Site icon My Marathi Status

संगणकाचे भाग व त्यांची माहिती | Parts of computer in marathi

Parts of computer in marathi संगणकाचे भाग : नमस्कार मंडळी ! या अगोदरच्या पोस्टमध्ये आम्ही तुम्हाला संगणक म्हणजे काय? म्हणजेच संगणकाची मूलभूत माहिती दिलेली होती, ती तुम्हाला नक्कीच समजली असेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण संगणकाचे भाग (parts of computer in marathi) बद्दल माहिती मिळवणार आहोत.

संगणकाचे भाग व त्यांची माहिती | parts of computer in marathi

मानवजातीसाठी संगणक हा अष्टपैलू शोध आहे. मानवासाठी संगणक आज जणू वरदानच ठरले आहे कारण आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात संगणक कार्यरत आहेत. यामुळे मनुष्याच्या कार्यात गती आलीच शिवाय मनुष्याच्या जीवन आरामदायी बनले आहे. संगणकाचे काही मूलभूत अंग आहेत जे डेटा वर वेगाने प्रक्रिया करून कोणतेही कार्य सफल करणे शक्य करतात.

तुम्ही जर संगणकाशी परिचित असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की संगणक हा केवळ एकच भाग किंवा प्रणाली नाही. यात अनेक इतर भाग संगणाकासोबत कार्यरत असतात त्या सर्व संगणाच्या भागांनी (parts of computer) मिळून संगणक प्रणाली तयार होते.

तर आजच्या या पोस्टमध्ये आपण संगणाचे भाग म्हणजेच parts of computer in marathi बद्दल जाणून घेणार आहोत.

संगणकाचे मूलभूत भाग | parts of computer in marathi with pictures

संगणकाचे खालीलप्रमाणे काही मूलभूत अंग आहेत. या सर्व अंगांनी एकत्रित कार्य करूनच कोणतेही कार्य संगणक मार्फत सफल होते. हे सर्व संगणकाचे अंग माहितीची देवाणघेवाण करणे, माहिती साठवणे, माहितीवर प्रक्रिया करून योग्य परिणाम दाखवणे सारखे कार्य सफल बनवतात.

तर चला मग संगणकाच्या अंगाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया :

संगणकाचे भाग | parts of computer in marathi

मॉनिटर

मॉनिटर हा संगणकाचा मुख्य भाग असतो. याशिवाय संगणकाची कल्पना करणे अशक्य आहे, कारण आपण जे काही कार्य संगणाकाकडून करून घेतो त्याची प्रतिमा आपल्याला मॉनिटर वर पाहायला मिळते. मॉनिटर वर स्क्रीन उपलब्ध असते.

या स्क्रीन मार्फत युजर इनपुट आणि आऊटपुट च्यां सहायाने संगणकाशी संवाद साधू शकतो. असे म्हणता येईल मॉनिटर हा संगणकाचा दृश्य भाग आहे, जेथे आपल्याला संगणकाने प्रदान केलेली सर्व माहिती पाहायला मिळते.

मॉनिटर हा cpu आणि वापरकर्ता यांच्यातील दुवा आहे. या दोघांमध्ये जे कार्य घडते ते सर्व मोनितरचा स्क्रीन वर दिसते. मॉनिटर चे मुख्य कार्य युजर कडून इंपूटच्या स्वरूपात मिळालेली माहिती आणि संगणकाकडून आउटपुट रुपात मिळालेली माहिती स्क्रीनवर प्रदर्शित करणे असते.

मॉनिटर त्याला cpu कडून मिळालेली सर्व माहिती फोटो, ऑडियो, व्हिडिओ, ग्राफिक्स यांच्या रूपात वापरकर्त्या पर्यंत पोचवतो. त्यामुळे मॉनिटर हा संगणकाचा सर्वात महत्वाचा भाग समजला जातो.

कीबोर्ड

कीबोर्ड हे संगणकाचे सर्वात महत्वाचे इनपुट उपकरण आहे. कीबोर्ड चा मुख्य उपयोग हा वापरकर्त्या कडून इनपुट रूपात माहिती मिळवण्यासाठी केला जातो. तसेच संगणकावर लिखाण काम करण्यासाठी देखील कीबोर्डचा वापर केला जातो.

कीबोर्ड हा आयाताकृती असतो त्यावर इंग्रजी अक्षरे, अंक , चिन्ह यांचे बटन असतात. हे सर्व बटन कीबोर्डवर आडव्या पद्धतीत मांडलेले असतात आणि त्यावर सुमारे १०८ बटन (key) असतात. हे बटन दाबून आपण संगणकाला इनपुट माहिती देऊ शकतो.

कीबोर्ड चे मुख्य कार्य संगणकावर डेटा आणि माहिती प्रविष्ट करणे आहे. कीबोर्ड हा संगणकाशी संवाद साधण्याचे मुख्य साधन आहे. कीबोर्ड वापरून आपण स्क्रीनवर ppt, spreadsheet तयार करू शकतो, तसेच इंटरनेट देखील वापरू शकतो.

माऊस

माऊस हे संगणकाचे इनपुट उपकरण आहे. कीबोर्ड प्रमाणेच हे आपल्याला इनपुट रूपात संगणकाला माहिती पुरवण्यासाठी मदत करते. माऊस द्वारे प्राप्त झालेल्या इनपुट माहितीवर प्रक्रिया करून संगणक आपल्याला मॉनिटर स्क्रीनवर त्याचा परिणाम दाखवते. माऊस ला पॉइंटर उपकरण असे देखील म्हटले जाते.

माऊसचे कार्य संगणकावरील कर्सर ला नियंत्रित करणे असते. माऊसच्या मदतीने आपण संगणकावरील कर्सर फिरवून विविध कार्य करू शकतो जसे की फाईल उघडणे, नवीन फाईल तयार करणे, फाईल delete करणे, आदी. संगणकाला कार्य कर्याण्यासाठी विविध कमांडची आवश्यकता असते आपण त्या माऊस द्वारे देऊ शकतो.

माऊस चा आकार हा छोटा असतो, अगदी तळहातावर मावेल एवढा. हा केबल द्वारे cpu सोबत जोडलेला असतो आणि हा अगदी उंदरासारखा भासतो म्हणूनच त्याला इंग्रजीत माऊस असे म्हटले जाते.

सीपीयू

सीपीयू हा संगणकाचा प्रोसेसर असतो याचा फुल फॉर्म central processing unit आहे. हे उपकरण संगणकावर पर पडणाऱ्या सर्व कर्यांचे प्रोसेसिंग करत असते. तसेच युजर कडून मिळालेल्या इनपुट माहितीवर प्रक्रिया करून त्याचे आऊटपुट माहितीत रूपांतरण करण्याचे महत्वाचे कार्य हे cpu करत असते.

प्रिंटर

प्रिंटर हे संगणकाचे मुद्रांक उपकरण आहे आणि हे उपकरण संगणकावरील मजकूर, प्रतिमा यासारखी माहिती पेपर वर मुद्रण करते. प्रिंटरचे मुख्य काम संगणकावरील माहिती कागदावर प्रिंट करणे असते म्हणूनच त्याचे नाव प्रिंटर असे आहे.

प्रिंटर हे usb केबल, लेन यांच्याद्वारे संगणकाशी कनेक्ट केले जाते तसेच आजकालचे आधुनिक प्रिंटर वायफाय, ब्लूटूथ यांच्यामार्फत देखील संगणकाशी जोडणे शक्य झाले आहे. प्रिंटरचा मदतीने आपण संगणकावर कलेक्ट केलेला डेटा कागदावर प्रिंट करू शकतो.

मदरबोर्ड

मथरबोर्ड संगणक प्रणालीचा मुख्य सर्किट असतो, संगणक मध्ये होणाऱ्या सर्व गतिविधि, माहितीची देवाणघेवाण आणि सर्व उपकरणातील संवाद येथूनच साधला जातो.

मदरबोर्डचे मुख्य कार्य म्हणजे उपकरणांमधील संभाषण ज्यामध्ये संगणकावरील विद्युत ऊर्जेचे नियंत्रण आणि देखरेख करणे, प्रशासन करणे किंवा व्यवस्थापन करणे समाविष्ट असते.

स्पीकर

स्पीकर हे संगणकाचे एक आऊटपुट उपकरण आहे यामध्ये संगणक डिजिटल आणि अनालोग सिग्नल द्वारे ध्वनीची निर्मिती करतो. तसेच याद्वारे संगणक आणि वापरकर्ता यामध्ये संवाद देखील साधला जातो. संगणकावरील सर्व ऑडियो फाईल्स या स्पीकर च्या मदतीने आपणाला ऐकता येतात.

हार्ड डिस्क

हार्ड डिस्क हे संगणकाचे एक storage उपकरण आहे जे संगणकावरील सर्व माहिती साठवून ठेवते. प्रत्येक संगणाकामध्ये इनबिल्ट हार्ड डिस्क उपलब्ध असते. हे उपकरण चुंबकीय तत्वावर काम करते आणि यात सर्व डिजिटल माहिती कसे फोटो, ऑडियो, व्हिडिओ, pdf, rar, zip फाईल्स, इत्यादी साठवून ठेवण्याची क्षमता असते.

हार्ड डिस्क ही संगणकाची रोम मेमोरी (rom memory) असते. तसेच वापरकर्ता इतर storage device देखील वापरू शकतो जसे की पेनड्राईव, एसएसडी, मेमोरी कार्ड, इत्यादी.

संगणक मधील हार्ड डिस्क ची माहिती साठवण्याची वेगवेगळी क्षमता असते आज बहुदा प्रत्येक संगणकामध्ये 500gb पासून ते 2TB पर्यंत हार्ड डिस्क उपलब्ध असते. आज हार्ड डिस्क ची सर्वोत्तम storage क्षमता 6TB पर्यंत पोहचली आहे.

रॅम मेमोरी

ram memory चा फुल फॉर्म आहे random मेमोरी. या मेमोरी च्या नावावरूनच तुमच्या लक्षात आले असेल की ही केवळ तात्पुरती मेमोरी आहे. Rom मेमोरी प्रमाणे या ram मेमोरीत डेटा कायमस्वरूपी साठवला जात नाही. एखादे एप्लिकेशन्स, गेम चालू असताना डेटा वाचण्याची आणि लिहिण्याची क्षमता यामध्ये असते.

ram ही खूप वेगवान मेमोरी आहे, जो पर्यंत आपण एखादे एप्लिकेशन वापरत आहोत तो पर्यंतच त्याचा डेटा ram मेमोरी मध्ये स्टोअर असतो, जर आपण ॲप्लिकेशन बंद केले किंवा मध्येच वीज पुरवठा खंडित झाला तर ram मेमोरी मधील डेटा पुसला जातो.

आपण काय शिकलो?

मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला संगणकाचे भाग म्हणजेच parts of computer in marathi बद्दल माहिती दिलेली आहे. मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल.

मित्रानो आपण यापूर्वीच्या पोस्टमध्ये संगणक म्हणजे काय अर्थात संगणाकाबद्दल सर्व मूलभूत माहिती जाणून घेतली होती त्यामुळे या पोस्टमध्ये मी तुम्हाला संगणकाच्या सर्व भागांची माहिती दिलेली आहे, धन्यवाद…!

Exit mobile version