Site icon My Marathi Status

संत श्री तुलसीदास बद्दल माहिती मराठीत – Sant Tulsidas Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला संत तुलसीदास बद्दल माहिती मराठीत – Sant Tulsidas Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – संत कबीर

संत श्री तुलसीदास – Sant Tulsidas Information in Marathi

१] नाव – संत श्री तुलसीदास
२] जन्म – इसवी सन १५३२
३] आई – हुलसी
४] वडील – आत्माराम
५] मृत्यू – इसवी सन १६२३

संत श्रीगोस्वामी तुलसीदास (उत्तर भारतीय संत आणि हिंदी महाकवी) इसवी सन १५३२ ते इसवी सन १६२३ गोस्वामी तुलसीदासांचा जन्म उत्तर प्रदेशातील सारो ह्या स्थानाजवळ रामपूर ह्या गावात दुबे नावाच्या कुळात इसवी सन १५३२ मध्ये भाद्रपद शुद्ध एकादशीस झाला.

तुलसीदासांच्या वडिलांचे नाव आत्माराम होते आणि आईचे नाव हुलसी होते. तुलसीदासांच्या जन्मानंतर दहा महिन्यांतच त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला आणि ते अनाथ झाले, त्यामुळे त्यांचे लहानपण फार कष्टात गेले.

त्यांना एका हनुमानमंदिरात आश्रय मिळाला होता आणि ते भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करत होते. रामशैल येथे राहणाऱ्या श्रीअनंतानंद ह्यांच्या परम शिष्याला, श्रीनरहरीस्वामींना तुलसीदास सापडले. त्यांनी त्यांचे नाव रामबोला असे ठेवले.

नरहरीस्वामींनी त्याला अयोध्या येथे नेले. शुक्रवार शके १५६९ मधील शुक्ल पंचमीच्या दिवशी त्यांनी तुलसीदासांची मुंज केली. कोणीही न शिकवताच तुलसीदासांनी गायत्री मंत्राचे उचारण केले.

त्यामुळे तिथले सगळे लोक चकित झाले. त्यानंतर नरहरीस्वामींनी वैष्णवांचे पाच संस्कार करून तुलसीदासांना राममंत्राची दीक्षा दिली आणि अयोध्येत राहूनच प्राथमिक विद्याभ्यास शिकवला.

तुलसीदासांची बुद्धी तीव्र होती आणि ते एकपाठी होते. काही दिवसांनंतर गुरु-शिष्य दोघे शुकक्षेत्र येथे गेले. तिथे नरहरीस्वामींनी तुलसीदासांना रामाचे चरित्र सांगितले. त्यानंतर ते दोघे काशी येथे गेले.

काशीत गेल्यावर शेषसनातन नावाच्या एका महापंडिताकडे तुलसीदासांनी वेद-वेदांगे, दर्शने आणि पुराणे ह्यांचा अभ्यास केला. अभ्यास पूर्ण झाल्यावर त्यांनी दीनबंधू पाठक ह्यांच्या मुलीशी, रूपवती हिच्याशी, विवाह केला.

त्यांचे त्यांच्या पत्नीवर अतिशय प्रेम होते. त्यांची पत्नी माहेरी गेली असता, त्यांना तिचा विरह सहन न झाल्यामुळे ते लोकाचार बाजूला सारून तिला भेटण्यासाठी तिच्या माहेरी गेले.

त्यांच्या धर्मनिष्ठ पत्नीने त्याबद्दल त्यांना चांगलेच खडसावले. पत्नीच्या बोलण्यामुळे तुलसीदासांचे मन संसारातून उडाले आणि त्यांना रामभजनाचा छंद जडला. तीर्थयात्रेच्या निमित्ताने तुलसीदासांनी खूप प्रवास केला.

चित्रकूट, अयोध्या आणि काशी ह्या तीन ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले. त्यांपैकी काशीमध्ये ते सर्वात जास्त काळ राहिले. काशीमध्ये ते असी घाटावर राहत असत. त्या घाटाला आता तुलसी घाट असे म्हणतात.

काशीत त्यांनी रामपंचायतन आणि संकटमोचन हनुमान ह्यांची स्थापना केली. तुलसीदासांचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. ते दयाळू आणि परोपकारी वृत्तीचे होते.

रामावर आणि हनुमंतावर त्यांची नितांत श्रद्धा होती. त्यांना हनुमंताचे आणि रामाचे साक्षात दर्शन झाले होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.

सुखदुःखांचा अनुभव, प्रवास, सत्संग आणि विशाल अभ्यास ह्यांच्या प्रभावातून त्यांची जीवनाकडे बघण्याची दृष्टी तयार झाली. ह्या दृष्टिकोनातूनच त्यांनी विविध बारा ग्रंथ लिहिले.

त्यांतील ‘रामचरितमानस’ आणि ‘विनयपत्रिका’ हे दोन ग्रंथ महत्त्वाचे आहेत. रामचरितमानसमध्ये चार वक्ते आणि चार श्रोते ह्यांच्यातील संवादांतून रामकथा सांगितली आहे.

चौपाई आणि दोहा ह्या दोन छंदांमध्ये हे काव्य अवधी बोलीत लिहिले आहे. ज्ञान आणि भक्ती तसेच स्वार्थातून परमार्थ ह्यांचा सुंदर मेळ रामचरितमानसमध्ये साधला आहे.

भाषासौंदर्य, प्रभावी प्रसंगचित्रण, उत्तम स्वभावचित्रण आणि संस्कार ह्या सर्वच दृष्टींनी हे काव्य उत्तम मानले जाते. रामचरितमानसची रचना इसवी सन १५७४ मध्ये झाली.

विनयपत्रिका हा ग्रंथ गीतस्वरूपात आहे. तुलसीदासांनी ह्या गीतांतून आत्मनिरीक्षण आणि आपल्या अपराधांची कबुली मांडली आहे. तुलसीदासांच्या साधनेमुळे निर्माण झालेले उत्कृष्ट काव्य, असे ह्या ग्रंथाचे वर्णन करता येईल.

तुलसीदासांनी रामकथेला ज्या उंचीवर नेले, त्यापेक्षा अधिक उंचीवर कोणत्याही हिंदी कवीला जाता आले नाही, त्यामुळे हिंदी साहित्यात त्यांना कवी म्हणून श्रेष्ठ स्थान प्राप्त झाले आहे.

तुलसीदासांनी लोकांना मानवताधर्म शिकवला. लोकांनी आपली संकुचित विचारसरणी सोडून विशाल दृष्टीने जगाकडे पाहावे, असा उपदेश त्यांनी आपल्या काव्यांतून केला.

कब देखौंगी नयन वह मधुर मूरति? राजिबदल-नयन, कोमल-कृपा-अयन,
मयननि बहु छबि अंगति दूरति ।।१।।
सिरसि जटाकलाप पानि सायक चाप उरसि रुचिर बनमाल मूरति।
तुलसीदास रघुनिरकी सोभा सुमिरि, भई है मगन नहिं तनकी सूरति ॥२॥

काय शिकलात?

आज आपण संत तुलसीदास बद्दल माहिती मराठीत – Sant Tulsidas Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version