Maza Aavadta Pakshi Popat Nibandh Marathi – मित्रांनो आज “माझा आवडता पक्षी पोपट निबंध मराठी ” या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
“पोपटा पोपटा बोलतोस गोड,
खाना जरा पेरूची फोड”
ही कविता तर सर्वश्रुतच आहे. असा हा सर्वांना आवडणारा पोपट माझा आवडता पक्षी आहे. त्याचा रंग हिरवा असतो. त्याची लालभडक, बाकदार व धारधार चोच असते. त्याच्या गळ्याभोवती काळी रेघ असते. त्यामुळे तो अतिशय सुंदर दिसतो.
Contents
Maza Aavadta Pakshi Popat Nibandh Marathi
निळ्या आकाशात उडणारा हिरव्यागार पोपटांचा थवा छान दिसतो. पोपट झाडावर बसतात. हिरव्यागार झाडात ते पटकन ओळखू येत नाही. पोपट झाडाच्या ढोलीत राहतात. लोक पोपटाला पकड़न पिंजऱ्यात ठेवतात. पण पोपटाला असे पिंजऱ्यात बंद करून ठेवू नये.
झाडावर मोकळेपणाने उडणारे पोपटच आनंदी दिसतात. पोपटाला पेरू खूप आवडतात. त्याला हिरवी मिरची व चण्याची डाळ सुद्धा आवडते. पिंजऱ्यात दांडीवर बसून झोके घेणारे पोपट सर्वांना आवडतात. आपण शिकवू तसे ते बोलतात. Maza Aavadta Pakshi Popat Nibandh Marathi
त्यांच्या तोंडून ‘राम राम’, ‘नमस्ते’ असे शब्द ऐकून सगळ्यांना आनंद होतो. पोपटाच्या बदधिमत्तेच्या अनेक कहाण्या प्रसिद्ध आहैते. असा हा मिठू मिठू पोपट कुणाला बरे आवडणार नाही ? तसे पाहता पोपट हा पक्षी पाळीव आणि जंगली या दोन्ही पक्षांमध्ये मोडला जातो.
माझा आवडता पक्षी पोपट निबंध मराठी
जर पोपटाला शिकवले तर तो माणसाचा चांगला मित्र पण बनू शकतो. आपण पहिले असेल कि खूप सारे पोपट बोलतात सुद्धा. पोपटांची स्मरण शक्ती खूप चांगली असल्या कारणामुळे त्याला लोकांची नावे सुद्धा लक्षात राहतात.
जर पोपटाला योग्य प्रकारे शिकवण दिली तर तो घरातील सर्व लोकांची नावे घेऊ शकतो. पोपटाचा आवाज हा खूप सुंदर असतो. काही पोपट शिकवल्याप्रमाणे छान गाणी सुद्धा बोलू शकतात. तसे पाहता पोपटांच्या खूप जाती असतात. Maza Aavadta Pakshi Popat Nibandh Marathi
जगामध्ये जवळपास 350 पेक्षा जास्त जाती आहेत. काही जातींमध्ये दोन्ही नर आणि मादी सारखेच दिसतात. त्यांच्यातील फरक ओळखण्यासाठी त्यांच्या रक्ताची तपासणी करावी लागते.
Maza Aavadta Pakshi Popat Nibandh Marathi
पोपटाच्या अनेक जाती आहेत त्यातल्या त्यात त्यांचा रंग पण त्यांच्या जातीनुसार बदलतो. पोपट रंगीबेरंगी असू शकतात. जगात सर्वात जास्त आणि रंगीबेरंगी पोपट हे दक्षिण अमेरिकेत पाहायला मिळतात. पोपट हा खूपच सुंदर व रंगीबेरंगी पक्षी आहे.
दक्षिण अमेरिकेत व ऑस्ट्रेलियात यांच्या अनेक विविध जाती आणि प्रकार आढळतात .त्याचा रंग सामान्यत: हिरवा असतो. त्याला लाल रंगाची वक्र चोच असते.तो लहान मुलांना खूप आवडतो. पिंजऱ्यात अडकून पडणे हेच पोपटांच्या गोड बोलण्याचे फळ म्हणावे लागेल. Maza Aavadta Pakshi Popat Nibandh Marathi
त्याच्या माने भोवती काळ्या रंगाचे वलय असते. तो एक शाकाहारी पक्षी आहे. तो दाणे, फळे, पाने, बिया आणि शिजलेला भात सुद्धा खातो. त्याला मिरची, आंबा, पेरू आणि कठीण कवचाची फळे आवडतात.
माझा आवडता पक्षी पोपट निबंध मराठी
पोपट संघचारी (गटाने एकत्र राहणारे) असून सगळ्या पक्ष्यांमध्ये अतिशय गोंगाट करणारे पक्षी आहेत. निरनिराळ्या प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या आवाजाची ते हुबेहुब नक्कल करतात. पोपट 30 ते 40 वर्षे जगतात. काही पोपट जास्त वर्षही जगतात.
पोपट समूहाने जेंव्हा एकत्र उडतात, तेव्हा हे दृश्य पहाण्यासारखे असते. पोपट खूप हुशार पक्षी आहे. त्यामुळे तो शिकवलेली कोणतीही भाषा सहज म्हणतो. त्याला पक्ष्यांचा पंडित असेही म्हणतात.
भारतातील लोक त्याला राम-राम, सीताराम, नमस्ते आणि स्वागतम् यासारखे शब्द शिकवतात. तो माणसांच्या आवाजाची नक्कल करू शकतो. बरेच लोक पोपटाला कसरती करण्यास शिकवतात.
Maza Aavadta Pakshi Popat Nibandh Marathi
भविष्य सांगणाऱ्या लोकांसाठी आणि सर्कस मध्ये काम करण्यासाठी पोपट उपयोगी ठरतात. तो सर्वांचे मनोरंजन करतो. पोपट एक खूप सुंदर पक्षी आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय उद्यानांची स्थापना केली आहे.
मनुष्य आपल्या जीवनासाठी जंगलतोड, वृक्षतोड करत आहे, त्यामुळे पोपट, तसेच सर्व पक्ष्यांचे जीवन धोक्यात आले आहे. आपल्याला त्यासाठी वेळीच उपाय करायला हवेत, अन्यथा काही काळानंतर आपणास हे पक्षी पहायला मिळणार नाहीत.
तर मित्रांना “Maza Aavadta Pakshi Popat Nibandh Marathi” हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे “माझा आवडता पक्षी पोपट निबंध मराठी “ मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
जगामध्ये पोपटाच्या जाती किती आहेत?
जगामध्ये जवळपास 350 पेक्षा जास्त जाती आहेत.