हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला सदाफुली बद्दल माहिती मराठीत – Periwinkle Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – सूर्यफूल बद्दल माहिती
सदाफुली – Periwinkle Information in Marathi
१] | मराठी नाव – | सदाफुली |
२] | इंग्रजी नाव – | Periwinkle / Wincaflower |
सदाफुलीची फुले दिसायला फार सुंदर व सदाबहार असतात. त्यांना बाराही महिने फुले येतात. रंग : ही फुले पांढऱ्या व गुलाबी अशा दोन रंगांची असतात. वर्णन : या झाडाची पाने हिरवीगार, आकाराने लांबट गोल असतात.
झाडे जास्त उंच नसतात. झुडपाएवढीच वाढतात. या झाडाच्या पानापानाला फुले उमलतात. ही फुले नाजूक असतात व लगेच सुकतात. प्रकार : या फुलांचे पांढरी सदाफुली व गुलाबी सदाफुली असे प्रकार पडतात.
उपयोग : सदाफुलीचा उपयोग आयुर्वेदिक औषधांसाठी करतात. ही फुले महादेवाला वाहतात. हल्ली कॅन्सरवरील औषधासाठी सदाफुलीवर संशोधन सुरू आहे. वैशिष्ट्य : या फुलांचा वास कडवट येतो.
इतर माहिती : सदाफुलीची फुले लहान व पाकळ्या नाजूक असतात. पाकळ्यांचा आकार गोल असतो. ही फुले झाडावरच छान दिसतात. सदाफुलीच्या फुलाला चार- पाच पाकळ्या असतात. सदाफुलीचे झाड रस्त्यावर, बागेत, तसेच रानात कोठेही उगवते.
काय शिकलात?
आज आपण सदाफुली बद्दल माहिती मराठीत – Periwinkle Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.