Site icon My Marathi Status

रविंद्रनाथ टागोर बद्दल माहिती मराठीत – Rabindranath Tagore Information in Marathi

हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला रविंद्रनाथ टागोर बद्दल माहिती मराठीत – Rabindranath Tagore Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – लाल बहादूर शाश्त्री

१] नाव – रवींद्रनाथ ठाकूर (टागोर)
२] जन्म – ७ मे १८६१ कोलकाता, भारत
३] मृत्यू – ७ ऑगस्ट १९४१ कोलकाता, भारत
४] वडील – देवेंद्रनाथ टागोर
५] आई – सरला देवी

रविंद्रनाथ टागोर परिचय – Rabindranath Tagore Information in Marathi

प्रतिभाशाली साहित्यामुळे जागतिक पातळीवरील नोबेल पारितोषिक ज्यांना मिळाले, त्या रविंद्रनाथ टागोरांचे नाव भारतातल्या प्रत्येक घराघरात माहीत आहे. त्यांचा गीतांजली हा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे.

भारतात जे थोर महापुरुष होऊन गेले, त्यात जागतिक किर्तीचे महाकवी, तत्वज्ञ, साहित्यिक आणि नवीन शिक्षणपध्दतीचे प्रवर्तक म्हणून रविंद्रनाथ टागोरांचे नाव घ्यावे लागते, रविंद्रनाथांचे सर्व वाङ्मय हे ४० खंडांमध्ये प्रसिध्द झालेले आहे.

रवींद्रनाथ हे मानवतेचे पुरस्कर्ते होते. रविंद्रनाथांच्या मातेचे नांव शारदादेवी आणि वडिलांचे नाव देवेंद्रनाथ . त्यांना आठ भाऊ व सहा बहिणी होत्या.

रविंद्रनाथांचा जन्म ७ मे १८६१ रोजी अत्यंत समृध्द घराण्यात झाला. घरी संपन्नता असूनही रविंद्रनाथ अगदी साधेपणाने राहात. त्याकाळत घरी मुलांना शिकवावे ही पध्दत फार रुढ होती.

शाळा संपल्यावर ते घरी आले की, व्यायाम शिकविणारे शिक्षक येत, नंतर चित्रकलेसाठीही त्यांच्या वडिलांनी शिक्षक नेमले होते. मग इंग्रजी शिकविण्यासाठी शिक्षक येत. ते सात-आठ वर्षाचे असतानाच कविता करीत.

काव्याबरोबर ते संगीतही शिकले. बॅरिस्टर पदवी प्राप्त करण्यासाठी वडिलांनी त्यांना इंग्लंडला पाठविले. पण कायद्याचे शिक्षण त्यांना आवडत नसे. शेवटी ते इंग्लंडहून परत आले.

इंग्लंडमध्ये असतांना त्यांना लोकगीते फार आवडली. त्या लोकगीतांच्या चाली त्यांनी आत्मसात केल्या. या चालींवर त्यांनी वाल्मिकी प्रतिभा या आपल्या सांगितिकेमधील गीते लिहिली १८८३ साली त्यांचा विवाह झाला. मृणालिनी हे त्यांच्या पत्नीचे नांव, त्यांना तीन कन्या व दोन मुले झाली.

शैक्षणिक, साहित्य देशासाठी केलेले कार्य – Rabindranath Tagore Information in Marathi

रविंद्रनाथांनी कलकत्यापासून जवळच असणाऱ्या शांतिनिकेतन येथे अरण्यशाळा काढली. श्रीनिकेतन ही संस्था काढली. कुटिरोद्योगाची कल्पना, शेतकऱ्यांसाठी कृषिबँक, हितैषीसभा त्यांनी सुरु केल्या.

नैसर्गिक सौंदर्याच्या सान्निध्यात शिक्षण द्यावे, यावर रविंद्रनाथांचा भर होता. वृक्षाच्या सावलीत, तपोवनाच्या कल्पनेवर आधारीत त्यांनी शिक्षणाची नवी पध्दती सुरु केली. तेथे शिष्यांच्या चित्ताला पल्लवित करणारे गुरु त्यांना निर्माण करावयाचे होते.

तेथील आश्रमात त्यांनी भारतीय चित्रकलेचे पुनरुज्जीवन केले. शांतिनिकेतन विद्यालयातूनच पुढ विश्वभारती विद्यापीठ उभे राहिले. तेथ जगभरातून आलेले हजारो विद्यार्थी शिक्षण घेत असतात.

टागोरांना ध्यानात रंगणे आवडे, तसेच काव्यामध्ये गूढगूंजन करण्याचीही त्यांची सवय होती. पण असे असूनही भारतमातेबद्दल त्यांना अतिशय प्रेम होते. वंगभंगचळवळीत त्यांनी भाग घेतला होता.

जालियानवाला बागेत पंजाबला भयंकर हत्याकांड झाले.त्यावेळी तेथे सभेसाठी जमलेल्या निष्पाप भारतीयांवर गोळीबार झाला. हे रविंद्रनाथांना आवडले नाही म्हणून ब्रिटिशांनी त्यांना दिलेली सर ही पदवी ब्रिटिश सरकारकडे परत पाठवली.

रविंद्रनाथांचे जन गण मन हे राष्ट्रगीत झाले तर आमार सोनार बांगला हे बांगला देशाचे राष्ट्रगीत झाले. रविंद्रनाथ टागोर हे सौंदर्यवादी कमी व तत्वज्ञ होते. हे सत्य व शिव यांचा साक्षात्कार सौंदर्यान्दारा घडवीत.

काय शिकलात?

आज आपण रविंद्रनाथ टागोर बद्दल माहिती मराठीत – Rabindranath Tagore Information in Marathi पहिली आहे, पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version