10 Best Marathi Kavita on Mother आईवर कविता मराठी मध्ये
नमस्कार मित्रांनो आज विषय आई आणि तिच्या अतुलनीय प्रेमावर आहे. (Marathi Kavita on Mother)
आपण आपल्या मातांवर प्रेम केले पाहिजे, जे हे पोस्ट वाचत आहे ते एक अतिमानवी व्यक्ती आहे कारण आपल्या आईचे प्रेम आपल्याला हे पोस्ट वाचण्यासाठी आणते आणि तिच्याबद्दल आपले प्रेम व्यक्त करते
स्वत: चा विचार न करता दररोज मेहनत घेत असलेल्या सर्व मातांना सलाम. Firstly (marathi kavita on mother)
आपणास यापैकी 10 कविता आवडल्यास आपल्या मित्रांसह आणि कुटूंबासह Share करा. धन्यवाद!!
1. आई
किती करावे तुझे कौतुक
शब्द अपुरे पडती माझे।
परतफेड नाही करू शकत
त्या उपकारांची तुझे ।।
अमृतवाणी मला तू
पाजीलास ग पान्हा।
जसे यशोदेच्या मांडीवर
कृष्ण बाळ तान्हा।।
गुण अवगुणांचा माझ्या
केला तू विलय।
सर्व गुन्हे माफ होती
असे तुझे न्यायालय।।
तुझ्या कुशीतली झोप
आजच्या संसारात नाही।
पुढचा जन्मही तुझ्या गर्भात मिळो
हि वाट मी पाही।।
जगावे पुन्हा पुन्हा
येऊनी तुझ्या मी पोटी।
सर्वच दुनिया तुझ्या विना
वाटे मला खोटी।।
तूच माझ्या जीवनाची
पालटलीस ग काया।
साष्टांग नमन करुनी
पडतो तुझिया पाया।। (marathi kavita on mother)
प्रेम तुझे आहे आई
या जगाहून भारी।
म्हणूनच स्वामी तिन्ही जगाचा
आई विना भिकारी।।
युवाकावी – वैभव कैलास भारंबे
2. आई म्हणजे आई असते
आई म्हणजे आई असते
तिला सर्वां गोष्टींची घाई असते
आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर असते
न केलेले प्रश्न सोडवण्यातही सक्षम असते
वेड्यासारखं वागल्यावर, ऐवढी अक्कल कशी नाही म्हटते
वळण लावण्यासाठी दोन-चार धपाटेही देते
आपण रागाने झोपी गेलो की नकळतच डोक्यावरुन हात फिरवते
स्वत:च्या वागणुकीची मनातल्या मनातच माफी मागते
गुपचुपच मित्र-मैत्रीणींसोबत सिनेमाला जायची परवानगी देते
सांगून बाहेर पडलो तरी वाट बघत असते
पोट भरलं असलं तरी घास भरत असते
आपल्याला काळजीत बघून तळमळ असते
आजारी झाल्यावर स्वत: डॉक्टर होऊन बसते
वेदनामुळे नुसत आईईई शब्द काढला की लगेच हजर असते
आपण जागे असलो तर तिची पापणी लागत नसते
फोनवर असलो तर ती आपल्याकडे लगेच कान करते
आपण खूश असलो तर कारण न जाणून घेता स्वत: ही हसते
यश मिळाल्यावर अश्रु भरलेल्या डोळ्याने भरभरुन बघते
जवळ असो वा दूर जीव आपल्यात अडकून ठेवते
मर्जीविरुद्ध किती तरी निर्णयांना प्रेमापोटी होकार देते
काही विस्टकले की वडिलांच्या तापटपणाच्या आचेपासून वाचवते
पुढल्या वेळी असे करु नको म्हणत पांघरुण घालते (marathi kavita on mother)
आपली आवड-नाआवड तिला तोंडी पाठ असते
किती जरी मोठे झालो तरी आपल्यातच गुंतलेली असते
नि:स्वार्थ प्रेम आणि नातं काय हे तिच्याकडून शिकायला मिळते
खरंच आई ही देवाहून मुळीच कमी नसते
आई म्हणजे खरंच आई असते
Kavita for mother in marathi
3. आई म्हणजे
आ म्हणजे आस्था,
ई म्हणजे ईश्वर !!
आई तू उन्हा मधली सावली…
आई तू पावसातली छत्री !!
आई तू थंडीतली शाल…
आता यावीत दु:खे खुशाल!!
आई म्हणजे मंदिराचा कळस…
आई म्हणजे
अंगणातली पवित्र तुळस !!
आई म्हणजे भजनात
गुणगुणावी अशी संतवाणी!! (marathi kavita on mother)
आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ
झाल्यानंतर प्यावं असं थंडगार
पाणी!!
आई म्हणजे वेदने नंतरची
सर्वात पहिली आरोळी -:
आ …………….ई…..
4. एक गोड नांत. (marathi kavita on mother)
आई एक नाव ..,
जगावेगळा भाव …
“आई” एक जीवन..,
प्रेमळ मायेच लक्षण…
“आई” एक श्वास..,
जिव्हाळ्याची रास…
“आई” एक आठवण..,
प्रेमाची साठवण…
“आई” एक वाट..,
आयुष्यातील सर्वात पहिली गाठ…
“आई” एक गोड नांत..,
बहरणारया जीवनाची हिरवी पात…
“आई” एक.. न संपणारी ठेव..,
जीवापाड जपणारी एकमेव…
“आई” एक घर..,
वात्सल्याची सर…
“आई”…नेहमी तुझ नाव घेताना
नेहमी येतो मला हुंदका..,,
तू दिलेल्या जिवनाच ऋण
फेडू शकेल मी का…(marathi kavita on mother)
Poem for mother in marathi
5. माझं दैवत घरात
आई …वेगळीच असते.
डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते.
डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते.
डोळे वटारून प्रेम करते, ती पत्नी असते.
आणि…
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते.
खरच… आई किती वेगळी असते.
माझं दैवत घरात
माझं दैवत उभं
माझ्याच घरात,
आयुष्यभरासाठी
‘आशीर्वाद’ देण्यास.
माझ्या मना
काहीच कळेना,
विसर मनाला
लागलो वारीला.
वारी-वारी करून
झालो मी बारीक,
खर्चुनी घरचं धन
लागली मनास सल.
सुखाच्या मी शोधात
कपाळी बुक्का लावत
माझं दैवत घरात
मी निघालो वारीत.
देहू-आळंदी झाले
पंढरी झाली-काशीलाही गेलो
मिसळलो मी वारीत
गुलाल खोबरे उधळत.
उशिराने कळुनी
चुकले मनास
‘वैभवाचं मंदिर’
त्यावर कळस.
‘तुळशीसम’ प्रसन्न
सगळीकडं सहभाग,
सुखदुखात सोबत
“मना हिरवं रोपटं”.
आली दाटुनी
नयनी आसवे,
मन माझे
पोरके झाले.
होतं घरीच दैवत
मी निघत वारीत,
मी निघत वारीत
माझं दैवत घरात.(marathi kavita on mother)
6. आई
कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई
आकांत श्वासांत , शांतता कुजबुज टाळे माझे ..आई
ना शुन्य आसपास, काळोख मावळे माझे ..आई
असेल – आहे – असणार, कुणी शब्द गाळले माझे ..आई
अपराध असा परमेशाचा, का? तेज लोपती माझे ..आई
अभेद्य चौकट अश्रुंची, चित्र पुराणे माझे ..आई
कुणीच नाही माझे ..आई
करूणेचे तळहात पोरके ..आई.
7. ती आई
ती फ़क्त आईच..! सकाळी दोन धपाटे घालुन
उठवते..ती आई !! उठवल्यावर
आवडता नाश्ता समोर …मांडते..
ती आई !! नाश्ता नाही होतो तोच
डब्याची चिंता सुरु करते.. ती आई !! काय
करीन ते घेउन जा म्हणताना सगळ
आवडीचे करते.. ती आई !! पदराला हात पुसत
सांभाळुन जा म्हणते..
ती आई !! परतीची आतुरतेने वाट बघत असते..
ती आई !! आपण झोपत नाही तोवर
जागी असते..
ती आई !! आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य
अपूर्ण.. ती फ़क्त आईच..!
ती फ़क्त आईच..!!
Marathi Kavita Aai Sathi
8. छाया
प्रेम तुझं हे एक मोठे आकाश ,काळोखात आहे तू
माझा प्रकाश,
जमिनी एवढी तुझी माया, उन्हा मधली तू
छाया,
दाखवले तू मला जग हे, रंगीन नऊ महिने
सांभाळले तू मला सहून वेदना कठीण,
शिकवले तू जगायला मला कशे फेडू मी तुझे
उपकार,
घेऊन जन्म हजारो सुद्धा भेटणार
नाही तुझ्यासारखी आई,
तिन्ही त्रिकाळ केले असतील मी बरेच पुण्य जे
आलो जन्माला पोटी तुझ्या,
जन्म घेऊन मी झालो धन्य ,सदा चरणी राहीन
मी आई तुझ्या …….!
9. आयुष्य
बाप एक निमित्त असतो;
आपल्या जन्मासाठी;
तर आई एक माध्यम असतं;
परमेश्वराच्या गोड स्वप्नातून जन्मलेलं.
आईच्या श्वासावर तरतो आपण;
आईच्या घासावर जगतो आपण;
एवढं सगळं होउनसुद्धा;
बापावरच्या अन्यायबद्दल बोलतो आपण.
आयुष्यभर बापाच्या नावाची;
पाटी आपण लावतो;
पण कधिही चटका बसल्यावर;
आईचीच आठवण काढतो.
आपल्या सगळ्या संकटांच उत्तरं;
आईजवळ तात्काळ असतं;
बाप बजावतो कर्तव्य फक्त;
त्याला बाकी काही देणं नसतं.
तसं बघितलं तर आई;
आपल्या गाविही कधी नसते;
पण बापापेक्ष्या आईच तुमच्यासाठी;
श्वासास्वासागणिक झुरते.
तुमच्या प्रत्येक दुखाःसाठी;
आईच्या डोळ्यात अश्रू असतो;
बाप मात्र समाजाच्या भीतिने;
आयुष्यभर कोरडच राहतो.
बाप कधी चांगला असतो;
नियमाला अपवाद असल्यासारखा;
पण आयुष्य नियमांनी जगायचं असतं;
अन अपवाद फक्त अभ्यासायचे असतात…
10. अशी ती आई
जन्म देऊनी केले न फिटणारे उपकार
अशी ती आई,
इवलेसे बोट धरून चालायला शिकवले,
जिच्या पदरात आपण बालपण घालवले,
जिच्या दुधाचे ऋण कोणीच फेडू शकत नाही,
अशी ईश्वराचा साक्षात रूप म्हणजे आई,
आभाळापेक्षा उंच जिची माया,
सागराहूनही खोल जिचे प्रेम,
ताऱ्यांपेक्षा अगणित जिचे उपकार,
बाळाचं रडणे ऐकून सुसाट धावत जी जाई,
अशी न संपणारा प्रेमाचा सागर म्हणजे आई..
स्वतः खेळणं बनून अंगाखांद्यावर खेळवले,
हात पकडून अ आ इ ई गिरवायला जिने
शिकवले,
उत्तम संस्कार जिच्यामुळे लाभले,
प्रेमाने पाठ थोपटून गाते जी अंगाई,
अशी दयाची घागर म्हणजे आई…
जिच्या प्रेमाचा कुठेच मोल नाही,
जिच्या आशिर्वादापेक्षा काहीच अनमोल
नाही,
जशी वासराला प्रेमाने चाटते त्याची गाय,
तशी प्रत्येक लेकराला सांभाळते त्याची माय,
कळ लागताच तोंडून निघणारा शब्द म्हणजे
आई…
नजर न लागावी म्हणून काजळ लावणारी आई
असते,
चिमणी कावळ्याची गोष्ट सांगून घास
भरवणारी आई असते,
अपूर्ण असलेला घरचा अभ्यास पूर्ण
करणारी आई
असते,
शाळा सुटल्यावर आतुरतेने आपली वाट
पाहणारी आई असते…
एकटेपणात येणारी आठवण म्हणजे आई,
कधी लाडाने माझा सोन्या म्हणणारी आई
असते,
तर कधी चुक्यांवर रागावणारी आई असते,
आपल्या दु:खात रडणारी सुखात हसणारी आई
असते,
पावसात भिजून आल्यावर पदराने डोकं
पुसणारी आई असते,
जिचा महिमा लिहिण्यास आकाशही कमी पडेल
अशी साठवण म्हणजे आई…
वरील कवितेत लिहिलेल्या ओळींमध्ये आपल्याला आईच्या प्रेमाची अनुभूती झालीच असेल, आणि आईच्या प्रेमाची बरोबरी या जगात कुठेही होऊ शकत नाही हे या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छित आहे, आईच प्रेम हे इतरांच्या प्रेमापेक्षा खूप मौल्यवान असतं, प्रत्येकाच्या नशिबात हे प्रेम असतं असे नाही आपण खूप नशीबवान आहोत आपल्याला आईच प्रेम मिळालं आहे.
माझ्या सारख्या पामराने आई वरती लिहिलेली हि कविता (Aai Kavita in Marathi) सर्व मातांना समर्पित. आणि आपल्याला लिहिलेली कविता आवडल्यास या कवितेला आपल्या आई सोबत शेयर करा आणि त्यावर आईचा प्रतिसाद काय आला त्या प्रतिसादाला आमच्यासोबत शेयर करायला विसरू नका,