Maze Ajoba Nibandh Marathi – मित्रांनो आज “माझे आजोबा निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
Contents
Maze Ajoba Nibandh Marathi
प्रत्येकाला स्वतःचे आजोबा खूप प्रिय असतात. लहानपणी घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्याने सर्वांनीच आजोबांसोबत खूप सारा वेळ व्यतित केलेला असतो.
सर्वांप्रमाणेच मलादेखील माझे आजोबा मला खाऊ देतात, फिरायला नेतात, भेटवस्तू आणतात, गोष्टी सांगतात. त्यामुळे माझे त्यांच्यासोबतचे नाते अत्यंत घट्ट बनलेले आहे.
माझ्या आजोबांचे नाव सखाराम दिनानाथ मोरे असे आहे. त्यांचे सध्याचे वय 83 वर्षे आहे. त्यांनी बँकेत तब्बल तीस वर्षे नोकरी केली आणि निवृत्ती घेऊन त्यांना आता सहा वर्षे पूर्ण झालेली आहेत.
माझे आजोबा निबंध मराठी
सध्या ते वाचन आणि संगीत असे छंद जोपासत आहेत परंतु त्यांचा बहुतांशी वेळ हा नातवंडांना खेळवण्यातच जातो. मला गोष्टी ऐकायला आणि नियमित वाचन करायला खूप आवडते.
या दोन्ही सवयी मला आजोबांमुळेच जडलेल्या आहेत. ते आम्हाला दररोज एक गोष्ट सांगतात. त्यांच्याकडे पुस्तकांचा भरपूर साठा आहे. त्यातील काही पुस्तकांचे वाचन ते माझ्याकडून करवून घेतात.
कधीकधी ते आम्हाला बँकेतील मजेशीर प्रसंग सांगत असतात. ते ऐकून आम्हाला गंमत वाटते. काहीवेळा माझ्याकडून वागण्यात आणि बोलण्यात चुका झाल्यास ते व्यवस्थित स्वतःचे उदाहरण देऊनच मला समजवून देखील सांगतात.
Maze Ajoba Nibandh Marathi
त्यामुळे घरातील कोणाही व्यक्तीपेक्षा मी जास्तीत जास्त वेळ आजोबांसोबत व्यतित करतो. आमच्या आजोबांना एकूण तीन मुलगे आहेत.
त्या तिघांचाही परिवार अत्यंत मजेत जगत आहे. सध्या आजी आणि आजोबा आमच्या जुन्या घरी राहतात. ते दोघे अजूनही अगदी स्वस्थ जगत आहेत.
आमचे घर त्यांच्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असल्याने मी कधी तिकडे तर कधी इकडे वडिलांकडे राहत असतो. सुट्टी दिवशी पूर्णवेळ मी आजोबांसोबत असतो.
माझे आजोबा निबंध मराठी
ते मला शेजारील बागेत आणि वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला नेतात. आम्ही दोघे डबा घेऊनच बाहेर पडतो. मग दिवसभर अगदी मज्जा करत सहल असल्याप्रमाणे वाटते.
कधीकधी माझे चुलत भाऊ बहिण देखील आमच्यासोबत फिरायला येत असतात. माझे आजोबा थोडे विनोदी स्वभावाचे आहेत.
मी खोड्या केल्यावर कधीकधी रागवतात परंतु बहुतेकदा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असतात. आमच्या आणि माझ्या काकांच्या घरी ते अधूनमधून फेरफटका मारत असतात.
Maze Ajoba Nibandh Marathi
त्यावेळी चांगल्याच मजेशीर गप्पा रंगतात आणि सहपरिवार भोजनाचा कार्यक्रम सुध्दा घेतला जातो. आजोबांचा मित्रपरिवार तसा जास्त नाहीये. ते मोजक्याच तीन ते चार जणांच्या संपर्कात नेहमी असतात.
त्याव्यतिरिक्त कुटुंबासोबत वेळ घालवणे, फिरायला जाणे, संगीत ऐकणे आणि वाचन करणे यामध्ये त्यांचा जास्तीत जास्त वेळ जात असतो.
ते कमालीचे शिकाऊ व्यक्ती असल्यासारखे सतत नवीन काहीतरी जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतात. आजोबा या वयातही सहजरीत्या मोबाईल आणि संगणक वापरू शकतात.
माझे आजोबा निबंध मराठी
ऑनलाईन बँकिंग आणि शॉपिंग या गोष्टी त्यांना खूप आवडतात. “सतत शिकत राहणे”, त्यांचा हा गुण मला खूप काही शिकवतो.
मीही माझ्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक क्षणी काही ना काही जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो. एकंदरीत माझे आजोबा हे विनोदी स्वभावाचे आणि स्वावलंबी व्यक्तिमत्त्व आहे.
Maze Ajoba Nibandh Marathi
माझे वडील आणि दोन्ही काका यांच्यात सुध्दा त्यांचे अनेक गुण उतरलेले दिसून येतात. “पेराल तेच उगवते”, या म्हणीप्रमाणे त्यांचे संस्कार हे आमच्या सर्व कुटुंबात रुजलेले आहेत. त्यामुळे माझ्यासाठी सध्या तरी माझे आजोबाच हे आदर्श व्यक्ती आहेत.
तर मित्रांना “Maze Ajoba Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “माझे आजोबा निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
आजोबा म्हणजे कोण ?
आजोबा हे आपल्या वडिलांचे वडील किंव्हा आईचे वडील असतात.