MNS Nondani.in | मनसे सदस्य/ सभासद ऑनलाईन नोंदणी कशी करावी 2023| mns nondani in marathi
Mns nondani in marathi :- नमस्कार मंडळी ! दिनांक १५/०३/२१ म्हणजेच सोमवार पासून मनसे (maharashtra navnirman sena) या पक्ष्याची सदस्य / सभासद पदाची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी mnsnondani.in या संकेतस्थळावर सुरू आहे. तर तुम्हाला जर मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य / सभासद पदासाठी नोंद करायची असेल तर तुम्ही करून घेऊ शकता.
या पोस्टमध्ये मी तुम्हाला मनसेच्या सदस्य पदासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी कशी करावी याबद्दल माहिती देणार आहे.
Mns nondani.in | मनसे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) सदस्य पदासाठी (Mns nondani in marathi) ऑनलाईन नोंदणी कशी करावी ?
मित्रांनो तुम्ही जर मनसे प्रेमी आहात किंवा जर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्ष्याचे समर्थक आहात तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
सोमवार दिनांक १५/०३/२१ या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या सदस्य पदासाठी ऑनलाईन नोंदणी अभियानाला शुभारंभ केला. हा कार्यक्रम मुंबईतील शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आला होता.
या वेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, त्यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि मुलगा अमित ठाकरे व इतर मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.
- ट्रेडिंग म्हणजे काय ?
- Flowchart म्हणजे काय ?
नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने यावेळेस मनसेच्या सदस्य पदासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात येत आहे. Covid – १९ या महामारीचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रत्यक्ष ऑफलाईन पद्धतीने नोंदणी न करता तुम्हाला mns nondani.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करता येणार आहे.
मनसे सदस्य पदासाठी नोंदणी करण्यापूर्वी तुम्हाला या अटी मान्य कराव्या लागतील :
- तुम्ही इतर कोणत्याही मान्यता प्राप्त पक्ष्याचे सक्रिय सदस्य नसायला हवेत
- तुम्हाला मनसेच्या सर्व धोरणांचे कडेकोट पालन करावे लागेल
- ही नोंदणी केवळ २०२३ पर्यंतच मर्यादित असेल.
Mnsnondani.in या संकेतस्थळावर मनसेच्या सदस्य पदासाठी (Mns nondani in marathi) अशी करा ऑनलाईन पद्धतीने नोंदणी :
स्टेप १ : सर्वात पहिले तुम्हाला https://mnsnondani.in/ या संकेेेतस्थळावर भेट द्यायची आहेे. येेेेेेेेेेेे
स्टेप २: येथे तुम्हाला भाषा निवडा असा पर्याय दिसेल आणि त्याखाली इंग्लिश आणि मराठी असे दोन पर्याय दिसतील. यातील मराठी वर क्लिक करा.
स्टेप ३: आता तुम्हाला तुमचा १० अंकी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.
स्टेप ४: मोबाईल क्रमांक टाकून मी सहमत आहे या बॉक्समध्ये चेक करून पुढे जा या पर्यायावर क्लिक करा. आता तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल तो तुम्ही येथे verify करायचा आहे.
स्टेप ५: त्यानंतर तुम्हाला तुमची वयक्तिक माहिती भरायची आहे. यात तुमचे नाव, आडनाव, वडिलांचे / पतीचे नाव, जन्मतारीख, इत्यादी
स्टेप ६: त्यानंतर तुम्हाला तुमचा प्रोफाईल फोटो अपलोड करायचा आहे.
स्टेप ७: अभिनंदन ! तुम्ही यशस्वीरीत्या मनसे (maharashtra navnirmam sena) सदस्य पदासाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी केली आहे.
निष्कर्ष :
मित्रांनो या पोस्टमध्ये मी तुम्हाला मनसे सदस्य पदासाठी (Mns nondani in marathi) ऑनलाईन पद्धतीने mnsnondani.in या संकेतस्थळावर नोंदणी कशी करावी याबद्दल माहिती दिली.
ही माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल, धन्यवाद… !