हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला Republic Day Speech, Information in Marathi 2021 – गणतंत्र दिवस बद्दल माहिती आणि भाषण मराठीत देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – ख्रिसमस नाताळ
Contents
गणतंत्र दिवस बद्दल माहिती मराठीत – Republic Day Information in Marathi
गणतंत्र दिवस बद्दल माहिती मराठीत ‘स्वातंत्र्यदिन’ आणि ‘प्रजासत्ताक दिन’ हे आपले राष्ट्रीय सआहेत. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी आपला देश स्वतंत्र झाला.
आपल्या देशाचा राज्यकारभार लोकशाही पद्धतीने चालावा म्हणून एक घटना समिती नेमण्यात आली होती. त्या समितीच्या अंमलबजावणीस २६ जानेवारी १९५० पासून सुरुवात झाली; म्हणून दरवर्षी हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.
या दिवशी दिल्लीला मोठा नेत्रदिक सोहळा साजरा केला जातो. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण होते. त्या दिवशी नौदल, वायुदल व भूदल यांची संचलने असतात.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय छात्रसेनेचे विद्यार्थी व भारताच्या इतर राज्यांमधील विद्यार्थ्यांचाही सहभाग असतो. तसेच इतर देशांच्या राष्ट्रप्रमुखांनाही खास पाहुणे म्हणून निमंत्रण असते.
ते एक प्रकारे भारताच्या प्रगतीचे शक्तिप्रदर्शनच असते. तसेच सर्व राज्यांमध्ये त्याचप्रमाणे प्रमुख शहरात रोषणाई करून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
याच दिवशी देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या सैनिकांना विविध पदके देऊन त्यांचा गौरव केला जातो. राष्ट्राबद्दलचे प्रेम प्रतीकांमधून व्यक्त होते. प्रतीकांमुळे ऐक्य भावना बळकट होते.
आपले राष्ट्रीय सण आपण आनंदाने साजरे केले पाहिजेत. त्यातून एकात्मतेची भावना वाढीस लागेल आणि हीच भारतीयांमधील ऐक्य भावना देशाच्या प्रगतीला आवश्यक आहे.
हा राष्ट्रीय सण भारतामध्ये सर्व शाळा, महाविद्यालये व विविध कार्यालयांमध्ये आनंदाने साजरा केला जातो. शाळेमध्ये या दिवशी मुले साफसफाई, सडा-रांगोळी करतात. प्रांगणात पताका लावतात.
सर्वजण वेळेवर झेंडा वंदन करण्यास येतात. झेंडा वंदन झाल्यावर लहान मुलांची भाषणे, त्यानंतर प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचे भाषण होते. कार्यक्रम संपल्यावर मुलांना खाऊ-वाटप केला जातो.
राष्ट्रगीत म्हणून या कार्यक्रमाची सांगता होते. खेडेगावामध्ये या दिवशी मुले प्रभात फेरी काढून, भारत माता की जय’ अशा घोषणा देऊन वातावरणात चैतन्य निर्माण करतात. अशा रीतीने सर्व भारतभर हा राष्ट्रीय सण साजरा केला जातो.
सूर्यास्तापूर्वी राष्ट्रध्वज आदरपूर्वक खाली उतरविला जातो. अशा प्रकारे प्रत्येक वर्षी भारतभर २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताकदिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो.
गणतंत्र दिवस बद्दल भाषण मराठीत – Republic Day Speech in Marathi
आदरणीय मुख्य अतिथी, माझे शिक्षक आणि माझ्या मित्रांनो, आज आपण ७२ वा प्रजासत्ताक दिवस साजरा करीत आहे. प्रजासत्ताक दिवस हा एक राष्ट्रीय सण आहे ज्याचा कोणत्याही धर्म आणि जातीशी काही संबंध नाही.
हा सर्व धर्मातील लोक साजरा करतात. या दिवशी म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाची राज्यघटना अस्तित्वात आली, जी डॉ भीमराव आंबेडकर (बाबासाहेब आंबेडकर) यांनी तयार केली.
या दिवशी, आपला देश संपूर्ण प्रजासत्ताक बनला. आज भारत संपूर्ण सार्वभौम गणराज्य म्हणून घोषित करण्यात आला. २६ जानेवारी १९३० रोजी इंग्रजांकडून पूर्ण स्वराज्य मिळण्यासाठी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसचे अधिवेशन पार पडले.
प्रजासत्ताक दिन हा संपूर्ण देशात गौरवाने साजरा केला जातो परंतु त्याचा मुख्य कार्यक्रम देशाची राजधानी दिल्लीत होतो. या दिवशी पंतप्रधान व भारताचे राष्ट्रपती इंडिया गेट येथे असलेल्या अमर जवान ज्योतीवर देशाच्या शहीद जवानांना,
प्रथम श्रद्धांजली अर्पण करतात. त्यानंतर एक भव्य परेड घेण्यात येते ज्यामध्ये देशाची एकता आणि अखंडता तसेच भारताची लष्करी ताकद दिसून येते. एवढे बोलून तुम्ही तुमचे भाषण संपवू शकता.
काय शिकलात?
आज आपण Republic Day Speech, Information in Marathi 2021 – गणतंत्र दिवस बद्दल माहिती आणि भाषण मराठीत पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.