मराठी उखाणे । Marathi Ukhane
हॅलो मित्रांनो कशे आहात तुम्ही आज मी तुम्हाला मराठी उखाणे । Marathi Ukhane – मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female आणि मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male दोन्ही सांगणार आहे हे उखाणे जवळपास ५०० पेक्षा जास्त आहे आशा करतो तुम्हाला नक्की आवडतील तर चला बघुयात. आणखी वाचा – गोष्टी
Contents
- 1 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 2 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 3 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 4 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 5 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 6 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 7 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 8 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 9 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 10 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 11 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 12 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 13 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 14 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 15 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 16 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 17 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 18 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 19 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 20 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 21 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 22 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 23 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 24 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 25 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 26 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 27 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 28 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 29 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 30 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 31 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 32 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 33 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 34 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 35 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 36 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 37 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 38 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 39 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 40 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 41 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 42 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 43 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 44 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 45 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 46 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 47 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 48 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 49 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 50 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 51 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 52 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 53 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 54 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 55 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 56 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
- 57 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
- 58 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
- 59 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
- 60 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
- 61 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
- 62 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
- 63 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
- 64 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 65 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 66 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 67 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 68 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 69 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 70 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 71 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 72 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 73 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 74 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 75 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 76 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 77 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 78 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 79 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 80 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 81 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 82 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 83 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 84 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 85 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 86 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 87 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 88 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 89 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 90 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 91 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 92 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 93 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 94 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 95 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 96 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 97 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 98 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 99 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 100 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 101 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 102 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 103 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 104 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 105 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 106 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 107 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 108 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 109 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 110 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 111 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 112 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 113 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 114 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 115 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 116 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 117 मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
- 118 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
- 119 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
- 120 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
- 121 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
- 122 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
- 123 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
- 124 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
- 125 मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
Sr. No. | उखाणे |
01 | अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा, ……रावांच्या नावाने भरते लग्न चुडा. |
02 | गोकुळाच्या कुंजवनात श्रीकृष्ण वाजवतो बासरी, ……रावांचे नाव घेऊन निघाले मी सासरी. |
03 | सोन्याच मंगळसूत्र सोनारांनी घडवलं, …..रावांच नाव घेते मैत्रिणींनी अडवलं. |
04 | चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, …….रावांच्या नावाने घालते सौभाग्याचा चुडा. |
05 | दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी, ……रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळी. |
06 | शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा, …..रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा. |
07 | जीवनाच्या सागरात सप्तरंगी पूल विचारांचा, …….च्या सह संसार करीन सुखाचा. |
08 | जीवनाच्या प्रांगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी, ……..चा उत्कर्ष होत राहो हेच मागणे देवापाशी. |
09 | शंकरासारखा पिता अन् गिरिजेसारखी माता, …….रावांसारखा पती मिळून स्वर्ग आला हाता. |
10 | वर्षाऋतूत दिसते इंद्रधनुष्याची सप्तरंगी कमान, ……..चे नाव घेऊन राखते सर्वाचा मान, |

11 | कोजागिरीच्या रात्री उमाशंकर खेळती सारीपाट, …..चे नाव घेतले आता सोडा माझीवाट, |
12 | यमूनेच्या काठी कृष्ण वाजवी पावा, …….चे नाव घेते सर्वानी लक्षपूर्वक ऐका. |
13 | नम्रता लीनता हीच खरी स्त्रीची चारुता …….चं नाव घेते आपणा सर्वाकरिता. |
14 | मानससरोवरात राजहंस मोती भक्षी, ……आणि माझ्या विवाहाला अमिनारायण साक्षी. |
15 | आकाशाच्या अंगणात चंद्राची रोहिणीला लागली चाहल, …….च्या जोडीने संसारात टाकते पाऊल. |
16 | नदी आहे पर्वतदुहिता, …….चे नाव घेते आपणकरिता. |
17 | संस्कृतमध्ये नदीला म्हणतात सरिता, …….चे नाव घेते आपल्या आग्रहाकरीता. |
18 | श्रीकृष्णाची झाली तुला रूक्मिणीच्या तुलसीपत्राने, …….चे नाव घेते मोठ्या आनंदाने. |
19 | लग्नमंडपी निनादतात सनईचे सूर, ……. च्या साठी आईवडिलाचे घर कले दूर. |
20 | धनाचे दैवत लक्ष्मी, तर विद्येचे सरस्वती, ……….ची आहे माझ्यावर प्रीती. |

21 | रासक्रीडेमध्ये कृष्ण उडवितो रंग दाट, ……रावांचे नाव घेते सोडा माझी वाट. |
22 | पानोपानी शकुनाच्या कोमल हिरव्या रेषा, ……..च्या जीवानात पुरवीन साऱ्या आशा. |
23 | सुवर्णाच्या कोंदणात हिरा शोभतो छान, …….रावांचे नाव सांगून राखते आपला मान. |
24 | श्रावण महिन्यात दरवळतो पारिजाताकाचा सुवास, ………चे नाव घेऊन देते घास. |
25 | स्वप्नासाठी हरिश्चद्राने केले सर्वस्वाचे दान, …….चे नाव घेऊन राखते तुमचा मान. |
26 | आर्शीवादाची फुले वेचावीत वाकून, ……रावांच नाव घेते तुमचा मान राखून. |
27 | मान्सूनचे आगमन पर्जन्याची चाहूल, ….नाव घेऊन टाकते मी पाऊल. |
28 | क्रियापदाविना वाक्याची नाही पूर्ती, ……नाव घेते हीच माझी स्फुर्ती. |
29 | इंद्रधनुष्यात असतात सात मोहक रंग, …….रावांच नाव घेत संसारात झाले दंग. |
30 | श्रावणाच्या शिडकाव्यांनी आनंदली धरणी, ……..चे नाव घेता सुखावले मी माझ्या मनी. |

31 | पृथ्वी मोलाचं लाभलं सौभाग्याच लेणं, ……..ची साथ असता मला काय उणं? |
32 | सप्तपदीची सात पावले जन्माची ठरावी, ……..रावांच्या बरोबर मी जन्मोजन्मी असावी. |
33 | लता डोले, कुंज डोले, डोले वनश्री, ……..च्या जीवनात उजळो भाग्यश्री. |
34 | मंगळसूत्राच्या दोन वाट्यात सासर माहेरचा संगम, ……..च्या सहवासात माझ्या आनंदाचा उगम. |
35 | गोऱ्या हातावर खुलतो मेंदीचा रंग, ……..चे नाव ऐकण्यात माझ्या सख्या झाल्या दंग. |
36 | पुरूष म्हणजे सागर, स्त्री म्हणजे सरिता, ……..चे नाव घेते तुम्हा सर्वाकरिता. |
37 | शंकराला वाहतात त्रिदळी पान, ……..चे नाव घेऊन राखते तुमचा मान. |
38 | अष्टकोनी टेबलावर रूमाल टाकते विणून, …….चे नाव घेते आग्रह केला म्हणून. |
39 | ज्योत दिव्याची मंद तेवते देवापाशी, ……चे नाव घेते…… दिवशी. |
40 | कमळ आहे आपले राष्ट्रीय फूल, ……रावांनी घातली मला भूल. |

41 | लग्नासारख्या मंगल दिनी नका कोणी रूसू, ……..ना घास देताना मला येते गोड हसू. |
42 | रूप्याची झारी, सोन्याचा तिला गिलावा, ……. सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा. |
43 | नीलवर्ण आकाशात प्रकाशमान शशी, चे नाव घेते……च्या दिवशी. |
44 | चंद्राच्या आकर्षणाने समुद्राला येते भरती, ……..च्या हृदयी आहे माझ्यासाठी प्रीती. |
45 | विवाहाला अग्निनारायणाची असते साक्ष, ……..च्या संसारात मी सदैव दक्ष. |
46 | ॐ नमोजी आज्ञा ने ज्ञानेश्वरीची सुरूवात, …….नि माझी जोडी ठेव सुखात. |
47 | नित्य नवीन शोधांनी गुंग होते मती, ध्यानी मनी नसताना ……मिळाले पती. |
48 | शुभ्र फुलांच्या मखमलीवर शुभमंगल जाहले, …….मी छया होऊन सप्तपदी चालले. |
49 | वाऱ्यासंगे ताऱ्यासंगे छेडीत जातो छंद मनाचा, …….सवे हात गुड्न मार्ग चालते नवजीवनाचा. |
50 |

51 | हिमालय पर्वतावर बर्फाचा पाऊस, रावांचे नाव घेते…… नी केली हौस. |
52 | सासर माहेरची मंडळी आहेत हौशी, ……..रावांच नाव घेते च्या दिवशी. |
53 | गिरीजाशंकर, सीता राम यांना गुरू करू, …….राव आपण दोघे संसारसागर तरू. |
54 | रूप्याच्या डबी, त्यात अत्तराचा बोळा, ……..रावांचे बोलणे शंभर रूपये तोळा. |
55 | कुरूंदाची सहाण, चंदनाचे खोड, ……..रावांचे बोलणे अमृतापे क्षा गोड. |
56 | आधी घातला चंद्रहार मग घातली ठुशी, …….रावांचे नाव घ्यायला माझी नेहमी खुशी. |
57 | पंढरीच्या यात्रेत विठ्ठलनामाचा गजर, रावांच्या सेवेला …… नेहमीच हजर. |
58 | देवापुढे लावला ऊद, वास सुटला छान, …….रावांचे नाव घेते, ऐका देऊन कान. |
59 | गौरीहार पुजले अन् बोहल्यावर चढले, ……रावांच्या सुखासाठी संसारात गढले. |
60 | पूजेच्या साहित्यात उदबत्यांचा पुडा, ……..रावांच्या नावाने भरला हातात चुडा. |

61 | यमुनेच्या डोहात, कृष्णाने केला खेळ, ……..रावांचे नाव घेत झाली संध्याकाळची वेळ. |
62 | रात्रीनंतर दिवस येतो, दिवसानंतर रात्र येते, ……. नाव घ्यायला कारण शोधत होते. |
63 | घराला असावे अंगण, अंगणात शोभावी तुळस, ……. च्या जीवनावर चढवीन आनंदाचा कळस. |
64 | रूसलेल्या धरेला श्रावण म्हणतो हास, ……..रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास. |
65 | वैशाखात येतो अक्षयतृतीयेचा सण, ……..चे नाव घ्यायला लागत नाही कारण. |
66 | ज्येष्ठात करावी वटसावित्रिची कथा, ……..च्या जीवनात कसलीच नाही व्यथा. |
67 | श्रावणात चालतो ऊन पावसाचा खेळ, ………चे नाव घ्यायला लावत नाही वेळ. |
68 | कार्तिकात येतो दीपावलीचा सण, ……..चे नाव घ्यायला आग्रहाचे कारण. |
69 | फेब्रुवरीला गार पाण्यासाठी ठेवावा लागतो माठ, …….चालतात नेहमी भराभर आणि ताठ. |
70 | पारिजातकाचे फुल म्हणजे सात्विक सौदर्याचे प्रतीक, थोरामोठ्यांचा आशीर्वादाने लाभले …… सारखे पती. |

71 | खवळला समुद्र लाटा काठोकाठ, रावांचे नाव घेते ….. च्या पाठोपाठ. |
72 | शिवाजीसारखा पुत्र, जिजाईसारखी माता, …….चे नाव घेते कांता. |
73 | शामकृष्ण कन्हैयाला राधेचा ध्यास, ……..देते जिलबीचा घास. |
74 | भरलेल्या पंक्तीत रांगोळी काढली चित्रांची, ……..घास देते पंगत बसली मित्रांची. |
75 | कमलदलांमध्ये उभी लक्ष्मीमाता, ……..चे नाव घेते कांता. |
76 | सासुरवाशीण मुलीने राखावा थोरामोठ्यांचा मान, ………रावांना कन्या केली दान. |
77 | राम सिता लक्ष्मण चालले वनात, ……..रावांच्या मी आहे सहभागी जीवनात. |
78 | हरिश्चंद्र राजा, रोहीदास पुत्र, ……..च्या नावाने घातले मंगळसूत्र. |
79 | इमारत बांधायला मजूर लागतात कुशल, ……..नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल. |
80 | सावित्रिने नवस केला पती मिळावा सत्यवान, ……..ची राणी झाले मी आहे भाग्यवान. |

81 | गाईच्या शिंगांना लावला सोनेरी रंग, …… राव बसले कामाला की होतात त्यात दंग. |
82 | आईनं वाढवलं, वडिलांनी पढवलं, ……रावांनी त्यांची होताच सोन्यानं मढवलं. |
83 | मोत्याचे पेले पाहून चंद्रसूर्य हासे, जमलेल्या मंडळीत……राव खासे. |
84 | रूप्याची सरी, तिला सोन्याचा गिलावा, ……सारखा नवरा मला जन्मोजन्मी मिळावा. |
85 | दारी होता कोनाडा, त्यात होता पैका, …….चे नाव घेते सर्वजण ऐका. |
86 | श्रावणमासी ऊन पावसाचा चालतो खेळ, ……..चे नाव घेण्यास लावत नाही वेळ. |
87 | संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती, ……..रावांशी लग्न झाले, झाली इच्छापूर्ती. |
88 | लांबसडक वेणीवर शोभे गुलाबाचं फुल, …….रावांना पाहताच पडलीय मला भूल. |
89 | द्राक्षाच्या वेलीला त्रिकोणी पान, ……रावांच नाव घेऊन राखते सर्वांचा मान. |
90 | नक्षीदार चंदनी देव्हाऱ्यात चांदीची गणेशाची मूर्ती, च्या नावाने……घराण्याची वाढवीन कीर्ती. |

91 | हृदयाची श्रीमंती स्वभावात आणते दानशूरता, ……ची मी आहे कांता. |
92 | भोळ्या शंकराला बिल्वपत्रांची आवड, …….ची पती म्हणून केली मी निवड. |
93 | यमुनेच्या प्रवाहात ताजमहालाचे पडते प्रतिबिंब, …….चे नाव घेण्यास करत नाही विलंब. |
94 | काव्यप्रकारात मोरोपंतांची प्रसिद्ध आर्या, नाव घेत …… ची भार्या. |
95 | संगीताला लागते तबलापेटीची साथ, …….आहेत माझे प्राणनाथ. |
96 | वसंताच्या आगमनाने सृष्टी होते पुलकित, …….चे नाव घेतांना मन होते आनंदित. |
97 | चंद्राला रोहिणी भेटे आकाशी, …….चे नाव घेते लग्नाच्या दिवशी. |
98 | मानससरोवरात विहार करते राजहंसाची जोडी, …….च्या नावात आहे शकीची गोडी. |
99 | पौर्णिमेच्या रात्री आकाशात प्रकाशते पूर्ण चंद्रबिंब, …….चं नाव घेण्यास लावत नाही विलंब. |
100 | उखाणा घे उखाणा घे करू नका गलबला, पूर्वपुण्याईने …….सारखे पती लाभले मला. |

१०१ | इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मून, …..रावाच नाव घेत…… ची सून. |
१०२ | खडी साखरेचा खडा खावा तेव्हा गोड, ……रावांचे नांव अमृतापेक्षा गोड. |
१०३ | इंग्रजी भाषेत आईला म्हणतात मदर, …..रावांचे नांव घेते सोडा माझा पदर. |
१०४ | सात जन्माची पुण्याई फळाला आली आज, …..रावाच्या हाताने ल्याले मंगळसूत्राचा साज. |
१०५ | फूलात फूल जाईचे फूल, ……रावांनी घातली मला भूल. |
१०६ | पत्रिका जुळाल्या, योग आला जुळून, …….राव पति मिळाले भाग्य थोर म्हणून. |
१०७ | संसार सागरात प्रीतीच्या लाटा, ….रावांच्या सुखदुःखात उचलीन अर्धा वाटा. |
१०८ | आईवडिलांच्या आशीर्वादाने आला भाग्याचा दिवस, …..राव पति मिळावे म्हणून कुलदेवतेला केला नवस. |
१०९ | सीतेची पतिभक्ति, सावित्रिचा निग्रह, …..रावांचे नांव घेण्यास नको मला आग्रह. |
११० | लाल चुटक मेंदी, हिरवागार चुडा, ……रावांसाठी जीव झाला माझा वेडा. |

१११ | नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री, आजपासून मी झाले …..रावांची गृहमंत्री. |
११२ | शब्द तिथे नाद, कवी तिथे कविता, …..रावांची जोड जणू सागर आणि सरिता. |
११३ | नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पदार्पण, …..रावांच्या जीवनात, माझे सर्वस्व अर्पण. |
११४ | चंदनाच्या झाडावर बसला मोर, …..रावांच्या जिवावर मी आहे थोर. |
११५ | चंद्राचा उदय, समुद्राला भरती, …..रावांच्या शब्दाने सारे श्रम हरती. |
११६ | मायामय नगरी, प्रेममय संसार, ……रावांच्या जिवावर माझ्या जीवनाचा भार. |
११७ | संसाराच्या सागरांत पतिपत्नी नावाड़ी, …….रांवाच्या जिवावर संसाराची गोडी. |
११८ | सावित्रीने नवस केला पति मिळवा सत्यवान, …..रावांच्या जिवावर मी आहे भाग्यवान. |
११९ | सर्व देवामध्ये श्रेष्ठ आहे ब्रह्मा, विष्णू, महेश, …..रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश. |
१२० | …..सुख, समाधान तेथे लक्ष्मीचा वास, रावांना देते मी जिलबीचा घास. |

121 | गजाननाची कृपा, गुरूंचा आशीर्वाद, …..रावांचे नांव घ्यायला आज करते सुरवात. |
122 | आई-वडिल सोडताना, पाऊल होतात कष्टी, …..रावांच्या संसारात करीन मी सुखाची सृष्टी. |
123 | सासूबाई आहेत प्रेमळ, जाऊबाई आहेत हौशी, ….रावांचे नाव घेते लग्नाच्या दिवशी. |
124 | सुवर्णाची अंगठी, रूप्याचे पैंजण, …..रावांचे नाव घेते ऐका सारेजण. |
125 | सासरचे निरांजण माहेरची फुलवात, …..रावांचे नांव घेण्यास करते सुरवात. |
126 | जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …..रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. |
127 | रूक्मिणीने पण केला, कृष्णालाच वरीन, ….रावांच्या साथीनं, आदर्श संसार करीन. |
128 | हिरव्या साडीला पिवळा काठ जरतारी, ……..रावांचे नाव घेते, शालू नेसून भरजरी. |
129 | सत्य पृथवीचा आधार, सूर्य स्वर्गाचा आधार, यज्ञ देवतांचा आधार …..राव माझे आधार. |
130 | माहेर जणू गंगा, सासर जणू सागर त्यातच एकरूप, …….रावांचे सुख निर्झर. |

131 | शिंपल्यात सापडले माणिक मोती, …….रावांच्या जीवनात मी झाले सारथी. |
132 | आकाशाच्या अंगणात, ब्रम्हा, विष्णू, आणि महेश, ……रावांचे नांव घेऊन करते हो गृहप्रवेश. |
133 | सुगंधात न्ह्याल्या दिशा धुंद दाही हळूच, …..रावांच नांव माझ्या ओठी येई. |
134 | महादेवाला बेल, विष्णूला तुळस, ……रावांचे ना घ्यायला कसकला हो आळस. |
135 | पतिव्रतेचा धर्म, नम्रतेने वागते, ……रावांच्या स्नेहाने, गेली माझी भीती. |
136 | मंगळसूत्रात राहे सासरची प्रीती, ……रावांचे नाव घेऊन समाधान चित्ती. |
137 | आनंदाने भरला दिन हा लग्नाचा, …..रावांना घास देत, गोड जिलेबीचा. |
138 | पित्याचे कर्तव्य संपले, कर्तव्याला माझ्या सुरूवात, ………रावांचे सहकार्य लाभो, माझ्या भावी जीवनात. |
139 | नव्या आयुष्याची, नवी गाणी, …च्या घराण्यात, रावांची झाले राणी. |
140 | सुर्यबिंदुचा कुंकुमतिलक पृथ्वीच्या भाळी, ……रावांचे नाव घेते……च्या वेळी. |

141 | संसाराच्या देव्हाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा, ….रावांचे नांव घेऊन मागते आर्शिवाद अखंड सौभाग्याचा. |
142 | मनाच्या वृंदावनात आनंदे डोलते भावनेची तुळस, ….रावांच्या साथीने, संसार मंदिरावर सुखाचा कळस. |
143 | स्वर्गाच्या नंदनवनात, सुवर्णाच्या केळी, ….रावांचे नाव घेते, मंगळागौरीच्या वेळी. |
144 | सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात, ….रावांचे नाव घेते पण सोडा माझी वाट. |
145 | रूप्याच्या वाटीत, सोन्याचा चमचा, ….रावांचे नांव घेते, मिळो आशीर्वाद तुमचा. |
146 | नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा, …रावांच्या संसारी आपणा सर्वांच्या शुभेच्छा. |
147 | मानवी जीवनाचा आहे परमेश्वर शिल्पकार, ….रावांच्या रूपाने झाला साक्षात्कार. |
148 | पदस्पर्शाने लवंडते उंबरठ्यावरलं माप, …….रावांची भाग्य पत्नी म्हणून गृहप्रवेश करते आज. |
149 | घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तुळस, ……रावांच्या जीवनांत चढवीण आनंदाचा कळस. |
150 | सुख दुःखाच्या धाग्यांनी जीवन वस्त्र विणले, ….रावांच्या सहवासात भाग्य माझे हसले. |
मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
Sr. No. | उखाणे |
151 | अलंकारात अलंकार मंगळसूत्र मुख्य, ….रावांचा आनंद हेच माझे सौख्य. |
152 | मंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार, ……रावांच्या सह ध्येय, आशा होवोत साकार. |
153 | आकाशाच्या पोटी चंद्र, सूर्य तारांगणे, ….रावांचे नाव घेते तुमच्या म्हणण्याप्रमाणे. |
154 | नीलवर्ण आकाशात चमकतात तारे, ……रावांचे नाव घेते लक्ष द्या सारे. |
155 | स्त्रियांनी वागावे शक्तिपेक्षा युक्तिने, ….रावांचे नांव घेते प्रेमापेक्षा भक्तिने. |
156 | जन्मोजन्मीचे भाग्य आज माझ्या समोर, ……रावांचे नाव घेते ऐका लहान थोर. |
157 | सायंकाळचे वेळी नमस्कार करते देवाला, ……रावांचे नाव घेताना आनंद होतो मनाला. |
158 | माहेरच्या ओढीने डोळे येतात भरून, …….रावांच्या संसारात मन घेते बळून. |
159 | लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी, ……रावांचे नांव घेते तुमच्यासाठी. |
160 | संसाररूपी कादंबरीचे उघडले पहिले पान, …….रावांचे नांव घेऊन तुमचा करीते मान. |

161 | लक्ष्मी शोभते दागदागिण्याने, विद्या शोभते विनयाने …..रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाने. |
162 | संसाररूपी सागरात प्रेमरूपी सरोवर, आयुष्याचा प्रवास करीते……रावां बरोबर. |
163 | नाव घ्या, नाव घ्या, आग्रह असतो सर्वांचा, ….रावांचे नाव असते ओठावर, पण प्रश्न असतो उखाण्याचा. |
164 | सुखी संसारात हवी विश्वासाची जोड, …….रावांचे नाव घेते घास घालून तोंड करते गोड. |
165 | मातृत्वाच्या मांगल्याने मन मोहित होते, ……रावांचा प्रिती ठेवा प्राणपणाने जपते. |
166 | अरूणासह उषा आली, सोनियाची प्रभा पसरली, ……रावांचे नांव घ्यायला मी नाही विसरली. |
167 | सौभाग्याचं लेणं काळी पोत, …….रावांच्या जीवनात उजळीन जीवनज्योत. |
168 | हिमालया पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी, ……रावांच्या जीवनात आहे मला गोडी. |
169 | सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात, ..रावांचे नांव घेते, पण सोडा माझी वाट. |
170 | भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली चित्राची, ……रावांच्या साथीला बसली पंगत मित्रांची. |

171 | रूप्याची डबी, त्यात अत्तराचा बोळा, …..रावांचे बोलणे शंभर रूपये तोळा. |
172 | दारापुढे वृंदावन, त्यात तुळशीचे झाड, …रावांच्या गुणांपुढे दागिण्यांचा काय पाड. |
173 | चंदनाचा पाट; रूप्याचे ताट, ……राव भुकेले, सोडा माझी वाट. |
174 | जडवाचे मंगळसूत्र सोन्याने मढविले, …..रावांच्या नावाकरिता एवढे का अडविले. |
175 | शंकराच्या पिंडीवर बेलाचे पान, …..रावांचे नाव घेते सर्वांचा मान. |
176 | आत्मरूपी करंडा, देहरूपी झाकण, ……रावांचे नांव घेऊन बांधते मी कंकण. |
177 | कुलीन घराण्यात जन्मले, कुलवान घराण्यात पडले, …..रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले. |
178 | फुलांच्या सोडल्या माळा, जागोजागी लावले आरसे, ……रावांच्या बाळाचे आज आहे बारसे. |
179 | गुलाबाचा ताटवा लतांचा कुज, ……रावांच्या बाळाची आज आहे मौज. |
180 | गोकुळांत आला कृष्ण सर्वांना झाला हर्ष, ……रावांच्या बाळाला लागले पहिले वर्ष. |

181 | सोन्याची घुगरं चांदीच्या वाळ्याला, सोनार घडवी दागिने …… रावाच्या बाळाला. |
182 | वरातीच्या मिरवणुकीत सनईचे सूर, ……रावांच्या बरोबर जातांना मनात होते हूरहूर. |
183 | दाराच्या चौकटीला गणपतीचं चित्र, …….रावांच्या मुळे मिळालं सौभाग्याचं मानपत्र. |
184 | अंबाबाईच्या देवळासमोर हळदीकुंकवाचा सडा, ………रावांच्या नावावर भरते लग्नचुडा. |
185 | आला श्रावणमास, पाऊस पडता शेतात, …….रावांचे नांव घेते धनधान्यसंपन्न घरात. |
186 | शरदाचे चांदणे, मधुवणी फुले निशिगंध, ……रावांचे नाव घेण्यात मला आहे आनंद. |
187 | जीवनात ही घडी अशीच राहू दे, …….रावांचे प्रीतफुल असेच हसू दे. |
188 | आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर, आयुष्याचा प्रवास करीन ……रावांच्या बरोबर. |
189 | आकाशात चमकतो तारा, अंगठीत चमकतो हिरा, ……राव पति मिळाले हाच भाग्योदय खरा. |
190 | सोन्याच्या साखळीत खुलतात काळे मणी, ……राव झाले माझ्या सौभाग्याचे धनी. |

191 | मनोभावे प्रार्थना करून पूजला गौरीहर, ……….रावांचा सहवास लाभो जन्मभर. |
192 | प्रेमाचा दिला हुंडा मानाची केली करणी, जीवनाचे पुष्प वाहिले ……रावांच्या चरणी. |
193 | चांदीच्या ताटांत पक्वान्नाची रास, ………रावांना देते लाडुचा घास. |
194 | रंगीबेरंगी रांगोळ्यांनी पंगतीला शोभा येते, लाडूचा गोड घास……..रावांना देते. |
195 | मंगळा गौरीची पूजा मनोभावे करते, ……रावांसाठी दिर्घायुष्य मागते. |
196 | चंद्राच्या महालात रोहिणीची चाहूल, ……..रावांच्या जीवनात टाकते पहिले पाऊल. |
197 | नातेवाईक जमले केले मोलाचे आहेर, ………रावांच्या सहवासासाठी सोडले मायेचे माहेर. |
198 | उंबरठ्यावरचे माप पायानी लोटते, ……..रावांच्या घरात भाग्याने प्रवेश करते. |
199 | आई, बाबा येते आशीर्वाद द्यावा, ……..रावांचा सहवास जन्मभर लाभावा. |
200 | ……रावांच्या बरोबर जातांना मन गेले गांगरून, आई-बाबांच्या आशीर्वादाची शाल घेते पांघरून. |

201 | मोत्याची माळ, सोन्याचा साज, ……रावांच नांव घेते मंगळागौर आहे आज. |
202 | मंगळा गौरी माते नमन करते तुला, …….रावांचे अखंड सौभाग्य लाभू दे मला. |
203 | दिवाळीच्या सणांला दिव्यांच्या पंक्ति, ……..रावांना ओवाळते मंगल आरती. |
204 | थोर कुळांत जन्मले, सुसंस्कारांत वाढले, ……..रावांच्या जीवावर भाग्यशाली झाले. |
205 | सर्व सणामध्ये दिवाळीचा सण मोठा, ……रावांच्या सहवासात आनंदाला नाही तोटा. |
206 | मखमली हिरवळीवर पाखरांचा थवा, ……रावांच्या वंशात लावीन दीप नवा. |
207 | संसाराच्या वेलीवर फुलले नवे फुल, ……रावांना लागली बाळाची चाहूल. |
208 | न चुकता टी.व्ही. वर बघत असे रामायण रविवारी, न कंटाळता ….रावांचे नाव घेते…….वारी. |
209 | विठ्ठलाच्या देवळात भक्तांची दाटी, ………रावांचे नांव घेते सासरच्यासाठी. |
210 | लावीत होते कुंकू, त्यात सापडला मोती, ………राव पती मिळाले म्हणून भाग्य मानू किती. |

211 | जाई, जुई, चमेली, शेवंती, नागचाफा, ……रावांचे नांव घेऊन माळते सोनचाफा. |
212 | हिंदमातेच्या डोक्यावर मोत्यांची जाळी, ……रावांचे नाव घेऊन बांधल्या मुंडावळी. |
213 | सोन्याचं मंगळसूत्र सोनारानं घडवलं, …….रावांचे नांव घेते, मैत्रिणींनी अडवलं. |
214 | प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी, …….रावांचे नांव घेऊन करते घरभरणी. |
215 | सत्यभामेने केली श्रीकृष्णाची सुवर्णतुला, …….रावांचे नांव घेते, आशीर्वाद द्यावा मला. |
216 | समुद्राला कुणी म्हणे सागर, कुणी म्हणे रत्नाकर, ………राव आहेत माझे जन्मोजन्मीचे प्रियकर. |
217 | चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा, …….रावांच्या नावांवर घालते सौभाग्याचा चुडा. |
218 | खवळला समुद्र, लाटा काठोकाठ, ……रावांचे नांव घेते ….च्या पाठोपाठ. |
219 | रजनीचे भांडार, शशांकाच्या दारी खुले, माझे मानस मंदिर ……रावांनी जिंकले. |
220 | परागांचे रक्षण, मऊ पाकळ्या करतात, त्याच हळूवार भावनेने ….राव मला जपतात. |

221 | पाटानं आणलं पाणी, शेत पिकली मोत्यावाणी, ……रावांच्या नावाचं मोल आहे सोन्यावाणी. |
222 | आधी ताना, आलापी, मग गाऊ भैरवी, ……रावांच्या नावाची, किती सांगू थोरवी. |
223 | राम, लक्ष्मण, सीता तीन मूर्ती साक्षात, …….रावांचे नांव घेते, नीट ठेवा लक्षात. |
224 | कण्वमुनींच्या आश्रमात, शकुंतलेच माहेर, ……..रावांनी केला मला सौभाग्याचा अहेर. |
225 | कमलांच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात, ……रावांचे नांव घेते सुवासिनींच्या मेळ्यात. |
226 | अश्रूपूर्ण नेत्रांनी, माहेरचा निरोप घेते, ……रावांच्या बरोबर, मी गृहप्रवेश करते. |
227 | वाती नक्षत्रातील थेंबाचे, शिंपल्यात होती मोती, …….रावांच्या संगतीत, उजळली जीवनज्योती. |
228 | संथ वाहती, गंगा, यमुना आणि सरस्वती, …..रावांचे नांव हीच माझ्या प्रेमाची महती. |
229 | कस्तुरीचा सुवास हरवळतो रानात, ……रावांचे नांव घेते माझ्या मनांत. |
230 | श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान, …….रावांचे नाव घेते, राखते सर्वांचा मान. |

231 | निळ्या आकाशी रोहिणीस वाटे चंद्रासवे असावे, लग्नाच्या दिवशी….रावांचे नांव घ्यावे. |
232 | नागपंचमीच्या सणी सख्या पूजती वारूळाला, ……रावांवीना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला. |
233 | पोपटाची हाक ऐकून मैना लागली डाळिंब सोलायला, ……रावांचे नाव घेऊन मी लागले माणिकमोती वेचायला. |
234 | साताऱ्याचे पेढे, नाशिकचा चिवडा, ……..रावांची निवड हा माझाच निवाडा. |
235 | वृंदावनी कोणी बाई तुळस लावली, ……रावांच्या संसारात आहे शीतल सावली. |
236 | ध्येय, प्रेम, आकांक्षांची जिथे होतसे पूर्ती, अशा……रावांची माझ्या हृदयी मूर्ती. |
237 | अमेरिकेत आहे आंधळ्या न्यायदेवतेचा पुतळा, …….रावांचे नांव घेते मला सांभाळा. |
238 | राम-लक्ष्मणाची जोडी अमर झाली जगात, ……रावांचे नांव घेते…….च्या घरात. |
239 | सासरचे निरांजण, माहेरची फुलवात, ……रावंचे नांव घेण्यास करते सुरवात. |
240 | उत्तर दिशेला चमकतो अढळ धृवतारा, ………रावांचा उत्कर्ष हा माझा अलंकार खरा. |

241 | काळसर आकाशात, इंद्रधनूचे सात रंग, ……..रावांचे नांव घेता, मनी उठले तरंग. |
242 | सतारीचा नाद, वीणेचा झंकार, ……..रावांच्या समावेत सुरू झाला संसार. |
243 | तळ्यातला राजहंस सुखवितो वनाला, …….रावांचे नांव सुखविते माझ्या मनाला. |
244 | आत्मरूपी करंडा, देहरूपी झाकण, ……..रावाचे नांव घेऊन बांधते मी कंकण. |
245 | मला नको हिरे, माणके, नको आकाशातले तारे, ………..राव हेच माझे अलंकार खरे. |
246 | वेलदोड्याच्या वेलावर हवा सुटली गार, …….रावांचे नांव घेते रात्र झाली फार. |
247 | देवासमोर काढली रांगोळी मोराची, ……..रावांचे नांव घेते स्नुषा थोराची. |
248 | यज्ञ, धर्म, कीर्ती, ऐश्वर्य आणि संपत्ती, …….रावांचे नाव ही माझ्या मनाची तृप्ती. |
249 | टपोरा मोगरा फुलला छान, ……..रावांचे नांव घेऊन राखते साऱ्यांचा मान, |
250 | पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने, फुले, ……रावांचे नांव घेतल्यावर, चेहरा माझा खुले. |

251 | कोल्हापूरच्या देवीपुढे, हळदी कुंकवाच्या राशी, …….रावांचे नांव घेते……च्या बारशाच्या दिवशी. |
252 | काजव्यांचा प्रकाश दिसे, अंधार आहे तोवर, …….रावांचे नांव घेते आग्रह आहे तोवर. |
253 | नव्या दिशा, नव्या आशा, नव्या घरी पदार्प, ……रावांच्या जीवनात माझं सर्वस्व अर्पण. |
254 | चंदनाच्या पेटीला सुवर्णाच्या चुका, …….रावांचे नांव घेते सर्वांनी ऐका. |
255 | सागराला आली भरती, नदीला आला पूर, …….रावांच्या प्रीतीसाठी आई-बाबाला केले दूर. |
256 | पौर्णिमेच्या चंद्राची, उज्वल प्रभा, ……राव हेच माझ्या सौभाग्याची शोभा. |
257 | विवाहाच्या सोहळ्यात, अत्तर गुलाबाचा थाट, ……..रावांचे नाव घेऊन सोडते भाऊ-भावजयीची गाठ. |
258 | उगवला सायंतारा, रातराणी बहरली, ……रावांचे नांव घेते वरात आली दारी. |
259 | स्वप्नपूर्ती च्या क्षणी आळविते केदार, ………रावांच्या मुळे मला मिळाले घरदार. |
260 | सावळ्या ढगांना सोनेरी कडा, …..रावांच्या हातांचा माझ्याभोवती वेढा. |

261 | नंदनवनात फुलली सोन्याची कमळे, ……रावांच्या मुळे मला संसाराचा अर्थ कळे. |
262 | मुळामुठेच्या संगमावर वसले सुंदर पुणे, ……रावांच्या संसारात नाही कशास उणे. |
263 | निळ्या नभावर कर्तृत्वाचा असे रूपेरी ठसा, …….रावांसह करीत आहे संसाराचा श्रीगणेशा. |
264 | पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पूडा, …….रावांच्या नावाने भरला सौभाग्याचा चुडा. |
265 | चांदीचा तांब्या, रूप्याची परात, ……रावांचे नांव घेते…..च्या घरात. |
266 | गानकोकिळ बालगंधर्व सुरात, …….रावांचे नांव घेते….च्या घरात. |
267 | झगमगीत दिव्यांच्या रोषणाईनं सजली वरात, ……रावांचे नांव घेते….. च्या दारात. |
268 | दह्याचे केले श्रीखंड, दुधाचा केला खवा, ……रावांचे नांव घेते नीट लक्षात ठेवा. |
269 | केसात घालते फुले, डोळ्यात घालते काजळ, ……रावांचे नांव घेऊन वाहते फुलांची ओंजळ. |
270 | भ्रमराच्या गुंजारवे, मुग्ध झाली कमलिनी, …….रावांची पत्नी झाले आजच्या शुभदिनी. |

271 | प्रीतीचा व निष्ठेचा, पसरू दे सुगंध, ……रावांच्या जीवनात निर्मिन मी आनंद. |
272 | आनंदाने भरला दिन हा लग्नाचा, …….रावांना घास देते गोड जिलेबीचा. |
273 | लग्नासारख्या गोड दिनी आज्ञा कशी मोडून कशी रूसू, …..रावांना घास देतांना, मला येई गोड हसू. |
274 | माहेरचे दिवस पाखरासारखे उडाले, स्मृतीठेवा त्यांचा घेऊन …… रावांच्या घरी आले. |
275 | हिरव्या हिरव्या रानांत, मोहक पिवळी फुले, …….रावांचे नांव घेता मन हिंदोळ्यावर झुले. |
276 | गोपाळ कृष्णाला आहे बासरीचा छंद, …….रावांच्या जीवनात, मला आहे आनंद. |
277 | कात, चुना, लवंग, पानाचा विडा, …….रावांच्या नावाचा भरते लग्नाचा चुडा. |
278 | सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे काचेचे चुडे, ……रावांचे नाव घेते मंगळागौरीपुढे. |
279 | अत्तरदाणी, गुलाबदाणी, विडे ठेविले करून, …..रावांना माळ घातली कुलदेवतेला स्मरून. |
280 | भाऊबीजेच्या दिवशी भाऊरायाला ओवाळीन, …..रावांच नांव घेते….दादाची बहीण. |

281 | कण्वमुनींच्या आश्रमात शकुन्तलेचे माहेर, ……रावांनी दिला मला सौभाग्याचा अहेर. |
282 | गौतमाची गौतमी, वसिष्ठांची अरूंधती, ……रावांची मी सौभाग्यवती. |
283 | दया, क्षमा, शांती हेच सतीचे माहेर, …..रावांच्या चरणावर केला पंचप्राणांचा अहेर. |
284 | दत्तात्रयाचा अवतार ब्रह्मा, विष्णु, महेश्वर, …रावांशी जमले जीवनाचे स्वर. |
285 | चांदीची कपबशी, सोन्याचा चमचा, …..रावांचे नाव घेते आशीर्वाद तुमचा. |
286 | आशीर्वादाची फुले वेचते वाकून, ……रावांचे नांव घेते आपला मान राखून. |
287 | यमूनेच्या डोहात कृष्ण वाजवी पावा, ……रावांच्या जिवावर संसार सुखाचा व्हावा. |
288 | रातराणीच्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित, मागते आयुष्य…..रावांच्या सहीत. |
289 | संसाररूपी देवळात नंदादीप तेवावा समाधानाचा, ……रावांच्या पाठीशी सदैव आशीर्वाद असावा तुमचा. |
290 | गीतात जसा भाव, फुलांत जसा गंध, …..रावांबरोबर जुळले रेशमी बंध. |

291 | विजेचे नर्तन, ढग करती गडगड, ……रावांचे नांव घेताना माझी होई गडबड. |
292 | श्यामसावळा कृष्णसखा भक्तांचा कैवारी, जीवन माझे सुखी ……रावांच्या संसारी. |
293 | संसाराच्या अंगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी, …….रावांचा उत्कर्ष होवो, हेच मागणे देवापाशी. |
294 | निसर्गाला नाही आदि आणि अंत, …..राव आहेत मला मनपसंत. |
295 | सद्सद्विवेक बुद्धीला असे शिक्षणाचे वरदान, …..रावांच्या संसारात देईन सर्वांना मान. |
296 | कोजागिरी पौर्णिमा नि शरदाचे चांदणे, …..राव आहेत सर्वांतच देखणे. |
297 | रामाने केले शिवधनुष्य भंग, ……रावांच्या जीवनात झाले मी दंग. |
298 | श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येती नटून, ……रावांच्या नावाने आले सौख्य माझे फुलून. |
299 | सागराच्या हृदयी अंतरंग लपले, ……रावांसाठी जीवनसर्वस्व अर्पिले. |
300 | नीलनभाच्या तबकात नक्षत्रांचा हार, ……रावांचा स्वभाव आहे फारच उदार. |

301 | तुकारामाने केले अभंग मोरोपंतानी केली आर्या, …..रावांची कन्या व ……रावांची भार्या. |
302 | शिवाजी राजाची जिजाई होती माता, …..रावांचे नांव घेऊन येते मी आता. |
303 | व्यंकटेशाच्या देवळाला सोन्याचे दार, ……रावांना घालते पुष्प हार. |
304 | चातक पक्षी पावसाचे पितो पाणी, ……रावांचे झाले मी राणी. |
305 | चांदण्या रात्री रातराणीचा सुवास, …रावांचे नांव घेते तुमच्यासाठी खास. |
306 | पंढरपूरच्या यात्रेत हरिनामाचा गजर, ……रावांचे नांव ऐकण्यासाठी सर्वजण आहेत हजर. |
307 | श्रीकृष्णाच्या गळ्यामध्ये वैजयंती माला, ……रावांचे नांव घेते मंगल दिन आला. |
308 | आरक्त गालावर उमटले लज्जेचे भाव, ..रावांने घेतला माझ्या अंतःकरणाचा ठाव. |
309 | सकाळच्या वेळी बागेत फुलं तोडतोय माळी, …..रावांचे नांव घेते आता तुमच्यावर आली पाळी. |
310 | यमुनेच्या तिरावर ताजमहालची इमारत, ……रावांचे नांव घेण्यास नाही मी हरत. |

311 | शिवाजी सारखा राजा गादीवर बसावा, …..रावांचे नांव घेते आशीर्वाद असावा. |
312 | अलंकारात अलंकार श्रेष्ठ मंगळसूत्र, …..रावांच्या हाती माझे जीवन सूत्र. |
313 | मणि मंगळसूत्र हेच बायकांचे लेणे, ……रावांकरीता स्वीकारले …… चे घराणे. |
314 | देवीच्या देवळात भोपी खेळतो पोत, …..रावांनी बांधली माझ्या गळ्यात मंगळसूत्राची पोत. |
315 | मंगळसूत्राच्या वाटीत संगम सासर माहेरचा, …..रावांचं नांव घेऊन मान राखते सर्वांचा. |
316 | मंगळसूत्र हा सौभाग्याचा अलंकार, …..रावांच्या सह ध्येय, आशा साकार. |
317 | हृदयरूपी शिंपल्यात प्रीतीचे पाणी, …..रावांच्या नावाने बांधले मंगल मणी. |
318 | शशी-रजनी, रवी-उषेची नियतीने बांधली जोडी, ……रावांच्या संसारात आहे प्रेमाची गोडी. |
319 | वरणभातावर धरली साजुक तुपाची धार, ……रावांना घास देताना तारांबळ झाली फार. |
320 | लावित होते कुकू, त्यांत पडले मोती, …..रावां सारखा भ्रतार जन्मोजन्मी चिंती. |

321 | दारी होती तुळस, तिला घालीत होत्ये पळी पळी पाणी, आधी होते आईबापाची तान्ही, मग झाले…..रावांचे राणी. |
322 | गंधाने भरले कचोळे त्यात पडली समूर, आणि…. च्या घराण्यात….राव चतुर. |
323 | झिरी मिरी पाऊस लागे मोत्यांच्या धारा, ……रावांच्या छत्रीला मोत्यांचा तुरा. |
324 | पाण्याच्या हंड्यावर फुलाचे झाकण, …….रावांच्या हातात सोन्याचे कंकण. |
325 | सोन्याची पेटी सदरेला दाटी, …..राव बसले पेढीवर तिथे राजा आला भेटी. |
326 | आंब्याच्या कोवळी पत्री, …..रावांच्या डोक्यावर मोत्याची छत्री. |
327 | पुण्यात जन्मले, गंगेत न्हाले आणि, ……रावांच्या जीवासाठी मुंबईत आले. |
328 | दशरथ राजाने, पुत्रासाठी केला नवस, ……रावांचे नाव घेते हळदीकुंकवाचा दिवस. |
329 | बाल्य गेलं मातापित्याच्या पंखाखाली, तारूण्याच्या वाटेवर मिळाली, मैत्रीची साथ, नसंसाराच्या वळणावर मिळाला …….रावांचा प्रेमळ हात. |
330 | नाही मोठेपणाची अपेक्षा, नाही दौलतीची इच्छा, ……रावांच्या संसारी आपणा सर्वांच्या शुभेच्छा. |

331 | सर्वांच्या आग्रहाखातर उखाणा आठवते, …….रावांचे नांव घेताना मीच मोहरते. |
332 | अर्जुनाच्या रथाचे कृष्णाने केले सारथ्य, …..रावांच्या घरी करीन सर्वांचे आतिथ्य. |
333 | प्रतिभेचा अविष्कार म्हणजे काव्य, ……रावांच्या सहवासात माझे भवितव्य. |
334 | डोंगरकपारी तरू लतावेली, …..रावांनी दिली गुलाबाची मोहक कळी. |
335 | उगवत्या रविला उषेची ओढ, …..रावांच्या संसाराला लाभली…ची जोड. |
336 | गरिबीची करू नये निंदा, श्रीमंतीचा करू नये गर्व, …..रावांच्या नावांवरी अर्पिले जीवन सर्व. |
337 | शब्दपाकळ्या मूक झाल्या, ओठीचे उडले स्वर, ……रावांबरोबर चालले सुखी राहो माहेर. |
338 | निरोपाच्या प्रांगणात पडला स्मृती पुष्पाचा सडा, …..रावांच्या सोबत चालले घेऊन आशीर्वादाचा घडा. |
339 | हृदयाच्या भावनेला प्रीतीचा पिसारा, …..रावांच्या सह फुलो सौख्याचा फुलोरा. |
340 | चंद्र तारांगणांच्या मेळाव्यात रजनी हसते, ……रावांच्या सहवासात… रमते. |

341 | वसंत ऋतूत कोकिळा गाणे गातात, …..रावांच्या सहवासात दिवस आनंदात जातात. |
342 | नीलवर्ण आकाशात वीज कडाडली ढगात, …रावांच्या सहवासात मी धन्य झाले जगात. |
343 | नीलवर्ण आकाशात चमकतात चांदण्या, ……रावांचे नांव घेते…..ची कन्या. |
344 | आंब्याच्या झाडाला आबे लागले शंभर, रावांचे नांव घेण्यात माझा पहिला नंबर. |
345 | सोन्याची घागर अमृताने भरावी, …..रावांची सेवा जन्मभर करावी. |
346 | गंगावाहे, यमुनावाहे, सरस्वती झाली गुप्त, …..रावांच्या पदरी घालून आईबाप झाले मुक्त. |
347 | शिवाजीसारखा पुत्र, धन्य जीजाऊची कुशी, ..रावांचे नांव घेते बारशाच्या दिवशी. |
348 | नाटकात नाटक गाजले सुभद्राहरण, …..रावांचे नांव घेते……. च्या बारशाचं कारणं. |
349 | तारूण्याच्या वाटेवर बालपणाची झाली इतराजी, ……रावांच्या नावाने मिळाली नवलाई संसाराची. |
350 | माहेरचे प्रेम खेचती मागे पुढे, …..रावांच्या साथीसाठी माहेर सोडावे लागे. |

351 | वर्षाऋतूच्या आगमनाने धरती होते हासरी, ……रावांचे नांव घेते मी नवपरिणीता लाजरी. |
352 | नभांगणी चांदणीला शोभा चंद्रमाची, …..सौभाग्याच्या दानात शोभा …..रावांची. |
353 | सागराच्या लाटा उसळताना दिसती शुभ्र धवल, …..रावांचे नांव घेते त्यात काय नवल? |
354 | सर्वांना नमस्कारासाठी जोडते हो हात, …..रावांचे नांव घेते, पण सोडा माझी वाट. |
355 | भावंडांचा सहवास, आईवडिलांचा आशीर्वाद, ……रावांचे नाव घेतांना तुमचेही लाभो आशीर्वाद. |
356 | प्रतिभेच्या अविष्कारातून काव्य बहरे, …..रावांच्या साथीने मन माझे मोहरे. |
357 | आला वारा गेला वारा रूपये घ्या पारखून, राजाच्या दरबारी….. राव आहेत कारकून. |
358 | श्रीरामाच्या पाऊली वाहते फुल आणि पान, ……रावांच नांव घेत राखते सर्वांचा मान. |
359 | निळ्या आकाशी रोहिणस वाटे चंद्रासवे असावे, लग्नाच्या दिवशी….स वाटे ……रावांचे नांव घ्यावे. |
360 | झगमगीत दिव्यांच्या रोषणाईनं सजली वरात, …..रावांच नांव घेते…..च्या दारात. |

361 | आत्मरूपी करंडा, देहरूपी झाकण, ……रावांचे नांव घेऊन बांधते मी कंकण. |
362 | दवबिंदूचा जन्म आहे विरण्यासाठी, ……रावांशी विवाह केला मी सुख जोपासण्यासाठी. |
363 | संसाराच्या अंगणात सुखदुःखाचा खेळ अविनाशी, …..रावांचा उत्कर्ष होवो, हेच मागणे देवापाशी. |
364 | कॅप्टन लक्ष्मी, नेताजी सुभाशचंद्र बोस, …..रावांचे नांव घेऊन जयहिंद चा करू घोष. |
365 | दसऱ्याच्या सणाला केला साखरभात, …..रावांचे नांव घेते…..पंताची नात. |
366 | एक पाय घरात, एक पाय दारात, जडावाचे पदक ….रावाच्या हारात. |
367 | लहानशा भिंती चित्रे काढू किती, सासूबाईच्या पोटी…..राव मोती. |
368 | सागवानाच्या पेटीला सोन्याची चूक, ……रावांच्या हातात कायद्याचे बुक. |
369 | शिसवी लाकडाचा देव्हारा, त्यात चांदीची मूर्ती, …..रावांची देशभक्त म्हणून सदा कीर्ती. |
370 | मराठ्यांच्या मुलखात भवानीची वारी, सैन्य चालले लढाईवर त्यात …. रावांची स्वारी. |

371 | काळ्या चंद्रकळेवर ताऱ्यासारख्या टिकल्या, ……रावांच्या मळ्यात खूप तुरी पिकल्या. |
372 | गाण्याच्या मैफलीत पेटीचा सूर, …..रावांची भेट म्हणजे प्रेमाचा पूर. |
373 | मोत्यांचे पेले पाहू चंद्रसूर्य हासे, जमलेल्या मंडळीत …..राव खासे. |
374 | सांबाच्या पिंडीला बेल वाहिला हिरवागार, आणि…..रावांच्या जिवासाठी केला संसार, |
375 | सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, ……रावांची राणी कामात गुंतली. |
376 | गुलाबाचे फुल गणपतीला वाहिले, …..रावांच्या जीवासाठी पूणे शहर पाहिले. |
377 | चाफळच्या मंदिरात राम, सीता, लक्ष्मण, ……रावांचे नाव घेऊन करते मी आपोषण. |
378 | मला नाही काही येत मी आहे साधी, …..रावांचे नाव घेते आधी. |
379 | सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला, ……रावांचे नाव घेते आशीर्वाद द्यावा मला. |
380 | मोह, माया, प्रेमाची जाळी पसरली दाट, …..रावांची सेवा करणे हीच माझ्या मोक्षाची वाट. |

381 | काचेच्या ताब्यात सरबत आहे गार, …..रावांचे नाव घ्यायला उशीर झाला फार. |
382 | दारात अंगण, अंगणात काढली रांगोळी, ……रावांचे नांव घेऊन बांधते मुंडावळी. |
383 | हिरवा शालू नेसून आले, …..रावांच्या जीवनात समरस झाले. |
384 | शाहू राजे बांधतात कोल्हापुरी फेटा, …..रावांच्या संसारांत माझा आहे अर्धा वाटा. |
385 | आदघर, माजघर, माजघरात पलंग, पलंगावर उशी, …..रावांच्या जीवावर मी आहे खुषी. |
386 | शंकर पार्वतीच्या पोटी जन्मले गणराज, ……रावांचे नांव घेते गौर बसली आज. |
387 | श्रीमंतीने दाखवू नये श्रीमंती, गरीबांना द्यावी सवलत, ……रावांची विद्वत्ता हिच माझी दौलत. |
388 | शुभमंगल प्रसंगी अक्षदा पडतात माथी, …..राव माझे जीवनसाथी. |
389 | शुभमंगल प्रसंगी गणेशाची साथ, …..रावांच्या नावाला आज केली सुरवात. |
390 | अमुल्य वेळी उमलली कळी, ……रावांचे नांव घेते सायंकाळच्या वेळी. |

391 | एक पाय ठेवते तळ्यात, एक पाय ठेवते मळ्यात, ……रावांचे नाव घेते सासरच्या मेळ्यात. |
392 | दया, क्षमा, शांती प्रेमाचे माहेर, …..रावांनी केला मला सौभाग्याचा अहेर. |
393 | कबीर विणतो शेला, देव घालतो घडी, …..रावांच्या जिवावर मी घालते मंगळसुत्राची जोडी. |
394 | सोनाराने मंगळसुत्र घडवले सोन्याच्या साखळीवर, …..रावांचे नाव माझ्या हृदयाच्या पाकळीवर. |
395 | यमुनेच्या तिरावर कृष्ण वाजवतो पावा, …..रावांचे नांव घेते तुमचा आशीर्वाद हवा. |
396 | जात होते फुलाला, पदर अडकला वेलीला, लिंबलोण कुणाला तर……रावांच्या रूपाला (गुणाला). |
397 | महादेवाच्या पुढे असतो नंदी, …..रावांचे नांव घेऊन देते तुम्हाला संधी. |
398 | पहाटेच्या वेळी वारा वाहतो झुळझुळ, …..रावांचे नांव घेताना पैंजन वाजतात खुळखुळ. |
399 | चांदीच्या तांब्याला नागाची खूण, …..रावांचे नांव घेते…..ची सुन. |
400 | हिरवी बांगडी गुलाब दास, …..रावांच्या ताटापुढे अत्तराचा वास. |

401 | लाजऱ्या राधिकेला कन्हैया म्हणतो हास, ……रावांना घालते लाडवाचा घास. |
402 | वसंत ऋतूत कोकिळ करते कूजन, …..रावांच्या सोबत करते लक्ष्मीपूजन. |
403 | चंद्राभोवती तारकांनी धरल गोल रिंगण, ……रावांच्या नावाने बांधले मी कंकण. |
404 | जमिन दुभंगून सीता झाली गुप्त, …..रावांना हार घालून केले आई-वडिलास मूक्त. |
405 | आशीर्वादाची फुले वेचते वाकून, …..रावांचं नांव घेते तुमचा मान राखून. |
406 | अमूर्त मूर्तीला स्वरूप देतो कलाकार, ……रावांचे सद्गुण हेच माझे अलंकार. |
407 | निशिगंधाच्या वासाने मन झाले मोहित, …..रावांचे नांव घेते…..च्या सहित. |
408 | जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, ……रावांचे नाव घेते पत्नी या नात्याने. |
409 | सासु-सासरे प्रेमळ, जावा-दिर हौशी, ……रावांचे नाव घेते…..च्या दिवशी. |
410 | यमुनेच्या तिरावर, ताजमहालाची सावली, …..रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली. |

411 | घराला असावे अंगण, अंगणात शोभावी तुळस, ……रावांच नांव घेते सायंकाळच्या वेळेस. |
412 | सुखी संसारात हवी विश्वासाची जोड, ……रावांना घास घालून तोंड करते गोड. |
413 | सोन्याची घागर अमृताने भरावी, …..रावांची सेवा जन्मभर करावी. |
414 | आई-वडिलांनी दिला जन्म, ब्रह्मदेवाने बांधल्या गाठी, माहेर सोडले …..रावांच्या सौख्यासाठी. |
415 | मातृत्वाच्या मन मोहित होते, …….रावांचा प्रीतीठेवा प्राणपणाने जपते. |
416 | प्रेमाचा दिला हुंडा, मानाची केली करणी, ……रावांचे नांव घेऊन करते घरभरणी. |
417 | हळद लावते किंचीत कुंकू लावते ठसठशीत, …..रावांसारखे पती मिळाले हेच माझे पूर्वसंचित. |
418 | स्वच्छता, टापटीप आरोग्याचे मुळ, …..रावांसाठी सोडले……चे कुळ. |
419 | सीतेच्या पर्णकुटीत लावल्या केळी, …..रावांचे नांव घेते सायंकाळच्या वेळी. |
420 | मेघरूपी पिंपातून टपटप पडतात मोती, ……रावांसारखे पती मिळाले देवाचे आभार मानू किती. |

421 | रूसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास, ……रावांचे नांव घेते तुमच्यासाठी खास. |
422 | साडे झाले, सुनमुख झाले आता निघाली वरात, …..रावांचे नांव घेते लक्ष्मी आली घरात. |
423 | महादेवाच्या मंदिरात उद्बत्तीचा वास, …..रावांना घालते करंजीचा घास. |
424 | चांदीच्या तबकात खडी साखरेचे खडे, ……रावांचे नांव घेते गौरीहारापुढे. |
425 | सातासमुद्राच्या पलीकडे राधा-कृष्णाचा खेळ, …..रावांचे नांव घेते सायंकाळची वेळ. |
426 | स्त्रीयांचे कर्तव्य पतिसेवा हेच, ……रावांचे आयुष्य वाढो भुषण मला हेच. |
427 | चंद्राला पाहून हर्षित होते राहिणी, ……रावाच्या जीवनात होईन आदर्श गृहीणी. |
428 | भगवद् गीतेत कृष्णाने अर्जुनाला केला उपदेश, ….रावांच्या बरोबर करते गृहप्रवेश. |
429 | मेनकेच्या पोटी जन्मली शकुंतला, …..रावांचे गुण पाहून अर्पण केले मला. |
430 | उंबरठ्यावर पाय दिल्यावर लागली सुखी जीवनाची चाहूल, …..रावांचे नांव घेऊन टाकते दिल्याघरी पाऊल. |

431 | सुखाची शीडी चढताना दुःखाचा नाही लवलेश, ……रावांसह करते गृहप्रवेश. |
432 | वाड्यात सव्वाहात तुळशीचे वृंदावन, …..रावांचे नांव घेऊन तुमचे करिते अभिनंदन. |
433 | सांजवात लावते वेळी होते माहेरची आठवण, ……रावांसाठी …..ची पाठवण. |
434 | संसाररूपी सागरात प्रेमरूपी सरोवर, आयुष्याचा प्रवास करते…..रावां बरोबर. |
435 | माहेरच्या अंगणात वेचले ज्ञानकण, …..रावांचे नांव घेऊन बांधते कंकण. |
436 | शरयू नदीत जन्म झाला मेघदूतांचा, …..रावांच्या संसारात उगम झाला आनंदाचा. |
437 | नेत्राच्या निरंजनात प्रीतीचा भाव, …..रावांच्या नांवास केली सुरवात. |
438 | मंगलमाते, मंगलदेवी वंदिते मी तूला, ……रावांना आयुष्य घालून सौभाग्य दे मला. |
439 | रामानी राज्य दिले, भरताने नाकारले, …..रावांनी सौभाग्य दिले ते मी स्वीकारले. |
440 | हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, …..रावांचे नांव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. |

441 | मनी मंगळसूत्र सौभाग्याची खूण, …..रावांचे नांव घेते ….ची सून. |
442 | चांदीच्या तबकात हळदी कुंकाचा काला, ……रावांच्या नावास आरंभ केला. |
443 | भिल्लीनीच्या रूपात शंकर झाले मोहित, रावांचे नांव घेते….. सहीत. |
444 | जय जवान, जय किसान गर्जतो सारा देश, …..रावांच्या जीवाकरीता घातला सौभाग्याचा वेश. |
445 | वडिलांचा आशीर्वाद मातेची माया, …..रावांसारखे पती मिळाले ही ईश्वराची दया. |
446 | काँग्रेसच्या पायात सत्याग्रहाची बेडी, …..रावांच्या जीवावर घालते मंगळसूत्राची जोडी. |
447 | दत्तात्रयाला शोभे गाय, महादेवाला नंदी, …….रावांच्या जीवावर मी आहे आनंदी. |
448 | तुळशीला घालते पाणी, विष्णूची करते शांती, ……रावांचे आयुष्य वाढो हीच ईश्वराला विनंती. |
449 | नीलवर्णी आकाशात जमले चाहूल; …..रावांच्या संसारात पडले पहिले पाऊल. |
450 | माप ओलांडून गृहप्रवेश करते, …..रावांचे नांव घेऊन लक्ष्मी सौभाग्य मागते. |

451 | नेत्रांच्या नीरंजनीत लावते पापणीच्या वाती, …..राव माझ्या ऋणानुबंधाच्या गाठी. |
452 | श्रावणधारेच्या वर्जवाणीत पृथ्वी बनते अंजली, ……रावांच्या संसारात मी तुळस रंगविली. |
453 | माहेरच्या ओढीने डोळे येतात भरून, …..रावांच्या संसारात मन घेते वळून. |
454 | मंगळसुत्राच्या दोन वाट्याने होते माहेर सासरचे मिलन; …..रावां जीवनात मिसळते आनंदी जीवन. |
455 | चांदीच्या तबकात मोती होऊन राहण्यापेक्षा चातकाची भागवावी तहान, …..राव पती मिळाले याहून भाग्य कोणते महान. |
456 | ताऱ्यांच लुकलुकनं चंद्राला आवडलं, ……रावांनी जीवनासाठी मला निवडल. |
457 | नागनाथाच्या मंदिरात उदबत्तीचा वास, ……रावांना घालते लाडूचा घास, |
458 | राम, लक्ष्मण, हनुमंत त्यांचा दास, …..रावांच नांव घेते तुमच्यासाठी खास. |
459 | सुनमुख पाहण्यासाठी लागतो आरसा, …..रावांना घास घालते अनारसा. |
460 | नववधुच्या करि शोभे हिरवे कंकण, …..रावांच्या हाताचे सोडते मी कंकण. |

461 | राधेच्या मनात कृष्णाचे चिंतन, ……रावांचे नांव घेऊन बांधते मी कंकण. |
462 | अमृतासाठी झाले समुद्राचे मंथन, …..रावांचे नांव घेऊन सोडते मी कंकण. |
463 | लग्नाचे बंधन, जन्माच्या गाठी, ……रावांचे नांव घेते तुमच्यासाठी. |
464 | संस्कृत भाषेत नदीला म्हणतात सरिता, …..रावांचे नांव घेते तुमच्या आग्रहाकरिता. |
465 | सासर आणि माहेर स्त्रीचे दोन नेत्र, …….रावांच्या जीवनावर बांधते मी मंगळसुत्र. |
466 | गर्व नसावा श्रीमंतीचा, अभिमान नसावा रूपाचा, ……रावांना घास घालते वरण, भात तुपाचा. |
467 | महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, ……रावांचं नाव घेते तुमचा मान राखून. |
468 | सातासमुद्रापलीकडे सापडतात शिंपले मोती, …..रावांच्या जीवनात मिसळल्या जीवनज्योती. |
469 | काव्य तेथे कविता, सागर तेथे सरिता, ……रावांचे नांव घेते तुमच्या इच्छेकरीता. |
470 | परमेश्वराचे सोबती सुखदुःखाचे भागीदार, …..च्या जीवनात आहे मी साथीदार. |

471 | नागिणीच्या वेलीखाली हरिणी घेते विसावा, ……रावांचे नांव घेते शुभाशिर्वाद असावा. |
472 | ल्याले मी आज सौभाग्याचा साज, ……रावांचे नाव घेते नववधु रूपाने आज. |
473 | १९४७ पूर्वी भारतात माजली होती आंदा-धुंदी, …….रावांना घास घालते बुंदी. |
474 | सुवासिक पारिजात बहरो प्रीतीच्या दारी, …….रावांसाठी माहेर सोडून आले मी सासरी. |
475 | श्रावण सरी नंतर पृथ्वीची पालटली काया, ……रावांच्या घरी मिळते माहेरची माया. |
476 | राम गेले वनात, भरत आले भेटी, …..चे नाव घेते सर्वांसाठी. |
477 | मंगलकार्यात लोक करतात आहेर, …..चे नाव घेऊन सोडले माहेर. |
478 | समुद्राच्या शिंपल्यात सापडले मोती, …..रावांच्या जीवनात मी आहे सारथी. |
479 | उगवला चंद्र रजनीला लागली चाहूल, …..रावांच नाव घेऊन संसारात टाकते पाऊल. |
480 | शाहू महाराज बांधतात कोल्हापुरी फेटा, …..रावांच्या संसारात माझा अर्धा वाटा. |

481 | आदगर माजघर, माजघरांत पलंग, पलंगावर उशी, …..रावांच्या जिवावर मी आहे खुषी. |
482 | सुख समाधान तेथे लक्ष्मीचा वास, ….. ना देते मी जिलबीचा घास. |
483 | लाजऱ्या राधिकेला कन्हैया म्हणतो हास, …..रावांना भरवते लाडवाचा घास. |
484 | सतारीचा नाद, वीणेचा झंकार, …..च्या समवेत सुरू झाला संसार. |
485 | मूकपणे छेडीत होते जीवनवीणेची तार, ……. च्या जीवनस्पर्शाने उमटतील झंकार. |
486 | ईश्वराविषयी मनी श्रद्धा,निष्ठा असावी ज्वलंत, …..ची पत्नी म्हणून मी ठरले भाग्यवंत. |
487 | पूजेच्या साहित्यांत उदबत्यांचा पुडा, …..रावांच्या जिवावर भरला हातभर चुडा. |
488 | चंद्रभोवती तारकांनी धरलं गोल रिंगण, …..रावांच्या नावाने बांधल मी कंकण. |
489 | वर्षाऋतूमध्ये वरूणराजाने केली बरसात, …..नाव घेण्यास केली मी सुरूवात. |
490 | घराला असावं अंगण, अंगणात डोलावी तुळस, …..च्या जीवनात चढवीन मी आनंदाचा कळस. |

491 | गौरीपुढे हळदीकुंकवाच्या राशी, …..रावांच नाव घेते चैत्रमासी. |
492 | निळे पाणी, निळे डोंगर,हिरवे हिरवे रान, …..रावांचे नाव घेऊन राखते सर्वाचा मान. |
493 | चांदीच्या ताटात रूपये तीनशेसाठ, …..नाव घेऊन बांधते मुंडावळीची गाठ. |
494 | पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा पुडा, …..च्या नावावर भरला सौभाग्याचा चुडा. |
495 | जाईजुईच्या फुलांचा मधूर सुटतो सुवास, …..चे नाव घेऊन देते घास. |
496 | भक्तासाठी वेडा झाला नंदन, नाव घेते सर्वांना करून वंदन. |
497 | इंद्राच्या नंदनवनात अप्सरा गातात गोड, भाग्याने लाभली…..जोड. |
498 | शंकराची पूजा पार्वती करते वाकून, …..नाव घेते सर्वाचा मान राखून. |
499 | सूर्यबिब शोभते संध्येच्या भाळी, …..नाव घेते संध्याकाळच्या वेळी. |
500 | घास घेण्यासाठी हातात घेतले पुरी श्रीखंड, …..ना लाभो आयुष्य उदंड. |

501 | आईवडिलांनी दिला जन्म, ब्रम्हदेवाने बांधल्या गाठी, माहेर सोडलं……रावांच्या सौख्यासाठी. |
502 | गुलाबपाकळीपेक्षा नाजूक दिसते शेवंती, …..राव सुखी राहोत हीच माझी विनंती. |
503 | ज्योतीने ज्योत पेटते, प्रीतीने प्रीती वाढते, …..चे नाव तुमच्यासाठी घेते. |
504 | आकाशात चमकतात तारे, जमिनीवर चमकतात हिरे, …..हेच माझे अलंकार खरे. |
505 | निसर्गावर करू पाहत आहे आजचा मानव मात, अर्धागी म्हणून…… च्या हाती दिला हात. |
506 | चंद्राचा होतो उदय, सागराला येते भरती, …..रावांच्या शब्दाने सारे श्रम हरती. |
507 | रत्नजडित सिंहासनावर गणपतिराय राजा, …..नाव घेत पहिला नंबर माझा. |
508 | राम बसले राज्यावर,सीता बसली अंकावर, …..चं तेज आहे माझ्या कुंकवावर. |
509 | मावळला सूर्य, परतले पक्षी, …..च्या प्रेमाला परमेश्र्वर साक्षी. |
510 | माहेरचे दिवस माझे पाखरासारखे उडाले, तेथील स्मृतिकण घेऊन……चे घरी आले. |

511 | भरलेल्या पंगतीत रांगोळी काढली मोरांची, …..ना घास देत पंगत बसली थोरांची. |
512 | सुखदुःखाच्या धाग्यानी जीवनवस्त्र विणले, …..च्या सहवासात भाग्य माझे हसले. |
513 | आई माते मंगळागौरी, नको मला कीर्ती आणि संपत्ती, सदैव राहू दे मला च्या संगती. |
514 | शृंगारलेला हत्ती माडवापुढे झुले, …..रावांना आवडतात मोगऱ्याची फुले. |
515 | विठ्ठलाच्या देवळात भक्तांची दाटी, …..चे नाव घेते तुमच्यासाठी. |
516 | सौभाग्याचे लेणे काळी पोत, ……. च्या जीवनात उजळीन जीवनज्योत. |
517 | चंद्रामुळे रंगला रोहिणीचा साज, …..नाव घेते गोड दिवस आज. |
518 | गौतमांच्या शापाने अहिल्या झाली शिळा, …..च्या नावाने लावते टिळा. |
519 | राम गेले वनास,राज्य दिले भरता, …..चे नाव घेते सर्वांच्या करिता. |
520 | लोकमान्य टिळक स्वराज्याचा हिरा, …..नाव घेऊन उखाणा करते पुरा. |

521 | पर्जन्याच्या दृष्टीने सृष्टी होते हिरवीगार, …..च्या जिवावर घालते मंगळसूत्राचा हार. |
522 | अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा, रावांना घास देते वरण भात तुपाचा. |
523 | बंधू प्रेमासाठी राज्यपद त्यागिले, …..च्या नावाबरोबर गृहिणीपद स्वीकारले. |
524 | महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, …..चे नाव घेते सर्वांचा मान राखून. |
525 | लवंग, जायपत्री पानाचा विडा, …..रावांच्या नावाने भरते लग्नाचा चुडा. |
526 | महादेवाला वाहते बेल, विष्णूला वाहते तुळस, …..रावांचे नाव घ्यायला मला नाही आळस, |
527 | भिलवडीचा आहे प्रेक्षणीय घाट, …..रावांचे नाव घेऊन बांधते मुंडावळीची गाठ. |
528 | मला नाही काही येत मी आहे साधी, …..रावांचे नाव घेते सर्वांच्या आधी. |
59 | सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला, …..रावांच नाव घेते आर्शीवाद द्यावा मला. |
530 | काश्मीरच्या नंदनवनात फुलला निशिगंध, …..रावांच्या जीवनता मला आहे आनंद. |
मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female
Sr. No. | उखाणे |
531 | इंग्रजी भाषेत गवताला म्हणतात ग्रास, …..रावांच्या संसारात मला नाही त्रास. |
532 | काचेच्या ताब्यात सरबत आहे गार, …..रावांचं नाव घ्यायला उशीर झाला फार. |
533 | हिरवां शालू नेसून आले, …..रावाच्या जवनात समरस झाले. |
534 | गोपाळ कृष्णाला बासरीचा आहे छंद, …..रावांच्या जीवनात मला आहे आनंद. |
535 | राजहंस पक्षी शोभा देतो वनाला, …..चं नाव घेते आनंद माझ्या मनाला. |
536 | कृष्णाने पण केला रूक्मिणीलाच वरीन, …..च्या जिवावर आदर्श संसार करीन. |
537 | आत्मरूपी करंडा देहरूपी झाकण, …..चे नाव घेऊन बांधते कंकण. |
538 | जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने, …..नाव घेते पत्नी या नात्याने. |
539 | राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात, …..नाव घेते नीट ठेवा लक्षात. |
540 | महादेवाच्या पिंडीला वेल वाहते ताजा, …..नाव घेते पहिला नंबर माझा. |

541 | कृष्णाच्या बासरीचा राधेला ध्यास, …..ना घालते लाडूचा घास. |
542 | राम लक्ष्मणाची जोडी अमर जगात, …..चे नाव घेते …..च्या घरात. |
543 | सासरचे निरंजन माहेरची फुलवात, …..नाव घेण्यास करते सुरूवात. |
544 | सागराला आली भरती, नदीला आला पूर, …..च्या सौख्याकरता आईबाप केले दूर. |
545 | मावळला सूर्य, उगवला शशी, …..रावांचे नाव घेते डोहाळजेवणाच्या दिवशी. |
546 | जीवनाच्या कोंदणात फुलले प्रीतीचे पुष्प, ……रावांच्या नावाने घेते मी सौभाग्य गुच्छ, |
547 | निसर्गावर करू पाहात आहे आजचा मानव मात, अर्धांगीनी म्हणून दिला……रावांच्या हाती हात. |
548 | जीवनाच्या सागरावर सप्तरंगी फुल विचारांचा, ……रावांसह सुखी होईल प्रवास संगीत संसाराचा. |
549 | चंद्राला येतो उदय, समुद्राला येते भरती, ….रावांच्या शब्दाने सारे श्रम हरती. |
550 | लावीत होते कुंकू, त्यात पडला मोती, सारखे पती मिळाले भाग्य म्हणून मानू किती? |
मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male
Sr. No. | उखाणे |
01 | चित्रकाराने केली फलकावर रंगांची उधळण, ……..चे नाव वाटे जणू माणिकमोत्यांची उधळण. |
02 | उगवला रवी मावळली रजनी, ……..चे नाव सदैव वसे माझ्या मनी. |
03 | जाईजुईच्या फुलांचा दरवळला सुगंध, …..च्या सहवासात झालो मी धुंद. |
04 | मोहमाया-स्नेहाची जाळी पसरली घनदाट, ….च्या बरोबर बांधली जीवनगाठ. |
05 | हिरवळीवर चरते सुवर्ण हरिणी, …….झाली सहचारिणी. |
06 | प्रसन्न वदनाने आले रविराज, …..ने चालविला संसारात स्नेहाचा साज. |
07 | नभांगणी दिसे शरदाचे चांदणे, …….चे रूप अत्यंत देखणे. |
08 | जीवनात मिळाला मनासारखा साथी, माझ्या संसाररथावर …….सारथी. |
09 | पुरूषाचे मन माझे उंच भराऱ्या घेते, …..त्याला प्रेमबंधन घालते. |
10 | जगाला सुवास देत उमलली कळी, भाग्याने लाभली मला…….प्रेमपुतळी. |

11 | वर मथळा खाली बातमी, वर्तमानपत्री रीती, …..चे नाव घेतो, अजोड आमची प्रीती. |
12 | नंदनवनी कोकिळा बोलती गोड, …..राणी माझा तळहातावरचा फोड. |
13 | पाण्याच्या हंड्यावर, रूप्याचे झाकण, …..च्या हातात हिऱ्याचे कंकण. |
14 | जगाला सुवास देते उमलती कळी, …..भाग्याने लाभली मला प्रेमपुतळी. |
15 | पुरूषाचे मन माझे उंच भराऱ्या घेते, …..त्याला प्रेमबंधन घालते. |
16 | देवळाला खरी शोभा कळसाने येते, मुळे माझे गृहसौख्य दुणावते. |
17 | गव्हात गहू बन्सी, तांदुळात आंबेमोहोर, ……चे नाव घेतो सांगितल्याबरोबर. |
18 | आंब्याचे पन्हे, उसाचा रस, …..चे नाव मनात रात्रंदिवस. |
19 | क्रियापदाशिवाय नाही वाक्याला पूर्ती, …..चे नाव हीच माझी स्फूर्ती. |
20 | रंभा, उर्वशी, तिलोत्तमा, आमची त्यातच जमा. |

21 | आंबा गोड, ऊस गोड, त्याहीपेक्षा अमृत गोड, …..चे नाव आहे अमृतापेक्षा ही गोड. |
22 | चंद्र आहे रोहिणीचा सांगाती, …..आहे माझी जीवनसाथी. |
23 | सत्यनारायणाची पूजा जोडीने केली, …..नाव घ्यायला घाई घाई झाली. |
24 | सायंकाळच्या आकाशाचा निळसर रंग, पण…..असते घरकामात दंग. |
25 | आंबेवनात कोकीळा गाते गोड, …..आहे माझी तळहाताचा फोड. |
26 | शंकरासारखा पिता अन् गिरजेसारखी माता, ..राणी मिळाली स्वर्ग आला होता. |
27 | श्रावण महिन्यात प्रत्येक वारी सण, …..ला सुखात ठेवील हा माझा पण. |
28 | देवाला भक्त करतो मनोभावे वंदन, …..मुळे झाले संसाराचे नंदन. |
29 | नवग्रह मंडळात शनीचं आहे वर्चस्व, …..आहे माझे जीवन-सर्वस्व. |
30 | राधिकेला कृष्ण म्हणे हास राधे, हास, मी मात्र……ला देतो लाडवाचा घास. |

31 | विज्ञान युगात माणूस करतोय निसर्गावर मात, …..अर्धांगिनी म्हणून घेतला मी माझ्या हाती हात. |
32 | आकाशातून पडतात पावसाच्या सरी, …..चं नाव घेतो घरी. |
33 | संसाररूपी सागारत पती पत्नीची नौका, …..नाव घेतो सर्वजण ऐका. |
34 | अंबाबाईच्या देवळाला सोन्याचा कळस, …..च नाव घ्यायला मला नाही आळस. |
35 | जाईजुईच्या फुलांचा सुटतो सुगंध, …..च्या सहवासाचा मला आहे आनंद. |
36 | सीतेसारखे चारित्र्य, रंभेसारखे रूप, मला मिळाली आहे अनुरूप. |
37 | दही, चक्का, तुप, …….आवडते मला खूप. |
38 | मस्तकावरील फुल घेतले, दूधातुपात बुडविले, …..च्या कपाळी कुंकुमतिलक लावले. |
39 | जोडीने आंबा शिंपला, आता निघेल वरात, …….च्या साथीने, संसाराची सुरूवात. |
40 | जुन्या पद्धतीच्या विवाहात, शृंगाराची अनोखी कला, जिलबीचा घास देतो माझ्या प्रिय……..ला. |

41 | गर्द आमराई, त्यामध्ये पोपटांचे थवे, …….चे नाव माझ्या ओठी यावे. |
42 | माझे पिता……माझी माता, शुभमुहूर्तावर आणली,….ही कान्ता. |
43 | अथांग फुलला गुलमोहर प्रसन्न, …..च्या नावाचा बहर संपन्न. |
44 | चांदीच्या ताटात, रूपया वाजतो खणखण, …..चे नाव घेऊन सोडतो आता कंकण. |
45 | इंद्राची इंद्राणी, दुष्यंताची शकुंतला, …..नांव ठेवले माझ्या प्रिय पत्नीला. |
46 | धर्मेच अर्थेच कामे च नातिचरामि अशी शपथ घेतली, …..ही प्रिय पत्नी लाभल्याने धन्यता वाटली. |
47 | देवळाला खरी शोभा कळसाने येते, ……मुळे माझे गृहसौख्य दुणावते. |
48 | कळी हसेल, फुल उमलेल, मोहरून येईल सुगंध, ……..च्या सोबतीत, गवसेल जीवनाचा आनंद, |
49 | बोरकरांची कवीता, जणू निसर्गाचे गाणे, …….ला देईन सुखाचे देणे. |
50 | बहरली फुलांनी निशिगंधाची पाती, …..चे नाव घेतो लग्नाच्या राती. |

51 | काश्मीरच्या नंदनवनात गुलाबाचा गंध, ……च्या जीवनात, मला आहे आनंद. |
52 | नीलवर्ण आकाशातून पडती पावसाच्या सरी, …….चे नाव घेतो……च्या घरी. |
53 | जिजाई सारखी माता, शिवाजीसारखा पुत्र, ………च्या गळ्यात बांधतो मी मंगळसुत्र. |
54 | घड्याळाचे काटे बघून धावपळ केली, नऊ वाजले तशी……ऑफिसला गेली. |
55 | पाटावर बसून, ताटात तांदूळ पसरले त्यावर सोन्याच्या अंगठीने…….चे नाव लिहिले. |
56 | आंब्याच्या झाडावर, कोकीळा करी कुंजन, माझ्या नावाचे…..करी पूजन. |
57 | आमच्या घरी आहे आज सत्यनारायणाची पूजा, …..माझी राणी, मी तिचा राजा. |
58 | निळे पाणी, निळे डोंगर, हिरवे हिरवे रान, …..चे नाव घेऊन राखतो सर्वांचा मान, |
59 | मायामय नगरी, प्रेममय संसार, …..च्या जीवावर माझ्या जिवनाचा भार. |
60 | संसाराच्या सागरात पतिपत्नी नावाडी, ……ची लागली मला संसाराची गोडी. |

61 | मुखी असावे प्रेम हातामध्ये दया, ….जडली माझी माया. |
62 | रसाळ पाहिजे वाणी स्त्री पाहिजे निर्मला, ……च्या नावाचा लागला मला जिव्हाळा. |
63 | काश्मिरच्या नंदनवनात फुलतो निशीगंध, ……च्या जीवनात मला आहे आनंद. |
64 | संसाररूपी सागरात पती-पत्नी नौका, …..च नाव घेतो सर्वजण ऐका. |
65 | बशीत बशी कपबशी, ……ला सोडून बाकी सर्व म्हशी. |
66 | इंग्लिश भाषेला महत्व आले फार, …..ने माझ्या संसाराला लावला हातभार. |
67 | कमळांच्या फुलांचा हार लक्ष्मीच्या गळ्यात, …..च नाव घेतो पुरूषांच्या मेळ्यात, |
68 | सीतेसारखे चारित्र्य, रंभेसारखे रूप, ……मला मिळाली आहे अनुरूप. |
69 | वेरूळाची शिल्पे आहेत अप्रतिम सुंदर, ……आहे माझी सर्वांपेक्षा सुंदर. |
70 | श्रीगणेशाच्या भेटीसाठी गौरी येती नटून, …..माझ्या संसारात आल्याने मी गेला फुलून. |

71 | रूक्मीणीने पण केला कृष्णाना वरीन, …..च्या साथीने आदर्श संसार करीन. |
72 | कृष्णाच्या बासरीचा राधेला लागे ध्यास, …..देतो मी लाडवाचा घास. |
73 | पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने, फुले, …..च नाव घेतल्यावर चेहरा माझा खुले. |
74 | सोन्याची सुंपली, मोत्यांनी गुंफली, …..माझी राणी घरकामात गुंतली. |
75 | हिमालय पर्वतावर शंकर-पार्वतीची जोडी, …..च्या जीवनात आहे मला गोडी. |
76 | नंदनवनात अमृताचे कलश, …..आहे माझी खूप सालस. |
77 | नंदनवनात अमृताचे कलश, …..माझी आहे मोठी सालस. |
78 | फुलात फूल मदणबाण, ……. माझा जीव की प्राण. |
79 | सांयकाळच्या आकाशाचा निळसर रंग, …..माझी नेहमी घरकामात दंग. |
80 | काश्मीरच्या नंदनवनात फुलतो निशिगंध, …..जीवनात मला आहे आनंद. |
81 | हिंदमातेच्या डोक्यावर मोत्याची जाळी, …..नाव घ्यायची माझ्यावर आली पाळी. |
82 | हिमालय पर्वतावर शंकर पार्वतीची जोडी, …..च्या जीवनात मला आहे गोडी. |
83 | इंग्लिश भाषेला महत्व आले फार, …..ने माझ्या संसाराला लावला हातभार. |
84 | वीज पुरवठ्यासाठी कोयनेला बांधले धरण, ……चे नाव घेतो आज आहे कारण. |
85 | खडीसाखरेचा खडा खावा तेव्हा गोड, …..च्या रूपात नाही कुठेही तोड. |
86 | भाजीत भाजी मेथीची, …..माझ्या प्रीतीची. |
काय शिकलात?
आज आपण मराठी उखाणे । Marathi Ukhane – मराठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female आणि मराठी उखाणे मुलांसाठी । Marathi Ukhane For Male दोन्ही पाहिले आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद

ठी उखाणे मुलींसाठी । Marathi Ukhane For Female

529 | सत्यभामेने श्रीकृष्णाची केली सुवर्णतुला, …..रावांच नाव घेते आर्शीवाद द्यावा मला. |