Marathi ukhane for male: नमस्कार मंडळी ! तुम्ही जर नवरदेवासाठी मराठी उखाणे best marathi ukhane for male किंवा marathi ukhane for groom शोधात असाल तर तुम्ही एकदम योग्य ठिकाणी आहात कारण या पोस्टमध्ये आम्ही तुमच्यासाठी खास नवरदेवासाठी उखाणे, पुरुषासाठी उखाणे best romantik marathi ukhane for male दिलेले आहेत.
मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात लग्न सोहळे खूप उत्साहात साजरे होतात, यात लग्न सोहळ्या सोबतच इतर अनेक कार्यक्रम देखील साजरे होतात. यात हळदीचा कार्यक्रम, गोंधळ असे बरेच कार्यक्रम असतात ज्यात नवरी आणि नवरदेवाला नाव घ्यायला सांगितले जाते. अशा वेळेस त्यांच्या उपयोगी पडतात ते म्हणजे खास लग्नाचे उखाणे.
म्हणून या पोस्टमध्ये आम्ही नवरदेवासाठी उखाणे, नवरदेवासाठी मराठी उखाणे, लग्नाचे उखाणे, marathi ukhane, marathi ukhane for male, marathi ukhane for groom, marathi ukhane for husband, marathi ukhane for boy, man,etc
Contents
- 1 100+ नवरदेवासाठी मराठी उखाणे | Best marathi ukhane for male and groom
- 1.1 Marathi ukhane for male | नवरदेवासाठी मराठी उखाणे
- 1.2 Marathi ukhane for groom | Navardevasathi ukhane
- 1.3 Best marathi ukhane for husband | नवऱ्यासाठी उत्कृष्ट मराठी उखाणे
- 1.4 Romantik marathi ukhane for male
- 1.5 Great marathi ukhane for male | नवरदेवाचे उखाणे मराठीत
- 1.6 Best marathi ukhane for marriage | लग्नाचे उखाणे
100+ नवरदेवासाठी मराठी उखाणे | Best marathi ukhane for male and groom
Marathi ukhane for male | नवरदेवासाठी मराठी उखाणे
लक्ष लक्ष दिव्यासारखे उजळत राहते एकनिष्ठ प्रेम, …ची माझ्या हृदयात कोरली गेली एकमेव फ्रेम.
उखाण्याचा चाललाय आग्रह, मारीन म्हणतो बाजी
….. च नाव घ्यायला झालो मी राजी.
हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोड़ी, … च्या जीवनात मला आहे गोडी.
आई-वडील, भाऊ बहिणी, जणू गोकूळासारखे घर, … च्या आगमनाने पडली त्या सुखात भर.
रुक्मिनीने पण केला कृष्णाला वरीन,
………… च्या साथीने आदर्श संसार करीन.
मोहमाया स्नेहाची जाळी पसरली घनदाट,…………….चे बरोबर बांधली जीवन गाठ.
नक्षीदार बाऊलमध्ये ठेवल्या आंब्याच्या फोडी
….. च्या सहवासात रात्र झाली थोडी.
हृदयात दिले स्थान तेव्हा दिला हातात हात, … च्या जीवनात लाविली मी प्रीतीची फुलवात.
काय जादु केली, जिंकलं मला एकाक्षणात, प्रथम दर्शनीच भरली… माझ्या मनात
पुढे जाते वासरु, मागुन चालली गाय, … ला आवडते नेहमी दुधावरची साय
दोन जीवांचे मीलन जणु शतजन्माच्या गाठी,
…..चे नाव घेतो तुमच्या आग्रहासाठी.
श्रावण मारती भुदेवीने पांघरली हिरवी शाल, … गेली माहेरी की होतात माझे हाल.
रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन, … च्या साथीने आदर्श संसार करीन.
Best marathi ukhane for husband | नवऱ्यासाठी उत्कृष्ट मराठी उखाणे
लोकलचा प्रवास करतो फर्स्टक्लास मध्ये बसून
….. ला पडली भूल आली प्रेमात फसून.
भाजीत भाजी मेथीची, ……माझ्या प्रितीची.
दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला, सौ……सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.
जाई जुई च्या फुलांचा दरवळला सुगंध, … च्या सहवासात झालो मी धुंद.
ताजमहाल बांधायला कारागीर होते कुशल, …चे नाव घेतो तुमच्या साठी स्पेशल.
निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, … चे नावघेऊन राखतो सर्वाचा मान.
दारी होते कोनाडे त्यात होती पळी, माझी … व्यवहाराच्या बाबतीत अगदीच खुळी.
श्रीकृष्णाच्या बाललीला यशोदेला सोडतात हसवून
….. ला नेतो हनीमून साठी विमानामध्ये बसवून.
Romantik marathi ukhane for male
स्वतंत्र भारताची राजधानी झाली दिल्ली
….. म्हणजे माझ्या रुदय कुलपाची किल्ली.
देवळाला खरी शोभा कळसाने येते, … मुळे माझे गृहसौख्य दुनावते.
संसाररूपी सागरात पतिपत्नींची नौका, ……चे नाव घेतो सर्वजण ऐका.
कोरा कागज काळी शाई, … ला रोज देवळात जाण्याची घाई.
आपल्या देशात करावा हिन्दी भाषेचा मान, …चे नाव घेतो ऐका सर्व देऊन कान
राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे हास, मी देतो… ला लाडवाचा / करंजीचा घास
प्रसन्न वदनाने आले रविराज, … ने चढविला संसाराला स्नेहाचा साज.
Great marathi ukhane for male | नवरदेवाचे उखाणे मराठीत
सत्यनारायणाची पूजा जोडीने केली,……..नाव घ्यायला घाई-घाई झाली
भारत देश स्वतंत्र झाला, इंग्रज गेले पळून, … चे नाव घेतो जरा पहा मागे वळून.
मायामय नगरी, प्रेममय संसार, … च्या जीवावर माझ्या जीवनाचा भार.
सगळ्या रुढी परंपरेत आहे विज्ञानाचे धागेदोरे
…सह घेतले मी सप्तपदीचे फेरे.
देवब्राम्हण अग्नीसाक्षीने घेतले मी सात फेरे,
…. चे व माझे जुळले जन्मोजन्मीचे फेरे.
चंद्राला पाहून भरती येते सागराला
….. ची जोडी मिळाली माझ्या जीवनाला
निर्सगवार करु पहात आहे आजचा मानव मात, अर्धागिनी म्हणुन … ने दिला माझ्या हातात हात.
Best marathi ukhane for marriage | लग्नाचे उखाणे
सनई आणि चौघडा वाजतो सप्त सुरात, … चे नाव घेतो … च्या घरात.
सर्व फुलांचा राजा गुलाबाचे फुल, संसार करु सुखाचा … तु, मी आणि एक मुल.
कृष्णा च्या बासरीचा राधेला लागे ध्यास
….. ला देतो मी लाडवाचा घास
पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार, … च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार
जिजाऊ सारखी माता शिवाजी सारखा पुत्र, … च्या गळ्यात बांधतो मंगळसुत्र.
2- पूर्वे कडून आला वारा, पश्चिमेकडून आला पाऊस,
……. ला लग्नाच्या आधीपासून, साडी नेसण्याची खूप होती हाऊस
गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ
सौ …… ने दिला मला प्रेमाचा हात !!
दारातल्या मोगर्याचा चढवला मांडवावर वेल
….. च्या साथीने संसारात आहे ऑल वेल.
टीप: मित्रांनो या पोस्टमध्ये खूप छान नवरदेवासाठी उखाणे, पुरुषांचे उखाणे, रोमँटिक उखाणे, best marathi ukhane for male, marathi ukhane for groom, romantic marathi ukhane for male, best marathi ukhane for husband, इत्यादी दिलेले आहेत.
या पोस्टमध्ये सुंदर ukhane in marathi for male, groom, husband दिलेले आहेत. हे सर्व नवरदेवासाठी मराठी उखाणे तुम्हाला खूप आवडतील. तुम्ही यातून best romantic marathi ukhane for male निवडून उपयोग करू शकता, धन्यवाद…!!!