विजयी हो विजयी हो,
भारत देश हमारा ॥धृ॥
निर्भय हो यह देश की माता, मंगल कीर्ती कराने।
सत्य, शील, अरू निर्मल मन से, वीरो को उपजाने।
सद्गुणी हो यह देश की जनता, जीवन सुख सजवाने।
रंक, राव, पंडित, भिखारी, सबको सुख दिलवाने ।।
विजयी हो, विजयी हो विजयी हो,
भारत देश हमारा॥१॥
स्पृश्यास्पृश्य हटे, यह सारा देश-कलंक मिटाने ।
सबके मन कर्तव्यशील हो, धन-उद्योग बढाने ।
सब का हो विश्वास प्रभू पर, अपनी शक्ती बढाने।
ब्रह्मचर्य, अध्यात्म, दैविगुण घर घर में प्रगटाने ।
विजयी हो, विजयी हो विजयी हो,
भारत देश हमारा ॥२॥
सारा भारत रहे सिपाही, शत्रू को दहशाने।
तुकड्यादास कहे स्फूर्ति हो, सबको भक्ती कराने ।।
विजयी हो, विजयी हो विजयी हो,
भारत देश हमारा॥३॥ – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
७. या भारतात बंधुभाव नित्य बसू दे।
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे।
दे वरचि असा दे॥धृ॥
हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसू दे।
मतभेद नसू दे॥१॥
सकलांस कळो मानवता, राष्ट्रभावना।
ही सर्व स्थळी मिळुनी समुदाय-प्रार्थना
उद्योगी तरुण शीलवान येथे दिसू दे॥२॥
जातीभाव विसरूनिया एक हो आम्ही।
अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी।
खलनिंदका मनींही सत्य न्याय वसू दे॥३॥
सौंदर्य रमो घराघरात स्वर्गियापरी।
ही नष्ट होऊ दे विपत्ति भीतीबावरी
तुकड्यास सदा या सेवेमाजि बसू दे॥४॥ – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
८. सागर वसना पावन देवी
सागर वसना पावन देवी
सरस सुहावन भारत माँ॥धृ॥
हिमगीर नील पयोधर वत्सल
जनमन भावन भारत माँ
सागर वसना पावन देवी
सरस सुहावन भारत माँ॥१॥
देवी रज को सेंचित करने
गोरस सरिता बहती थी
गंगा, यमुना, सिंधु सराविल
कलित कथाएँ कहती थी
आज बहानी खंडित होकर
करुणा सावन भारत माँ
सागर वसना पावन देवी
सरस सुहावन भारत माँ॥२॥
९. प्रार्थना
दयाकर दान भक्ती का, हमे परमात्मा देना
दया करना, हमारी आत्मा मे, शुद्धता देना।
हमारे ध्यान मे आओ, प्रभू आँखों मे बस जाओ
अंधेरे दिल मे आकर के परमज्योजी जगा देना।।
बहा दो प्रेम की गंगा दिलों में प्रेम का सागर
हमे आपस मे मिल जुल कर प्रभू रहना सिखा देना।
हमारा कर्म हो सेवा, हमारा धर्म ही सेवा
सदा ईमान हो सेवा व सेवक चर बना देना।
वतन के वास्ते जीना, वतन के वास्ते मरना
वतन पर जान फिदा करना, प्रभू हम को सिखा देना ।।
१०. सरस्वती स्तवन
या कुन्देंदुतुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता
या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना।
या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिदैवैः सदा वन्दिता,
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्या पहा॥
११. इतनी शक्ती हमे देना दाता
इतनी शक्ती हमे देना दाता, मन का विश्वास कमजोर होना
हम चले नेक रस्ते में हम से, भुल कर भी कोई भूल हो ना॥धृ॥
दूर अज्ञान के हो अंधेरे, तू हमे ज्ञान की रोशनी दे।
हर बुराई से बचते रहें हम, जितनी भी दे भली जिंदगी दे।
बैर हो ना किसी का किसी से, भावना मन मे बदले की हो ना।
हम चले नेक रस्ते पे हम से, भूल कर भी कोई भूल हो ना ॥१॥
हम ना सोचे हमे क्या मिला, हम ये सोचे किया क्या है अर्पण।
फुल खुशियों के बाँटे सभी को, सब का जीवन भी बन जाये मधुबन।
अपनी करुणा जल तू बहा के, कर दे पावन हर-एक मन का कोना।
हम चले नेक रस्ते में हम से, भूल कर भी कोई भूल हो ना ॥२॥
१२. लावियेला दीप
लावियेला दीप प्रेमें तेवता ठेवू चला
बालकांच्या उन्नतीचा, मार्ग हा चालू चला॥धृ॥
नंदादीप इथे, मंदिरी शांत
ज्योत ज्ञानाची, तेवते त्यात
झाडुनिया काजळीला, वात ही सारू चला॥१॥
बीज जे अपुल्या, लाभले हाती
सुप्त त्यामाजी, ईश्वरी शक्ती
प्रेमसिंचन नित्य करोनी, वृक्ष हा हा सजवू चला॥२॥
आज ही कालिका, भासते मुग्ध
अंतरी दिव्य, साठवी गंध
पसरायाते परिमळ जगती, पुष्प हे फुलवू चला ॥३॥
हिंदमातेचे हे हिरेमोती
दौलत राष्ट्राची आपुल्या हाती
रक्षण, वर्धन, दौलतीचे, ध्येय हे साधू चला. – ताराबाई परांजपे
१३. सत्यं शिवं सुंदरा
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा सत्यं शिवं सुंदरा ।।धृ।।
शब्दरूप शक्ती दे, भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा ॥१॥
विद्याधन दे आम्हास, एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतिरी दयासागरा।।२।।
होऊ आम्ही नीतिमंत, कला गुणी बुद्धीमंत
कीर्तीचा कळस जाई उंच अंबरा।।३।।
१४. गुरुविण जगी थोर काय?
गुरु ईश्वर तात माय, गुरुविण जगी थोर काय ॥धृ।। गुरुवेनमः
गुरु प्रेमळ गुरु उद्धार, जडतेचा हरूनी भार
न्यावयास पेंलपार, एकमेव गुरु उपाय॥१॥ गुरुवेनमः
प्राणासह भरूनी श्वास, ज्ञानाचा दे प्रकाश
करावया मातीचा विकास, कोण दुजा गुरु शिवाय ॥२॥ गुरुवेनमः
गुरु तारा रम्य राशी, तोच अग्नी जलराशी
ओलांडून विश्व जाय ॥३॥ गुरुवेनमः
गुरु पूजा विधी विकार, गुरु अपार गुणविधान
स्वर्गाहून गुरु महान वंदावे तेची पाय॥४॥ गुरुवेनमः
१५. एक प्रतिज्ञा असे आमुची
एक प्रतिज्ञा असे आमुची ज्ञानाची साधना
निरंतर ज्ञानाची साधना…२
ज्ञान हेच संजीवन साऱ्या जगताच्या जीवना ॥धृ.॥ निरंतर…
ज्योत जागवू सुजाणतेची, सकलांच्या अंतरी
तीच निवारील परत तमाचे, प्रभाव सूर्यापरी
ज्ञानच देऊळ ज्ञानच दैवत, प्रगतीच्या पूजना ॥१॥ निरंतर…
नव्या युगाचा नव्या गुणाचा ज्ञान धर्म आहे
त्यातच आमुचा उदय, उद्याचे आश्वासन आहे
मुक्त करील तो परंपरेचा, अंगी धरा गुण भला॥२॥ निरंतर…
हाच मंत्र नेईल आम्हाला, दिव्य भविष्याकडे
न्यायनीतिचे पाऊल जेथे, भेदाशी ना अडे
जे-जे मंगल, पावन त्यांची, येथे आराधना ॥३॥ निरंतर…
१६. हे हंसवाहिनी
हे हंस वाहिनी, ज्ञानदायिनी, अम्बे विमल मति दे…२।
जग शिरमौर बनाये भारत, वह बल विक्रम दे…२॥धृ.॥
साहस, शील हृदय में भर दे, जीवन त्याग तपोमय कर दे।
संयम, सत्य स्नेह का वर दे, स्वाभिमान भर दे॥१॥
लव-कुश, ध्रुव प्रल्हाद बने हम, मानवता का कष्ट हरे हम।
सीता, सावित्री, दुर्गा माँ, फिर घर-घर भर दे…२॥२॥ हे हंस वाहिनी…
१७. देह मंदिर चित्त मंदिर
देह मंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थनाऽऽऽ
सत्य सुंदर मंगलाची, नित्य हो आराधना ।।धृ.॥
जीवनी नवतेज राहो, अंतरंगी भावनाऽऽऽ
सुंदराचा वेध लागो, मानवाच्या जीवना
शौर्य लाभो, ध्यैर्य लाभो, सत्यता संशोधना॥१॥
सत्य, सुंदर मंगलाची…
भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासनाऽऽऽ
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू, बंधुतेच्या बंधना।।२।।
सत्य, सुंदर मंगलाची…
दुःखितांचे दुःख जावो, ही मनाची कामनाऽऽऽ
वेदना जाणावयाला, जागवू संवेदना
दुर्बळांच्या रक्षणाला, पौरुषाची साधना ॥३॥
सत्य, सुंदर मंगलाची…
प्रतिज्ञा । शालेय प्रार्थना आणि परिपाठ | School Prathna and Paripath in Marathi
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे. त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा आणि वडिलधाऱ्या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.
माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे. त्यांचे कल्याण आणि त्यांची समृद्धी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे.
पसायदान । शालेय प्रार्थना आणि परिपाठ | School Prathna and Paripath in Marathi
आता विश्वात्मकें देवें। येणे वागयज्ञे तोषावें।
तोषोनि मज द्यावे। पसायदान हे॥१॥
जे खळांची व्यंकटी सांडो। तया सत्कर्मी रती वाढो।
भूतां परस्परे जडो मैत्र जिवांचे॥२॥
दुरितांचे तिमिर जातो। विश्व स्वधर्म सूर्ये पाहो।
जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात॥३।।
वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी।
अनवरत भूमंडळी। भेटतु भूतां ॥४॥
चला कल्पतरुचें आरव। चेतना चिंतामणीचे गांव।
बोलते जे अर्णव। पियूषांचे ॥५॥
चंद्रमे जे अलांछन। मार्तंड जे तापहीन
जे सर्वाही सदा सज्जन। सोयरे होतु ॥६॥
किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखी। अखंडित ॥७॥
आणि ग्रंथोपजीविये। विशेषी लोकीं इये।
दृष्टादृष्ट विजये। होआवे जी॥८॥
तेथे म्हणे श्री विश्वेशरावो । हा होईल दानपसावो।
येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया झाला ।।९।।
ओम शांती शांती शांती।। – संत ज्ञानेश्वर
पसायदानाचा अर्थ
“विश्वस्वरूप सद्गुरु यांनी माझ्या वाग्यज्ञेवरून संतुष्ट होऊन मजला हा प्रसाद द्यावा… दुष्टांचा कुटीलपणा जाऊन त्यांना सत्कर्माची प्रीती उत्पन्न होवो व जीवमात्रांची एकमेकांवर मैत्री वाढो. या सर्व विश्वामधील पापरूपी अंधार नाहीसा होऊन स्वधर्मरूपी सूर्य उगवून त्याचा प्रकाश होवो आणि प्राणिमात्राच्या ज्या ज्या इच्छा असतील त्या त्या पूर्ण होवो.
या भूतलावर अखिल मंगलाचा वर्षाव करणाऱ्या भगवत्भक्तांच्या समुदायाची सर्व भूतांना सद्भावे करून सदोदित भेट होवो…
ते भक्तजन कसे आहेत? चालत- बोलते कल्पतरुचे बाग, जीवंत चिंतामणीचे गांव किंवा अमृताचे चालते- बोलते समुद्रच आहेत… ते कलंकरहित प्रतिचंद्र संसाररूपी अंधःकार दूर करून शांतिसुख देणारे प्रतिसूर्य असे भगवत्भक्त, ते सकल जीवांना प्रिय होवोत…
फार काय मागावे! सर्व त्रैलोक्य सुखाने परिपूर्ण होऊन प्राणिमात्राला हरीचे अखंड भजन करण्याची इच्छा होवो… आणि या ग्रंथावरच ज्यांचे उपजीवन आहे, त्यांना इहलोकचे व परलोकचे भोगावर विजय प्राप्त करो. तेंव्हा सद्गुरु प्रसन्न होऊन म्हणाले की, “तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व होईल.” …असे वरदान मिळाल्याने ज्ञानदेव फार संतोषित झाले.
समूहगीत । शालेय प्रार्थना आणि परिपाठ | School Prathna and Paripath in Marathi
१. हा देश माझा
हा देश माझा याचे भान, जरासे राहू द्या रे
जरासे राहू द्या ॥धृ॥
हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा
ह्या गंगा-यमुना, शेती धरती, बाग-बगीचा माझा
अभिलाषा याची धरीता। कुणी नजर वाकडी करिता
त्या मरण द्यावया, स्फुरण आपुले बाहु पाऊ द्या रे॥१॥
हे हात उत्सुकलेले,
दगडाच्या वर्षावाला
रोकाते लावा कार्याला,
या देशाच्या प्रगतीला
हे बंद करा उत्पात,
थांबवा आपुला घात
सामर्थ्य व जावो व्यर्थ काहीसा
अर्थ ही येऊ द्या रे॥२॥
जरी अनेक अपुले धर्म, जरी
अनेक अपुल्या जाती
परि अभंग असू द्या,
सदैव आपुली माणुसकीची नाती
द्या सर्व दूर ललकारी,
फुकारे एक तुतारी
संदेश शेष जे द्वेष मनातील
वाहुनी जाऊ द्या रे॥३॥
२. सारे जहाँ से अच्छा
सारे जहाँ से अच्छा हिंदोसताँ हमारा
हम बुलबुले हैं इसकी यह गुलिस्ता हमारा॥
गुरबत मे हो अगर हम, रहता है दिल वतन मे।
समझो हमे वही भी, दिल हो जहाँ हमारा॥१॥
परबत वो सबसे उँचा, हमसाया आसमाँ का।
वह संतरी हमारा, वह पासबाँ हमारा॥२॥
गोदी मे खेलती है, जिसकी हजारों नदियाँ।
गुलशन है जिनके दम से रक्शे जिनाँ हमारा ॥३॥
ए आबे-रुदे-गंगा, वह दिन है याद तुझ को।
उतरा तेरे किनारे, जब कारवाँ हमारा ॥४॥
मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना।
हिंदी है हम, वतन है हिन्दोस्ताँ हमारा ॥५॥
युनानो तिस्त्रो रूमा, सब मिट गए जयाहाँ से
अब तक मगर है बाकी, नामोनिशा हतारा॥६॥
कुछ बात है कि हस्ती, मिटती नही हमारी।
सदियों रहा है दुश्मन, दौरे जमाँ हमारा ॥७॥
इकबाल कोई मरहम, अपना नही जहाँ में।
मालूम क्या किसी का दर्दे-निहाँ हमारा ॥८॥
सारे जहाँ से… – महम्मद ईकबाल
३. जय जय महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ॥
रेवा, वरदा, कृष्णा, कोयना, भद्रा, गोदावरी
एकमतांचे भरतो पाणी, मातीच्या घागरी
भीम थडीच्या तटांना या यमुनेचे पाणी पाजा॥१॥
जय जय महाराष्ट्र…
भीती न आम्हा तुझी मुलीही गडगडणाऱ्या नभा
अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिमा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभूराजा
दरीदरीतून वाद गुंजला महाराष्ट्र माझा ।।२।।
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निष्काच्या घामाने भिजला
देश रक्षणासाठी शिजला, दिल्लीचेही तख्त राखतो
महाराष्ट्र माझा॥३॥
४. हम होंगे कामयाब
होंगे कामयाब हम होंगे कामयाब
हम होंगे कामयाब-एक दिन
मन में है विश्वास,
पूरा है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन ॥धृ.॥
हम चलेंगे साथ-साथ,
डाल हाथों में हाथ
हम चलेंगे साथ-साथ
मन में है विश्वास
पूरा है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन।
होंगी शांती चारो और (२)
होंगी शांती चारो और एक दिन
मन में है विश्वास,
पूरा है विश्वास,
हम होंगे कामयाब एक दिन (२)
होंगी जीत सच्चाई की
होंगी जीत सचाई की एक दिन
मन मे है विश्वास
पूरा है विश्वास
हम होंगे कामयाब एक दिन (२)
युग बदलेगा चारो और
युग बदलेगा चारो और एक दिन
मन में हे विश्वास
पूरा हैं विश्वास
हम होंगे कामबाब एक दिन॥
५. खरा तो एकचि धर्म
खरा तो एकचि धर्म।
जगाला प्रेम अर्पावे ॥धृ॥
जगी जे हीन अतिपतित,
जगी जे दीन पद-दलित
तया जाऊन उठवावे।
जगाला प्रेम अर्पावे ॥१॥
सदा जे आर्त अति विकल,
ज्यांना गांजिती सकल
तया जाऊन हसवावे।
जगाला प्रेम अर्पावे।।२।।
कुणा ना व्यर्थ शिणवावे,
कुणा ना व्यर्थ हिणवावे
समस्ता बंधु मानावें।
जगाला प्रेम अर्पावे ॥३॥
प्रभुची लेकरे सारी,
तयाला सर्व ही प्यारी
कुणा ना तुच्छ लेखावें
जगाला प्रेम अर्पावे॥४॥
असे हे सार धर्माचे,
असे हे सार सत्याचे
परार्था प्राण ही द्यावे।
जगाला प्रेम अर्पावे – साने गुरूजी
६. बल सागर भारत होओ
बलसागर भारत होओ,
विश्वात शोभुनी राहो ॥धृ॥
हे कंकण करि बांधियेले
जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले
मी सिद्ध मरायाला हो। बलसागर…॥१॥
वैभवी देश चढवीन
सर्वस्व त्यास अीन
तिमिर घोर संहारीन
या बंधु सहायाला हो । बलसागर… ॥२॥
हातात हात घेऊन
हृदयात हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून
या कार्य करायाला हो। बलसागर… ॥३॥
करि दिव्य पताका घेऊ
प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दाऊ
ही माय निजपदा लाहो। बलसागर… ॥४॥
या उठा! करू हो शर्थ
संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरी व्यर्थ
भाग्यसूर्य तळपत राहो। बलसागर… ॥५॥
ही माय मुक्त होईल
वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांती देईल
तो सोन्याचा दिन येवो। बलसागर… ॥६॥ – साने गुरुजी
७. झेंडा उँचा रहे हमारा
झेंडा उँचा रहे हमारा।
विजयी विश्व तिरंगा प्यारा।।
झेंडा उँचा रहे हमारा ॥धृ।।
सदा शक्ती सरसानवाला।
प्रेम सुधा बरसानेवाला॥
वीरों को हर्षानेवाला॥
मातृभूमि का तनमन सारा॥१॥
आणखी वाचा – 50+ नवीन छोटे मराठी सुविचार
काय शिकलात?
आज आपण शालेय प्रार्थना आणि परिपाठ | School Prathna and Paripath in Marathi माहित पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.