हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला नवरात्र उत्सव माहिती, इतिहास मराठी । Navratri Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात.
आणखी वाचा – ऋषिपंचमी
आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी असे नऊ दिवस शारदीय नवरात्र किंवा देवीचे नवरात्र असते. श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशा स्वरूपात देवीची पूजा करावयाची असते. हिला नवदुर्गा अपराजिता असेही म्हणतात. नऊ रात्री संपेपर्यंत हा उत्सव चालतो म्हणून या उत्सवाला नवरात्र असे म्हणतात. आश्विन शुद्ध प्रतिपदेला सकाळी घटस्थापना करतात. आपल्या घरातील नित्यपूजेच्या देवाच्या उजव्या बाजूस तांबड्या मातीची वेदी करून त्यावर शुद्ध जलाने भरलेला कलश ठेवावयाचा असतो. त्या कलशात गंध, फूल, अक्षता, दुर्वा, सुपारी, एक नाणे, पंचपल्लव घालावयाचे.
मग त्या कलशावर पूर्णपात्र ठेवून त्यावर देवीची प्राणप्रतिष्ठा करावयाची असते. पहिल्या दिवशी अशी देवी ठेवली की नऊ दिवस तिला तेथून हलवावयाची नसते. दररोज देवीची पंचोपचारांनी पूजा करावयाची असते. रोज एकेक माळ त्या देवीवर बांधावयाची असते. ही माळ शक्यतो तिळाच्या फुलांची असावी. देवीजवळ नऊ दिवस अखंड दिवानंदादीप लावावयाचा असतो. तो विझ द्यायचा नाही. नऊ दिवस देवीची आरती, गोड पक्वानाचा नैवेद्य, ब्राह्मण-सवाष्ण, कुमारिका भोजन इत्यादी गोष्टी आपल्या प्रथेप्रमाणे करावयाच्या असतात. काही लोक या दिवसांत देवीपुढे सप्तशतीचा पाठ करतात.
घरातील मुख्य यजमानाने नऊ दिवस एकभुक्त राहावयाचे असते. दशमीला पूजा, आरती झाल्यावर नवरात्र उठवितात. काही लोक नवमीलाच नवरात्र पूजेचे विसर्जन करतात, नवरात्रात देवीची पूजा का करायची, देवीने काय केले, याविषयी एक कथा आहे. ती अशी पूर्वी दुर्गम नावाचा एक भयंकर दैत्य होता. ब्रह्मदेवाच्या वराने ती उम्पत माला होता. त्याने सर्व देवांना सळो की पळो करून सोडले. त्याने अनेक ऋषिमुनींना ठार मारले. त्यांचे यज्ञ नष्ट केले. तेव्हा सर्व देवऋषींनी आदिशक्तीची-आदिमातेची आराधना केली.
प्रसत्र झालेल्या आदिशक्तीने भयंकर रूप धारण करून दुर्गम राक्षसाचा नाश केला, माणून तिला दर्गादेवी असे नाव मिळाले. याच वेळी महिष नावाचा एक भयंकर राक्षस देवांना त्रास देऊ लागला. तेव्हा ब्रह्माविष्णू-महेश यांनी देवीची आळवणी केली. दुर्गादेवी अष्टादशभुजा सम्प धारण करून विंध्य पर्वतावर आली. दुर्गादेवीचे व महिषासुराचे मोठे युद्ध झाले. शेवटी दुर्गादबीन महिषासुराच्या छातीवर पाय दिला व त्याला ठार मारले. म्हणून तिला महिषासुरमर्दिनी असे नाव मिळाले. नवरात्राच्या या नऊ दिवसांत देवीने आणखी खूप पराक्रम केले. शुंभ-निशुंभ या दोन राक्षसांनी देवांचा पराभव करून स्वर्गावरही स्वारी केली.
तेव्हा सर्व देवांनी आदिमातेला हाक मारली. त्या वेळी देवीने अंबिका, चण्डा व मुण्डा ही सपे धारण केली. तिने वाघाचे कातडे परिधान केले. गळ्यात अंडमाला घातली. तिची भयंकर जीप तोंडातून बाहेर लोंबत होती. तिने चण्ड-मुण्डांशी युद्ध करून त्यांना ठार मारले. या तिच्या पराक्रमामुळे तिला चामुण्डा नाव मिळाले. मग शुंभ राक्षस राक्षससैन्याचा प्रमुख बनला. तेव्हा अंबिका सिंहावर बसून युद्ध करू लागली. सिंहाने अनेक राक्षसांना ठार मारले. शेवटी देवीने सर्व राक्षसांचा नाश करून देवलोकावरील संकट दूर केले. त्या वेळी सर्व देवऋषींनी दुर्गामातेचा जयजयकार केला.
तिची पूजा केली. अशी आहे ही आदिमाता दुर्गाभवानी. या देवीने नऊ दिवस नऊ अवतार धारण करून दुष्ट- दुर्जनांचा नाश केला, म्हणून या नवदुर्गेचे नवरात्र साजरे करावयाचे असते. याच आदिमायेने मत्स्यकूर्मादी अवतार घेतले. रामरूपाने रावण, कुंभकर्णास ठार मारले. कृष्णरूपाने कंसशिशुपालादींचा नाश केला. बिभीषण, मारुती, अर्जुन या वीरभक्तांच्या अंगात हिनेच प्रवेश केला.
छत्रपती शिवरायांच्या तलवारीत हिनेच प्रवेश करून देव, धर्म बुडवणाऱ्यांचा विनाश केला. समाजात दुर्गुण माजले. दुष्टदुजन उन्मत्त झाले का हाच आदिशक्ती प्रकट होते व दुष्टांचे निर्दालन व सज्जनांचे संरक्षण करते. ही परमेश्वरी शक्तीच जगाचा उद्धार करते, अशी भारतीयांची श्रद्धा आहे. म्हणूनच नवरात्रात नऊ दिवस या देवीची महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या स्वरूपात पूजा करायची असते. हे आदिशक्ती, हे जगन्माते, आम्हाला शक्ती दे. बुद्धी दे. ऐश्वर्य दे, चांगली वासना दे. अशी तिला प्रार्थना करावयाची असते. नवरात्राचा हा उत्सव भारतात सगळीकडे मोठ्या उत्साहाने, भक्तिभावाने साजरा केला जातो.
काय शिकलात?
आज आपण नवरात्र उत्सव माहिती, इतिहास मराठी । Navratri Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.