हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला नागपंचमी सणाबद्दल माहिती मराठी | Nag Panchami Information in Marathi सांगणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – 15 Festivals Information in Marathi
दिनांक : | १३ ऑगस्ट २०२१ |
महिना : | श्रावण |
तिथी : | पंचमी |
पक्ष : | शुक्ल |
धार्मिक महत्त्व
मराठी महिन्यांतील पाचवा महिना म्हणजे श्रावण. सगळ्यात शुद्ध आणि सात्त्विक महिना. श्रावण महिन्यात निसर्गही फळाफुलांनी नटलेला आणि हिरवागार असतो. अशा या पवित्र महिन्यातील सणांची सुरुवात नागपंचमीपासून होते. या महिन्यात सगळे जीवजंतू आणि निसर्गही तृप्त आणि आनंदी असतो.
दिवसाचे महत्त्व
नागपंचमीच्या दिवशी सर्व स्त्रिया, लहान मुली गावाबाहेरील नागाच्या देवळात वा वारुळाला जाऊन नागाची पूजा करतात. तसेच सासुरवाशिणी माहेरी येतात. खेडेगावांत झाडाला झोके बांधून स्त्रिया व मुली झोके खेळतात.
फुगड्या, झिम्मा असे पारंपरिक खेळ खेळतात. या दिवशी पुरण व कणकेपासून बनवलेले दिंड-मोदकासारखे उकडलेले पदार्थ, ज्वारीच्या लाह्या करून नागाला नेवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरू नये. कापूनये, चुलीवर तवा ठेवू नये, तळू नये, अशी प्रथा आहे.
इतर माहिती
नाग हा मानवाचा मित्रच आहे. शेतकऱ्यांचाही हितचिंतक आहे. शेतातील उंदरासारखे प्राणी पिकांची नासधूस करत असतात. त्यांचा नाश करून शेतातील पिकाला हिरवेगार ठेवण्याचे काम नागच करतात. त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे नागपंचमी. कर्नाटकात या दिवशी गूळपापडीचे लाडू करतात.
काय शिकलात?
आज आपण नागपंचमी सणाबद्दल माहिती मराठी | Nag Panchami Information in Marathi पाहिली आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.