पोपटाबद्दल माहिती मराठीत – Parrot Information in Marathi

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला पोपटाबद्दल माहिती मराठीत – Parrot Information in Marathi देणार आहे, तर चला बघुयात.

मराठी नाव : कीर, पोपट, रावा, राघू, चन्ना.
इंग्रजी नाव : Rose-ringed Parakeet (रोझरिंग्ड पॅराकीट), Parrot पोपट.
आकार : १० ते १०० सें.मी.
वजन : २६० ग्राम.

माहिती – Parrot Information in Marathi

हिरव्यागार रंगाचा पोपट आपण चांगलाच ओळखतो. पिंजऱ्यात दिसणाऱ्या पोपटापेक्षा रानात स्वच्छंद विहरणाऱ्या ह्या पक्ष्याला पाहताना एक वेगळाच आनंद वाटतो. गळ्यावर असणाऱ्या काळ्या-गुलाबी गोफामुळे नर सहज ओळखता येतो. (वरील चित्र पहा). मादीला गोफ नसतो. बऱ्याच जणांना मैना म्हणजे राघूची मादी असं वाटतं. पण हे चुकीचं आहे.

या शाकाहारी पक्ष्याचं मुख्य खाद्य म्हणजे फळं, सर्व प्रकारची धान्यं, बिया, शेंगदाणे, मिरच्या वगैरे. त्यामुळे शेतकऱ्यांचं व बागायतदारांचं पोपट फारच नुकसान करतात. तसं म्हटलं तर पोपटाची गणना त्रासदायक पक्ष्यांमध्ये केली जाते. मात्र बीजप्रसारात तो निभावत असलेल्या भूमिकेचा अजून पुरेसा अभ्यास झालेला नाही. जीचा हंगाम साधारण जानेवारी ते मे पर्यंत असतो.

झाडांच्या खोडांमध्ये असलेल्या किंवा पक्ष्यांनी खोदून काढलेल्या भोकांमध्ये आणि घरांच्या भिंतींमध्ये असलेल्या फटींचा वापर करून घरटी केली जातात. याचाच एक भाईबंद म्हणजे पंचरंगी पोपट (Blossom headed Parakeet) किंवा तुईया. हा सारखा ‘तुई तुई’ असा आवाज करतो. आकाराने हा मैनेएवढाच असतो. पण बारीक अंगकाठी आणि लांबलचक निळी शेपटी हे वैशिष्ट्य. या निळ्या शेपटीचं टोक पांढरं असतं.

तुम्ही जर बारकाईनं पाहिलंत तर कोणतंही फळ खात असताना पोपट ते बरंच वाया घालवतो असं तुमच्या लक्षात येईल. याचं कारण त्याच्या चोचीचा आकार. बाकदार चोचीच्या पाकळ्या जेव्हा हलत असतात तेव्हा राहिलेल्या फटीतून खाद्य खाली सांडतं. पोपटाला फोडता येतं पण चिमणीसारखं सफाईनं टिपता येत नाही. चिमणीला भराभर टिपता येतं पण पोपटाप्रमाणे कठीण कवचाचं फळ फोडून खाता येत नाही. प्रत्येक पक्ष्याची चोच विशिष्ट काम करते. जसा चारा तशी चोच!

काय शिकलात?

आज मी तुम्हाला पोपटाबद्दल माहिती मराठीत – Parrot Information in Marathi दिली आहे. पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: