Site icon My Marathi Status

साक्षरतेचे महत्व निबंध मराठी | Saksharta che mahatva nibandh marathi

Saksharta che mahatva nibandh marathi – मित्रांनो आज “साक्षरतेचे महत्व निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

साक्षरता म्हणजे काय ?

साक्षरतेचा अर्थ देशातील अशिक्षित लोकांना शिक्षित करून वाचन व लेखन करण्यायोग्य बनवणे होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर साक्षर असणे म्हणजे वाचन व लेखन करण्याची योग्यता प्राप्त करणे होय. भारतात राष्ट्रीय साक्षरता मिशन अनुसार जर एखादा व्यक्ती आपले नाव लिहिणे व वाचण्या योग्य असेल तर तो साक्षर आहे.

भारतात, ‘राष्ट्रीय साक्षरता मिशनच्या’ अनुसार जर एखादी व्यक्ती आपले नाव लिहु आणि वाचु शकत असेल तर त्या व्यक्तीला साक्षर समजले जाते. वास्तवीक १९८८ मध्ये ‘राष्ट्रीय साक्षरता मिशनची’ सुरुवात झाली होती ती यासाठी की १५ ते ५५ वयोगटातील ७५% लोकांना २००७ पर्यंत कामापुरते साक्षर बनवण्यात यावे आणि त्यायोगे वेळोवेळी केल्या गेलेल्या जनगणनेत साक्षर लोकांची टक्केवारी सुध्दा वाढली. [Saksharta che mahatva nibandh marathi]

पण आजच्या जगात केवळ एवढ्याच ज्ञानावर एखादी व्यक्ती साक्षर संबोधणे चुकीचे आहे. पुर्वीच्या काळी निरक्षर लोकांची मोठ्या प्रमाणात फसवणुक होतं होती. मुख्यतः सावकारांकडुन. अश्या लोकांच्या निरक्षरतेचा फायदा घेउन त्यांच्याकडुन अंगठ्यांचे ठसे घेउन मोठ्याप्रमाणात जमीनी, आर्थीक मालमत्ता लाटण्यात आल्या.

Saksharta che mahatva nibandh marathi

पुढे सरकारकडुन सावकारांवर बंधन आली आणि अश्याप्रकारांना आळा बसला. असे असले तरी निरक्षरतेमुळे अश्या समाजाची वाढच खुंटल्यासारखे झाले. व्यवहारी जगात प्रगतीचे अनेक मार्ग उघडे असतानाही असा निरक्षर समाज पारंपारीक व्यवहारांमध्येच गुंतुन पडला त्यामुळे त्यांचे आर्थीक प्रगतीचे मार्ग खुंटले. बालमजुरी,अल्पवयीन गुन्हेगारी, रस्त्यांवर भिक

-मागणारे अनेक लहान-लहान मुले यांच्या प्रमाणात निरक्षरतेमुळे वाढ झाली. “एक स्त्री शिकली तर अख्खं कुटुंब शिकतं, सुशिक्षित होतं.” असे ज्योतीबा फुले म्हणाले होते. परंतु काळाच्या ओघात त्यांचे विचारही तितकेसे तग धरु शकले नाहीत. आजही निरक्षरतेमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय आहे. निरक्षर पालकांमुळे कुटुंब कल्याण, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, अंधश्रध्दा अश्या अनेक गोष्टी वाढत जातात ज्या इतर समाजाच्या प्रगतीच्य आड येत आहेत. महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत देश्याच्या शक्तीला पोखरुन काढत आहेत.

वर्तमान काळात शिक्षणाचे महत्त्व भरपूर आहे. शिक्षण ही जीवनातील एक आवश्यक बाब आहे. याशिवाय अशिक्षित लोकही आपल्याच समाजाचा भाग आहेत. आणि त्यांना साक्षर करणे आपले कर्तव्य आहे. कारण जर एखाद्या देशाचा प्रत्येक नागरिक साक्षर असेल तरच त्या देशाची प्रगती होईल. साक्षरतेचा संबंध देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाशी आहे. शिक्षणाशिवाय व्यक्तीचे जीवन पशूप्रमाणे होते. (Saksharta che mahatva nibandh marathi )

साक्षरतेचे महत्व

भारताला गावांचा देश म्हटले जाते. कारण आपल्या देशातील बहुसंख्य लोक खेड्या गावात राहतात. या लोकांमध्ये शेतकरी मजूर इत्यादींची संख्या अधिक आहे आणि सर्वात जास्त अशिक्षित व निरक्षर हेच लोक आहेत. अश्या काळात अशिक्षिततेचा फायदा घेऊन अनेक चतुर व्यापारी, कुटील नेते आणि सरकारी अधिकारी यांचा आपल्या कार्यासाठी लाभ करून घेतात.

निरक्षर लोक शासनाकडून आलेल्या योजना व्यवस्थित समजू शकत नाही व यामुळे त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. साक्षर लोक शासनाच्या योग्य निर्णयांमध्ये सहयोग करतात आणि चुकीच्या निर्णयांचा विरोध देखील करतात. साक्षर व्यक्तीला आपल्या मताची किंमत माहिती असते. म्हणून तो योग्य नेत्यालाच आपले मत देतो. “Saksharta che mahatva nibandh marathi”

आपला देश कृषिप्रधान देश आहे. जर या देशातील शेतकरी साक्षर असेल तरच तो शेतीमधून अधिक उत्पन्न प्राप्त करू शकतो. शिकलेले शेतकरी वैज्ञानिक पद्धतीने शेती करतात. ते नवनवीन आधुनिक उपकरणांचा उपयोग करून शेतातून अधिक धान्य उत्पन्न करतात. आणि आपल्या गावाचा व देशाचा विकास करतात.

Saksharta che mahatva

ज्याप्रमाणे पुरुषांसाठी शिक्षणाचे महत्त्व आहे त्याच पद्धतीने स्त्री शिक्षण देखील अत्यावश्यक आहे. एक शिक्षित महिला आपली मुले व कुटुंबातील इतर सदस्यांना शिक्षित करते. यासोबतच नोकरी व व्यवसाय करून कुटुंबाला आर्थिक सहयोग पोहचवते. {Saksharta che mahatva nibandh marathi }

यामुळे कुटुंबास लवकर समाजाची प्रगती होते. कमी साक्षरतेमुळे देशाला केवढे नुकसान होते हे त्या देशातील विकासदरावरून लक्षात येते. जगभरातील साक्षरतेचे महत्व लक्षात घेऊन संयुक्त राष्ट्र संघटनेने 17 नोव्हेंबर 1965 ला 8 सप्टेंबर चा दिवस ‘जागतिक साक्षरता दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

1966 मध्ये पहिल्यांदा जागतिक साक्षरता दिन साजरा करण्यात आला आणि तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी हा दिवस 8 सप्टेंबर ला साजरा केला जातो.

साक्षरतेचे महत्व

आपल्या देशात आजही मोठ्या प्रमाणात लोकसंख्या अशिक्षित आहे. यामागील कारण असे आहे की आजही अनेक खेड्या गावांमध्ये योग्य तो उपलब्ध नाही. आणि आर्थिक दृष्ट्या गरीब विद्यार्थी प्रायव्हेट शाळांमध्ये शिक्षण घेऊ शकत नाही.

म्हणून समाज व शासन दोघांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून, मुलगा असो वा मुलगी शिक्षणाला घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्य करायला हवे. शिक्षण वाढेल तर लोक साक्षर होऊन प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतील आणि यामुळे देशही प्रगत होईल. “Saksharta che mahatva nibandh marathi “

तर मित्रांना “Saksharta che mahatva nibandh marathi “ हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “साक्षरतेचे महत्व निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

‘जागतिक साक्षरता दिन’ कधी साजरा केला जातो?

8 सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक साक्षरता दिन’ म्हणून साजरा केला जातो?

‘राष्ट्रीय साक्षरता मिशनची’ सुरुवात कधी झाली?

१९८८ मध्ये ‘राष्ट्रीय साक्षरता मिशनची’ सुरुवात झाली.

Exit mobile version