गुलमोहर फुलाबद्दल माहिती मराठीत – Royal Poinciana Flower Information in Marathi
हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला गुलमोहर फुलाबद्दल माहिती मराठीत – Royal Poinciana Flower Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – भेंडी फुलाबद्दल माहिती
गुलमोहर – Royal Poinciana Flower Information in Marathi
१] | मराठी नाव : | गुलमोहर |
२] | हिंदी नाव : | गुलमोहर |
३] | इंग्रजी नाव : | Royal Poinciana Flower |
गुलमोहोराची फुले ही झुपक्यांनी येतात. लांबून छानच दिसतात. रंग : या फुलांचे पिवळा व लाल असे दोन रंग असतात. वर्णन : गुलमोहोराची पाने हिरवी व लहान असतात.
एका लहान कांडीला पाच सहा पाने येतात. गुलमोहोराची फुले उन्हाळ्यात (चैत्र महिन्यात) येतात. या झाडांची पाने गळून पडल्यानंतर फुले लागतात. ही फुले लहान लहान असतात.
फुलांच्या मध्ये दोन – तीन तुरे येतात. गुलमोहोराच्या झाडाची उंची ३० ते ४० फुटांपर्यंत असू शकते. या झाडाची पालवी लोंबती असते. या झाडाचे खोड काहीसे पिवळट पांढुरके, तसेच खडबडीत असते.
गुलमोहोराच्या झाडाची पाने संयुक्त प्रकारची असतात. या फुलांचा बहर संपल्यावर तेथेच हिरव्या लांब शेंगा दिसतात. त्या साधारण दीड ते दोन फूट लांब असतात.
या शेंगा काळ्या झाल्या म्हणजे त्या परिपक्व झाल्या, असे समजतात. प्रकार : गुलमोहोराच्या झाडांचे दोन प्रकार पडतात. एक पिवळा गुलमोहोर आणि दुसरा लाल गुलमोहोर.
उपयोग : गुलमोहोराची फुले झुपक्यांनी येत असल्याने त्यांचा उपयोग फुलदाणीत ठेवण्यासाठी करतात. त्याच्या शेंगा औषधी असतात. गुलमोहोराच्या काळ्या झालेल्या शेंगा फोडल्यानंतर त्यास लहान गोल आकाराचा भाग असतो.
त्यातील गर लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत पोट साफ होण्यासाठी उपयोगी पडतो. एक कप पाण्यात तो गर भिजत घालून रात्री झोपताना प्यायल्यास दुसऱ्या दिवशी पोट साफ होते. या फुलांच्या पाकळ्या आंबट गोड लागतात.
त्यामुळे लहान मुले त्या आवडीने खातात. गुलमोहोराची झाडे शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेने, बागांमधून लावली जातात. त्याचा औषधी उपयोग तर आहेच पण झुपकेदार लाल फुलांमुळे गुलमोहोराची झाडे अतिशय सुंदर व आकर्षक दिसतात.
काय शिकलात?
आज आपण गुलमोहर फुलाबद्दल माहिती मराठीत – Royal Poinciana Flower Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.