पृथ्वीचे मनोगत निबंध मराठी | Pruthviche Manogat Nibandh Marathi

Pruthviche Manogat Nibandh Marathi – मित्रांनो आज “पृथ्वीचे मनोगत निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Pruthviche Manogat Nibandh Marathi

नमस्कार मित्रांनो ! मी, पृथ्वी आहे. आज मी तुम्हाला माझे मनोगत सांगणार आहे. तुम्ही सर्व मनुष्य, प्राणी आपापल्या परिवारा सोबत तुमच्या घरामध्ये राहता असे तुम्हाला वाटते पण तसे नसून सर्व काही माझ्यात सामावलेले आहे.

या सृष्टी वरील सर्व काही मनुष्य, झाडे-झुडुपे, पशु-पक्षी, घरे-दुकाने, नद्या- समुद्र सर्व काही गोष्टींचा भार मी उचललेला आहे. मला माझ्या निर्मिती बद्दल अधिक काही आठवत नाही.

परंतु तुमच्या मधील काही शास्त्रज्ञांच्या मानण्यानुसार आज पासून सुमारे 5 अब्ज वर्षापूर्वी माझा जन्म झाला असावा. शास्त्रज्ञांच्या मते, अंतरिक्षात वेगवेगळ्या गॅसेसच्या मिश्रणाने एक जोरदार विस्फोट झाला. Pruthviche Manogat Nibandh Marathi

पृथ्वीचे मनोगत निबंध मराठी

या विस्फोटामुळे एक आगीचा मोठा गोळा तयार झाला व याच गोळ्याला आज आपण सूर्य म्हणतो. या विस्फोटामुळे अनेक लहान-लहान धुळीचे कण निर्माण झाले आणि गुरुत्वाकर्षणाच्या साह्याने हे धुळीचे कण एकमेकांना जवळ आले व यापासून लहान – मोठे दगड गोटे तयार झाले व हे दगड गोटे एकमेकांना जुळले अनेक ग्रह पृथ्वी आणि आपली सूर्यमाला तयार झाली. “Pruthviche Manogat Nibandh Marathi”

सुरुवातीला माझे तापमान अतिशय उष्ण होते. अगदी सूर्याप्रमाणेच परंतु हळू-हळू मी थंड झाले. व माझ्यावर आकाशातून वेगवेगळ्या उलका पडू लागल्या. यामुळे माझ्यावर नवीन बेटे, डोंगर, खनिज पदार्थ, आम्ल आणि सजीव जीवनाची उत्पत्ती झाली. या मुळे लहान लहान जीवांची निर्मिती होऊन हळू-हळू आजचा मनुष्याचा जन्म झाला.

Pruthviche Manogat Nibandh Marathi

अशाप्रकारे माझी निर्मिती झाली आणि माझ्या निर्मिती बरोबरच सजीव जीवांचे अस्तित्व ही तयार झाले. माझ्या या निर्मितीच्या कथा विज्ञानात त्याप्रमाणे वेगवेगळ्या धर्मामध्ये, भाषेमध्ये सांगितले जाते.

प्रत्येक धर्मात माझी वेगळी कथा ऐकायला मिळते. परंतु मला या गोष्टींचा किंचितही फरक पडत नाही. माझा आकार ज्या प्रमाणे गोल आहे त्यामुळे सतत फिरत राहते. म्हणून मी जातपात, धर्म, उच्च-निच्चता, गरीब श्रीमंत असा भेदभाव मानत नाही. Pruthviche Manogat Nibandh Marathi

मी माझ्यात सामावलेल्या सर्वांना समान माझ्या लेकरां प्रमाणेच समजते. आई ज्या प्रमाणे आपल्या मुलांचे संगोपन करते, त्याप्रमाणेच मी सुद्धा मनुष्याला नुकसान होऊ देत नाही. परंतु आज मनुष्य मला नुकसान पोहोचवत आहे.

पृथ्वीचे मनोगत निबंध मराठी

त्यामुळे मला तर नुकसान होतेच पण त्या पेक्षाही जास्त नुकसान तुमचेच होते. तुम्ही माझ्यावर अनेक हानिकारक पदार्थ तयार करत आहात. मोठ्या प्रमाणात नष्ट न होणारा कचरा, प्लास्टिक, घातक रसायने माझ्यावर टाकले जात आहेत. त्यामुळे मी नापीक होत आहे.

आज मनुष्याने माझ्यावर जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनि प्रदूषण आणि भूमी प्रदूषण मोठ्या प्रमाणात केले आहे. त्यामुळे माझे नुकसान होत आहे. मनुष्य जेवढे माझे नुकसान करेल त्यांना परिणाम सुद्धा मनुष्यांनाच सोसावा लागेल. Pruthviche Manogat Nibandh Marathi

आज मनुष्याने स्वतःच्या स्वार्थासाठी मला हानी पोहोचवणे सुरू केले आहे. पण मला याची जरा ही चिंता नाही. उलट मला या गोष्टीचा आनंद वाटतो की दुष्टांचा नाश करण्यासाठी स्वतः परमेश्वराने माझ्या मध्ये जन्म घेतला होता.

Pruthviche Manogat Nibandh Marathi

देवी आदिशक्ती ने माझ्या भूमीवर अवतरीत होऊन अनेक राक्षसांचा अंत केलेला आहे. अनेक महान पुरुषांनी माझ्या मध्ये जन्म घेतला होता. परंतु आजचा मनुष्य सर्व विसरून मला नष्ट करण्याच्या मार्गावर आहे.

त्याच्या या कृत्यामुळे माझा नाश होईलच पण सोबतच मनुष्याचाही विनाश होईल. त्यामुळे माझ्यावर सुखा समाधानाने राहायचे असेल तर माझे रक्षा करणे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे.

तर मित्रांना “Pruthviche Manogat Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “पृथ्वीचे मनोगत निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

पृथ्वीचा जन्म कधी झाला असावा?

आज पासून सुमारे 5 अब्ज वर्षापूर्वी पृथ्वीचा जन्म झाला असावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: