Site icon My Marathi Status

मराठी उखाणे । Marathi Ukhane

हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला मराठी उखाणे । Marathi Ukhane – मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female आणि मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male दोन्ही सांगणार आहे हे उखाणे जवळपास ५०० पेक्षा जास्त आहे आशा करतो तुम्हाला नक्की आवडतील तर चला बघुयात. आणखी वाचा – गोष्टी

Contents

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
01 अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा,
……रावांच्या नावाने भरते लग्न चुडा.
02 गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी,
……रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी.
03 सोन्याच मंगळसूत्र सोनारांनी घडवलं,
…..रावांच नाव घेते मैत्रिणींनी अडवलं.
04 चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा,
…….रावांच्या नावाने घालते सौभाग्याचा चुडा.
05 दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी,
……रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळी.
06 शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा,
…..रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा.
07 जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा,
…….च्या सह संसार करीन सुखाचा.
08 जीवनाच्या प्रांगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी,
……..चा उत्कर्ष होत राहो हेच मागणे देवापाशी.
09 शंकरासारखा पिता अन् गिरिजेसारखी माता,
…….रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता.
10 वर्षाऋतूत दिसते इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान,
……..चे नाव घेऊन राखते सर्वाचा मान,

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
11 कोजागिरीच्या रात्री उमाशंकर खेळती सारीपाट,
…..चे नाव घेतले आता सोडा माझीवाट,
12 यमूनेच्या काठी कृष्ण वाजवी पावा,
…….चे नाव घेते सर्वानी लक्षपूर्वक ऐका.
13 नम्रता लीनता हीच खरी स्त्रीची चारुता
…….चं नाव घेते आपणा सर्वाकरिता.
14 मानससरोवरात राजहंस मोती भक्षी,
……आणि माझ्या विवाहाला अमिनारायण साक्षी.
15 आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहल,
…….च्या जोडीने संसारात टाकते पाऊल.
16 नदी आहे पर्वतदुहिता,
…….चे नाव घेते आपणकरिता.
17 संस्कृतमध्ये नदीला म्हणतात सरिता,
…….चे नाव घेते आपल्या आग्रहाकरीता.
18 श्रीकृष्णाची झाली तुला रूक्मिणीच्या तुलसीपत्राने,
…….चे नाव घेते मोठ्या आनंदाने.
19 लग्नमंडपी निनादतात सनईचे सूर,
……. च्या साठी आईवडिलाचे घर कले दूर.
20 धनाचे दैवत लक्ष्मी, तर विद्येचे सरस्वती,
……….ची आहे माझ्यावर प्रीती.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
21 रासक्रीडेमध्ये कृष्ण उडवितो रंग दाट,
……रावांचे नाव घेते सोडा माझी वाट.
22 पानोपानी शकुनाच्या कोमल हिरव्या रेषा,
……..च्या जीवानात पुरवीन साऱ्या आशा.
23 सुवर्णाच्या कोंदणात हिरा शोभतो छान,
…….रावांचे नाव सांगून राखते आपला मान.
24 श्रावण महिन्यात दरवळतो पारिजाताकाचा सुवास,
………चे नाव घेऊन देते घास.
25 स्वप्नासाठी हरिश्चद्राने केले सर्वस्वाचे दान,
…….चे नाव घेऊन राखते तुमचा मान.
26 आर्शीवादाची फुले वेचावीत वाकून,
……रावांच नाव घेते तुमचा मान राखून.
27 मान्सूनचे आगमन पर्जन्याची चाहूल,
….नाव घेऊन टाकते मी पाऊल.
28 क्रियापदाविना वाक्याची नाही पूर्ती,
……नाव घेते हीच माझी स्फुर्ती.
29 इंद्रधनुष्यात असतात सात मोहक रंग,
…….रावांच नाव घेत संसारात झाले दंग.
30 श्रावणाच्या शिडकाव्यांनी आनंदली धरणी,
……..चे नाव घेता सुखावले मी माझ्या मनी.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
31 पृथ्वी मोलाचं लाभलं सौभाग्याच लेणं,
……..ची साथ असता मला काय उणं?
32 सप्तपदीची सात पावले जन्माची ठरावी,
……..रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी.
33 लता डोले, कुंज डोले, डोले वनश्री,
……..च्या जीवनात उजळो भाग्यश्री.
34 मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासर माहेरचा संगम,
……..च्या सहवासात माझ्या आनंदाचा उगम.
35 गोऱ्या हातावर खुलतो मेंदीचा रंग,
……..चे नाव ऐकण्यात माझ्या सख्या झाल्या दंग.
36 पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता,
……..चे नाव घेते तुम्हा सर्वाकरिता.
37 शंकराला वाहतात त्रिदळी पान,
……..चे नाव घेऊन राखते तुमचा मान.
38 अष्टकोनी टेबलावर रूमाल टाकते विणून,
…….चे नाव घेते आग्रह केला म्हणून.
39 ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी,
……चे नाव घेते…… दिवशी.
40 कमळ आहे आपले राष्ट्रीय फूल,
……रावांनी घातली मला भूल.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
41 लग्नासारख्या मंगल दिनी नका कोणी रूसू,
……..ना घास देताना मला येते गोड हसू.
42 रूप्याची झारी, सोन्याचा तिला गिलावा,
……. सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा.
43 नीलवर्ण आकाशात प्रकाशमान शशी,
चे नाव घेते……च्या दिवशी.
44 चंद्राच्या आकर्षणाने समुद्राला येते भरती,
……..च्या हृदयी आहे माझ्यासाठी प्रीती.
45 विवाहाला अग्निनारायणाची असते साक्ष,
……..च्या संसारात मी सदैव दक्ष.
46 ॐ नमोजी आज्ञा ने ज्ञानेश्वरीची सुरूवात,
…….नि माझी जोडी ठेव सुखात.
47 नित्य नवीन शोधांनी गुंग होते मती,
ध्यानी मनी नसताना ……मिळाले पती.
48 शुभ्र फुलांच्या मखमलीवर शुभमंगल जाहले,
…….मी छया होऊन सप्तपदी चालले.
49 वाऱ्यासंगे ताऱ्यासंगे छेडीत जातो छंद मनाचा,
…….सवे हात गुड्न मार्ग चालते नवजीवनाचा.
50

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
51 हिमालय पर्वतावर बर्फाचा पाऊस,
रावांचे नाव घेते…… नी केली हौस.
52 सासर माहेरची मंडळी आहेत हौशी,
……..रावांच नाव घेते च्या दिवशी.
53 गिरीजाशंकर, सीता राम यांना गुरू करू,
…….राव आपण दोघे संसारसागर तरू.
54 रूप्याच्या डबी, त्यात अत्तराचा बोळा,
……..रावांचे बोलणे शंभर रूपये तोळा.
55 कुरूंदाची सहाण, चंदनाचे खोड,
……..रावांचे बोलणे अमृतापे क्षा गोड.
56 आधी घातला चंद्रहार मग घातली ठुशी,
…….रावांचे नाव घ्यायला माझी नेहमी खुशी.
57 पंढरीच्या यात्रेत विठ्ठलनामाचा गजर,
रावांच्या सेवेला …… नेहमीच हजर.
58 देवापुढे लावला ऊद, वास सुटला छान,
…….रावांचे नाव घेते, ऐका देऊन कान.
59 गौरीहार पुजले अन् बोहल्यावर चढले,
……रावांच्या सुखासाठी संसारात गढले.
60 पूजेच्या साहित्यात उदबत्यांचा पुडा,
……..रावांच्या नावाने भरला हातात चुडा.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
61 यमुनेच्या डोहात, कृष्णाने केला खेळ,
……..रावांचे नाव घेत झाली संध्याकाळची वेळ.
62 रात्रीनंतर दिवस येतो, दिवसानंतर रात्र येते,
……. नाव घ्यायला कारण शोधत होते.
63 घराला असावे अंगण, अंगणात शोभावी तुळस,
……. च्या जीवनावर चढवीन आनंदाचा कळस.
64 रूसलेल्या धरेला श्रावण म्हणतो हास,
……..रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास.
65 वैशाखात येतो अक्षयतृतीयेचा सण,
……..चे नाव घ्यायला लागत नाही कारण.
66 ज्येष्ठात करावी वटसावित्रिची कथा,
……..च्या जीवनात कसलीच नाही व्यथा.
67 श्रावणात चालतो ऊन पावसाचा खेळ,
………चे नाव घ्यायला लावत नाही वेळ.
68 कार्तिकात येतो दीपावलीचा सण,
……..चे नाव घ्यायला आग्रहाचे कारण.
69 फेब्रुवरीला गार पाण्यासाठी ठेवावा लागतो माठ,
…….चालतात नेहमी भराभर आणि ताठ.
70 पारिजातकाचे फुल म्हणजे सात्विक सौदर्याचे प्रतीक,
थोरामोठ्यांचा आशीर्वादाने लाभले …… सारखे पती.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
71 खवळला समुद्र लाटा काठोकाठ,
रावांचे नाव घेते ….. च्या पाठोपाठ.
72 शिवाजीसारखा पुत्र, जिजाईसारखी माता,
…….चे नाव घेते कांता.
73 शामकृष्ण कन्हैयाला राधेचा ध्यास,
……..देते जिलबीचा घास.
74 भरलेल्या पंक्तीत रांगोळी काढली चित्रांची,
……..घास देते पंगत बसली मित्रांची.
75 कमलदलांमध्ये उभी लक्ष्मीमाता,
……..चे नाव घेते कांता.
76 सासुरवाशीण मुलीने राखावा थोरामोठ्यांचा मान,
………रावांना कन्या केली दान.
77 राम सिता लक्ष्मण चालले वनात,
……..रावांच्या मी आहे सहभागी जीवनात.
78 हरिश्चंद्र राजा, रोहीदास पुत्र,
……..च्या नावाने घातले मंगळसूत्र.
79 इमारत बांधायला मजूर लागतात कुशल,
……..नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल.
80 सावित्रिने नवस केला पती मिळावा सत्यवान,
……..ची राणी झाले मी आहे भाग्यवान.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
81 गाईच्या शिंगांना लावला सोनेरी रंग,
…… राव बसले कामाला की होतात त्यात दंग.
82 आईनं वाढवलं, वडिलांनी पढवलं,
……रावांनी त्यांची होताच सोन्यानं मढवलं.
83 मोत्याचे पेले पाहून चंद्रसूर्य हासे,
जमलेल्या मंडळीत……राव खासे.
84 रूप्याची सरी, तिला सोन्याचा गिलावा,
……सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा.
85 दारी होता कोनाडा, त्यात होता पैका,
…….चे नाव घेते सर्वजण ऐका.
86 श्रावणमासी ऊन पावसाचा चालतो खेळ,
……..चे नाव घेण्यास लावत नाही वेळ.
87 संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती,
……..रावांशी लग्न झाले, झाली इच्छापूर्ती.
88 लांबसडक वेणीवर शोभे गुलाबाचं फुल,
…….रावांना पाहताच पडलीय मला भूल.
89 द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान,
……रावांच नाव घेऊन राखते सर्वांचा मान.
90 नक्षीदार चंदनी देव्हाऱ्यात चांदीची गणेशाची मूर्ती,
च्या नावाने……घराण्याची वाढवीन कीर्ती.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
91 हृदयाची श्रीमंती स्वभावात आणते दानशूरता,
……ची मी आहे कांता.
92 भोळ्या शंकराला बिल्वपत्रांची आवड,
…….ची पती म्हणून केली मी निवड.
93 यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब,
…….चे नाव घेण्यास करत नाही विलंब.
94 काव्यप्रकारात मोरोपंतांची प्रसिद्ध आर्या,
नाव घेत …… ची भार्या.
95 संगीताला लागते तबलापेटीची साथ,
…….आहेत माझे प्राणनाथ.
96 वसंताच्या आगमनाने सृष्टी होते पुलकित,
…….चे नाव घेतांना मन होते आनंदित.
97 चंद्राला रोहिणी भेटे आकाशी,
…….चे नाव घेते लग्नाच्या दिवशी.
98 मानससरोवरात विहार करते राजहंसाची जोडी,
…….च्या नावात आहे शकीची गोडी.
99 पौर्णिमेच्या रात्री आकाशात प्रकाशते पूर्ण चंद्रबिंब,
…….चं नाव घेण्यास लावत नाही विलंब.
100 उखाणा घे उखाणा घे करू नका गलबला,
पूर्वपुण्याईने …….सारखे पती लाभले मला.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
१०१ इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून,
…..रावाच नाव घेत…… ची सून.
१०२ खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड,
……रावांचे नांव अमृतापेक्षा गोड.
१०३ इंग्रजी भाषेत आईला म्हणतात मदर,
…..रावांचे नांव घेते सोडा माझा पदर.
१०४ सात जन्माची पुण्याई फळाला आली आज,
…..रावाच्या हाताने ल्याले मंगळसूत्राचा साज.
१०५ फूलात फूल जाईचे फूल,
……रावांनी घातली मला भूल.
१०६ पत्रिका जुळाल्या, योग आला जुळून,
…….राव पति मिळाले भाग्य थोर म्हणून.
१०७ संसार सागरात प्रीतीच्या लाटा,
….रावांच्या सुखदुःखात उचलीन अर्धा वाटा.
१०८ आईवडिलांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस,
…..राव पति मिळावे म्हणून कुलदेवतेला केला नवस.
१०९ सीतेची पतिभक्ति, सावित्रिचा निग्रह,
…..रावांचे नांव घेण्यास नको मला आग्रह.
११० लाल चुटक मेंदी, हिरवागार चुडा,
……रावांसाठी जीव झाला माझा वेडा.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
१११ नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
आजपासून मी झाले …..रावांची गृहमंत्री.
११२ शब्द तिथे नाद, कवी तिथे कविता,
…..रावांची जोड जणू सागर आणि सरिता.
११३ नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पदार्पण,
…..रावांच्या जीवनात, माझे सर्वस्व अर्पण.
११४ चंदनाच्या झाडावर बसला मोर,
…..रावांच्या जिवावर मी आहे थोर.
११५ चंद्राचा उदय, समुद्राला भरती,
…..रावांच्या शब्दाने सारे श्रम हरती.
११६ मायामय नगरी, प्रेममय संसार,
……रावांच्या जिवावर माझ्या जीवनाचा भार.
११७ संसाराच्या सागरांत पतिपत्नी नावाड़ी,
…….रांवाच्या जिवावर संसाराची गोडी.
११८ सावित्रीने नवस केला पति मिळवा सत्यवान,
…..रावांच्या जिवावर मी आहे भाग्यवान.
११९ सर्व देवामध्ये श्रेष्ठ आहे ब्रह्मा, विष्णू, महेश,
…..रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश.
१२० …..सुख, समाधान तेथे लक्ष्मीचा वास,
रावांना देते मी जिलबीचा घास.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
121 गजाननाची कृपा, गुरूंचा आशीर्वाद,
…..रावांचे नांव घ्यायला आज करते सुरवात.
122 आई-वडिल सोडताना, पाऊल होतात कष्टी,
…..रावांच्या संसारात करीन मी सुखाची सृष्टी.
123 सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी,
….रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी.
124 सुवर्णाची अंगठी, रूप्याचे पैंजण,
…..रावांचे नाव घेते ऐका सारेजण.
125 सासरचे निरांजण माहेरची फुलवात,
…..रावांचे नांव घेण्यास करते सुरवात.
126 जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…..रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.
127 रूक्मिणीने पण केला, कृष्णालाच वरीन,
….रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन.
128 हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी,
……..रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी.
129 सत्य पृथवीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधार,
यज्ञ देवतांचा आधार …..राव माझे आधार.
130 माहेर जणू गंगा, सासर जणू सागर त्यातच एकरूप,
…….रावांचे सुख निर्झर.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
131 शिंपल्यात सापडले माणिक मोती,
…….रावांच्या जीवनात मी झाले सारथी.
132 आकाशाच्या अंगणात, ब्रम्हा, विष्णू, आणि महेश,
……रावांचे नांव घेऊन करते हो गृहप्रवेश.
133 सुगंधात न्ह्याल्या दिशा धुंद दाही हळूच,
…..रावांच नांव माझ्या ओठी येई.
134 महादेवाला बेल, विष्णूला तुळस,
……रावांचे ना घ्यायला कसकला हो आळस.
135 पतिव्रतेचा धर्म, नम्रतेने वागते,
……रावांच्या स्नेहाने, गेली माझी भीती.
136 मंगळसूत्रात राहे सासरची प्रीती,
……रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती.
137 आनंदाने भरला दिन हा लग्नाचा,
…..रावांना घास देत, गोड जिलेबीचा.
138 पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात,
………रावांचे सहकार्य लाभो, माझ्या भावी जीवनात.
139 नव्या आयुष्याची, नवी गाणी,
…च्या घराण्यात, रावांची झाले राणी.
140 सुर्यबिंदुचा कुंकुमतिलक पृथ्वीच्या भाळी,
……रावांचे नाव घेते……च्या वेळी.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
141 संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा,
….रावांचे नांव घेऊन मागते आर्शिवाद अखंड सौभाग्याचा.
142 मनाच्या वृंदावनात आनंदे डोलते भावनेची तुळस,
….रावांच्या साथीने, संसार मंदिरावर सुखाचा कळस.
143 स्वर्गाच्या नंदनवनात, सुवर्णाच्या केळी,
….रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी.
144 सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात,
….रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट.
145 रूप्याच्या वाटीत, सोन्याचा चमचा,
….रावांचे नांव घेते, मिळो आशीर्वाद तुमचा.
146 नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा,
…रावांच्या संसारी आपणा सर्वांच्या शुभेच्छा.
147 मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार,
….रावांच्या रूपाने झाला साक्षात्कार.
148 पदस्पर्शाने लवंडते उंबरठ्यावरलं माप,
…….रावांची भाग्य पत्नी म्हणून गृहप्रवेश करते आज.
149 घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तुळस,
……रावांच्या जीवनांत चढवीण आनंदाचा कळस.
150 सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले,
….रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
151 अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य,
….रावांचा आनंद हेच माझे सौख्य.
152 मंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार,
……रावांच्या सह ध्येय, आशा होवोत साकार.
153 आकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य तारांगणे,
….रावांचे नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे.
154 नीलवर्ण आकाशात चमकतात तारे,
……रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे.
155 स्त्रियांनी वागावे शक्तिपेक्षा युक्तिने,
….रावांचे नांव घेते प्रेमापेक्षा भक्तिने.
156 जन्मोजन्मीचे भाग्य आज माझ्या समोर,
……रावांचे नाव घेते ऐका लहान थोर.
157 सायंकाळचे वेळी नमस्कार करते देवाला,
……रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला.
158 माहेरच्या ओढीने डोळे येतात भरून,
…….रावांच्या संसारात मन घेते बळून.
159 लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी,
……रावांचे नांव घेते तुमच्यासाठी.
160 संसाररूपी कादंबरीचे उघडले पहिले पान,
…….रावांचे नांव घेऊन तुमचा करीते मान.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
161 लक्ष्मी शोभते दागदागिण्याने, विद्या शोभते विनयाने
…..रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाने.
162 संसाररूपी सागरात प्रेमरूपी सरोवर,
आयुष्याचा प्रवास करीते……रावां बरोबर.
163 नाव घ्या, नाव घ्या, आग्रह असतो सर्वांचा,
….रावांचे नाव असते ओठावर, पण प्रश्न असतो उखाण्याचा.
164 सुखी संसारात हवी विश्वासाची जोड,
…….रावांचे नाव घेते घास घालून तोंड करते गोड.
165 मातृत्वाच्या मांगल्याने मन मोहित होते,
……रावांचा प्रिती ठेवा प्राणपणाने जपते.
166 अरूणासह उषा आली, सोनियाची प्रभा पसरली,
……रावांचे नांव घ्यायला मी नाही विसरली.
167 सौभाग्याचं लेणं काळी पोत,
…….रावांच्या जीवनात उजळीन जीवनज्योत.
168 हिमालया पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी,
……रावांच्या जीवनात आहे मला गोडी.
169 सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात,
..रावांचे नांव घेते, पण सोडा माझी वाट.
170 भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्राची,
……रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
171 रूप्याची डबी, त्यात अत्तराचा बोळा,
…..रावांचे बोलणे शंभर रूपये तोळा.
172 दारापुढे वृंदावन, त्यात तुळशीचे झाड,
…रावांच्या गुणांपुढे दागिण्यांचा काय पाड.
173 चंदनाचा पाट; रूप्याचे ताट,
……राव भुकेले, सोडा माझी वाट.
174 जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले,
…..रावांच्या नावाकरिता एवढे का अडविले.
175 शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान,
…..रावांचे नाव घेते सर्वांचा मान.
176 आत्मरूपी करंडा, देहरूपी झाकण,
……रावांचे नांव घेऊन बांधते मी कंकण.
177 कुलीन घराण्यात जन्मले, कुलवान घराण्यात पडले,
…..रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले.
178 फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे,
……रावांच्या बाळाचे आज आहे बारसे.
179 गुलाबाचा ताटवा लतांचा कुज,
……रावांच्या बाळाची आज आहे मौज.
180 गोकुळांत आला कृष्ण सर्वांना झाला हर्ष,
……रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
181 सोन्याची घुगरं चांदीच्या वाळ्याला,
सोनार घडवी दागिने …… रावाच्या बाळाला.
182 वरातीच्या मिरवणुकीत सनईचे सूर,
……रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूर.
183 दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र,
…….रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र.
184 अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा,
………रावांच्या नावावर भरते लग्नचुडा.
185 आला श्रावणमास, पाऊस पडता शेतात,
…….रावांचे नांव घेते धनधान्यसंपन्न घरात.
186 शरदाचे चांदणे, मधुवणी फुले निशिगंध,
……रावांचे नाव घेण्यात मला आहे आनंद.
187 जीवनात ही घडी अशीच राहू दे,
…….रावांचे प्रीतफुल असेच हसू दे.
188 आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर,
आयुष्याचा प्रवास करीन ……रावांच्या बरोबर.
189 आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा,
……राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा.
190 सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी,
……राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
191 मनोभावे प्रार्थना करून पूजला गौरीहर,
……….रावांचा सहवास लाभो जन्मभर.
192 प्रेमाचा दिला हुंडा मानाची केली करणी,
जीवनाचे पुष्प वाहिले ……रावांच्या चरणी.
193 चांदीच्या ताटांत पक्वान्नाची रास,
………रावांना देते लाडुचा घास.
194 रंगीबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते,
लाडूचा गोड घास……..रावांना देते.
195 मंगळा गौरीची पूजा मनोभावे करते,
……रावांसाठी दिर्घायुष्य मागते.
196 चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल,
……..रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल.
197 नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर,
………रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर.
198 उंबरठ्यावरचे माप पायानी लोटते,
……..रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते.
199 आई, बाबा येते आशीर्वाद द्यावा,
……..रावांचा सहवास जन्मभर लाभावा.
200 ……रावांच्या बरोबर जातांना मन गेले गांगरून,
आई-बाबांच्या आशीर्वादाची शाल घेते पांघरून.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
201 मोत्याची माळ, सोन्याचा साज,
……रावांच नांव घेते मंगळागौर आहे आज.
202 मंगळा गौरी माते नमन करते तुला,
…….रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला.
203 दिवाळीच्या सणांला दिव्यांच्या पंक्ति,
……..रावांना ओवाळते मंगल आरती.
204 थोर कुळांत जन्मले, सुसंस्कारांत वाढले,
……..रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले.
205 सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा,
……रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा.
206 मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा,
……रावांच्या वंशात लावीन दीप नवा.
207 संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल,
……रावांना लागली बाळाची चाहूल.
208 न चुकता टी.व्ही. वर बघत असे रामायण रविवारी,
न कंटाळता ….रावांचे नाव घेते…….वारी.
209 विठ्ठलाच्या देवळात भक्तांची दाटी,
………रावांचे नांव घेते सासरच्यासाठी.
210 लावीत होते कुंकू, त्यात सापडला मोती,
………राव पती मिळाले म्हणून भाग्य मानू किती.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
211 जाई, जुई, चमेली, शेवंती, नागचाफा,
……रावांचे नांव घेऊन माळते सोनचाफा.
212 हिंदमातेच्या डोक्यावर मोत्यांची जाळी,
……रावांचे नाव घेऊन बांधल्या मुंडावळी.
213 सोन्याचं मंगळसूत्र सोनारानं घडवलं,
…….रावांचे नांव घेते, मैत्रिणींनी अडवलं.
214 प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी,
…….रावांचे नांव घेऊन करते घरभरणी.
215 सत्यभामेने केली श्रीकृष्णाची सुवर्णतुला,
…….रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला.
216 समुद्राला कुणी म्हणे सागर, कुणी म्हणे रत्नाकर,
………राव आहेत माझे जन्मोजन्मीचे प्रियकर.
217 चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा,
…….रावांच्या नावांवर घालते सौभाग्याचा चुडा.
218 खवळला समुद्र, लाटा काठोकाठ,
……रावांचे नांव घेते ….च्या पाठोपाठ.
219 रजनीचे भांडार, शशांकाच्या दारी खुले,
माझे मानस मंदिर ……रावांनी जिंकले.
220 परागांचे रक्षण, मऊ पाकळ्या करतात,
त्याच हळूवार भावनेने ….राव मला जपतात.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
221 पाटानं आणलं पाणी, शेत पिकली मोत्यावाणी,
……रावांच्या नावाचं मोल आहे सोन्यावाणी.
222 आधी ताना, आलापी, मग गाऊ भैरवी,
……रावांच्या नावाची, किती सांगू थोरवी.
223 राम, लक्ष्मण, सीता तीन मूर्ती साक्षात,
…….रावांचे नांव घेते, नीट ठेवा लक्षात.
224 कण्वमुनींच्या आश्रमात, शकुंतलेच माहेर,
……..रावांनी केला मला सौभाग्याचा अहेर.
225 कमलांच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात,
……रावांचे नांव घेते सुवासिनींच्या मेळ्यात.
226 अश्रूपूर्ण नेत्रांनी, माहेरचा निरोप घेते,
……रावांच्या बरोबर, मी गृहप्रवेश करते.
227 वाती नक्षत्रातील थेंबाचे, शिंपल्यात होती मोती,
…….रावांच्या संगतीत, उजळली जीवनज्योती.
228 संथ वाहती, गंगा, यमुना आणि सरस्वती,
…..रावांचे नांव हीच माझ्या प्रेमाची महती.
229 कस्तुरीचा सुवास हरवळतो रानात,
……रावांचे नांव घेते माझ्या मनांत.
230 श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान,
…….रावांचे नाव घेते, राखते सर्वांचा मान.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
231 निळ्या आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे,
लग्नाच्या दिवशी….रावांचे नांव घ्यावे.
232 नागपंचमीच्या सणी सख्या पूजती वारूळाला,
……रावांवीना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला.
233 पोपटाची हाक ऐकून मैना लागली डाळिंब सोलायला,
……रावांचे नाव घेऊन मी लागले माणिकमोती वेचायला.
234 साताऱ्याचे पेढे, नाशिकचा चिवडा,
……..रावांची निवड हा माझाच निवाडा.
235 वृंदावनी कोणी बाई तुळस लावली,
……रावांच्या संसारात आहे शीतल सावली.
236 ध्येय, प्रेम, आकांक्षांची जिथे होतसे पूर्ती,
अशा……रावांची माझ्या हृदयी मूर्ती.
237 अमेरिकेत आहे आंधळ्या न्यायदेवतेचा पुतळा,
…….रावांचे नांव घेते मला सांभाळा.
238 राम-लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात,
……रावांचे नांव घेते…….च्या घरात.
239 सासरचे निरांजण, माहेरची फुलवात,
……रावंचे नांव घेण्यास करते सुरवात.
240 उत्तर दिशेला चमकतो अढळ धृवतारा,
………रावांचा उत्कर्ष हा माझा अलंकार खरा.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
241 काळसर आकाशात, इंद्रधनूचे सात रंग,
……..रावांचे नांव घेता, मनी उठले तरंग.
242 सतारीचा नाद, वीणेचा झंकार,
……..रावांच्या समावेत सुरू झाला संसार.
243 तळ्यातला राजहंस सुखवितो वनाला,
…….रावांचे नांव सुखविते माझ्या मनाला.
244 आत्मरूपी करंडा, देहरूपी झाकण,
……..रावाचे नांव घेऊन बांधते मी कंकण.
245 मला नको हिरे, माणके, नको आकाशातले तारे,
………..राव हेच माझे अलंकार खरे.
246 वेलदोड्याच्या वेलावर हवा सुटली गार,
…….रावांचे नांव घेते रात्र झाली फार.
247 देवासमोर काढली रांगोळी मोराची,
……..रावांचे नांव घेते स्नुषा थोराची.
248 यज्ञ, धर्म, कीर्ती, ऐश्वर्य आणि संपत्ती,
…….रावांचे नाव ही माझ्या मनाची तृप्ती.
249 टपोरा मोगरा फुलला छान,
……..रावांचे नांव घेऊन राखते साऱ्यांचा मान,
250 पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने, फुले,
……रावांचे नांव घेतल्यावर, चेहरा माझा खुले.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
251 कोल्हापूरच्या देवीपुढे, हळदी कुंकवाच्या राशी,
…….रावांचे नांव घेते……च्या बारशाच्या दिवशी.
252 काजव्यांचा प्रकाश दिसे, अंधार आहे तोवर,
…….रावांचे नांव घेते आग्रह आहे तोवर.
253 नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पदार्प,
……रावांच्या जीवनात माझं सर्वस्व अर्पण.
254 चंदनाच्या पेटीला सुवर्णाच्या चुका,
…….रावांचे नांव घेते सर्वांनी ऐका.
255 सागराला आली भरती, नदीला आला पूर,
…….रावांच्या प्रीतीसाठी आई-बाबाला केले दूर.
256 पौर्णिमेच्या चंद्राची, उज्वल प्रभा,
……राव हेच माझ्या सौभाग्याची शोभा.
257 विवाहाच्या सोहळ्यात, अत्तर गुलाबाचा थाट,
……..रावांचे नाव घेऊन सोडते भाऊ-भावजयीची गाठ.
258 उगवला सायंतारा, रातराणी बहरली,
……रावांचे नांव घेते वरात आली दारी.
259 स्वप्नपूर्ती च्या क्षणी आळविते केदार,
………रावांच्या मुळे मला मिळाले घरदार.
260 सावळ्या ढगांना सोनेरी कडा,
…..रावांच्या हातांचा माझ्याभोवती वेढा.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
261 नंदनवनात फुलली सोन्याची कमळे,
……रावांच्या मुळे मला संसाराचा अर्थ कळे.
262 मुळामुठेच्या संगमावर वसले सुंदर पुणे,
……रावांच्या संसारात नाही कशास उणे.
263 निळ्या नभावर कर्तृत्वाचा असे रूपेरी ठसा,
…….रावांसह करीत आहे संसाराचा श्रीगणेशा.
264 पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पूडा,
…….रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा.
265 चांदीचा तांब्या, रूप्याची परात,
……रावांचे नांव घेते…..च्या घरात.
266 गानकोकिळ बालगंधर्व सुरात,
…….रावांचे नांव घेते….च्या घरात.
267 झगमगीत दिव्यांच्या रोषणाईनं सजली वरात,
……रावांचे नांव घेते….. च्या दारात.
268 दह्याचे केले श्रीखंड, दुधाचा केला खवा,
……रावांचे नांव घेते नीट लक्षात ठेवा.
269 केसात घालते फुले, डोळ्यात घालते काजळ,
……रावांचे नांव घेऊन वाहते फुलांची ओंजळ.
270 भ्रमराच्या गुंजारवे, मुग्ध झाली कमलिनी,
…….रावांची पत्नी झाले आजच्या शुभदिनी.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
271 प्रीतीचा व निष्ठेचा, पसरू दे सुगंध,
……रावांच्या जीवनात निर्मिन मी आनंद.
272 आनंदाने भरला दिन हा लग्नाचा,
…….रावांना घास देते गोड जिलेबीचा.
273 लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडून कशी रूसू,
…..रावांना घास देतांना, मला येई गोड हसू.
274 माहेरचे दिवस पाखरासारखे उडाले,
स्मृतीठेवा त्यांचा घेऊन …… रावांच्या घरी आले.
275 हिरव्या हिरव्या रानांत, मोहक पिवळी फुले,
…….रावांचे नांव घेता मन हिंदोळ्यावर झुले.
276 गोपाळ कृष्णाला आहे बासरीचा छंद,
…….रावांच्या जीवनात, मला आहे आनंद.
277 कात, चुना, लवंग, पानाचा विडा,
…….रावांच्या नावाचा भरते लग्नाचा चुडा.
278 सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे काचेचे चुडे,
……रावांचे नाव घेते मंगळागौरीपुढे.
279 अत्तरदाणी, गुलाबदाणी, विडे ठेविले करून,
…..रावांना माळ घातली कुलदेवतेला स्मरून.
280 भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायाला ओवाळीन,
…..रावांच नांव घेते….दादाची बहीण.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
281 कण्वमुनींच्या आश्रमात शकुन्तलेचे माहेर,
……रावांनी दिला मला सौभाग्याचा अहेर.
282 गौतमाची गौतमी, वसिष्ठांची अरूंधती,
……रावांची मी सौभाग्यवती.
283 दया, क्षमा, शांती हेच सतीचे माहेर,
…..रावांच्या चरणावर केला पंचप्राणांचा अहेर.
284 दत्तात्रयाचा अवतार ब्रह्मा, विष्णु, महेश्वर,
…रावांशी जमले जीवनाचे स्वर.
285 चांदीची कपबशी, सोन्याचा चमचा,
…..रावांचे नाव घेते आशीर्वाद तुमचा.
286 आशीर्वादाची फुले वेचते वाकून,
……रावांचे नांव घेते आपला मान राखून.
287 यमूनेच्या डोहात कृष्ण वाजवी पावा,
……रावांच्या जिवावर संसार सुखाचा व्हावा.
288 रातराणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित,
मागते आयुष्य…..रावांच्या सहीत.
289 संसाररूपी देवळात नंदादीप तेवावा समाधानाचा,
……रावांच्या पाठीशी सदैव आशीर्वाद असावा तुमचा.
290 गीतात जसा भाव, फुलांत जसा गंध,
…..रावांबरोबर जुळले रेशमी बंध.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
291 विजेचे नर्तन, ढग करती गडगड,
……रावांचे नांव घेताना माझी होई गडबड.
292 श्यामसावळा कृष्णसखा भक्तांचा कैवारी,
जीवन माझे सुखी ……रावांच्या संसारी.
293 संसाराच्या अंगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी,
…….रावांचा उत्कर्ष होवो, हेच मागणे देवापाशी.
294 निसर्गाला नाही आदि आणि अंत,
…..राव आहेत मला मनपसंत.
295 सद्सद्विवेक बुद्धीला असे शिक्षणाचे वरदान,
…..रावांच्या संसारात देईन सर्वांना मान.
296 कोजागिरी पौर्णिमा नि शरदाचे चांदणे,
…..राव आहेत सर्वांतच देखणे.
297 रामाने केले शिवधनुष्य भंग,
……रावांच्या जीवनात झाले मी दंग.
298 श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येती नटून,
……रावांच्या नावाने आले सौख्य माझे फुलून.
299 सागराच्या हृदयी अंतरंग लपले,
……रावांसाठी जीवनसर्वस्व अर्पिले.
300 नीलनभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,
……रावांचा स्वभाव आहे फारच उदार.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
301 तुकारामाने केले अभंग मोरोपंतानी केली आर्या,
…..रावांची कन्या व ……रावांची भार्या.
302 शिवाजी राजाची जिजाई होती माता,
…..रावांचे नांव घेऊन येते मी आता.
303 व्यंकटेशाच्या देवळाला सोन्याचे दार,
……रावांना घालते पुष्प हार.
304 चातक पक्षी पावसाचे पितो पाणी,
……रावांचे झाले मी राणी.
305 चांदण्या रात्री रातराणीचा सुवास,
…रावांचे नांव घेते तुमच्यासाठी खास.
306 पंढरपूरच्या यात्रेत हरिनामाचा गजर,
……रावांचे नांव ऐकण्यासाठी सर्वजण आहेत हजर.
307 श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये वैजयंती माला,
……रावांचे नांव घेते मंगल दिन आला.
308 आरक्त गालावर उमटले लज्जेचे भाव,
..रावांने घेतला माझ्या अंतःकरणाचा ठाव.
309 सकाळच्या वेळी बागेत फुलं तोडतोय माळी,
…..रावांचे नांव घेते आता तुमच्यावर आली पाळी.
310 यमुनेच्या तिरावर ताजमहालची इमारत,
……रावांचे नांव घेण्यास नाही मी हरत.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
311 शिवाजी सारखा राजा गादीवर बसावा,
…..रावांचे नांव घेते आशीर्वाद असावा.
312 अलंकारात अलंकार श्रेष्ठ मंगळसूत्र,
…..रावांच्या हाती माझे जीवन सूत्र.
313 मणि मंगळसूत्र हेच बायकांचे लेणे,
……रावांकरीता स्वीकारले …… चे घराणे.
314 देवीच्या देवळात भोपी खेळतो पोत,
…..रावांनी बांधली माझ्या गळ्यात मंगळसूत्राची पोत.
315 मंगळसूत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा,
…..रावांचं नांव घेऊन मान राखते सर्वांचा.
316 मंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार,
…..रावांच्या सह ध्येय, आशा साकार.
317 हृदयरूपी शिंपल्यात प्रीतीचे पाणी,
…..रावांच्या नावाने बांधले मंगल मणी.
318 शशी-रजनी, रवी-उषेची नियतीने बांधली जोडी,
……रावांच्या संसारात आहे प्रेमाची गोडी.
319 वरणभातावर धरली साजुक तुपाची धार,
……रावांना घास देताना तारांबळ झाली फार.
320 लावित होते कुकू, त्यांत पडले मोती,
…..रावां सारखा भ्रतार जन्मोजन्मी चिंती.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
321 दारी होती तुळस, तिला घालीत होत्ये पळी पळी पाणी,
आधी होते आईबापाची तान्ही, मग झाले…..रावांचे राणी.
322 गंधाने भरले कचोळे त्यात पडली समूर,
आणि…. च्या घराण्यात….राव चतुर.
323 झिरी मिरी पाऊस लागे मोत्यांच्या धारा,
……रावांच्या छत्रीला मोत्यांचा तुरा.
324 पाण्याच्या हंड्यावर फुलाचे झाकण,
…….रावांच्या हातात सोन्याचे कंकण.
325 सोन्याची पेटी सदरेला दाटी,
…..राव बसले पेढीवर तिथे राजा आला भेटी.
326 आंब्याच्या कोवळी पत्री,
…..रावांच्या डोक्यावर मोत्याची छत्री.
327 पुण्यात जन्मले, गंगेत न्हाले आणि,
……रावांच्या जीवासाठी मुंबईत आले.
328 दशरथ राजाने, पुत्रासाठी केला नवस,
……रावांचे नाव घेते हळदीकुंकवाचा दिवस.
329 बाल्य गेलं मातापित्याच्या पंखाखाली, तारूण्याच्या वाटेवर मिळाली,
मैत्रीची साथ, नसंसाराच्या वळणावर मिळाला …….रावांचा प्रेमळ हात.
330 नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा,
……रावांच्या संसारी आपणा सर्वांच्या शुभेच्छा.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
331 सर्वांच्या आग्रहाखातर उखाणा आठवते,
…….रावांचे नांव घेताना मीच मोहरते.
332 अर्जुनाच्या रथाचे कृष्णाने केले सारथ्य,
…..रावांच्या घरी करीन सर्वांचे आतिथ्य.
333 प्रतिभेचा अविष्कार म्हणजे काव्य,
……रावांच्या सहवासात माझे भवितव्य.
334 डोंगरकपारी तरू लतावेली,
…..रावांनी दिली गुलाबाची मोहक कळी.
335 उगवत्या रविला उषेची ओढ,
…..रावांच्या संसाराला लाभली…ची जोड.
336 गरिबीची करू नये निंदा, श्रीमंतीचा करू नये गर्व,
…..रावांच्या नावांवरी अर्पिले जीवन सर्व.
337 शब्दपाकळ्या मूक झाल्या, ओठीचे उडले स्वर,
……रावांबरोबर चालले सुखी राहो माहेर.
338 निरोपाच्या प्रांगणात पडला स्मृती पुष्पाचा सडा,
…..रावांच्या सोबत चालले घेऊन आशीर्वादाचा घडा.
339 हृदयाच्या भावनेला प्रीतीचा पिसारा,
…..रावांच्या सह फुलो सौख्याचा फुलोरा.
340 चंद्र तारांगणांच्या मेळाव्यात रजनी हसते,
……रावांच्या सहवासात… रमते.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
341 वसंत ऋतूत कोकिळा गाणे गातात,
…..रावांच्या सहवासात दिवस आनंदात जातात.
342 नीलवर्ण आकाशात वीज कडाडली ढगात,
…रावांच्या सहवासात मी धन्य झाले जगात.
343 नीलवर्ण आकाशात चमकतात चांदण्या,
……रावांचे नांव घेते…..ची कन्या.
344 आंब्याच्या झाडाला आबे लागले शंभर,
रावांचे नांव घेण्यात माझा पहिला नंबर.
345 सोन्याची घागर अमृताने भरावी,
…..रावांची सेवा जन्मभर करावी.
346 गंगावाहे, यमुनावाहे, सरस्वती झाली गुप्त,
…..रावांच्या पदरी घालून आईबाप झाले मुक्त.
347 शिवाजीसारखा पुत्र, धन्य जीजाऊची कुशी,
..रावांचे नांव घेते बारशाच्या दिवशी.
348 नाटकात नाटक गाजले सुभद्राहरण,
…..रावांचे नांव घेते……. च्या बारशाचं कारणं.
349 तारूण्याच्या वाटेवर बालपणाची झाली इतराजी,
……रावांच्या नावाने मिळाली नवलाई संसाराची.
350 माहेरचे प्रेम खेचती मागे पुढे,
…..रावांच्या साथीसाठी माहेर सोडावे लागे.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
351 वर्षाऋतूच्या आगमनाने धरती होते हासरी,
……रावांचे नांव घेते मी नवपरिणीता लाजरी.
352 नभांगणी चांदणीला शोभा चंद्रमाची,
…..सौभाग्याच्या दानात शोभा …..रावांची.
353 सागराच्या लाटा उसळताना दिसती शुभ्र धवल,
…..रावांचे नांव घेते त्यात काय नवल?
354 सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात,
…..रावांचे नांव घेते, पण सोडा माझी वाट.
355 भावंडांचा सहवास, आईवडिलांचा आशीर्वाद,
……रावांचे नाव घेतांना तुमचेही लाभो आशीर्वाद.
356 प्रतिभेच्या अविष्कारातून काव्य बहरे,
…..रावांच्या साथीने मन माझे मोहरे.
357 आला वारा गेला वारा रूपये घ्या पारखून,
राजाच्या दरबारी….. राव आहेत कारकून.
358 श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान,
……रावांच नांव घेत राखते सर्वांचा मान.
359 निळ्या आकाशी रोहिणस वाटे चंद्रासवे असावे,
लग्नाच्या दिवशी….स वाटे ……रावांचे नांव घ्यावे.
360 झगमगीत दिव्यांच्या रोषणाईनं सजली वरात,
…..रावांच नांव घेते…..च्या दारात.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
361 आत्मरूपी करंडा, देहरूपी झाकण,
……रावांचे नांव घेऊन बांधते मी कंकण.
362 दवबिंदूचा जन्म आहे विरण्यासाठी,
……रावांशी विवाह केला मी सुख जोपासण्यासाठी.
363 संसाराच्या अंगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी,
…..रावांचा उत्कर्ष होवो, हेच मागणे देवापाशी.
364 कॅप्टन लक्ष्मी, नेताजी सुभाशचंद्र बोस,
…..रावांचे नांव घेऊन जयहिंद चा करू घोष.
365 दसऱ्याच्या सणाला केला साखरभात,
…..रावांचे नांव घेते…..पंताची नात.
366 एक पाय घरात, एक पाय दारात,
जडावाचे पदक ….रावाच्या हारात.
367 लहानशा भिंती चित्रे काढू किती,
सासूबाईच्या पोटी…..राव मोती.
368 सागवानाच्या पेटीला सोन्याची चूक,
……रावांच्या हातात कायद्याचे बुक.
369 शिसवी लाकडाचा देव्हारा, त्यात चांदीची मूर्ती,
…..रावांची देशभक्त म्हणून सदा कीर्ती.
370 मराठ्यांच्या मुलखात भवानीची वारी,
सैन्य चालले लढाईवर त्यात …. रावांची स्वारी.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
371 काळ्या चंद्रकळेवर ताऱ्यासारख्या टिकल्या,
……रावांच्या मळ्यात खूप तुरी पिकल्या.
372 गाण्याच्या मैफलीत पेटीचा सूर,
…..रावांची भेट म्हणजे प्रेमाचा पूर.
373 मोत्यांचे पेले पाहू चंद्रसूर्य हासे,
जमलेल्या मंडळीत …..राव खासे.
374 सांबाच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार,
आणि…..रावांच्या जिवासाठी केला संसार,
375 सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली,
……रावांची राणी कामात गुंतली.
376 गुलाबाचे फुल गणपतीला वाहिले,
…..रावांच्या जीवासाठी पूणे शहर पाहिले.
377 चाफळच्या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण,
……रावांचे नाव घेऊन करते मी आपोषण.
378 मला नाही काही येत मी आहे साधी,
…..रावांचे नाव घेते आधी.
379 सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला,
……रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला.
380 मोह, माया, प्रेमाची जाळी पसरली दाट,
…..रावांची सेवा करणे हीच माझ्या मोक्षाची वाट.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
381 काचेच्या ताब्यात सरबत आहे गार,
…..रावांचे नाव घ्यायला उशीर झाला फार.
382 दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी,
……रावांचे नांव घेऊन बांधते मुंडावळी.
383 हिरवा शालू नेसून आले,
…..रावांच्या जीवनात समरस झाले.
384 शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा,
…..रावांच्या संसारांत माझा आहे अर्धा वाटा.
385 आदघर, माजघर, माजघरात पलंग, पलंगावर उशी,
…..रावांच्या जीवावर मी आहे खुषी.
386 शंकर पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज,
……रावांचे नांव घेते गौर बसली आज.
387 श्रीमंतीने दाखवू नये श्रीमंती, गरीबांना द्यावी सवलत,
……रावांची विद्वत्ता हिच माझी दौलत.
388 शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी,
…..राव माझे जीवनसाथी.
389 शुभमंगल प्रसंगी गणेशाची साथ,
…..रावांच्या नावाला आज केली सुरवात.
390 अमुल्य वेळी उमलली कळी,
……रावांचे नांव घेते सायंकाळच्या वेळी.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
391 एक पाय ठेवते तळ्यात, एक पाय ठेवते मळ्यात,
……रावांचे नाव घेते सासरच्या मेळ्यात.
392 दया, क्षमा, शांती प्रेमाचे माहेर,
…..रावांनी केला मला सौभाग्याचा अहेर.
393 कबीर विणतो शेला, देव घालतो घडी,
…..रावांच्या जिवावर मी घालते मंगळसुत्राची जोडी.
394 सोनाराने मंगळसुत्र घडवले सोन्याच्या साखळीवर,
…..रावांचे नाव माझ्या हृदयाच्या पाकळीवर.
395 यमुनेच्या तिरावर कृष्ण वाजवतो पावा,
…..रावांचे नांव घेते तुमचा आशीर्वाद हवा.
396 जात होते फुलाला, पदर अडकला वेलीला,
लिंबलोण कुणाला तर……रावांच्या रूपाला (गुणाला).
397 महादेवाच्या पुढे असतो नंदी,
…..रावांचे नांव घेऊन देते तुम्हाला संधी.
398 पहाटेच्या वेळी वारा वाहतो झुळझुळ,
…..रावांचे नांव घेताना पैंजन वाजतात खुळखुळ.
399 चांदीच्या तांब्याला नागाची खूण,
…..रावांचे नांव घेते…..ची सुन.
400 हिरवी बांगडी गुलाब दास,
…..रावांच्या ताटापुढे अत्तराचा वास.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
401 लाजऱ्या राधिकेला कन्हैया म्हणतो हास,
……रावांना घालते लाडवाचा घास.
402 वसंत ऋतूत कोकिळ करते कूजन,
…..रावांच्या सोबत करते लक्ष्मीपूजन.
403 चंद्राभोवती तारकांनी धरल गोल रिंगण,
……रावांच्या नावाने बांधले मी कंकण.
404 जमिन दुभंगून सीता झाली गुप्त,
…..रावांना हार घालून केले आई-वडिलास मूक्त.
405 आशीर्वादाची फुले वेचते वाकून,
…..रावांचं नांव घेते तुमचा मान राखून.
406 अमूर्त मूर्तीला स्वरूप देतो कलाकार,
……रावांचे सद्गुण हेच माझे अलंकार.
407 निशिगंधाच्या वासाने मन झाले मोहित,
…..रावांचे नांव घेते…..च्या सहित.
408 जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
……रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने.
409 सासु-सासरे प्रेमळ, जावा-दिर हौशी,
……रावांचे नाव घेते…..च्या दिवशी.
410 यमुनेच्या तिरावर, ताजमहालाची सावली,
…..रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
411 घराला असावे अंगण, अंगणात शोभावी तुळस,
……रावांच नांव घेते सायंकाळच्या वेळेस.
412 सुखी संसारात हवी विश्वासाची जोड,
……रावांना घास घालून तोंड करते गोड.
413 सोन्याची घागर अमृताने भरावी,
…..रावांची सेवा जन्मभर करावी.
414 आई-वडिलांनी दिला जन्म, ब्रह्मदेवाने बांधल्या गाठी,
माहेर सोडले …..रावांच्या सौख्यासाठी.
415 मातृत्वाच्या मन मोहित होते,
…….रावांचा प्रीतीठेवा प्राणपणाने जपते.
416 प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी,
……रावांचे नांव घेऊन करते घरभरणी.
417 हळद लावते किंचीत कुंकू लावते ठसठशीत,
…..रावांसारखे पती मिळाले हेच माझे पूर्वसंचित.
418 स्वच्छता, टापटीप आरोग्याचे मुळ,
…..रावांसाठी सोडले……चे कुळ.
419 सीतेच्या पर्णकुटीत लावल्या केळी,
…..रावांचे नांव घेते सायंकाळच्या वेळी.
420 मेघरूपी पिंपातून टपटप पडतात मोती,
……रावांसारखे पती मिळाले देवाचे आभार मानू किती.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
421 रूसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास,
……रावांचे नांव घेते तुमच्यासाठी खास.
422 साडे झाले, सुनमुख झाले आता निघाली वरात,
…..रावांचे नांव घेते लक्ष्मी आली घरात.
423 महादेवाच्या मंदिरात उद्बत्तीचा वास,
…..रावांना घालते करंजीचा घास.
424 चांदीच्या तबकात खडी साखरेचे खडे,
……रावांचे नांव घेते गौरीहारापुढे.
425 सातासमुद्राच्या पलीकडे राधा-कृष्णाचा खेळ,
…..रावांचे नांव घेते सायंकाळची वेळ.
426 स्त्रीयांचे कर्तव्य पतिसेवा हेच,
……रावांचे आयुष्य वाढो भुषण मला हेच.
427 चंद्राला पाहून हर्षित होते राहिणी,
……रावाच्या जीवनात होईन आदर्श गृहीणी.
428 भगवद् गीतेत कृष्णाने अर्जुनाला केला उपदेश,
….रावांच्या बरोबर करते गृहप्रवेश.
429 मेनकेच्या पोटी जन्मली शकुंतला,
…..रावांचे गुण पाहून अर्पण केले मला.
430 उंबरठ्यावर पाय दिल्यावर लागली सुखी जीवनाची चाहूल,
…..रावांचे नांव घेऊन टाकते दिल्याघरी पाऊल.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
431 सुखाची शीडी चढताना दुःखाचा नाही लवलेश,
……रावांसह करते गृहप्रवेश.
432 वाड्यात सव्वाहात तुळशीचे वृंदावन,
…..रावांचे नांव घेऊन तुमचे करिते अभिनंदन.
433 सांजवात लावते वेळी होते माहेरची आठवण,
……रावांसाठी …..ची पाठवण.
434 संसाररूपी सागरात प्रेमरूपी सरोवर,
आयुष्याचा प्रवास करते…..रावां बरोबर.
435 माहेरच्या अंगणात वेचले ज्ञानकण,
…..रावांचे नांव घेऊन बांधते कंकण.
436 शरयू नदीत जन्म झाला मेघदूतांचा,
…..रावांच्या संसारात उगम झाला आनंदाचा.
437 नेत्राच्या निरंजनात प्रीतीचा भाव,
…..रावांच्या नांवास केली सुरवात.
438 मंगलमाते, मंगलदेवी वंदिते मी तूला,
……रावांना आयुष्य घालून सौभाग्य दे मला.
439 रामानी राज्य दिले, भरताने नाकारले,
…..रावांनी सौभाग्य दिले ते मी स्वीकारले.
440 हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी,
…..रावांचे नांव घेते हळदी कुंकाच्या दिवशी.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
441 मनी मंगळसूत्र सौभाग्याची खूण,
…..रावांचे नांव घेते ….ची सून.
442 चांदीच्या तबकात हळदी कुंकाचा काला,
……रावांच्या नावास आरंभ केला.
443 भिल्लीनीच्या रूपात शंकर झाले मोहित,
रावांचे नांव घेते….. सहीत.
444 जय जवान, जय किसान गर्जतो सारा देश,
…..रावांच्या जीवाकरीता घातला सौभाग्याचा वेश.
445 वडिलांचा आशीर्वाद मातेची माया,
…..रावांसारखे पती मिळाले ही ईश्वराची दया.
446 काँग्रेसच्या पायात सत्याग्रहाची बेडी,
…..रावांच्या जीवावर घालते मंगळसूत्राची जोडी.
447 दत्तात्रयाला शोभे गाय, महादेवाला नंदी,
…….रावांच्या जीवावर मी आहे आनंदी.
448 तुळशीला घालते पाणी, विष्णूची करते शांती,
……रावांचे आयुष्य वाढो हीच ईश्वराला विनंती.
449 नीलवर्णी आकाशात जमले चाहूल;
…..रावांच्या संसारात पडले पहिले पाऊल.
450 माप ओलांडून गृहप्रवेश करते,
…..रावांचे नांव घेऊन लक्ष्मी सौभाग्य मागते.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
451 नेत्रांच्या नीरंजनीत लावते पापणीच्या वाती,
…..राव माझ्या ऋणानुबंधाच्या गाठी.
452 श्रावणधारेच्या वर्जवाणीत पृथ्वी बनते अंजली,
……रावांच्या संसारात मी तुळस रंगविली.
453 माहेरच्या ओढीने डोळे येतात भरून,
…..रावांच्या संसारात मन घेते वळून.
454 मंगळसुत्राच्या दोन वाट्याने होते माहेर सासरचे मिलन;
…..रावां जीवनात मिसळते आनंदी जीवन.
455 चांदीच्या तबकात मोती होऊन राहण्यापेक्षा चातकाची भागवावी तहान,
…..राव पती मिळाले याहून भाग्य कोणते महान.
456 ताऱ्यांच लुकलुकनं चंद्राला आवडलं,
……रावांनी जीवनासाठी मला निवडल.
457 नागनाथाच्या मंदिरात उदबत्तीचा वास,
……रावांना घालते लाडूचा घास,
458 राम, लक्ष्मण, हनुमंत त्यांचा दास,
…..रावांच नांव घेते तुमच्यासाठी खास.
459 सुनमुख पाहण्यासाठी लागतो आरसा,
…..रावांना घास घालते अनारसा.
460 नववधुच्या करि शोभे हिरवे कंकण,
…..रावांच्या हाताचे सोडते मी कंकण.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
461 राधेच्या मनात कृष्णाचे चिंतन,
……रावांचे नांव घेऊन बांधते मी कंकण.
462 अमृतासाठी झाले समुद्राचे मंथन,
…..रावांचे नांव घेऊन सोडते मी कंकण.
463 लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी,
……रावांचे नांव घेते तुमच्यासाठी.
464 संस्कृत भाषेत नदीला म्हणतात सरिता,
…..रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाकरिता.
465 सासर आणि माहेर स्त्रीचे दोन नेत्र,
…….रावांच्या जीवनावर बांधते मी मंगळसुत्र.
466 गर्व नसावा श्रीमंतीचा, अभिमान नसावा रूपाचा,
……रावांना घास घालते वरण, भात तुपाचा.
467 महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून,
……रावांचं नाव घेते तुमचा मान राखून.
468 सातासमुद्रापलीकडे सापडतात शिंपले मोती,
…..रावांच्या जीवनात मिसळल्या जीवनज्योती.
469 काव्य तेथे कविता, सागर तेथे सरिता,
……रावांचे नांव घेते तुमच्या इच्छेकरीता.
470 परमेश्वराचे सोबती सुखदुःखाचे भागीदार,
…..च्या जीवनात आहे मी साथीदार.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
471 नागिणीच्या वेलीखाली हरिणी घेते विसावा,
……रावांचे नांव घेते शुभाशिर्वाद असावा.
472 ल्याले मी आज सौभाग्याचा साज,
……रावांचे नाव घेते नववधु रूपाने आज.
473 १९४७ पूर्वी भारतात माजली होती आंदा-धुंदी,
…….रावांना घास घालते बुंदी.
474 सुवासिक पारिजात बहरो प्रीतीच्या दारी,
…….रावांसाठी माहेर सोडून आले मी सासरी.
475 श्रावण सरी नंतर पृथ्वीची पालटली काया,
……रावांच्या घरी मिळते माहेरची माया.
476 राम गेले वनात, भरत आले भेटी,
…..चे नाव घेते सर्वांसाठी.
477 मंगलकार्यात लोक करतात आहेर,
…..चे नाव घेऊन सोडले माहेर.
478 समुद्राच्या शिंपल्यात सापडले मोती,
…..रावांच्या जीवनात मी आहे सारथी.
479 उगवला चंद्र रजनीला लागली चाहूल,
…..रावांच नाव घेऊन संसारात टाकते पाऊल.
480 शाहू महाराज बांधतात कोल्हापुरी फेटा,
…..रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
481 आदगर माजघर, माजघरांत पलंग, पलंगावर उशी,
…..रावांच्या जिवावर मी आहे खुषी.
482 सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास,
….. ना देते मी जिलबीचा घास.
483 लाजऱ्या राधिकेला कन्हैया म्हणतो हास,
…..रावांना भरवते लाडवाचा घास.
484 सतारीचा नाद, वीणेचा झंकार,
…..च्या समवेत सुरू झाला संसार.
485 मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार,
……. च्या जीवनस्पर्शाने उमटतील झंकार.
486 ईश्वराविषयी मनी श्रद्धा,निष्ठा असावी ज्वलंत,
…..ची पत्नी म्हणून मी ठरले भाग्यवंत.
487 पूजेच्या साहित्यांत उदबत्यांचा पुडा,
…..रावांच्या जिवावर भरला हातभर चुडा.
488 चंद्रभोवती तारकांनी धरलं गोल रिंगण,
…..रावांच्या नावाने बांधल मी कंकण.
489 वर्षाऋतूमध्ये वरूणराजाने केली बरसात,
…..नाव घेण्यास केली मी सुरूवात.
490 घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तुळस,
…..च्या जीवनात चढवीन मी आनंदाचा कळस.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
491 गौरीपुढे हळदीकुंकवाच्या राशी,
…..रावांच नाव घेते चैत्रमासी.
492 निळे पाणी, निळे डोंगर,हिरवे हिरवे रान,
…..रावांचे नाव घेऊन राखते सर्वाचा मान.
493 चांदीच्या ताटात रूपये तीनशेसाठ,
…..नाव घेऊन बांधते मुंडावळीची गाठ.
494 पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा,
…..च्या नावावर भरला सौभाग्याचा चुडा.
495 जाईजुईच्या फुलांचा मधूर सुटतो सुवास,
…..चे नाव घेऊन देते घास.
496 भक्तासाठी वेडा झाला नंदन,
नाव घेते सर्वांना करून वंदन.
497 इंद्राच्या नंदनवनात अप्सरा गातात गोड,
भाग्याने लाभली…..जोड.
498 शंकराची पूजा पार्वती करते वाकून,
…..नाव घेते सर्वाचा मान राखून.
499 सूर्यबिब शोभते संध्येच्या भाळी,
…..नाव घेते संध्याकाळच्या वेळी.
500 घास घेण्यासाठी हातात घेतले पुरी श्रीखंड,
…..ना लाभो आयुष्य उदंड.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
501 आईवडिलांनी दिला जन्म, ब्रम्हदेवाने बांधल्या गाठी,
माहेर सोडलं……रावांच्या सौख्यासाठी.
502 गुलाबपाकळीपेक्षा नाजूक दिसते शेवंती,
…..राव सुखी राहोत हीच माझी विनंती.
503 ज्योतीने ज्योत पेटते, प्रीतीने प्रीती वाढते,
…..चे नाव तुमच्यासाठी घेते.
504 आकाशात चमकतात तारे, जमिनीवर चमकतात हिरे,
…..हेच माझे अलंकार खरे.
505 निसर्गावर करू पाहत आहे आजचा मानव मात,
अर्धागी म्हणून…… च्या हाती दिला हात.
506 चंद्राचा होतो उदय, सागराला येते भरती,
…..रावांच्या शब्दाने सारे श्रम हरती.
507 रत्नजडित सिंहासनावर गणपतिराय राजा,
…..नाव घेत पहिला नंबर माझा.
508 राम बसले राज्यावर,सीता बसली अंकावर,
…..चं तेज आहे माझ्या कुंकवावर.
509 मावळला सूर्य, परतले पक्षी,
…..च्या प्रेमाला परमेश्र्वर साक्षी.
510 माहेरचे दिवस माझे पाखरासारखे उडाले,
तेथील स्मृतिकण घेऊन……चे घरी आले.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
511 भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली मोरांची,
…..ना घास देत पंगत बसली थोरांची.
512 सुखदुःखाच्या धाग्यानी जीवनवस्त्र विणले,
…..च्या सहवासात भाग्य माझे हसले.
513 आई माते मंगळागौरी, नको मला कीर्ती आणि संपत्ती,
सदैव राहू दे मला च्या संगती.
514 शृंगारलेला हत्ती माडवापुढे झुले,
…..रावांना आवडतात मोगऱ्याची फुले.
515 विठ्ठलाच्या देवळात भक्तांची दाटी,
…..चे नाव घेते तुमच्यासाठी.
516 सौभाग्याचे लेणे काळी पोत,
……. च्या जीवनात उजळीन जीवनज्योत.
517 चंद्रामुळे रंगला रोहिणीचा साज,
…..नाव घेते गोड दिवस आज.
518 गौतमांच्या शापाने अहिल्या झाली शिळा,
…..च्या नावाने लावते टिळा.
519 राम गेले वनास,राज्य दिले भरता,
…..चे नाव घेते सर्वांच्या करिता.
520 लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा,
…..नाव घेऊन उखाणा करते पुरा.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
521 पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवीगार,
…..च्या जिवावर घालते मंगळसूत्राचा हार.
522 अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,
रावांना घास देते वरण भात तुपाचा.
523 बंधू प्रेमासाठी राज्यपद त्यागिले,
…..च्या नावाबरोबर गृहिणीपद स्वीकारले.
524 महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून,
…..चे नाव घेते सर्वांचा मान राखून.
525 लवंग, जायपत्री पानाचा विडा,
…..रावांच्या नावाने भरते लग्नाचा चुडा.
526 महादेवाला वाहते बेल, विष्णूला वाहते तुळस,
…..रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस,
527 भिलवडीचा आहे प्रेक्षणीय घाट,
…..रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळीची गाठ.
528 मला नाही काही येत मी आहे साधी,
…..रावांचे नाव घेते सर्वांच्या आधी.
59 सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला,
…..रावांच नाव घेते आर्शीवाद द्यावा मला.
530 काश्मीरच्या नंदनवनात फुलला निशिगंध,
…..रावांच्या जीवनता मला आहे आनंद.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
531 इंग्रजी भाषेत गवताला म्हणतात ग्रास,
…..रावांच्या संसारात मला नाही त्रास.
532 काचेच्या ताब्यात सरबत आहे गार,
…..रावांचं नाव घ्यायला उशीर झाला फार.
533 हिरवां शालू नेसून आले,
…..रावाच्या जवनात समरस झाले.
534 गोपाळ कृष्णाला बासरीचा आहे छंद,
…..रावांच्या जीवनात मला आहे आनंद.
535 राजहंस पक्षी शोभा देतो वनाला,
…..चं नाव घेते आनंद माझ्या मनाला.
536 कृष्णाने पण केला रूक्मिणीलाच वरीन,
…..च्या जिवावर आदर्श संसार करीन.
537 आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण,
…..चे नाव घेऊन बांधते कंकण.
538 जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने,
…..नाव घेते पत्नी या नात्याने.
539 राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात,
…..नाव घेते नीट ठेवा लक्षात.
540 महादेवाच्या पिंडीला वेल वाहते ताजा,
…..नाव घेते पहिला नंबर माझा.

मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

Sr. No. उखाणे
541 कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यास,
…..ना घालते लाडूचा घास.
542 राम लक्ष्मणाची जोडी अमर जगात,
…..चे नाव घेते …..च्या घरात.
543 सासरचे निरंजन माहेरची फुलवात,
…..नाव घेण्यास करते सुरूवात.
544 सागराला आली भरती, नदीला आला पूर,
…..च्या सौख्याकरता आईबाप केले दूर.
545 मावळला सूर्य, उगवला शशी,
…..रावांचे नाव घेते डोहाळजेवणाच्या दिवशी.
546 जीवनाच्या कोंदणात फुलले प्रीतीचे पुष्प,
……रावांच्या नावाने घेते मी सौभाग्य गुच्छ,
547 निसर्गावर करू पाहात आहे आजचा मानव मात,
अर्धांगीनी म्हणून दिला……रावांच्या हाती हात.
548 जीवनाच्या सागरावर सप्तरंगी फुल विचारांचा,
……रावांसह सुखी होईल प्रवास संगीत संसाराचा.
549 चंद्राला येतो उदय, समुद्राला येते भरती,
….रावांच्या शब्दाने सारे श्रम हरती.
550 लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती,
सारखे पती मिळाले भाग्य म्हणून मानू किती?

मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male

Sr. No. उखाणे
01 चित्रकाराने केली फलकावर रंगांची उधळण,
……..चे नाव वाटे जणू माणिकमोत्यांची उधळण.
02 उगवला रवी मावळली रजनी,
……..चे नाव सदैव वसे माझ्या मनी.
03 जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध,
…..च्या सहवासात झालो मी धुंद.
04 मोहमाया-स्नेहाची जाळी पसरली घनदाट,
….च्या बरोबर बांधली जीवनगाठ.
05 हिरवळीवर चरते सुवर्ण हरिणी,
…….झाली सहचारिणी.
06 प्रसन्न वदनाने आले रविराज,
…..ने चालविला संसारात स्नेहाचा साज.
07 नभांगणी दिसे शरदाचे चांदणे,
…….चे रूप अत्यंत देखणे.
08 जीवनात मिळाला मनासारखा साथी,
माझ्या संसाररथावर …….सारथी.
09 पुरूषाचे मन माझे उंच भराऱ्या घेते,
…..त्याला प्रेमबंधन घालते.
10 जगाला सुवास देत उमलली कळी,
भाग्याने लाभली मला…….प्रेमपुतळी.

मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male

Sr. No. उखाणे
11 वर मथळा खाली बातमी, वर्तमानपत्री रीती,
…..चे नाव घेतो, अजोड आमची प्रीती.
12 नंदनवनी कोकिळा बोलती गोड,
…..राणी माझा तळहातावरचा फोड.
13 पाण्याच्या हंड्यावर, रूप्याचे झाकण,
…..च्या हातात हिऱ्याचे कंकण.
14 जगाला सुवास देते उमलती कळी,
…..भाग्याने लाभली मला प्रेमपुतळी.
15 पुरूषाचे मन माझे उंच भराऱ्या घेते,
…..त्याला प्रेमबंधन घालते.
16 देवळाला खरी शोभा कळसाने येते,
मुळे माझे गृहसौख्य दुणावते.
17 गव्हात गहू बन्सी, तांदुळात आंबेमोहोर,
……चे नाव घेतो सांगितल्याबरोबर.
18 आंब्याचे पन्हे, उसाचा रस,
…..चे नाव मनात रात्रंदिवस.
19 क्रियापदाशिवाय नाही वाक्याला पूर्ती,
…..चे नाव हीच माझी स्फूर्ती.
20 रंभा, उर्वशी, तिलोत्तमा,
आमची त्यातच जमा.

मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male

Sr. No. उखाणे
21 आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड,
…..चे नाव आहे अमृतापेक्षा ही गोड.
22 चंद्र आहे रोहिणीचा सांगाती,
…..आहे माझी जीवनसाथी.
23 सत्यनारायणाची पूजा जोडीने केली,
…..नाव घ्यायला घाई घाई झाली.
24 सायंकाळच्या आकाशाचा निळसर रंग,
पण…..असते घरकामात दंग.
25 आंबेवनात कोकीळा गाते गोड,
…..आहे माझी तळहाताचा फोड.
26 शंकरासारखा पिता अन् गिरजेसारखी माता,
..राणी मिळाली स्वर्ग आला होता.
27 श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण,
…..ला सुखात ठेवील हा माझा पण.
28 देवाला भक्त करतो मनोभावे वंदन,
…..मुळे झाले संसाराचे नंदन.
29 नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व,
…..आहे माझे जीवन-सर्वस्व.
30 राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे, हास,
मी मात्र……ला देतो लाडवाचा घास.

मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male

Sr. No. उखाणे
31 विज्ञान युगात माणूस करतोय निसर्गावर मात,
…..अर्धांगिनी म्हणून घेतला मी माझ्या हाती हात.
32 आकाशातून पडतात पावसाच्या सरी,
…..चं नाव घेतो घरी.
33 संसाररूपी सागारत पती पत्नीची नौका,
…..नाव घेतो सर्वजण ऐका.
34 अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस,
…..च नाव घ्यायला मला नाही आळस.
35 जाईजुईच्या फुलांचा सुटतो सुगंध,
…..च्या सहवासाचा मला आहे आनंद.
36 सीतेसारखे चारित्र्य, रंभेसारखे रूप,
मला मिळाली आहे अनुरूप.
37 दही, चक्का, तुप,
…….आवडते मला खूप.
38 मस्तकावरील फुल घेतले, दूधातुपात बुडविले,
…..च्या कपाळी कुंकुमतिलक लावले.
39 जोडीने आंबा शिंपला, आता निघेल वरात,
…….च्या साथीने, संसाराची सुरूवात.
40 जुन्या पद्धतीच्या विवाहात, शृंगाराची अनोखी कला,
जिलबीचा घास देतो माझ्या प्रिय……..ला.

मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male

Sr. No. उखाणे
41 गर्द आमराई, त्यामध्ये पोपटांचे थवे,
…….चे नाव माझ्या ओठी यावे.
42 माझे पिता……माझी माता,
शुभमुहूर्तावर आणली,….ही कान्ता.
43 अथांग फुलला गुलमोहर प्रसन्न,
…..च्या नावाचा बहर संपन्न.
44 चांदीच्या ताटात, रूपया वाजतो खणखण,
…..चे नाव घेऊन सोडतो आता कंकण.
45 इंद्राची इंद्राणी, दुष्यंताची शकुंतला,
…..नांव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला.
46 धर्मेच अर्थेच कामे च नातिचरामि अशी शपथ घेतली,
…..ही प्रिय पत्नी लाभल्याने धन्यता वाटली.
47 देवळाला खरी शोभा कळसाने येते,
……मुळे माझे गृहसौख्य दुणावते.
48 कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध,
……..च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद,
49 बोरकरांची कवीता, जणू निसर्गाचे गाणे,
…….ला देईन सुखाचे देणे.
50 बहरली फुलांनी निशिगंधाची पाती,
…..चे नाव घेतो लग्नाच्या राती.

मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male

Sr. No. उखाणे
51 काश्मीरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध,
……च्या जीवनात, मला आहे आनंद.
52 नीलवर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी,
…….चे नाव घेतो……च्या घरी.
53 जिजाई सारखी माता, शिवाजीसारखा पुत्र,
………च्या गळ्यात बांधतो मी मंगळसुत्र.
54 घड्याळाचे काटे बघून धावपळ केली,
नऊ वाजले तशी……ऑफिसला गेली.
55 पाटावर बसून, ताटात तांदूळ पसरले
त्यावर सोन्याच्या अंगठीने…….चे नाव लिहिले.
56 आंब्याच्या झाडावर, कोकीळा करी कुंजन,
माझ्या नावाचे…..करी पूजन.
57 आमच्या घरी आहे आज सत्यनारायणाची पूजा,
…..माझी राणी, मी तिचा राजा.
58 निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान,
…..चे नाव घेऊन राखतो सर्वांचा मान,
59 मायामय नगरी, प्रेममय संसार,
…..च्या जीवावर माझ्या जिवनाचा भार.
60 संसाराच्या सागरात पतिपत्नी नावाडी,
……ची लागली मला संसाराची गोडी.

मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male

Sr. No. उखाणे
61 मुखी असावे प्रेम हातामध्ये दया,
….जडली माझी माया.
62 रसाळ पाहिजे वाणी स्त्री पाहिजे निर्मला,
……च्या नावाचा लागला मला जिव्हाळा.
63 काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध,
……च्या जीवनात मला आहे आनंद.
64 संसाररूपी सागरात पती-पत्नी नौका,
…..च नाव घेतो सर्वजण ऐका.
65 बशीत बशी कपबशी,
……ला सोडून बाकी सर्व म्हशी.
66 इंग्लिश भाषेला महत्व आले फार,
…..ने माझ्या संसाराला लावला हातभार.
67 कमळांच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात,
…..च नाव घेतो पुरूषांच्या मेळ्यात,
68 सीतेसारखे चारित्र्य, रंभेसारखे रूप,
……मला मिळाली आहे अनुरूप.
69 वेरूळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर,
……आहे माझी सर्वांपेक्षा सुंदर.
70 श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येती नटून,
…..माझ्या संसारात आल्याने मी गेला फुलून.

मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male

Sr. No. उखाणे
71 रूक्मीणीने पण केला कृष्णाना वरीन,
…..च्या साथीने आदर्श संसार करीन.
72 कृष्णाच्या बासरीचा राधेला लागे ध्यास,
…..देतो मी लाडवाचा घास.
73 पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने, फुले,
…..च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले.
74 सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली,
…..माझी राणी घरकामात गुंतली.
75 हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी,
…..च्या जीवनात आहे मला गोडी.
76 नंदनवनात अमृताचे कलश,
…..आहे माझी खूप सालस.
77 नंदनवनात अमृताचे कलश,
…..माझी आहे मोठी सालस.
78 फुलात फूल मदणबाण,
……. माझा जीव की प्राण.
79 सांयकाळच्या आकाशाचा निळसर रंग,
…..माझी नेहमी घरकामात दंग.
80 काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध,
…..जीवनात मला आहे आनंद.
81 हिंदमातेच्या डोक्यावर मोत्याची जाळी,
…..नाव घ्यायची माझ्यावर आली पाळी.
82 हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी,
…..च्या जीवनात मला आहे गोडी.
83 इंग्लिश भाषेला महत्व आले फार,
…..ने माझ्या संसाराला लावला हातभार.
84 वीज पुरवठ्यासाठी कोयनेला बांधले धरण,
……चे नाव घेतो आज आहे कारण.
85 खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड,
…..च्या रूपात नाही कुठेही तोड.
86 भाजीत भाजी मेथीची,
…..माझ्या प्रीतीची.

काय शिकलात?

आज आपण मराठी उखाणे । Marathi Ukhane – मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female आणि मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male दोन्ही पाहिले आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद

ठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

529 सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला,

Exit mobile version