Site icon My Marathi Status

संत श्री चक्रधर स्वामी बद्दल माहिती मराठीत – Sant Chakradhar Swami Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला संत श्री चक्रधर स्वामी बद्दल माहिती मराठीत – Sant Chakradhar Swami Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात.

संत श्रीचक्रधर स्वामी – Sant Chakradhar Swami Information in Marathi

१] नाव – संत श्री चक्रधर स्वामी
२] जन्म – ११९४
३] मृत्यू – १२७३

भरवस (भरूच) येथील राजाच्या एका प्रधानाचे नाव विशाळदेव होते. विशाळदेवाच्या पत्नीचे नाव माल्हाइसा होते. श्रीदत्तात्रेयाच्या कृपेने विशाळदेव आणि माल्हाइसा ह्यांच्या पोटी इसवी सन ११९४ मध्ये एक मुलगा जन्माला आला.

त्याचे नाव हरिपाळदेव असे ठेवण्यात आले. त्याने लहान असतानाच वेद, पुराणे, राजकारण, लढाई अशा सर्व विद्यांचा अभ्यास केला. तो मोठा झाल्यावर त्याचे लग्न कमळाईसा नावाच्या एका मुलीशी करण्यात आले.

काही काळ गेल्यानंतर एके दिवशी हरिपाळदेवाची प्रकृती बिघडली आणि त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यासाठी त्याचे प्रेत स्मशानभूमीत नेण्यात आले असता एक चमत्कार घडला.

हरिपाळदेव जिवंत झाला. हरिपाळदेवाचे शरीर पूर्वीचे असले, तरी जीवात्मा पूर्वीचा नव्हता. पण त्या जीवात्म्याने हरिपाळदेवाचे सर्व देहधर्म आणि जीवनधर्म स्वीकारले.

पूर्वीच्या हरिपाळदेवाप्रमाणेच ह्यानेही संसार सुरू केला, काही काळ गेल्यानंतर हरिपाळाचे मन संसारातून विरक्त झाले. त्याचे मन खऱ्या सुखाच्या शोधासाठी तळमळू लागले, नागपूरजवळ असलेल्या रामटेकच्या यात्रेच्या निमित्ताने तो घराबाहेर पडला.

पण तो रामटेक येथे न जाता देऊळगाव येथे गेला. तिथून तो सिद्धपूर येथे गेला. तिथे त्याला एक विरागी पुरुष भेटला. दोघांची दृष्टादृष्ट होताच तो विरागी पुरुष, गोविंद प्रभू मनाशी म्हणाला, ‘हा माझा आहे.

आणि त्याने आपल्या हातातील मक्याचे उष्टे कणीस प्रसाद म्हणून हरिपाळाकडे फेकले. हरिपाळाने ते वरच्यावर झेलले. मग हरिपाळाने गोविंद प्रभूचे शिष्यत्व पत्करले. त्याच वेळी गोविंद प्रभुंनी त्याचे नाव चक्रधर असे ठेवले.

गोविंद प्रभुंचा शिष्य झालेल्या चक्रधरांनी सालबर्डीच्या डोंगरावर बारा वर्षे तप केले. त्या तपातून त्यांना ज्ञान मिळाले की; सत्य, अहिंसा, समता या तीन तत्त्वांचे आचरण केले; तरच मानवजातीचे कल्याण होईल.

ह्या तीन तत्त्वांच्या प्रचारासाठी त्यांनी आपले उर्वरित आयुष्य वेचायचे असे ठरवले. हिंडत-हिंडत ते भंडारा येथे गेले. तिथे त्यांना नीलभट भांडारकर नावाचा एक शिष्य मिळाला. तो त्यांचा पहिला शिष्य होता.

पुढे चक्रधर पैठण येथे आले आणि तिथे त्यांनी संन्यास स्वीकारला आणि जीवनोद्धाराच्या कार्याला प्रारंभ केला. त्यांनी साऱ्या महाराष्ट्रभर भ्रमण केले आणि योग्य व्यक्तींना त्यांच्या योग्यतेनुसार प्रेम आणि ज्ञान दिले.

चक्रधरांना उच्चनीच हा भेद मान्य नव्हता. मांगाच्या घरी अन्न भक्षून त्यांनी आपल्या मनातली ही समानता प्रकट केली. सोवळ्या-ओवळ्याच्या कल्पनेवरही त्यांचा विश्वास नव्हता.

उपासतापास, व्रते इत्यादी गोष्टींनी देव मिळत नाही, असे त्यांचे मत होते. अहिंसक वृत्तीने वागावे, सर्वाविषयी प्रेम बाळगावे; असा उपदेश ते करत असत.

त्यांनी स्त्रियांच्या उद्धाराची वाट मोकळी केली आणि शूद्रांनाही ज्ञानाचा अधिकार आहे, असा उपदेश केला. त्यांनी संस्कृत भाषेला बाजूला सारून मराठी भाषेला प्राधान्य दिले.

त्यांच्या अशा रूढिबाह्य वागण्यामुळे त्या काळातल्या धर्मपंडितांना राग आला. हेमाद्री पंडित हा त्यांपैकीच एक, तो रामदेवराव यादवाचा प्रधान होता. त्याने चक्रधरांना पकडले आणि त्यांच्यावर व्यभिचाराचा आरोप ठेवला.

रामदेवरावाने त्याला शिरच्छेदाची शिक्षा दिली. हेमाद्रीने ती शिक्षा लगेच अमलात आणली. अशा त-हेने चक्रधरांचे अलौकिक जीवन समाप्त झाले.

चक्रधरांना मराठी, गुजराती आणि संस्कृत ह्या तीन भाषा अवगत होत्या. संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व असल्यामुळे त्यांची मराठी भाषाही प्रगल्भ होती.

शंकराचार्य आणि रामानुजाचार्य ह्या दोघांच्याही मतांशी त्यांचा चांगला परिचय होता. त्यांना ज्योतिषशास्त्र व खगोलशास्त्र ह्यांचेही ज्ञान होते. नाव हाकणे, औत वाहणे, शस्त्र फेकणे इत्यादी कलाही त्यांना अवगत होत्या.

त्यांचे शिष्य त्यांना सर्वज्ञ म्हणत. विरक्ती, निःस्पृहता, वक्तृत्व असे अनेक सद्गुण त्यांच्या अंगी होते. चक्रधरांनी कोणताही ग्रंथ लिहिला नाही, पण त्यांनी वेळोवेळी केलेल्या उपदेशांचे संग्रह त्यांच्या शिष्यांनी तयार केले. त्यातूनच सूत्रपाठ, दृष्टान्तपाठ इत्यादी ग्रंथ तयार झाले आहेत.

काय शिकलात?

आज आपण संत श्री चक्रधर स्वामी बद्दल माहिती मराठीत – Sant Chakradhar Swami Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version