सदाफुली बद्दल माहिती मराठीत – Periwinkle Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला सदाफुली बद्दल माहिती मराठीत – Periwinkle Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – सूर्यफूल बद्दल माहिती

सदाफुली – Periwinkle Information in Marathi

१] मराठी नाव – सदाफुली
२] इंग्रजी नाव – Periwinkle / Wincaflower

सदाफुलीची फुले दिसायला फार सुंदर व सदाबहार असतात. त्यांना बाराही महिने फुले येतात. रंग : ही फुले पांढऱ्या व गुलाबी अशा दोन रंगांची असतात. वर्णन : या झाडाची पाने हिरवीगार, आकाराने लांबट गोल असतात.

झाडे जास्त उंच नसतात. झुडपाएवढीच वाढतात. या झाडाच्या पानापानाला फुले उमलतात. ही फुले नाजूक असतात व लगेच सुकतात. प्रकार : या फुलांचे पांढरी सदाफुली व गुलाबी सदाफुली असे प्रकार पडतात.

उपयोग : सदाफुलीचा उपयोग आयुर्वेदिक औषधांसाठी करतात. ही फुले महादेवाला वाहतात. हल्ली कॅन्सरवरील औषधासाठी सदाफुलीवर संशोधन सुरू आहे. वैशिष्ट्य : या फुलांचा वास कडवट येतो.

इतर माहिती : सदाफुलीची फुले लहान व पाकळ्या नाजूक असतात. पाकळ्यांचा आकार गोल असतो. ही फुले झाडावरच छान दिसतात. सदाफुलीच्या फुलाला चार- पाच पाकळ्या असतात. सदाफुलीचे झाड रस्त्यावर, बागेत, तसेच रानात कोठेही उगवते.

काय शिकलात?

आज आपण सदाफुली बद्दल माहिती मराठीत – Periwinkle Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: