Site icon My Marathi Status

मोराबद्दल माहिती मराठीत – Peacock Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला मोराबद्दल माहिती मराठीत – Peacock Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात.

मराठी नाव : मोर-नर, लांडोर-मादी, मयूर, अनंतचक्षू, भुजंगभुक्
इंग्रजी नाव : Peacock पेअकॉक
आकार : नर – ९२ ते १२२ सेंमी, मादी – ८६ सेंमी.
वजन : नर – ४ ते ६ किलो, मादी – २.७ ते ४ किलो.

माहिती – Peacock Information in Marathi

मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मोराची सुंदरता, रंग आणि नृत्य जगप्रसिद्ध आहे. नर आणि मादीतील फरक म्हणजे नराला शेपटीभोवती पिसारा असतो तर मादीमध्ये तो नसतो. मोराचं खाद्य म्हणजे धान्य, कोवळी पानं, किडे, साप, सरडे इत्यादी. शेतीला नुकसानकारक असूनही मोराला आपल्याकडे आदरानं वागवलं जातं. मोर पानझडीच्या जंगलांमध्येही राहतात.

रात्रीची झोप घेण्यासाठी मोर झाडांवर येतात. जमिनीला समांतर पसरलेल्या आडव्या आणि जाडजूड फांद्यांवर ते बसतात. पहाट झाली की त्यांचा म्याँओ! म्याँओ! असा आवाज ऐकू येतो. या आवाजाला मोराची केका म्हणतात. मोरांचा एक कुटुंब-थवा असतो त्यात एक नर आणि तीन ते पाच लांडोरी (माद्या) असतात. पूर्वी मोराच्या पिसांचा लेखणी म्हणून वापर होत असे.

वर्षा ऋतू आणि मोर यांचं अतूट नातं आहे. आभाळात काळ्या-सावळ्या ढगांची गर्दी झाली की मोर आपला सुंदर पिसारा उघडून नाचायला लागतो. विणीचा हंगाम साधारण जानेवारी ते ऑक्टोबर असतो. झाडाझुडपांच्या बुडाशी किंवा गवतामध्ये अडचणीची जागा पाहून लांडोर सुमारे ३ ते ५ अंडी घालते. तकतकीत, दुधावरच्या सायीच्या रंगाची अंडी उबवण्याच्या क्रियेमध्ये मळकट होतात. अंड्यांमधून बाहेर आलेल्या पिल्लांना लांडोर भरवत नाही. ती पिल्लांना खाद्य शोधण्यात मदत करते.

पिल्लं आपली आपण खातात. महाराष्ट्रात कितीतरी गावांमध्ये मोराला लोकांनी संरक्षण दिलं आहे. अशा गावांमध्ये मोर निर्धास्त वावरतात. अगदी घराच्या परसातही येतात. जेव्हा कडक उन्हाळा सुरू होतो तेव्हा मोरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाते. त्यांना धान्य पुरवलं जातं. मोरांबद्दल अशीच प्रेमाची भावना संपूर्ण भारतभर दिसून येते.

काय शिकलात?

आज मी तुम्हाला मोराबद्दल माहिती मराठीत – Peacock Information in Marathi दिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version