Site icon My Marathi Status

माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी | Maza Aavadta Prani Manjar Nibandh Marathi

Maza Aavadta Prani Manjar Nibandh Marathi – मित्रांनो आज “माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

मांजर घरी असणे हे किती आनंददायक असते याचा प्रत्यय ज्यांच्या घरी मांजर आहे त्यांना आलेलाच असतो. मांजर अंगावर घेणे आणि त्याला कुरवाळणे हे माझे नित्यनियमाचे काम झाले आहे. ‘Maza Aavadta Prani Manjar Nibandh Marathi’

Maza Aavadta Prani Manjar Nibandh Marathi

आमच्या घरी पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे मांजर आहे. त्याला आम्ही लाडाने मनी म्हणतो. मांजर हे आकाराने छोटे असते. त्याच्या अंगावर केस असतात त्यामुळे त्याचे शरीर आपल्याला मऊ लागते.

त्याला चार पाय आणि एक शेपटी असते. मांजर ती शेपटी कशीही हलवू शकते. मांजराला दोन सुंदर डोळे असतात. त्या डोळ्यांनी मांजर रात्रीदेखील स्पष्टपणे पाहू शकते. मांजराचे कान आणि डोळे खूपच तीक्ष्ण असतात.

मांजराचे कान कुठलीही हालचाल सहज ओळखतात. मांजराचे नाक खूप छोटे असते. कानाप्रमाणे मांजराचे नाकहीं संवेदनशील असते. किटक, उंदीर, मांस आणि मच्छी जर कुठे असेल तर मांजर ते लगेच शोधून काढते. Maza Aavadta Prani Manjar Nibandh Marathi

माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी

मांजराला पंजे असतात ज्याद्वारे ते शिकार घट्ट पकडून ठेवते. पंजाला तीक्ष्ण नखे असतात. झाडावर, भिंतीवर, घरावर कुठलेही मांजर सहज चढू शकते. त्याचा तळपाय मऊ गादीसारखा असतो ज्यामुळे त्याला कितीही उंचीवरून फेकले तरी इजा होत नाही.

मांजराचे शरीर नैसर्गिकरित्या गुरुगुर करीत असते. मांजराचे दात टोकदार असतात. कुठलाही पदार्थ अत्यंत सावधपणे खाणे हे मांजराचे वैशिष्ट्य म्हणता येईल. मांजर खूप आवडीने मांसाहारी पदार्थ खाते. तसेच ते सतत दूध पित राहते, कधीतरी पाणी पिते.

मांजर अन्न खाऊन झाल्यावर जिभळ्या चाटत राहते. भूक लागली किंवा कुठले संकट समोर आल्यास मांजर फक्त म्याऊ..म्याऊ.. असेच ओरडते. मांजराच्या विविध प्रजाती विविध देशांत आढळतात. Maza Aavadta Prani Manjar Nibandh Marathi

Maza Aavadta Prani Manjar Nibandh Marathi

मांजर वाघ, चित्ता, बिबट्या या प्राण्यांच्या मूळ कुळातील पाळीव प्राणी आहे. परंतु बहुताश गुण आणि शरीर वाघासारखे असल्याने तिला “वाघाची मावशी” असे म्हणतात. तसेच नर मांजराला बोका असे म्हणतात.

महाराष्ट्रात सर्वत्र मांजराला मनी, माऊ, मनीम्याऊ असे लाडाने संबोधतात. मांजराचे चालणे आणि बसणे खूपच ऐटीत असते. मांजराची झोप पूर्ण झाल्यानंतर एका विशिष्ट पद्धतीने ते आळस देते.

तो आळस पाहण्यासारखा असतो. मांजर घरात नसेल तर मला काहीतरी चुकल्यागत वाटत राहते. असे हे काहीही न करणारे प्रेमळ, सोज्वळ मांजर मला खूप आवडते.

तर मित्रांना “Maza Aavadta Prani Manjar Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “माझा आवडता प्राणी मांजर निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

Exit mobile version