Site icon My Marathi Status

ओणम उत्सवाबद्दल माहिती मराठीत- Onam Information in Marathi

हॅलो वाचकांनो आज मी तुम्हाला ओणम उत्सवाबद्दल माहिती मराठीत – Onam Information in Marathi देणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – उत्सव

माहिती – Onam Information in Marathi

महिना – आश्विन भारतातील निरनिराळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात. ओणम हा केरळ राज्यामधील मुख्य सण. महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव ज्याप्रमाणे दहा दिवस साजरा केला जातो, त्याप्रमाणेच ओणम हा सण केरळ राज्यात दहा दिवस साजरा केला जातो.

हा सण आश्विन महिन्यात येतो. या सणाला सर्व लोकांचा सहभाग असतो. या सणासाठी घराची रंगरंगोटी करतात. गृहिणी घरापुढे सडा टाकून विविध प्रकारच्या रांगोळ्या काढतात. घराच्या दारावर विविध प्रकारच्या फुलांची तोरणे लावतात.

लहान-मोठे सारे जण नवीन कपडे परिधान करतात. स्त्रिया नवीन कपडे, दागिने घालून नटतात. या सणाला वामनदेवतेची शंकूच्या आकाराची मातीची मूर्ती बनवितात व ती अंगणामध्ये बसवितात. नंतर मोठ्याने ‘आरप्पु’ अशा घोषणा देतात.

मग वामनदेवतेची पूजा केली जाते. वामनदेवतेस हे लोक ‘तृकाकारप्पन’ असे म्हणतात. या सणानिमित्त घराघरांत मिष्टान्नाचे जेवण करतात. हा सण सार्वजनिकरित्या साजरा केला जातो.

समाजातील सर्व लोक एकत्र येतात त्यामुळे राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण होते. या दिवशी विविध स्पर्धा, नौकानयन, मैदानी खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. केरळ प्रांतातील लोक या सणानिमित्ताने आपआपसांतील वैर विसरून राष्ट्रीय एकात्मता दाखवितात.

काय शिकलात?

आज आपण ओणम उत्सवाबद्दल माहिती मराठीत- Onam Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

Exit mobile version