Mi Tiranga Boltoy Nibandh Marathi – मित्रांनो आज “मी तिरंगा बोलतोय निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
Contents
Mi Tiranga Boltoy Nibandh Marathi
“वरी केशरी मध्ये पांढरा,
खाली हिरवा रंग,
अशेकचक्रा शोभतो,
निळसर रंग”
असे गीत तुम्ही मुले उत्साहाने गात असता. हे गीत ज्याच्याविषयी तुम्ही गाता तोच तिरंगा आहे मी! मी स्वतंत्र भारताचा तिरंगा बोलतोय.
आज मला माझ्या मनातले तुमच्याशी मोकळेपणाने बोलायचे आहे. तसे पाहता मी म्हणजे भारत देशाची आन, बान तसेच शान आहे. भारतीय माझा आदरही करतात. प्रथम पंडित जवाहरलाल नेहरू यांनी २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्य ही घोषणा केली होती. “Mi Tiranga Boltoy Nibandh Marathi”
त्यानंतर १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले व त्याच बरोबर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पदग्रहण केलेले या घटनेची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस भारतीय राज्यघटना अमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.
मी तिरंगा बोलतोय निबंध मराठी
स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना म्हणजेच संविधान अमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली.
त्यामुळेच १५ ऑगस्ट तसेच २६ जानेवारी या दोन तारखांना माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण धारण महत्त्व आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. [Mi Tiranga Boltoy Nibandh Marathi]
स्वातंत्र्याचे प्रतीक जो तिरंगा म्हणजे मी आकाशात डौलात डोलावा म्हणून असंख्य स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची तसेच कुटुंबाची पर्वा न करता देशप्रेमाने झापाटून जाऊन निकराचा लढा दिला.
Mi Tiranga Boltoy Nibandh Marathi
माझ्यावरील अतीव प्रेमापोटी या लढ्यात सर्वजणांनी तळमळीने स्वतंत्र भारताचे स्वप्न साकार कण्यासाठी घरदार, नातेवाईक, माता – पिता, बायको मुले यांना सोडून फक्त स्वातंत्र्यप्राप्तीचा ध्यास घेऊन या धगधगत्या अग्निकुंडात उडी घेतली होती.
स्वातंत्र्यप्राप्तीचे स्वप्न उराशी बाळगून ज्यांनी तुरुंगवास भोगला, शारीरिक-मानसिक छळाची परिसीमा ज्यांनी सहन केली, माणुसकीला लाजवतील अशा क्रूर व अनन्वित छळ त्यांनी निधड्या छातीने सहन केला, कित्येक स्वातंत्र्यवीरांनी वंदे मातरम् चा घोष केला. Mi Tiranga Boltoy Nibandh Marathi
मी तिरंगा बोलतोय निबंध मराठी
अशा सर्व स्वातंत्र्य वीरांचे स्मरण करून त्यांना मानवंदना देणे हे सर्व भारतीयांचे प्रथम कर्तव्य आहे. हे सर्व का, तर तिरंगा आकाशात मानाने फडफडावा म्हणून, तिरंग्याकडे म्हणजेच माझ्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू नये अथवा माझी हेटाळणी करू नये याकरिताच भारतीय तिन्ही सैन्य दलातील अधिकारी व जवानांनी रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून भारताचे रक्षण केले व आजही ते करत आहेत.
स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी आपल्या सर्वस्वाची होळी केली व आपले प्राण स्वतंत्र्यासाठी खर्ची घातले. त्या वीरांना व वीरांगनांना कोटी कोटी प्रणाम! त्यांच्यामुळेच भारताला स्वातंत्र्याची गोडी चाखता आली. Mi Tiranga Boltoy Nibandh Marathi
Mi Tiranga Boltoy Nibandh Marathi
आजच्या युवा पिढीच्या खांदयावरच उद्याच्या भारताची भिस्त आहे. या तिरंग्याचे रक्षण करणे व तिरंगा मानाने कसा फडफडत राहील याची काळजी घेण्याचे काम या युवापिढीवरच आहे.
जगभरात भारताला प्रगतिपथावर नेणारे कोण असतील, तर ते आहेत आजच्या युवा पिढीचे प्रतिनिधीत्व करणारे युवक.
भारतीय स्वातंत्र्य संग्रामात स्वातंत्र्यवीरांनी केलेले आत्मबलिदान नक्की स्फूर्ती देणारे आहे, यात शंका नाही. पण, त्याचा गंभीरतेने विचार केला जातो का, हे पाहणे गरजेचे आहे.
मी तिरंगा बोलतोय निबंध मराठी
स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ज्यांनी ज्यांनी म्हणून आपला देह ठेवला. आपले रक्त सांडले त्याचे प्रतीक हा तिरंगी झेंडा आहे. त्याला वंदन करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे.
संपत्तीची / पैशांची परिपक्वता यायच्या आधीच आज युवापिढीच्या हातात भरपूर पैसा खेळू लागला आहे. त्यामुळे खर्च करण्याच्या बाबतीत संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे रजा मिळाली की, मौजमजा करण्याकडे यांचा कल असतो. त्यामुळे सहाजिकच झेंडावंदन या राष्ट्रीय सोहळ्याचा त्यांना विसर पडतो.
मी तिरंगा बोलतोय निबंध मराठी
जर १५ ऑगस्टच्या पुढे मागे लागून रजा आल्या, तर ही मंडळी झेंडावंदन या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष करून सहलीलाही जाण्यास मागे पुढे बघत बघत नाहीत.
‘अरे छोडो झेंडावंदन, चलो हम पिकनिक मनायेंगे’ अशासारखी वाक्ये ऐकली की, तळपायाची आग मस्तकात जाते. याचकरिता का स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आत्मसमर्पण केल होते. हा विचार मनात येऊन मन विषण्ण होते. Mi Tiranga Boltoy Nibandh Marathi
यातील काही विवाहीत तरुण जोडपी आपल्या मुलांना महागडे झेंडे विकत घेऊन देतात. पण, त्या झेंड्यामागे लाखो क्रांतीवीरांनी केलेले आत्मबलिदान याची जाणीव त्या मुलांना करून देण्यात ते अपयशी ठरतात. यामुळे या झेंड्याचे महत्त्व मुलांना कधीच समजत नाही. व त्यांच्या हातून नकळत झेंड्याचा अपमान होतो.
Mi Tiranga Boltoy Nibandh Marathi
झेंडावंदन सोहळा झाल्यावर काही वेळातच हे झेंडे मुलांच्या हातून खाली पडलेले दिसतात हे पाहून मनाचा संताप होतो. सर्वच सरकारी कार्यालयात त्या दोन्ही दिवशी झेंडावंदन होते.
काही कार्यालयात ते अगदी संचलनासकट पद्धतीशीर होते. तर काही कार्यालयात ते तबलापेटीसह इ. वाद्ये वाजवून होते. स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाचे महत्त्व या तरुण पिढीला जाणवू लागले आहे.
मी तिरंगा बोलतोय निबंध मराठी
स्वातंत्र्यासाठी प्राण पणास लावून लढलेल्या तसेच स्वातंत्र्यसंग्रामात प्राण गमावलेल्या वीरांबद्दलची माहिती, त्यांनी देशाकरिता केलेला त्याग इत्यादींबद्दल या नवीन पिढीला जाणून घेण्याची इच्छा मूळ धरू लागली आहे. म्हणूनच सर्वजण अभिमानाने म्हणतात.
“उत्सव तीन रंगाचा,
आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांचा,
ज्यांनी हा भारत देश घडवला”
तर मित्रांना “Mi Tiranga Boltoy Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “मी तिरंगा बोलतोय निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
तिरंगा मध्ये किती रंग आहेत?
तिरंगा मध्ये तीन रंग आहेत.
तिरंगा मध्ये कोणते रंग आहेत?
तिरंगा मध्ये केशरी, पांढरा, हिरवा आणि अशोक चक्र निळ्या रंगाचा आहे.