Site icon My Marathi Status

माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी | Maza Aavadta Prani Gay Nibandh Marathi

Maza Aavadta Prani Gay Nibandh Marathi – मित्रांनो आज “माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी “ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.

भारतीय संस्कृतीत गाईला अत्यंत पवित्र मानले जाते. पूर्वीपासून घरी गाय असणे म्हणजे उत्तम संस्कारांचे लक्षण मानले गेले आहे. गाईला गोमाता, गोदेवी असे देखील म्हणतात म्हणजेच आपण तिला आई आणि देवीसमान मानतो. Maza Aavadta Prani Gay Nibandh Marathi

Maza Aavadta Prani Gay Nibandh Marathi

प्रत्येक सण समारंभाला देवदेवतांसोबत गाईचे सुद्धा पूजन केले जाते. संपूर्ण जगभरात गाईच्या विविध प्रजाती आढळतात. गाय हा सर्वत्र आढळणारा मादी प्राणी आहे.

भारतीय संस्कृतीत शेतीला अनन्य साधारण महत्त्व असल्याने शेतीच्या कामांसाठी बैलांचा उपयोग अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे गाय बैल अशी जोडी घरी असणे हे संपत्ती आणि सधनतेचे लक्षण असते.

गाईचे दूध अत्यंत पवित्र आणि सात्विक मानले जाते. पूर्वीच्या काळी जेव्हा यांत्रिक आणि तंत्रज्ञान विकास झाला नव्हता तेव्हा घरी गाय असणे गरजेचेच होते. गाईच्या दुधावर लहान मुले आणि इतर लोक देखील सांभाळले जायचे. Maza Aavadta Prani Gay Nibandh Marathi

माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी

शारिरीक विकासासाठी गाईचे पौष्टिक दूध आजही आवडीने पिले जाते. गायीला चार पाय, एक शेपूट, दोन छोटी शिंगे, दोन कान, मोठे डोके, नाक आणि दोन डोळे असतात.

गाय हा शांत स्वभावाचा शाकाहारी प्राणी आहे. गाईच्या पिल्लाला वासरू म्हटले जाते. गाय आणि वासरू अशी जोडी घरी असेल तर त्या घरी आनंद भरभरून वाहतो अशी समज आहे. Maza Aavadta Prani Gay Nibandh Marathi

पृथ्वीवर गाय वेगवेगळ्या आकारात आणि रंगात आढळते. भारतात मध्यम आकाराची तांबडी, काळी आणि पांढरी गाय असते. हिरवे गवत, पिकांची ताटे, पाला व इतर शाकाहारी अन्न असा तिचा आहार असतो.

Maza Aavadta Prani Gay Nibandh Marathi

“ही पाहा गाय.
गाय गवत खाते.
आपल्याला दूध देते.             

Maza Aavadta Prani Gay Nibandh Marathi

सुमित ऊठ.
गवत आण. गाईला दे.
गजू इकडे ये.
भांडे घे. बाबांना दे.
बाबांनी गाईचे दूध काढले.
आईने मुलांना दूध दिले.
मुलांनी दूध केले फस्त.
आरोग्य त्यांचे झाले मस्त.”

गायीला रानात चरण्यासाठी नेले जाते त्यामुळे तिचा विहार होतो आणि स्वच्छ ताजे गवत तिला खायला मिळते. गायीचे दूध हे खूप लाभदायक आहे. तिच्या दुधापासून बनवलेले तूप हे सात्विक तूप मानले जाते.

गायीच्या दुधापासून खूप सारे पदार्थ जसे की दही, तूप, लोणी, ताक, पनीर, मावा इत्यादी बनवता येतात. गोमूत्र हे देखील अनेक रोग उपचारांत गुणकारी समजले जाते. गायीचे शेण आपण आपले घर परिसर सारवण्यासाठी वापरतो. “Maza Aavadta Prani Gay Nibandh Marathi”

भारतात एकवेळ लोक उपाशी राहतील पण गाईला उपाशी ठेवत नाहीत. मानवी उत्क्रांतीत गाय अत्यंत महत्त्वाची मानली जाते. तिचा मानवाशी खूप जवळचा संबंध असल्याचे दिसून येते.

माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी

गाय हा संवेदनशील प्राणी असून तिला सुद्धा भावना असतात. त्यामुळे इतर प्राण्यांपेक्षा गाईला अत्यंत महत्त्व दिले जाते. आमच्या घरी मंगल प्रसंगी गोडधोड जेवण बनवल्यास त्याचा नैवेद्य म्हणून गाईला सर्वप्रथम दिला जातो.

गाय अत्यंत वंदनीय आणि पूजनीय आहे. तिचा निरागस चेहरा, शांत स्वभाव आणि तिच्या असण्यातील सहजता ही सर्वांना प्रिय वाटते. अशा अनेक कारणांमुळे माझा आवडता प्राणी हा गाय आहे.

तर मित्रांना “Maza Aavadta Prani Gay Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.

मित्रांनो, तुमच्याकडे “माझा आवडता प्राणी गाय निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.

तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून  कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.

काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.

गाईला कोण कोणत्या नावाने ओळखले जाते?

गाईला गोमाता, गोदेवी या नावाने देखील ओळखले जाते.

Exit mobile version