Pahateche Saundary Nibandh Marathi – मित्रांनो आज “पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया. रस्त्यावर तुरळक रहदारी होती.
रस्तेही आळोखेपिळोखे देत उठत होते. पथारीवाले आपापले संसार मांडत होते. चहाची दुकाने शटर्सच्या पापण्या उचलून पूर्ण जागी झाली होती. वाफाळलेल्या गरम गरम चहाचे घुटके घेत माणसं ताजीतवानी होत होती… काही घर झोपली होती.
Contents
Pahateche Saundary Nibandh Marathi
काही सुस्तपणा झटकत उठत होती. काही मात्र ‘good boy’ सारखी उठून केव्हाच तय्यार झालीहोती. त्यांच्या पुढच्या अंगणात सडासंमार्जन व रांगोळ्या काढण्यावरूनच कळत होते.
‘उठी उठी गोपाळा’ चे सूर कुठल्या तरी घरातील रेडियोवरून ऐकू येत होते. कुठे सनईचे, भैरवीचे सूर तरंगत होते. मनाला वेगळीच प्रसन्नता येत होती. हा अनुभव मला नवा होता, छान होता.
वाटेत लागलेल्या मैदानावर मुले पळण्याचा व्यायाम करीत होती. मोठी माणसे जलद चालण्याचा ! कॅनव्हॉसचे बूट, स्पोर्टस् पँट, टी शर्ट व हातात टेनिसची रेंकेट नाचवत कोणी स्थानिक पीट सॅम्प्रास टेनिस कोर्टकडे चालले होते. ‘Pahateche Saundary Nibandh Marathi’
पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध
कोणी पी.टी. उषा, ट्रॅकसूट घालून रनिंगच्या आवेशात होती. या माझ्याच वयाच्या युवकांना उत्साहाने मैदानावर पाहून, माझी मलाच थोडी शरम वाटली. ‘आलं पाहिजे’ म्हणत पुढे झालो…
मैदानावर जाण्यासाठी माकडटोपी, स्वेटर, हातमोजे, पायमोजे घालून काही पेन्शनर वृद्ध रस्त्याने येताना दिसले… सकाळपाळीचा कुणी कामगार सायकल मारीत ड्यूटी गाठत होता…
ही सारीच माणसे कशी तरतरीत दिसत होती… शेजारच्या देवळात काकड आरती चालू होती. अमंगलावर पावित्र्याचे औक्षण होत होतं. जग मंगलमय होत होतं… काहीजण पोटपूजेला लागले होते. दुधाच्या पिशव्या वाटणारे इकडून तिकडे पळत होते.
Pahateche Saundary Nibandh Marathi
पेपरवाली पोरे कमीत कमी वेळात पेपर वाटण्याची करामत करत होती. सफाई कामगार खराट्याच्या फणीने रस्ते विंचरत होते. त्यांच्यातला गुंता काढत होते.. आता रस्ते कसे नीटनेटके दिसत होते… अंधाराचे जाळे फिटू लागले होते.
आकाशनगरीत लक्ष लक्ष रत्नदीप विझू लागले. क्षितिजावर टपोरा शुक्रतारा मोगऱ्यासारखा फुलला होता… उषाराणी रजनीला निरोपाचे विडे देत होती त्या निरोप समारंभास लागले होते. दुधाच्या पिशव्या वाटणारे इकडून तिकडे पळत होते. पेपरवाली पोरे कमीत कमी वेळात पेपर वाटण्याची करामत करत होती. सफाई कामगार खराट्याच्या फणीने रस्ते विंचरत होते.
त्यांच्यातला गुंता काढत होते.. आता रस्ते कसे नीटनेटके दिसत होते… अंधाराचे जाळे फिटू लागले होते. आकाशनगरी लक्ष लक्ष रत्नदीप विझू लागले. क्षितिजावर टपोरा शुक्रतारा मोगऱ्यासारखा फुलला होता… उषाराणी रजनीला निरोपाचे विडे देत होती. त्या निरोप समारंभास पक्ष्यांनी संगीत दिलं. ‘Pahateche Saundary Nibandh Marathi’
पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध
मंद, थंड, शीतल वारा त्याची वार्ता पसरवीत होता. अरुणाच्या रथात बसून रविराज अवकाश भ्रमणाच्या तयारीत होता. त्याच्या स्वागताला रंगांची उधळण आकाश अंगणात झाली. फुलांनी परिमल उधळला. पवित्रता, मंगलता, प्रसन्नता यात जग न्हाऊन निघालं… हा निसर्ग, हे रम्य दृश्य मला अनोखं होतं.
विलक्षण मोहवीत होतं. चराचरामधलं चैतन्य माझ्या गात्रागात्रांत सळसळू लागलं. मो करंटा, रोज याला मुकत होतो. “ते काही नाही. रोज अभ्यंगस्नान करून, शुचिर्भूत होऊन निसर्गदेवतेला वंदन करायचंच!” निश्चय करून घराच्या अंगणात पाय ठेवला तोच निश्चयाला उजवा कौल देणारी शुभशकुनाची भारद्वाज पक्ष्याची जोडी मला दिसली.
तर मित्रांना “Pahateche Saundary Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “पहाटेचे सौंदर्य मराठी निबंध “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.