Site icon My Marathi Status

माझ्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र निबंध मराठी | Mazya Swapnatil Samruddh Maharastra Nibandh Marathi

Mazya Swapnatil Samruddh Maharastra Nibandh Marathi – मित्रांनो आज “माझ्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र निबंध मराठी”  या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

Mazya Swapnatil Samruddh Maharastra Nibandh

शिवरायांचे महान शौर्य
तुकोबांची आहे भक्ती इथे
महान अमुचा महाराष्ट्र
आहे पंढरीची वारी जिथे…..

नावाप्रमाणे महान असलेला आपला महाराष्ट्र. विरांची, शूरांची, संतांची व भक्तांची महान अशी भूमी, आपला महाराष्ट्र भारताची आर्थिक राजधानी मुंबई आपली ”शान’ आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आपला ‘मान’ आहे. सहयाद्री आणि सातपुडा यांच्या विकख्याने महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर पडलेली आहे. गोदावरी आणि चंद्रभागा त्यांच्या स्पर्शाने महाराष्ट्राची भूमी पावन झालेली आहे.

1 मे 1960 ला राज्याचा दर्जा मिळालेला आपला महाराष्ट्र आज 36 जिल्हे व सहा प्रशासकीय विभागाने नटलेला आहे. विविध धर्म, परंपरा, रितीरिवाज पिके आणि भाषा यांनी सजलेला आपला महाराष्ट्र समृद्धनेच्या दिशेने वाटचाल करतो आहे. महाराष्ट्र हे प्रामुख्याने कृषी प्रधान राज्य आहे. बहुसंख्य नागरीक शेतीवर अवलंबून आहे. हा आपला बळीराजा संपन्न झालेला पहायला मला आवडेल. त्याच्यावर कर्जमाफीची वेळ न येतांनाचा क्षण पाहायला मला आवडेल. {Mazya Swapnatil Samruddh Maharastra Nibandh Marathi}

माझ्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र निबंध मराठी

याकरीता आधुनिक रोनीचा मार्ग शेतक-यांकरीता खुला व्हावा. ज्याप्रमाणे “समृद्धी महामार्ग महाराष्ट्राची ‘चमक’ वाढवित आहे. त्याप्रमाणे खेडयातही असे रस्ते व्हावे. जेणेकरून शेतकरी शेतातील भाजीपाल व धान्य मोठमोठ्या बाजारपेठेत नेऊ शकतील. उत्पादनाला चांगला भाव मिळवू शकतील.

हा देखील निबंध वाचा »  सूर्य मावळला नाही तर… निबंध मराठी | Surya Mavala Nahi Tar Nibandh in Marathi

सध्या आपला महाराष्ट्र त्याच दिशेने वाटचाल करतांना पाहून आनंद होत आहे. महाराष्ट्रातील रस्ते खेडयापाड्या- पासून शहरांपर्यंत चमकत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षण घेणे सहजसोपे होलाना पाहतांना आनंद होत आहे

शिक्षणपूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या कौशल्याने देशाचा विकास करण्याकरीता तयार असलेल्या तरुणाला रोजगार मिळावा. जेणेकरून हे तरुण आपल्या महाराष्ट्राला त्यांच्या हाताने समृद्ध करतील. आणि असा समृद्ध महाराष्ट्र मला पाहायला आवडेल. महाराष्ट्रातील ग्रामीण शाळा ओस पडतांना दिसत आहे. {Mazya Swapnatil Samruddh Maharastra Nibandh Marathi}

Mazya Swapnatil Samruddh Maharastra

पालकांचा कल CBSC बोर्डकडे वळतांना दिसत आहे. ‘एक देश-एक बोर्ड’ ही संकल्पना शाळां- मध्ये राबविल्यास ग्रामीण भागातील शाळा पुन्हा गजबजायला लागतील. तसेच उदयोगधंदयांचा विस्तार झाल्यास ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार निकेल. त्यामुळे खेडे संपन्न होतील आणि आपोआपच महाराष्ट्र संपन्न होईल असा संपन्न, समृद्ध महाराष्ट्र माझ्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र आहे.

जिथे शहरांसोबतच खेडेही संपन्न असेल नैसर्गिक संपत्तीची मर्यादा पाहता ‘घर निथे सोलर उपक्रम शासनाने राबवि- ल्यास स्वावलंबी कुटुंब, स्वावलंबी गाव पाहायला मिळेल. मोठ्या उदयोगाबरोबरच लघुउद्योग व पारंपारीक कुटीरउदयोगाला चालना मिळालेली पाहणे माझे स्वप्न आहे. मोठ्या उदयोगाबरोबरच लघुउद्योग व पारंपारीक कुटीर उद्‌योगाला चालना मिळालेली पाहणे माझे स्वप्न आहे. “Mazya Swapnatil Samruddh Maharastra Nibandh Marathi”

माझ्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र

पारंपारीक कौशल्याचे संवर्धन होईलच सोबतच ग्रामीण भागातील रोजगार निर्मिती मिळेल. ग्रामीण लोकांचा ओढा शहरांकडे होणार नाही. खेडे ओस पडणार नाही. असा हा आपला महाराष्ट्र प्रगतीच्या मार्गाने वाटचाल करीत आहे. शेतीविकास, रोजगारनिर्मिती, उदयोगधंदे विकास, शिक्षा- प्रणाली सुधारणा, कुटीरोद्योग संवर्धन होऊन संपन्न व समृद्ध झालेला महाराष्ट्र पाहणे मला आवडेल. “Mazya Swapnatil Samruddh Maharastra Nibandh Marathi”

बळीराजा मनसोक्त हसावा,
तरुण माझा रिकामा न बसावा, खेड्यातही कुटीरोद्योग असावा.
उद्योगांचे संवर्धन व्हावे,
महान आमचा महाराष्ट्र
संपन्न, समृद्ध दिसावा…..

तर मित्रांना “Mazya Swapnatil Samruddh Maharastra Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

हा देखील निबंध वाचा »  पृथ्वीचे मनोगत निबंध मराठी | Pruthviche Manogat Nibandh Marathi

मित्रांनो, तुमच्याकडे “माझ्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण होते.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण?

देवेंद्र गंगाधर फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहे.

Exit mobile version