Site icon My Marathi Status

माझ्या स्वप्नातील शाळा निबंध मराठी | Mazya Swapnatil Shala Nibandh Marathi

Mazya Swapnatil Shala Nibandh Marathi – मित्रांनो आज “माझ्या स्वप्नातील शाळा निबंध मराठी” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Mazya Swapnatil Shala Nibandh Marathi

“असावी सुंदर अशी एक शाळा
ओढ लागे जिची प्रत्येक बाळा
असावा असा एक गुरु
ज्ञानदानाचा असे तो कल्पतरु”

माझ्या मनातील शाळाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येवले- वस्तीसारखी स्वच्छ, सुंदर असावी. शाळेच्या चारही बाजूंनी पक्की संरक्षक भिंत असावी.

शाळेच्या पुढे खेळण्यासाठी प्रशस्त मैदान असले पाहिजे, खो-खो, कबड्डी व इतर खेळ घेणारे शिक्षक असावेत. शाळेमध्ये विदयार्थ्यांना विविध खेळांचे प्रशिक्षणही दिले पाहिजे.

शाळेच्या बाजूला बाग असावी. त्या बागेत वेगवेगळ्या प्रकारची झाडे व फुलझाडे असावीत. शाळेला स्वतंत्र व्यासपीठ असावे व त्यासमोर सुंदर अशी हिरवळ असावी. शाळेला निसर्गरम्य असे वातावरण असावे.

माझ्या स्वप्नातील शाळा

“लहान मुले म्हणजे बागेतील फुलांचा चौफेर आस्वाद घेणारे फुल- पाखरं” अशा या फुलपाखरांना बंद खोलीत भिंतीच्या आवारात शिक्षण दिले तर त्यांच्या काही पचणी पडणार नाही. त्यांच मनही रमणार नाही.

अशा या फुलपाखराचं मन रमण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात असणारी माझी सुंदर स्वप्नातील शाळा किती गोड असेल ना? या बिना घंटीच्या शाळेत विदयार्थ्यांना अभ्यासाचे बंधन असणार नाही. अभ्यास करावा वाटत असेल तर तोही खेळासारखा फुलपाखरांच्या सोबत खेळताना.

अभ्यास करण्यासाठी झाडांना बनविलेल्या कट्ट्यांवर बसून मुले मुक्तपणे कृती करतील. शाळा गावाच्या एका बाजूला असावी. त्या शाळेचे लक्ष्य केवळ विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न व आदर्श नागरिक घडविणे हे असावे. शाळेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी. शाळेत मुलामुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावे. {Mazya Swapnatil Shala Nibandh Marathi}

Mazya Swapnatil Shala Nibandh

सर्व मुलामुलींना दुपारचे जेवण दिले जावे. दुपारचे जेवण पोष्टीक असण्यासाठी शाळेत परसबाग असावी. त्यात सर्व प्रकारच्या आज्यांचा समावेश असावा. शाळेत स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन व थोर व्यक्तींच्या जयंत्या व पुण्यतिथ्या साजच्या करून विदयार्थ्यांमध्ये देशाभिमान जागृत करावा.

शाळेत खुले ग्रंथालय असावे, म्हणजे ज्याला हवे ते पुस्तकू त्याने काढावे नि वाचायला लागावे. शाळेत संगणक, इंटरनेटसारखी साधने असावीत. शाळा डिजीटल असावी. शाळेतील वर्ग हवेशीर, प्रशस्त व भरपूर प्रकाश येईल असे असावेत. मुलांना बसण्यासाठी वर्गात चांगली बैठक व्यवस्था असावी. “Mazya Swapnatil Shala Nibandh Marathi”

माझ्या शाळेतील अभ्यासक्रम निश्चित असेल, पण तो पूर्ण करण्याची रटाळ धडपड नसेल. विद्यार्थी स्वतः अभ्यास करतील, वाचन करतील. शाळेत शिक्षकांनी स्वत: तयार केलेले शैक्षणिक साहित्य भरपूर व विदयार्थ्यांना सहजपणे हाताळता येईल अशी त्यांची मांडणी केलेली असेल. थोडक्यात माझ्या स्वप्नातील शाळा खालीलप्रमाणे असेल….

माझ्या स्वप्नातील शाळा निबंध मराठी

“शाळा म्हणजे नकोत नुसत्या भिंती,
तिथे साकाराव्या बालकाच्या जीवनाची आकृती,
शाळेत असावी सुंदर बाग,
तिथे रमावा आमचा छोटा वाघ.
तिथे नसावी फक्त पुस्तक वही,
तिथे असावी भविष्य साकारण्याची ग्वाही.
शाळेत असावा एक गणवेश,
ज्याने पुसून टाकावेत सारे द्वैष.
शाळेत नसावे फक्ते ज्ञान,
तिथे व्हावे मुलांचे मनोरंजन छान.
तिथे अभ्यासाचे दडपण,
तिथे असावे असे की,
झोपेतही यावी शाळेची आठवण.
तिथून घडू नयेत नुसते तांत्रिक,
तर तिथून घडावेत उद्याचे सुजाण नागरिक.
तिथे नसावित व्याख्यानयुक्त भाषण,
तिथे असावे वालकेंद्रीत कृतियुक्त अध्यापन.
अशी असावी माझी स्वप्नातील शाळा
जिने घालावा समाजातील अनेक वाईट गोष्टींना आळा ॥

“Mazya Swapnatil Shala Nibandh Marathi”

तर मित्रांना “Mazya Swapnatil Shala Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “माझ्या स्वप्नातील शाळा निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

हे पण वाचा 👇👇👇

माझी शाळा निबंध मराठी
Exit mobile version