आज मी तुम्हाला Independence day information and Speech in marathi – स्वतंत्रदिवस बद्दल माहिती आणि भाषण मराठीत देणार आहे तुम्ही तुमच्या माहिती नुसार हे वाचून भाषण किंवा माहिती मिळवू शकता, तर चला बघुयात. आणखी वाचा – गुरु पौर्णिमा
भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले. या अगोद भारतावर इंग्रजांची सत्ता होती. १५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण भारतात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरभारताचे पंतप्रधान तिरंगा झेंड्यास मानवंदन करतात आणि सर्व भारतीयांनादेशभक्तीचे, देशप्रेमाचे आवाहन करतात.
भारतामध्ये हा सण सर्व शाळा,महाविद्यालये, विविध कार्यालयांमध्ये साजरा केला जातो. या दिवशी सर्व भारतामध्ये राष्ट्रीय सुट्टी असते. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी कितीतरी लोकांनी तुरुंगवास भोगला, काहीजण हसतहसत फासावर लटकले, त्यांची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
इंग्रज राज्यकर्त्यांनी भारतातील प्रत्येक माणसाला पशु-प्राण्यांप्रमाणे वागणूक दिली. या अन्यायाचा नि:पात करण्यासाठी सर्वांनी मिळून इंग्रजांना देशाबाहेर घालवून दिले व भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. या दिवशी विद्यार्थी शाळेचा स्वच्छ गणवेश घालून शाळेत येतात, शाळेमध्ये झेंडा वंदन करतात.
शाळेमध्ये मुलांची भाषणे होतात. त्यानंतर पाहुणे व अध्यक्षांचे देशभक्तिवर भाषण होते. शाळेकडून विद्यार्थ्यांना खाऊ-वाटप केला जातो. खेडेगावांमध्ये प्रभात फेरी निघते. नंतर तिरंगी झेंड्यास वंदन करून त्याचे पावित्र्य राखले जाते.
आपल्या राष्ट्रध्वजात तीन रंग आहेत. सर्वांत वरच्या बाजूस असणारा केशरी रंग त्याग व शौर्याचे प्रतीक आहे. मध्यभागी असणाऱ्या पांढऱ्या रंगातून शांतीचा संदेश मिळतो. खालच्या बाजूस असलेला हिरवा रंग समृद्धीचे प्रतीक आहे.
राष्ट्रध्वजाच्या मध्यभागी असणाऱ्या पांढऱ्या पट्ट्यावर निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. चक्र हे गतीचे प्रतीक आहे. यातून आपण देशाच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील असले पाहिजे, असा संदेश मिळतो.
राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राजमुद्रा ही आपली राष्ट्रीय प्रतीके आहे. हा आपला राष्ट्रीय सण सर्वांनी आनंदाने साजरा केलाच पाहिजे. कारण त्यामुळेच राष्ट्रातील ऐक्याची भावना वाढीस लागेल.
भारताच्या प्रगतीसाठी ऐक्यभावना आणि सामाजिक समभाव हाच महत्त्वाचा आहे. सूर्यास्तापूर्वी ध्वजास वंदन करून मानाने ध्वज खाली उतरविला जातो.
Contents
स्वतंत्रदिवस बद्दल माहिती आणि भाषण मराठीत – Short Speech on Independence Day in Marathi Language
आदरणीय मुख्य अतिथी सर, आदरणीय शिक्षक, पालक आणि सहकारी मित्रानो स्वातंत्र्य दिनाच्या या शुभ मुहूर्तावर माझे विचार मांडण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद झाला आहे.
हा आपला ७४ वा स्वातंत्र्यदिन उत्सव आहे. अगदी 74 वर्षांपूर्वी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. आपल्या स्वातंत्र्यलढ्याची कहाणी खूप मोठी आहे, ज्याचे वर्णन एका दिवसात करता येणार नाही. स्वातंत्र्य दिन प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्वाचा असतो.
आपल्यावर ७४ वर्षांपूर्वी ब्रिटीशांचे राज्य होते, ते व्यापाराच्या बहाण्याने भारतात आले आणि हळूहळू सर्व काही आपल्या ताब्यात घेऊन आपल्याला गुलाम केले. त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी अनेक आंदोलने केल्यानंतर भारत स्वतंत्र झाला.
आपल्या देशातील शूर योद्ध्यांमुळे आपण आज स्वतंत्र झालो आहोत आणि त्या लोकांना श्रद्धांजली वाहून हा दिवस साजरा करतो. स्वातंत्र्य दिन हा भारताच्या राष्ट्रीय सणांपैकी एक आहे. एवढे बोलून तुम्ही तुमचे भाषण संपवू शकता.
काय शिकलात?
आज आपण Independence day information and Speech in marathi – स्वतंत्रदिवस बद्दल माहिती आणि भाषण मराठीत पाहिलं आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.