Site icon My Marathi Status

निसर्ग माझा गुरु निबंध मराठी | Nisarg Maza Guru Nibandh Marathi

Nisarg Maza Guru Nibandh Marathi – मित्रांनो आज “निसर्ग माझा गुरु निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Nisarg Maza Guru Nibandh Marathi

दिव्यरसी विरणे जीव,
जीवित हे त्याचे नाव

ही अनुभूती केवळ निसर्गातच येऊ शकते. म्हणून जीवनाचा उत्कट आस्वाद घ्यायचा असेल तर निसर्गाकडे चला. निसर्ग हा मानवाचा सोबती तर आहेच पण तो एक महान गुरुही आहे.

वृक्ष आपले जिवलग मित्र आहेत. आपल्या आयुष्यात जशी जवळची माणसे आनंद व प्रकाश आणतात तसेच वृक्षसुद्धा सुख देतात. आनंदाच्या क्षणाची आठवण ठेवायची असली तर वृक्षासारखा दुसरा मित्र नाही.

निसर्ग माझा गुरु निबंध मराठी

‘निसर्ग आपला मित्र’ या लेखात प्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली म्हणतात की निसर्गाच्या सहवासात राहण्यासारखा दुसरा आनंद नाही.

या छंदामुळे मी मनाने प्रसन्न आणि शरीराने निरोगी राहू शकलो. निसर्ग आपला शेवटपर्यंत सोबत पुरणारा सच्चा दोस्त आहे.

बोधिवृक्षाखाली बसणारा बुद्ध, वनस्पतींना हृद्य आहे हे सांगणारा जगदीश बोस, देवदारच्या वनात बसून काव्य करणारा शेले, टेकडीवर अभंगाची स्फूर्ती घेणारे तुकाराम, डोंगरावर परमेश्वरी संदेश ऐकणारे पैगंबर, मेघदूत लिहिणारे कालिदास, वृक्षांना उच्चतम आकांक्षाचे प्रतीक मानणारा अर्नोल्ड, सागरा प्राण तळमळला म्हणणारे सावरकर या सर्व थोरांनी निसर्गातून प्रेरणा घेतली, म्हणजे निसर्ग हाच त्यांचा गुरू.

Nisarg Maza Guru Nibandh Marathi

निसर्गाकडे चला, सर्वत्र नावीन्याचा लखलखाट दिसेल. जग उत्पन्न होऊन इतकी वर्षे झाली, पण रोज सकाळी ते नवीनच जन्माला येते आहे असे वाटते.

सूर्योदयाचे आणि सूर्यास्ताचे सोने पहिल्यासारखेच पिवळेधमक आहे. आभाळाचा निळा रंग अजून विरला नाही. कळ्याफुलांचा सुगंध अजून उडाला नाही.

तृणांची हिरवीगार मखमल अद्याप टवटवीत आहे. निसर्ग म्हणजे जे रम्य आणि भव्य त्याचे प्रत्ययकारी दर्शनच.

निसर्ग माझा गुरु निबंध मराठी

समुद्र केवढा सखोल, विशाल आणि अथांग ! भरतीच्या आणि ओहोटीच्या तालावर आपल्या मनोवृत्ती अखंड नाचत असतात.

पहाटेच्या वेळी अंगावर लाटांचे तुषार झेलत ओल्या आणि भुसभुसीत वाळूवर अनवाणी चालण्यात केवढे काव्य आहे. डोंगरावर ज्या माणसांचे स्वार्थी जग आपण पार विसरून जातो.

डोंगरावरील हिरव्या सृष्टीचे रहिवासी उन्हाळ्यात वाऱ्यांच्या झुळुकांशी खेळतात, पावसाळ्यात मुसळधारांशी दंगामस्ती करणार, हिवाळ्यात धुक्याची दुलई पांघरून आत नाचत असतात.

Nisarg Maza Guru Nibandh Marathi

जीवन आनंदमय करणारी संजीवनी म्हणजे निसर्ग होय. मृत्यूची चाहूल लागली की माणसे उदास व हताश होतात. पण झाडे मात्र पानगळतीची चाहूल लागताच सळसळतात, रंगांची उधळण करतात, रंगोत्सव साजरा करतात.

ती मृत्युभयाने भयभीत होत नाहीत किंवा खिन्नही होत नाहीत. एक पान गळले तरी त्याच्या जागी नवे पान येणारच आहे असा अमरत्वाचा संदेश निसर्गगुरू देत असतो. हे अमृताचे द्रोण निसर्गातच प्यायला मिळतात.

निसर्ग माझा गुरु निबंध मराठी

गळण्याआधी सळसळुनी ही रंग उधळती पाने
आग लागल्यागत राळांचा फाग खेळतो राने
म्हणती आता अपर्ण होऊ, झेलू हिमसुमवर्षा
हे सामोरे सहर्ष आम्ही नव्या जिण्याच्या स्पर्शा

तर मित्रांना “Nisarg Maza Guru Nibandh Marathi”  हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “निसर्ग माझा गुरु निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

जीवन आनंदमय करणारी संजीवनी म्हणजे कोण?

जीवन आनंदमय करणारी संजीवनी म्हणजे निसर्ग होय.

Exit mobile version