Savitribai Phule Information in Marathi – सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षीकाच नव्हें तर त्या एक उत्तम कवियित्री, अध्यापिका, समाजसेविका आणि पहिली विद्याग्रहण करणारी महिला देखील आहेत.
Contents
Savitribai Phule Information in Marathi
त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवुन देण्याकरता खर्ची घातले. सावित्रीबाई फुले भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. सावित्रीबाईंचे पूर्ण नाव सावित्रीबाई ज्योतिराव फुले होते. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे होते.
सावित्रीबाईंनी वयाच्या नवव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचे लग्न 1840 मध्ये बारा वर्षांचे ज्योतीराव फुले यांच्याशी झाले. त्यांचा विवाह झाला त्यावेळेस त्या शिक्षीत नव्हत्या पण लग्नानंतर ज्योतिबांनी त्यांना लिहावाचावयास शिकविले. तो काळ स्त्रियांच्या दृष्टीकोनातुन फारसा चांगला काळ नव्हता त्यांना शिक्षणाची देखील अनुमती नसल्याने सावित्रीबाईंच्या शिक्षणाकरता ज्योतिबांच्या परिवाराने फार विरोध केला. [Savitribai Phule Information in Marathi]
सावित्रीबाई फुले यांची माहिती
जुन्या चालिरीतींचा पगडा आणि समाजाच्या भितीने ज्योतिबांच्या घरच्यांनी दोघांना घराबाहेर काढले. ज्योतिबांनी सावित्रीबाईंचे शिक्षण सुरूच ठेवले व त्यांचा प्रवेश एका प्रशिक्षण शाळेत करविला.
समाजाच्या इतक्या विरोधानंतर देखील सावित्रीबाईंनी आपले शिक्षण पुर्ण केले. शिक्षण पुर्ण केल्यानंतर या शिक्षणाचा उपयोग समाजातील महिलांना शिक्षीत करण्याकरता करावा असा विचार सावित्रीबाईंनी केला पण हा विचार एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हतां कारण त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती.
दोघांनी मुली गोळा करून मुलींची शाळा सुरू केली. एकुण 9 मुलींनी प्रवेश घेतला, सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापिका देखील बनल्या. आणि त्या देशाच्या पहिल्या शिक्षीका बनल्या.
Savitribai Phule Information
सावित्रीबाईंवर शेण, दगड, कचरा फेकण्यात येते असे, त्यांना शिवीगाळ केली जात असे तरी देखील त्या डगमगल्या नाहीत, ध्येयापासुन परावृत्त झाल्या नाहीत. प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि स्त्रिशिक्षणाची ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली. {Savitribai Phule Information in Marathi}
महिलांचा आत्मविश्वास वाढवण्याची गरज त्यांनी ओळखली. त्यावेळी ज्योतिरावांनी समाजात विधवा आणि गर्भवती महिलांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात बाल हत्या प्रतिबंध गृह सुरू केले आणि सावित्रीबाईंनी ते प्रभावीपणे चालवले.
समाजात प्रचलित असमानता दूर करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. सावित्रीबाईंनी त्यांचे काम केवळ शिक्षणापुरते मर्यादित केले नाही तर विधवा आणि मुलांच्या हत्या थांबवण्यासाठी गरीब अस्पृश्य समाजासाठी मोलाचे कार्य केले.
सावित्रीबाई फुले माहिती
त्यांच्या कार्याचा सन्मान 12 फेब्रुवारी 1852 रोजी ब्रिटिश अधिकारी मेजर कँडी यांनी केला. सावित्रीबाई कवियत्री म्हणुन देखील या समाजाला परिचीत आहेत “काव्यफुले” आणि “बावनकशी सुबोधरत्नाकर” यात त्यांच्या काव्यरचना आज देखील आपल्याला पाहाता येतात.
1897 मध्ये प्लेगने पुण्यात घेरले. यामध्ये रूग्णांची सेवा करत असताना, तो देखील या आजाराने ग्रस्त झाला. शेवटी 10 मार्च 1897 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाईंचे निधन झाले. समाजाप्रती त्यांच्या अतुल्य अश्या योगदानाला कधीही विसरता येणार नाही. “Savitribai Phule Information in Marathi”
महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांच्या कार्यामुळे त्यांना अनेक पुरस्कांरानी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि केंद्र सरकार ने त्यांच्या नावाने अनेक पुरस्कारांची निर्मीती केली आणि त्यांच्या सन्मानार्थ एक डाक तिकीट देखील काढण्यात आले आहे.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला?
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला.
सावित्रीबाई फुले यांचे निधन कधी झाले?
10 मार्च 1897 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे निधन झाले.