Site icon My Marathi Status

परशुराम जयंती माहिती, इतिहास मराठी । Parshuram Jayanti Information in Marathi

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला परशुराम जयंती माहिती, इतिहास मराठी । Parshuram Jayanti Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.

आणखी वाचा – हनुमान जयंती

परशुराम जयंती मराठी । Parshuram Jayanti Information in Marathi

परशुराम जयंती वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी परशुराम जयंती असते. परशुराम हा भगवान विष्णूच्या दहा अवतारांपैकी सहावा अवतार. वैशाख शुद्ध तृतीयेला रात्रीच्या पहिल्या प्रहरात पुनर्वसू नक्षत्रावर रेणुकेच्या पोटी परशुरामाचा जन्म झाला, म्हणून परशुराम जयंती त्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहरात केली जाते. या दिवशी अनेक लोक उपवास करतात व परशुरामाची पूजा करतात.

कोकणात चिपळूणपासून जवळच परशुरामाचे भव्य प्राचीन मंदिर आहे. त्या गावालाच पररशुराम किंवा परशुराम क्षेत्र असे म्हणतात. अक्षय्य तृतीयेला तेथे परशुराम जयंतीचा फार मोठा उत्सव साजरा केला जातो. भजन-पूजन, कथा-कीर्तन व शेवटी महाप्रसाद असे विविध प्रकारचे कार्यक्रम होतात. पालखीचा सोहळा पाहण्यासारखा असतो. कोकणातील बहुतेक लोकांचे-त्यातही कोकणस्थ ब्राह्मणांचे-परशुराम हे अत्यंत आवडते दैवत आहे. जमदग्नी नावाचे एक थोर ज्ञानी ऋषी होते. ते शीघ्रकोपी होते.

इंद्राने त्यांना एक कामधेनू दिली होती व तुझ्या पोटी प्रत्यक्ष नारायण पुत्ररूपाने जन्मास येईल, असा वर दिला होता. जमदग्नींच्या पत्नीचे नाव रेणुका. जमदग्नी व रेणुका यांना एकूण पाच पुत्र झाले. त्यांची नावे रुमणवत, सुषेण, वसू, विश्वावसु व राम अशी होती. यापैकी रामाचा जन्म वैशाख शुद्ध तृतीया या शुभ दिवशी झाला. सर्व भावंडांत राम हा अत्यंत तेजस्वी होता. सर्व ऋषिमुनी हा राम म्हणजे प्रत्यक्ष नारायणाचा अवतार आहे, असे मानून त्याला नमस्कार करीत. वयाच्या बाराव्या वर्षीच रामाने सर्व शास्त्रांचे अध्ययन पूर्ण केले.

मग तो तपश्चर्येसाठी कैलास पर्वतावर गेला. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेला गणेश त्याला म्हणाला, “तू नारायणाचा अवतार आहेस. तुला हवे असेल ते माग.” तेव्हा राम म्हणाला, “मला आपला परशू द्या व मला परशुविद्या शिकवा.” गणेशाने रामाला आपला परशू दिला व परशुविद्याही शिकविली. त्या दिवसापासून राम हा ‘परशुराम’ म्हणून प्रसिद्ध झाला. हाच तो सप्तचिरंजीवांपैकी सातवा चिरंजीव परशुराम. मग परशुरामांनी गंधमादन पर्वतावर तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न करून घेतले. प्रसन्न झालेल्या शंकरांनी परशुरामाला सर्व शस्त्रास्त्रे व युद्धकला शिकविली. याशिवाय एक दिव्य धनुष्य, कधी न संपणाऱ्या बाणांचे दोन भातेही दिले. जगात तुझा कोणीही पराभव करणार नाही, असा वरही शंकरांनी परशुरामाला दिला. परशुराम महान पितृभक्त म्हणून ओळखला जातो.

एकदा जमदग्नींची पत्नी रेणुका हिच्या हातून एक अपराध घडला. त्यामुळे जमदग्नी अतिशय संतापले. त्यांनी आपल्या मुलांना हाका मारून बोलावून घेतले. त्या वेळी परशुराम वनात गेला होता. बाकी चौघेजण जमदग्नींकडे आले. जनदग्नींनी त्या चौघांनाही आपल्या मातेचे-रेणुकेचे मस्तक उडविण्यास सांगितले. परंतु आई श्रेष्ठ तीर्थ आहे. माता पित्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आईच्या दर्शनाने मुलगा पापमुक्त होतो. मातृवध महापाप आहे असे सांगून त्या चौघांनी आपल्या मातेचे मस्तक उडविण्यास नकार दिला.

थोड्या वेळाने परशुराम तेथे आला. जमदग्नी रेणुकेवर व चारी पुत्रांवर भयंकर संतापलेले होते. तेव्हा त्यांच्या आज्ञेनुसार परशुरामाने आपल्या परशूने आपली माला व चौधे भाऊ यांची मस्तके उडविली. परशुरामाची आपल्यावरील भक्ती, निष्ठा पाहून प्रसन्न झालेल्या जमदग्नींनी परशुरामाला हवा तो वर मागायला सांगितले. तेव्हा परशुराम हात जोडून म्हणाला, “आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी माता व चारी भाऊ झोपेतून उठल्याप्रमाणे जिवंत होवोत.

मी त्यांची मस्तके उडविली होती, याचे स्मरण त्यांना न होवो.” ‘तथास्तु’ म्हणून जमदग्नींनी संजीवनी मंत्राने रेणुकेला व चारी पुत्रांना जिवंत केले. त्या दिवसापासून जमदग्नींनी आपला क्रोध सोडून दिला. त्या काळी नर्मदेच्या उत्तर तीरावर कार्तवीर्य सहस्रार्जुन नावाचा एक बलाढ्य क्षत्रिय राजा होता. एकदा त्याने ब्रह्मर्षी वसिष्ठांचा आश्रम नष्ट केला तेव्हा ‘परशराम तझा वध करील’ असा वसिष्ठांनी त्याला शाप दिला होता. तो शाप लवकरच खराही ठरला.

एकदा परशुराम आश्रमात नसताना सहस्रार्जुनाने जमदग्नींच्या आश्रमात घुसून त्यांची कामधेनु पळवून नेली व पुन्हा एकदा आश्रमावर हल्ला करून आश्रमात एकटेच असलेल्या जमदग्नींची एकवीस वेळा वार करून निघृण हत्या केली. परशुरामाला हे समजताच त्याचा क्रोध वणव्यासारखा भडकला. ‘मी संपूर्ण पृथ्वी निःक्षत्रिय करीन. क्षत्रिय कुळाचा समूळ नाश करीन,’ अशी प्रतिज्ञा करून परशुरामाने वाऱ्याच्या वेगाने सहस्रार्जुनाचा पाठलाग केला. सहस्रार्जुन व परशुराम यांचे घनघोर युद्ध झाले.

परशरामाने आपल्या परशने सहस्रार्जनाचा, त्याच्या सर्व पत्रांचा व सर्व क्षत्रियांचा संहार केला. सर्व क्षत्रियांचा संहार करून परशुरामाने कुरुक्षेत्रावरील समंतपंचक तीर्थावर आपल्या पित्याचे श्राद्ध करून आपली प्रतिज्ञा पूर्ण केली. मग मात्र परशुराम शांत झाला. सगळी पृथ्वी परशुरामाने जिंकली व ती कश्यप ऋषींना दान दिली. मग परशुराम महेंद्र पर्वतावर राहावयास गेले. त्या वेळी पश्चिम सागराला प्रचंड उधाण आले. तेव्हा अनेक ब्राह्मण व ऋषी महेंद्र पर्वतावर परशुरामाच्या आश्रयाला आले.

मग परशुरामाने एक दिव्य बाण मारून पश्चिम सागराला मागे सारले. त्या मोकळ्या जागेवर ऋषींनी, ब्राह्मणांनी वस्ती केली. हीच ती शूर्पाकार भूमी. हिलाच ‘परशुरामभूमी’ असेही म्हणतात. याच भूमीला पुढे ‘कोकण’ असे म्हटले जाऊ लागले. सीतास्वयंवरानंतर परत जात असलेल्या श्रीरामाची व परशुरामाची भेट झाली. त्या वेळी श्रीरामाचे अद्भुत सामर्थ्य पाहून या पृथ्वीचे रक्षण करण्यास आता विष्णूचा सातवा अवतार श्रीराम समर्थ आहे, हे लक्षात घेऊन परशुरामाने आपले अवतारकार्य संपविण्याचे ठरविले.

आपल्या कार्याची ओळख सर्वांना राहावी म्हणून परशुरामाने चिपळूण, गुहागर, दाभोळ इत्यादी नगरांची रचना केली व तेथे राहणाऱ्या ब्राह्मणांची, ऋषींची सर्व व्यवस्था केली. मग ‘तुमच्यावर कधी संकट आले तर माझे स्मरण करा. मी तुमच्या मदतीसाठी गुप्त रीतीने येईन,’ असे सर्वांना सांगून परशुराम महेंद्र पर्वतावर गुप्त झाले. लोकांच्या कल्याणासाठी त्यांनी आत्मलिंग प्रकट केले. हेच आजचे चिपळूणजवळ असलेले परशुराम क्षेत्र.

काय शिकलात?

आज आपण परशुराम जयंती माहिती, इतिहास मराठी । Parshuram Jayanti Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version