Site icon My Marathi Status

पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध | Pavsalyatil Ek Diwas Marathi Nibandh

Pavsalyatil Ek Diwas Marathi Nibandh – मित्रांनो आज “पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. मला रिमझिम पडणारा पाऊस आवडतो.

पण पाऊस अत्यंत लहरी आहे. तो कधी उग्र रूप धारण करतो. असा पावसाळ्यातील एक दिवस माझ्या चांगलाच लक्षात राहिला आहे.

Pavsalyatil Ek Diwas Marathi Nibandh

पावसाळ्याला ऋतूंचा राजा म्हटले जाते. उन्हाळ्यात पडणाऱ्याा भयंकर उष्णता आणि गर्मी पासून पावसाच्या शितल लहरी आपली सुटका करतात. व संपूर्ण वातावरण सुखद गारव्याने भस्न देतात.

भारतात पावसाळा जून महिन्यात सुरू होऊन सप्टेंबर पर्यंत राहतो. या दरम्यान काही भागात अतिवृष्टी होते तर काही ठिकाणी पाऊसच येत नाही. असो माझ्या आयुष्यातही पावसाळ्यातील एक अविस्मरणीय दिवस आलेला आहे. Pavsalyatil Ek Diwas Marathi Nibandh

मी त्या दिवसाच्या काही आठवणी आज लिहू इच्छितो. धो-धो पाऊस पडत होता म्हणून आम्हाला शाळेतून लवकर घरी सोडण्यात आले होते. सगळी कडे पाणीच पाणी होते. रस्त्याने चालताना मी आजूबाजूला असलेली हिरवीगार झाडे पाहत होतो.

पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध

झाडाच्या पानांवरून पावसाच्या पाण्याचे थेंब टपटप खाली पडत होते. निसर्ग बहरून गेला होता. तेवढयात माझे लक्ष एका मांजराच्या पिल्लाकडे गेले ते पाण्यात बुडत होतं. माझा जीव कासावीस झाला. त्या पिलाला वाचवण्यासाठी मी त्याकडे जाऊ लागलो.

माझा तोल गेला आणि मी पाण्यात पडलो. तेव्हा माझ्या लक्षात आले की तो एक पाण्याने भरलेला नाला होता आणि मी नाल्यात पडता-पडता वाचलो. त्या मांजराच्या पिलाला कसे वाचवावे हा प्रश्न माझ्यापुढे होता. “Pavsalyatil Ek Diwas Marathi Nibandh”

हा देखील निबंध वाचा »  जय जवान जय किसान जय विज्ञान निबंध मराठी | Jay Jawan Jay Kisan Jay Vidnyan Essay In Marathi

पाण्याच्या प्रवाहाबरोबर एक लाकडी फळी वाहून येताना मला दिसली. मी ती फळी पकडली व त्यां पिलाच्या दिशेने वळवली. मांजरीच्या पिल्लूने लगेच त्या फळीला पकडले आणि त्यावर ती चढून बसली.

Pavsalyatil Ek Diwas Marathi Nibandh

मी अलगद तीला पकडले. ते पिल्लू मला चाटू लागले जणू काही ते माझे आभार मानत होते. त्या पिल्लाची आई तीला शोधत होती, जोरजोरात म्याँव…..म्याँव….म्याँव….. करून तीला हाका मारत होती.

एका घराच्या छपरावर ती मांजरी उभी होती. आईला बघताच माझ्या हातातील पिल्लू सुध्दा जोरजोरात ओरडू लागले. त्या पिल्लाला लाकडी फळ सहाय्याने मी घराच्या छपरावर सोडले. Pavsalyatil Ek Diwas Marathi Nibandh

पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध

पिल्यू धावतच त्याच्या आईकडे गेले आणि आई तिला प्रेमाने चाटू लागली. ते दृष्य पाहून माझ्या डोळ्यात पाणी आल आणि मनाला समाधान ही वाटले.

एका हरवलेल्या पिल्लाचा जीव वाचवून मी त्याला सुखरूप तिच्या आईपर्यंत पोहोचवल्याचा आनंद गगनांत मावत नव्हता. अशाप्रकारे पावसाळ्यातील हा एक दिवस अविस्मरणीय आणि आनंददायी होता.

तर मित्रांना  “Pavsalyatil Ek Diwas Marathi Nibandh”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे  “पावसाळ्यातील एक दिवस मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

हा देखील निबंध वाचा »  बैल पोळा निबंध मराठी | Bail Pola Nibandh in Marathi

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Exit mobile version